Maharashtra

Nashik

CC/3/2015

Shankar Sahadu Londhe - Complainant(s)

Versus

Chairman, Suhas Dwakranath Kande Bhairavnath Nagari Co-op Patsanstha - Opp.Party(s)

Keshav Santu Shelke

24 Mar 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum
Collector Office Compound
Nashik
 
Complaint Case No. CC/3/2015
 
1. Shankar Sahadu Londhe
Near Sandip Dhaba, Nashik Pune Road, Sinner Tal Sinner
Nashik
Maharashtra
2. Gangubai Shankar Londhe
Near Sandip Dhaba, Nashik Pune Road, Sinner Tal Sinner
Nashik
Maharashtra
3. Sudam Shankar Londhe
Near Sandip Dhaba, Nashik Pune Road, Sinner Tal Sinner
Nashik
Maharashtra
4. Balu Shankar Londhe
Near Sandip Dhaba, Nashik Pune Road, Sinner Tal Sinner
Nashik
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Chairman, Suhas Dwakranath Kande Bhairavnath Nagari Co-op Patsanstha
Krushna chintan, Nashik Pune Road, Sinner Tal. Sinner
Nashik
Maharashtra
2. Abhijit Tukaram Dighole
Krushna chintan, Nashik Pune Road, Sinner Tal. Sinner
Nashik
Maharashtra
3. Hemantsheth Narayan Naik
Krushna chintan, Nashik Pune Road, Sinner Tal. Sinner
Nashik
Maharashtra
4. Bandunana Damodar Naik
Krushna chintan, Nashik Pune Road, Sinner Tal. Sinner
Nashik
Maharashtra
5. Prakash Murlidhar Nanavare
Krushna chintan, Nashik Pune Road, Sinner Tal. Sinner
Nashik
Maharashtra
6. Sunil Phulchand Ranmale
Krushna chintan, Nashik Pune Road, Sinner Tal. Sinner
Nashik
Maharashtra
7. Ramkrushna Kondaji Shevale
Krushna chintan, Nashik Pune Road, Sinner Tal. Sinner
Nashik
Maharashtra
8. Ramdas Khandu Sanap
Krushna chintan, Nashik Pune Road, Sinner Tal. Sinner
Nashik
Maharashtra
9. Balkrushna Mulridhar Vetale
Krushna chintan, Nashik Pune Road, Sinner Tal. Sinner
Nashik
Maharashtra
10. Govindrao Yadavrao Sabale
Krushna chintan, Nashik Pune Road, Sinner Tal. Sinner
Nashik
Maharashtra
11. Anjali Ashutosh Rathod
Krushna chintan, Nashik Pune Road, Sinner Tal. Sinner
Nashik
Maharashtra
12. Yogita Bharat Shevale
Krushna chintan, Nashik Pune Road, Sinner Tal. Sinner
Nashik
Maharashtra
13. Ashok Ramji Varandal
Krushna chintan, Nashik Pune Road, Sinner Tal. Sinner
Nashik
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M. S. Sonawane PRESIDENT
 HON'BLE MRS. Prerana Kalunkhe Kulkarni MEMBER
 HON'BLE MR. K. P. Jadhav MEMBER
 
For the Complainant:Keshav Santu Shelke, Advocate
For the Opp. Party:
ORDER

                                            

 (निकालपत्र मिलिंद सा.सोनवणे, अध्‍यक्ष यांनी पारीत केले)

नि का ल प त्र

पारित दिनांकः24/3/2015

        तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 (यापुढे संक्षेपासाठी ‘ग्रा.स.कायदा’) कलम 12 नुसार प्रस्‍तूत तक्रार दाखल केलेली आहे.

2.    तक्रारदाराचे म्‍हणणे थोडक्‍यात असे की, त्‍यांनी सामनेवाल्‍यांकडे पतसंस्‍थेत मुदत ठेवीत खालील प्रमाणे रकमा ठेवलेल्‍या आहेत.

अ.क्र.

ठेवपावती क्र.

ठेव रक्‍कम

देय रक्‍कम

ठेव दिनांक

देय दिनांक

1.

20228

2,00,000/-

2,22,000/-

03/10/2013

03/10/2014

2.

20324

2,00,000/-

2,22,000/-

25/10/2013

25/10/2014

3.

20227

2,00,000/-

2,22,000/-

03/10/2013

03/10/2014

4.

20325

2,00,000/-

2,22,000/-

25/10/2013

25/10/2014

5.

20322

2,00,000/-

2,22,000/-

25/10/2013

25/10/2014

6.

20321

2,00,411/-

2,22,456/-

18/10/2013

18/10/2014

7.

20323

2,00,000/-

2,22,000/-

25/10/2013

25/10/2014

8.

20226

2,00,000/-

2,22,000/-

03/10/2013

03/10/2014

 

3.    तक्रारदाराचे असेही म्‍हणणे आहे की, वरील मुदत ठेवीची मुदत संपल्‍यानंतर त्‍यांनी सामनेवाल्‍यांकडे पैशांची मागणी केली. मात्र सामनेवाल्‍यांनी त्‍यांना पैसे दिले नाहीत. संस्‍थेची आर्थिक परिस्थिती खालावण्‍यास सर्व सामनेवाले जबाबदार असल्‍याने ते वरील पैशांच्‍या परताव्‍यासाठी वैयक्‍तीक व संयुक्‍तीक जबाबदार आहेत. त्‍यामुळे वरील ठेवीची एकूण रक्‍कम रु.17,86,456/- व्‍याजासह मिळावी. शारीरीक व मानसीक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- मिळावा, अशा मागण्‍या तक्रारदाराने मंचाकडे केलेल्‍या आहेत.

4.    तक्रारदाराने तक्रार अर्जाच्‍या पुष्‍ठयर्थ दस्‍तऐवज यादी नि.5 लगत मुदत ठेव पावतींच्‍या सांक्षाकित प्रती दाखल केलेल्‍या आहेत.

5.    सामनेवाले प्रस्‍तूत तक्रारी कामी हजर झाले नाहीत म्‍हणून त्‍यांचेविरुध्‍द प्रस्‍तूत तक्रार एकतर्फा चालविण्‍यात आली.

6.    तक्रारदारातर्फे वकील अॅड.शेळके यांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकण्‍यात व विचारात घेण्‍यात आला.

7.    निष्‍कर्षांसाठीचे मुद्दे व त्‍यावरील आमचे निष्‍कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.

                मुद्दे                                                   निष्‍कर्ष

  1. सामनेवाला यांनी तक्रारदारांना मुदत

          ठेवींमधील रक्‍कम परत न करुन

           सेवेत कमतरता केली काय?                              होय.

  1. प्रस्‍तूत केसमध्‍ये सामनेवाला पतसंस्‍थेचे

          चेअरमन, व्‍हा.चेअरमन, संचालक यांना 

          जबाबदार धरता येईल काय?                               होय.

  1. आदेश काय?                                                    अंतीम आदेशाप्रमाणे

का  र  ण  मि  मां  सा

मुद्दा क्र.1 बाबतः

8.    तक्रारदाराने आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठयर्थ दस्‍तऐवज यादी नि.5 लगत मुदत ठेव पावती क्र.20228, 20324, 20227, 20325, 20322, 20321, 20323, 20226 च्‍या साक्षांकित प्रती दाखल केलेल्‍या आहेत. सदर मुदत ठेवीतील देय रक्‍कमा मुदत संपल्‍यावर अनेकवेळा मागूनही परत केलेल्‍या नाहीत, ही बाब तक्रारदार यांनी शपथेवर सांगितलेली आहे. सामनेवाल्‍यांनी ती बाब हजर होवून आव्‍हानित केलेली नाही. सदर बाब त्‍यांना मान्‍य असल्‍यामुळेच त्‍यांनी आव्‍‍हानित केलेली नाही, असा प्रतिकूल निष्‍कर्ष काढण्‍यास आम्हास पुरेसा वाव आहे. कोणतीही बँक अथवा पतसंस्‍था मुदत ठेवीत ठेवलेली रक्‍कम मुदत ठेवीची मुदत संपल्‍यानंतर व ठेवीदाराने मागितल्‍यावर लगेच परत करण्‍यास कायदेशीर जबाबदार आहेत.  त्‍यामुळे प्रस्‍तूत केसमध्‍ये ठेवीदारांना वर नमूद प्रमाणे रक्‍कमा न देवून सामनेवाला यांनी सेवेत कमतरता केलेली आहे, असे आमचे मत आहे. यास्‍तव मुद्दा क्र.1 चा निष्‍कर्ष आम्‍ही पतसंस्‍था व सामनेवाला क्र.1 ते 12 यांच्‍या बाबतीत होकारार्थी व सामनेवाला क्र.13 यांच्‍या बाबतीत नकारार्थी देत आहोत.

मुद्दा क्र.2 बाबतः

9.    प्रस्‍तुत केसमध्‍ये आता सामनेवाला पतसंस्‍था व सामनेवाला क्र.1 ते 12 यांची काय जबाबदारी ठरते, असा आमच्‍या समोरील प्रश्‍न आहे.  नोंदणीकृत पतसंस्‍था ही कायदेशीर व्‍यक्‍ती आहे.  तिचे संचालक व सभासद हे पतसंस्‍था या कायदेशीर व्‍यक्‍तीपेक्षा भिन्‍न असतात. म्‍हणजेच पतसंस्‍थेने केलेल्‍या अनधिकृत/बेकायदेशीर कृतीसाठी सभासद व संचालक यांना जबाबदार धरता येत नाही. त्‍यामुळे पतसंस्‍था व सभासद यांच्‍यात एक संरक्षणात्‍मक पडदा(Corporate or Co-operative Veil) असतो, असे कायद्याच्‍या परिभाषेत समजले जाते.  अशा प्रकारचे संरक्षण मिळण्‍यासाठीच नोंदणीकृत कंपनी अथवा सहकारी संस्‍था स्‍थापन केल्‍या जातात.  मात्र सभासद व संचालक यांना वरील संरक्षण ते जर संस्‍थेच्‍या हितासाठी काम करीत असतील तरच मिळत असते.  ज्‍यावेळी त्‍यांच्‍या पतसंस्‍थेने दिलेल्‍या संरक्षणाचा गैरवापर सभासद अथवा संचालकाकडून केला जातो, त्‍यावेळी हा संरक्षणात्‍मक पडदा दूर सारुन त्‍यांना पतसंस्‍थेच्‍यासाठी वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार धरण्‍याचे अधिकार न्‍यायालयांना असतात. मा.उच्‍च न्‍यायालय, मुंबई यांच्‍या व्दिसदस्‍सीय पिठाने मंदाताई पवार विरुध्‍द महाराष्‍ट्र शासन व इतर रिट पिटीशन नं.117/2011, दि.3/5/2011 यात देखील सदर संरक्षणात्‍मक पडदा ग्राहक न्‍यायालय दुर सारुन  चेअरमन/व्‍हा.चेअरमन/ संचालक यांना योग्‍य अशा परिस्थितीत जबाबदार धरु शकतील, असा निर्वाळा दिलेला आहे.

10.   वरील पार्श्‍वभुमीवर आशिष बिर्ला विरुध्‍द मुरलीधर राजधर I(2009) C.P.J. 200 N.C. या केसमध्‍ये मा.राष्‍ट्रीय आयोगाने जिल्‍हा मंचाने संरक्षणात्‍मक पडदा दुर सारत संचालकांना दोषी धरण्‍याचा जिल्‍हा मंचाचा आदेश उचित ठरविलेला आहे. त्‍यातील निर्वाळा प्रस्‍तुत केसला लागु होतो, असे आमचे मत आहे.  त्‍यामुळे पतसंस्‍थेमध्‍ये संचालक मंडळाने केलेल्‍या अफरातफरी, गैरव्‍यवहार व घोटाळे या मुळे जर ठेवीदारांना त्‍यांचे हक्‍काचे पैसे मुदत ठेवीची मुदत उलटल्‍यानंतरही परत मिळत नसतील, तर संरक्षणात्‍मक पडदा बाजूस सारुन संचालक मंडळ जबाबदार ठरते, असे आमचे मत आहे. यास्‍तव मुद्दा क्र.2 चा निष्‍कर्ष आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

मुद्दा क्र.3 बाबतः

11.   मुद्दा क्र.1 व 2 चे निष्‍कर्ष स्‍पष्‍ट करतात की, सामनेवाला पतसंस्‍था व सामनेवाला क्र.1 ते 12 यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्र. 20228, 20324, 20227, 20325, 20322, 20321, 20323, 20226  ची मुदत संपल्‍यानंतर त्‍या ठेव पावतीतील देय रक्‍कमा मागूनही परत केलेल्‍या नाहीत.  सदर बाब सेवेतील कमतरता ठरते. त्‍यामुळे सामनेवाला पतसंस्‍था व सामनेवाला क्र.1 ते 12 यांच्‍याकडून वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार सदर रक्कमा व्‍याजासह परत मिळण्‍यास पात्र आहेत. तक्रारदार हे त्‍यांच्‍या हक्‍काचे पैसे न मिळाल्‍यामुळे झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.7000/- सामनेवाला पतसंस्‍था व सामनेवाला क्र.1 ते 12 यांच्‍याकडून वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या मिळण्‍यास पात्र आहेत, असे आमचे मत आहे.  सामनेवाला क्र.13 हे सरव्‍यवस्‍थापक असून त्‍यांची पतसंस्‍थेत पतसंस्‍था व संचालक मंडळ सांगेल ते काम करणे एवढीच जबाबदारी आहे. त्‍यामुळे सामनेवाला क्र.13 यांचेविरुध्‍दची तक्रार रद्द करणे उचित होईल, असे आम्‍हास वाटते. यास्‍तव मुद्दा क्र.3 च्‍या निष्‍कर्षापोटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

                             आ  दे  श

  1. सामनेवाला पतसंस्‍था व सामनेवाला क्र.1 ते 12 यांना आदेशीत

करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीक रित्‍या खालील तक्‍त्‍यात नमूद ठेवपावतींच्‍या देय रक्‍कमा देय तारखेपासून प्रत्‍यक्ष रक्‍कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.9% व्‍याजासह अदा कराव्‍यात.

अ.क्र.

ठेवपावती क्र.

देय रक्‍कम

देय दिनांक

1.

20228

2,22,000/-

03/10/2014

2.

20324

2,22,000/-

25/10/2014

3.

20227

2,22,000/-

03/10/2014

4.

20325

2,22,000/-

25/10/2014

5.

20322

2,22,000/-

25/10/2014

6.

20321

2,22,456/-

18/10/2014

7.

20323

2,22,000/-

25/10/2014

8.

20226

2,22,000/-

03/10/2014

 

2.    सामनेवाला पतसंस्‍था व सामनेवाला क्र.1 ते 12 यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदारांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीक रित्‍या मानसिक व आर्थीक त्रासापोटी भरपाई म्‍हणून रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम  रु.7000/- अदा करावेत.

3.    सामनेवाला क्र.13 विरुध्‍दची तक्रार फेटाळण्‍यात येते.

4.    निकालपत्राच्‍या प्रती उभय पक्षास विनामुल्‍य देण्‍यात याव्‍यात.

                               

नाशिक                                   

दिनांकः24/03/2015                               

 
 
[HON'BLE MR. M. S. Sonawane]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Prerana Kalunkhe Kulkarni]
MEMBER
 
[HON'BLE MR. K. P. Jadhav]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.