सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.64/2010
तक्रार निकाल झाल्याचा दि.21/10/2010
माधुरी वसंत कोरगावकर
वय सु.60 वर्षे, धंदा – घरकाम,
रा.वैश्यवाडा, सावंतवाडी,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) चेअरमन,
श्री प्रशांत अच्युत राजाध्यक्ष
2) व्हा.चेअरमन,
श्री मनोज गुरुनाथ नार्वेकर
3) संचालक,
श्री मेघःश्याम श्रीपाद भांगले
4) संचालक,
श्री शैलेश गुरुदास पई
5) संचालक,
श्री महेंद्र परशुराम पटेकर
6) संचालक,
श्री राजन शंकर हवळ
7) संचालक,
श्री अशोककुमार ज. गुप्ता
8) संचालक,
श्री माधव लक्ष्मण नाखरे
9) संचालक,
श्री राजेश श्रीपाद पनवेलकर
10) संचालक,
श्री सुभाष कृष्णा तावडे
11) संचालक,
श्रीम. माया शांताराम चिटणीस
वरील सर्व 1 ते 11 रा.वीर सावरकर नागरी सहकारी पतसंस्था
मर्या.सावंतवाडी, मु.पो.सावंतवाडी,
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री अनिल निरवडेकर.
आदेश नि.1 वर
(दि.21/10/2010)
1) विरुध्द पक्षाच्या वीर सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन व संचालकांनी तक्रारदाराच्या मुदत ठेवीची रक्कम, मुदत ठेवीनंतर व्याजासह परत न केल्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2) सदरची तक्रार दि.12/10/2010 ला तपासणी करुन मंचासमोर Admission hearing साठी दि.20/10/2010 ला ठेवली होती; परंतु त्या दिवशी तक्रारदार व त्यांचे वकील मंचासमोर हजर न झालेमुळे आज प्रकरण Admission hearing ला बोर्डवर घेण्यात आले.
3) दरम्यान मंचाने प्रकरणाची तपासणी केली असता सदर प्रकरणात वीर सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेला आवश्यक पार्ट असतांना देखील, पार्टी न जोडल्याचे निदर्शनास आले. तसेच तक्रारीमध्ये ज्या ठेव पावत्यांची मागणी करण्यात आली त्या ठेव पावतीचा क्रमांक चुकल्याचे दिसून आले व अन्य क्रमांकाच्या पावत्या जोडण्यात आल्याचे दिसून आल्याने मंचाने ही बाब तक्रारदाराच्या वकीलांच्या निदर्शनास आणून दिली.
4) त्यामुळे तक्रारदाराच्या वकीलांनी सदर प्रकरणात बदल करणेऐवजी सदरचे प्रकरण परत करणेसंबंधाने Withdrawal Pursis नि.5 वर दाखल केले व नवीन तक्रार परत दाखल करणेची परवानगी मागीतली. मंचाने तक्रारदाराची पुरसीस स्वीकृत करुन त्यांची विनंती मान्य केली व तक्रार प्रकरण Withdraw करणेस परवानगी दिली. त्यानुसार खालील आदेश पारीत करणेत येतात.
आदेश
1) तक्रारदाराच्या वकीलांनी नि.5 वर दाखल केलेल्या Withdrawal Pursis नुसार सदरची तक्रार Withdraw करणेची परवानगी देण्यात येते.
2) तसेच तक्रारदारास नवीन प्रकरण दाखल करणेची परवानगी देण्यात येते.
3) तक्रारदाराने प्रकरणात दाखल केलेले मुळ बचत खाते पुस्तक व मुळ कागदपत्रे त्यांना परत करणत यावेत.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 21/10/2010.
सही/- सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग