जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २११/२०१२
तक्रार दाखल दिनांक – ०१/१२/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २३/१२/२०१३
१) श्री. उदय प्रभाकर मुळे,
वय – वर्षे, कामधंदा –
२) सौ. उर्मिला उदय मुळे,
वय – वर्षे, कामधंदा –
दोन्ही हल्ली राहणार मुंबई तर्फे ज.मु.
श्री.शामकांत देविदास मुळे,
वय – ५२ वर्षे, कामधंदा – नोकरी,
रा.३९/२, श्रमवैभव, विदयानगर,
धुळे रोड, दोंडाईचा,
ता.शिंदखेडा, जि.धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
धुळे, ता.जि. धुळे.
(समन्स/ नोटीसची बजावणी मा.चेअरमन
यांचेवर करण्यात यावी) .............. जाबदेणार
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड. श्री.ए.पी. पाठक)
(जाबदेणार तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
अ.नं. |
मुदत ठेव पावती क्रमांक |
मुदत ठेवीची तारीख |
मुदत ठेव रक्कम |
मुदत ठेव देय दिनांक |
मुदती अंती मिळणारी रक्कम |
१ |
००५५११ |
०७.११.२००७ |
४०,०००/- |
०७/११/२००८ |
४४,४१२/- |
२ |
००५५१२ |
०७.११.२००७ |
४०,०००/- |
०७/११/२००८ |
४४,४१२/- |
३ |
००५५१३ |
०७.११.२००७ |
४०,०००/- |
०७/११/२००८ |
४४,४१२/- |
४ |
०११६२९ |
०७.११.२००७ |
५०,०००/- |
०७/११/२००८ |
५५,५१५/- |
५ |
०११६३० |
०७.११.२००७ |
५०,०००/- |
०७/११/२००८ |
५५,५१५/- |
६ |
१८३६ |
०८.०३.२००४ |
२५,०००/- |
०८/०९/२००९ |
५०,०००/- (दामदुपटट) |
७ |
१८३७ |
०८.०३.२००४ |
२५,०००/- |
०८/०९/२००९ |
५०,०००/- (दामदुपटट) |
८ |
२८१४६ |
२१.०५.२००५ |
०५,०००/- |
२१/०५/२०११ |
१०,०००/- (दामदुपटट) |
एकुण |
२,७५,०००/- |
३,५४,२६६/- |
१. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी जाबदेणार ‘श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे’ (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावतीत रक्कम गुंतविली होती त्याचा तपशील खालील प्रमाणे.
२. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे वरील देय रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता जाबदेणार यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडून मुदत ठेव पावतींमधील मुदतीअंती देय रक्कम रूपये ३,४५,२६६/- व त्यावरील व्याज. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रूपये ५०,०००/- आणि अर्जाचा खर्च रक्कम रूपये २५,०००/-जाबदेणार यांचेकडून मिळावा, याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
३. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ मुदत ठेव पावतींच्या छायांकित प्रती नि.१ ते ८ वर दाखल केलेल्या आहेत.
४. जाबदेणार यांना मे. मंचाची नोटीसची बजावणी होवूनही मुदतीत हजर न झालेने त्यांचे विरूध्द ‘एकतर्फा’ आदेश पारित करण्यात आला आहे.
५. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे पाहता व विद्वान वकीलानी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत काय ? होय
२. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कमतरता केली आहे काय ? होय
३. तक्रारदार हे जाबदेणार यांच्याकडून देय रक्कम
व त्यावरील व्याज मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
४. तक्रारदार हे जाबदेणार यांच्याकडून मानसिक
त्रास व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम वसुल होऊन
मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
५. अंतिम आदेश ? खालीलप्रमाणे विवेचन
६. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव पावतींच्या छायांकित प्रती नि.१ ते ८ वर दाखल केलेल्या आहेत. जाबदेणार यांनी तक्रारदार यांची मुदत ठेव पावतींमधील रक्कम नाकारलेली नाही. मुदत ठेवपावतींमधील रक्कमेचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये रक्कम गुंतविली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे गुंतवलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही जाबदेणार यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मुदतठेव पावतींमधील व्याजासह होणारी रक्कम जाबदेणार यांच्याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार पतसंस्था श्री समर्थ सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे यांचेकडून मुदतठेव पावतींमधील मुदतीअंती एकूण देय रक्कम रूपये ३,४५,२६६/- सदर आदेश तारखे पासून संपूर्ण रक्कम फीटेपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्के दराप्रमाणे व्याजासह, अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.३ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा क्र.४- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदतठेव पावतींमधील व्याजासह होणारी रक्कम जाबदेणार यांच्याकडुन परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना जाबदेणार पतसंस्था श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे जाबदेणार यांच्या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुदद क्रं.४ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा क्र.५- वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. जाबदेणार श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे यांनी, सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात.
(१) मुदतठेव पावतींमधील मुदतीअंती असलेली देय रक्कम रूपये ३,४५,२६६/- (अक्षरी रूपये तीन लाख पंचेचाळीस हजार दोनशे सहासष्ठ मात्र) व या रकमेवर देय दिनांकापासुन द.सा.द.शे. ६ टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत व्याज दयावे.
(२) मानसिक त्रासापोटी रक्कम रू.१,०००/- (अक्षरी रूपये एक हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.५००/- (अक्षरी रूपये पाचशे मात्र) दयावेत.
३. वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक/अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्थेचा कारभार पाहात असतील त्यांनी करावी. तसेचक्र.२मधीलरकमेपैकीकाहीरक्कम अगर व्याज दिले असल्यास, त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
धुळे.
दि.२३/१२/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.