सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्र.37/2009
कु.प्रथमेश जगन्नाथ खोरजुवेकर
वय वर्षे 19, धंदा शिक्षण
तक्रारदातरर्फे कुलमुखत्यारी
श्री दत्तप्रसाद मनोहर महाजन
वय वर्षे 38, धंदा – व्यापार
दोघेही रा.बांदा, ता.सावंतवाडी,
जिल्हा सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) सातेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
साटेली भेडशी तर्फे सरव्यवस्थापक
श्री लक्ष्मण पांडूरंग मोरजकर
वय- सज्ञान, धंदा- नोकरी
2) सातेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
साटेली भेडशी तर्फे चेअरमन
श्री कृष्णा पांडूरंग मोरजकर
वय – सज्ञान, धदा – व्यवसाय
दोन्ही रा.भेडशी, ता.दोडामार्ग, जि.सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष. गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फेः - तक्रारदातरर्फे कुलमुखत्यारी श्री दत्तप्रसाद मनोहर महाजन
विरुद्धपक्षातर्फे - व्यक्तीशः
- आदेश निशाणी 1 वर –
(दि.07/07/2010)
1) मंचाने तक्रार क्रमांक 42/2009 मध्ये पारीत केलेल्या निकालपत्रातील आदेशाची विरुध्द पक्षाच्या पतसंस्थेने अंमलबजावणी न केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 27 अंतर्गत सदरचे दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
2) सदर दरखास्तीचे नोटीस विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना बजावण्यात आले. त्यानुसार विरुध्द पक्षाने मंचासमोर हजर होऊन वैयक्तिक जातमुचलका दिला. त्यामुळे मंचाने पर्सनल बॉंडवर विरुध्द पक्षाची मुक्तता केली.
3) दरम्यान तक्रारदाराचे कुलअखत्यारी असलेले श्री दत्तप्रसाद मनोहर महाजन हे आज मंचासमोर हजर झाले व सदर दरखास्त प्रकरणातील तक्रारदार नामे प्रथमेश जगन्नाथ खोरजुवेकर याचे दि.10/06/2010 रोजी अपघाती निधन झाल्याचे स्पष्ट केले. तसेच सदरची दरखास्त निकाली करणेची विनंती नि.24 वरील अर्जाद्वारे केली.
4) मुळ तक्रारदाराचे अपघाती निधन झाल्यावर त्याचे वारस मंचासमोर आणण्यात आले नाहीत. तसेच वारस रेकॉर्डवर आणण्यासाठीची कोणतीही तजवीज करण्यात आली नाही. त्यामुळे सदरचे प्रकरण निकाली काढण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
- आ दे श-
1) सदर दरखास्त प्रकरणातील तक्रारदाराचे अपघाती निधन झाल्यामुळे त्याचे कुलअखत्यारीने दिलेल्या नि.24 वरील अर्जानुसार सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) विरुध्द पक्ष क्र.1 व2 यांचे बेलबॉंड रद्द करण्यात येतात.
3) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 07/07/2010
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-