सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्र. 36/2009
कु.हेमांगी जगन्नाथ खोरजुवेकर
वय वर्षे 20, धंदा शिक्षण
तक्रारदातरर्फे कुलमुखत्यारी
श्री दत्तप्रसाद मनोहर महाजन
वय वर्षे 38, धंदा – व्यापार
दोघेही रा.बांदा, ता.सावंतवाडी,
जिल्हा सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) सातेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
साटेली भेडशी तर्फे सरव्यवस्थापक
श्री लक्ष्मण पांडूरंग मोरजकर
वय- सज्ञान, धंदा- नोकरी
2) सातेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
साटेली भेडशी तर्फे चेअरमन
श्री कृष्णा पांडूरंग मोरजकर
वय – सज्ञान, धदा – व्यवसाय
दोन्ही रा.भेडशी, ता.दोडामार्ग, जि.सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फेः- कुलमुखत्यारी श्री दत्तप्रसाद मनोहर महाजन
विरुद्धपक्षातर्फे- व्यक्तीशः
- आदेश निशाणी 1 वर–
(दि.07/07/2010)
1) मंचाने पारीत केलेल्या मुळ तक्रार क्रमांक 43/2009 मध्ये पारीत केलेल्या निकालपत्रातील आदेशानुसार रक्कमेची अदायगी विरुध्द पक्षाच्या सातेरी नागरी सहकारी पतसंस्थेने न केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 27 अंतर्गत सदरचे दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
2) सदर दरखास्त प्रकरणाची नोटीस विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना बजावण्यात आले. त्यानुसार ते मंचासमोर हजर झाल्यामुळे त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली व सदरचे प्रकरण चौकशीसाठी मंचासमोर ठेवले असतांना विरुध्द पक्षाच्या पतसंस्थेने रक्कमेची अदायगी करणे सुरु केले व ही रक्कम तक्रारदाराने स्वीकारली. विरुध्द पक्षाने नि.24 वर मंचासमोर अर्ज दाखल करुन रक्कमेची संपूर्ण अदायगी केली असल्यामुळे प्रकरण निकाली करणेची विनंती केली.
3) दरम्यान आज तक्रारदार मंचासमोर हजर होऊन त्यांने नि.26 वर अर्ज दाखल केला या अर्जात नमूद केल्यानुसार उभय पक्षकारांमध्ये आपसी तडजोड झाली असल्यामुळे त्याला सदरची दरखास्त पूढे चालवावयाची नाही व ही दरखास्त मागे घेण्याची परवानगी मिळावी अशी विनंती केली. त्यामुळे आम्ही तक्रारदाराचे विनंतीवरुन तक्रारदाराचा अर्ज मंजूर करीत असून त्या दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराने नि.26 वर दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यात येऊन दरखास्त प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) आरोपी क्र.1 व 2 यांचे बेलबॉंड रद्द करणेत येतात.
3) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 07/07/2010
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-