मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई ग्राहक तक्रार क्रमांक – 20/2010 तक्रार दाखल दिनांक – 25/06/2010 निकालपत्र दिनांक - 04/02/2011 कुमारी रजनी वाय. इंगळे, ए/6, मेहता अपार्टमेंटस्, प्रो. अघासे पॅथ, ओएफएफ, बी.एस.रोड, दादर (पश्चिम), मुंबई 400 028. ........ तक्रारदार विरुध्द 1) चेअरमन, मेहता अपार्टमेंटस् को.ऑप.हौ.सो.लि., मेहता अपार्टमेंटस्, प्रो. अघासे पॅथ, ओएफएफ, भवानी शंकर रोड, दादर (पश्चिम), मुंबई 400 028. 2) सेक्रेटरी, मेहता अपार्टमेंटस् को.ऑप.हौ.सो.लि., मेहता अपार्टमेंटस्, प्रो. अघासे पॅथ, ओएफएफ, भवानी शंकर रोड, दादर (पश्चिम), मुंबई 400 028. 3)मेहता अपार्टमेंटस्, प्रो. अघासे पॅथ, ओएफएफ, भवानी शंकर रोड, दादर (पश्चिम), मुंबई 400 028. ......... सामनेवाले क्रं. 1 ते 3 समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ - निकालपत्र– दिनांकः 04/02/2011 द्वारा - मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ सदरहू तक्रारदारकुमारी रजनी वाय. इंगळे यांनी चेअरमन व सेक्रेटरी, मेहता अपार्टमेंटस् को.ऑप.हौ.सो.लि., व इतर यांचेविरुध्द तक्रार दाखल केली आहे. यामधे त्यांनी विरुध्दपक्ष यांचेकडून त्यांचे नांवे शेअर्स बदलून मागितलेले आहेत. तसेच नॉमिनेशन फॉर्म गहाळ केल्याबद्दल रुपये 50,000/- नुकसानभरपाई व इतर मागण्या केल्या आहेत. तक्रारदार हे सदर सोसायटीमध्ये ए/7 या सदनिकेत 1969 पासून रहात होत्या. त्यांच्या वडिलांचे दिनांक 24/08/1979 रोजी निधन झाल्यावर त्यांच्या आई श्रीमती शिला वाय. इंगळे या सोसायटीच्या सदस्या झाल्या. तदनंतर त्याही सन 2008 मधे निधन पावल्या. त्यानंतर तक्रारदार ही त्यांची मुलगी या नात्याने याच सदनिकेत रहात आहे. सोसायटीने सदस्य मरण पावल्यावर त्यांच्या लिखित नॉमिनेशप्रमाणे त्यांच्या पत्नीला सदस्या बनवून घेतले होते. तक्रारदार या सोसायटीचा मेन्टेनन्स भरत असतात, व त्या या सदनिकेत रहिवाशी आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार आईवडिलांच्या देहांतानंतर त्यांनी सोसायटीला नॉमिनेशन फॉर्म व शपथपत्र दिले होते, परंतु सोसायटीच्या कार्यकारी अधिका-यांनी तो गहाळ केला आहे, व ही सोसायटीची सेवेत कमतरता आहे त्यामुळे त्याला तक्रारदार जबाबदार नाहीत, व सोसायटीने तक्रारदार यांना वारसदार ठरवून त्यांना सदस्य बनवावे व शेअर सर्टिफीकेट त्यांच्या नांवे करुन द्यावे. तसेच तक्रारदार यांची बहिण पुणे येथे रहाते व त्यांनी तक्रारदार हिस ना हरकत प्रमाणपत्र लिहून दिलेले आहे असे म्हणणे मांडले आहे. तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष यांचेकडे सन 2007 मधे सोसायटीने दुरुस्ती उपक्रम चालू केला असतांना सिमेंट बालकनीत पडले व त्यावरुन तक्रारदार या घसरल्याने अपघात झाला व त्यांचे वैद्यकिय बिल व खर्च, मानसिक त्रास व नुकसानभरपाई तक्रारदार यांनी मागणी केली आहे तसेच ऑफीस कार्यकारी अधिका-यांविरुध्द त्यांच्या अनेक तक्रारी आहेत. 2) विरुध्दपक्ष यांनी त्यांची लेखी कैफीयत दिनांक 01/08/2010 रोजी दाखल केली आहे. यामधे त्यांनी कथन केले आहे की, या सोसायटीतील ए/7 या सदनिकेतील सदस्यांनी पत्नीच्या नांवे नॉमिनेशन फॉर्म भरला होता, त्याप्रमाणे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सदस्य बनल्या परंतु त्यांनी मात्र नॉमिनेशन फॉर्म भरला नव्हता. त्यांच्या कायदेशीर वारसाबाबत सोसायटीला काहीही कळविले नाही. तसेच तक्रारदार यांनी ऑक्युपायर म्हणून सोसायटीचा वारसाचा किंवा नॉमिनी फॉर्म भरलेला नाही. त्यामुळे सोसायटी तक्रारदार यांच्या मागणीची पूर्तता करु शकत नाही असे विरुध्दपक्ष कथन करतात. तोंडी युक्तीवादाच्या वेळेसही त्यांनी सोसायटीच्या व्यवस्थापनानुसार अशा प्रकारचा फॉर्म भरुन देण्याबाबत विनंती केली. उभयपक्षकारांची शपथपत्रे, पुरावा कागदपत्रे, लेखी कैफीयत, युक्तीवाद मंचाने पडताळून पाहिला व मंचापुढे पुढीव एकमेव प्रश्न उदभवतो. प्रश्न - तक्रारदार यांनी केलेली मागणी या मंचाच्या कार्यकक्षेत येते का? वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच नकारार्थी देत असून पुढील कारण मिमांसा देत आहेत - कारण मिमांसा तक्रारदार यांचे वडिल यशवंत इंगळे यांचे दिनांक 24/08/1979 रोजी निधन झाले, ते सदर सोसायटीचे सदस्य होते, व या सोसायटीत ए/7 या सदनिकेत कुटूंबियासमवेत रहात हाते. त्यांच्या मरणोत्तर सोसायटीने त्यांच्या पत्नीला वारस हक्काने सदस्य बनवून घेतले. वास्तविक वारस हक्काप्रमाणे पत्नी इतकाच त्यांच्या मुलामुलींचाही समान अधिकार मिळकतीवर राहतो. त्यांच्या पत्नी फक्त नॉमिनी होत्या व श्री. यशवंत इंगळे हे कोणतेही इच्छापत्र न करता निधन पावले त्यामुळे तदनंतर त्यांचे सर्व कायदेशीर वारस सोसायटीचे सदस्य म्हणून नामांकित झाले पाहिजे होते, असे मंचाच्या निदर्शनास येते. परंतु सोसायटीचे सदस्य मरण पावल्यानंतर त्यांचे नेमके कायदेशीर वारसदार किती? व कोणते? आहेत. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार या मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. त्यामुळे तक्रारदार यांची फक्त त्यांच्या नांवे शेअर सर्टिफीकेट द्यावेत क? किंवा इतर कोणते वारस कायदेशीर आहेत? किंवा ना हरकत प्रमाणपत्र रास्त होईल? किंवा नाही अशा प्रश्नांचा निर्णय हे मंच अधिकार क्षेत्राच्या मर्यादेनुसार घेऊ शकत नसल्याने तक्रारदार यांच्या मागणीबाबत हे मंच आदेश करु शकत नाही. परंतु मंचाचे कायदेशीर मत मंचाने प्रकट केले आहे तक्रारदार योग्य त्या कोर्टात दावा दाखल करु शकतात म्हणून हे मंच पुढील अंतिम आदेश पारीत करीत आहेत. - अंतिम आदेश - 1) तक्रार क्रमांक 20/2010 मंचाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असल्याने रद्दबादल ठरवत आहे. 2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही. 2) 3) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी. दिनांक – 04/02/2010 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. सही/- सही/- (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई एम.एम.टी./-
| [ SMT.BHAVNA PISAL] MEMBER[HONABLE MR. JUSTICE MR.NALIN MAJETHIA] PRESIDENT | |