Maharashtra

Ahmednagar

CC/17/327

Smt. Sunita Balasaheb Sanap - Complainant(s)

Versus

Chairman, Radhakrishna Vikhe Patil Sahakari Patsanstha Ltd. - Opp.Party(s)

Adv. Aasava

02 Jan 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/327
( Date of Filing : 28 Nov 2017 )
 
1. Smt. Sunita Balasaheb Sanap
A/P Loni Budruk, Tal. Rahata
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Chairman, Radhakrishna Vikhe Patil Sahakari Patsanstha Ltd.
Hasnapur Loni, Tal. Rahata,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Adv. Aasava, Advocate
For the Opp. Party:
Dated : 02 Jan 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्‍यक्ष)

1.   तक्रारकर्तीने सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्तीने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, सामनेवाला यांनी वेगवेगळया जाहिराती, पॉपलेंट वगैरेव्‍दारे आकर्षक जाहिराती करुन या पतसंस्‍थेमध्‍ये नागरीकांनी संस्‍थेच्‍या फिक्‍स डिपॉझिट योजनेमध्‍ये ठेवी ठेवल्‍यास आकर्षक व्‍याज देण्‍याचे, ठेवी सुरक्षीत राहतील असे आमिष दाखवले होते. तक्रारकर्तीने सामनेवाला यांचेवर विश्वास ठेवून स्‍वतःची कौटूंबिक गरज भागविण्‍याकरीता पतसंस्‍थेच्‍या फिक्‍स डिपॉझीट योजनेत खालील प्रमाणे डिपॉझीट रक्‍कमा जमा केलेल्‍या आहेत.

अ.क्र.   

पावती नंबर

ठेव रक्‍कम

ठेव ठेवल्‍याची तारीख    

रक्‍कम परत देण्‍याची तारीख    

परतीची रक्‍कम

1.

152

15,000/-

12.2.2008

12.2.2017

30,000/-

2.

153

10,000/-

13.2.2008

13.2.2017

20,000/-

     तक्रारकर्तीने तक्रारीत पुढे असे कथन केलेले आहे की, वरील नमुद दाखल मुदत ठेव पावत्‍यांची मुदत संपल्‍यानंतर तक्रारर्ती यांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे मुदत ठेव रक्‍कमेची वांरवार मागणी करुनसुध्‍दा सामनेवालाने सध्‍या आमच्‍याकडे पैसे नसल्‍याने व वेगवेगळी कारणे सांगून रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. व तक्रारकर्तीस रक्‍कम परत केलेली नसल्‍याने सदर तक्रार तक्रारकतर्तीने मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

3.   तक्रारकर्तीने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवालाकडून मुदत ठेवची रक्‍कम तक्रारकर्तीला 15 टक्‍के व्‍याजासह मिळण्‍याचा आदेश व्‍हावा. तसेच तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम देऊन व नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्‍याचा आदेश पारीत व्‍हावा अशी विनंती केली आहे.

4.   तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्‍यात आली. निशाणी 8 नुसार सामनेवालास नोटीस प्राप्‍त होऊनसुध्‍दा ते प्रकरणात हजर झाले नाही. म्‍हणून दिनांक 04.07.2018 रोजी निशाणी क्र.1 वर सदर प्रकरण सामनेवालाचे विरुध्‍द एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला.

5.   तक्रारकर्तीची दाखल तक्रार, दस्‍तावेज, शपथपत्र, मुळ मुदत ठेव पावत्‍या तसेच तक्रारकर्तीतर्फे युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला व खालील निष्‍कर्षा प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

निष्‍कर्ष

6.   तक्रारकर्तीने सामनेवालकडून दिनांक 12.02.2008 व दिनांक 13.02.2008 रोजी 15,000/- व 10,000/- अशी रक्‍कम जमा केलेली आहे. व सदर रक्‍कमेची मुदत ठेव दिनांक 12.02.2017 व दिनांक 13.02.2017 रोजी संपली असल्‍याने सामनेवालाने तक्रारकर्तीला मुदत ठेव संपल्‍यानंतर 30,000/- आणि 20,000/- देण्‍यास मान्‍य केले आहे, ही बाब तक्रारकर्तीने दाखल तक्रार व मुळ मुदत ठेव पावत्‍यावरुन सिध्‍द होते. सबब तक्रारकर्ती ही सामनेवालाची ग्राहक आहे असे सिध्‍द होते. सामनेवालाने तक्रारकर्तीला वांरवार मागणी करुनही मुदत ठेव पावत्‍यावरील मुदत ठेव रक्‍कम परत केलेली नाही व सदर प्रकरणात सामनेवालास नोटीस काढूनही त्‍यांनी त्‍यांची बाजू मांडली नाही व ते प्रकरणात हजर झाले नाही. तक्रारकर्तीने दाखल निशाणी 1, शपथपत्र व दस्‍तावेजावरुन असे सिध्‍द होते की, सामनेवालाने तक्रारकर्तीकडून मुदत ठेव रक्‍कम स्विकारली व मुदत संपल्‍यानंतर ती रक्‍कम परत केली नाही. ही बाब सामनेवालाची तक्रारकर्तीप्रति अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे असे सिध्‍द होते. सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येतो.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवाला यांनी तक्रारकर्तीला मुदत ठेव पावत्‍यावरील रक्‍कम रु.50,000/- (रक्‍कम रु.पन्‍नास हजार फक्‍त) दिनांक 13.02.2017 पासून द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याजासह रक्‍कम अदाईकीपर्यंत तक्रारकर्तीला द्यावे.

3.   सामनेवाला यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.5,000/- (रक्‍कम रु.पाच हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च 500/- (रक्‍कम रु.पाचशे फक्‍त ) तक्रारकर्तीला द्यावे.

4. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

5. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

6. तक्रारकर्तीस या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.