Maharashtra

Ahmednagar

CC/17/90

Punjahari Shankar Kale Others 2, Through Balasaheb Karbhari Sanap - Complainant(s)

Versus

Chairman, Radhakrishna Vikhe Patil Sahakari Patsanstha Ltd. - Opp.Party(s)

Asava

16 Mar 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/17/90
( Date of Filing : 14 Mar 2017 )
 
1. Punjahari Shankar Kale Others 2, Through Balasaheb Karbhari Sanap
Loni Bk, Tal- Rahata,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Chairman, Radhakrishna Vikhe Patil Sahakari Patsanstha Ltd.
Hasnapur (Loni), Tal- Rahata,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Asava , Advocate
For the Opp. Party: Adv.S.B.Mundada, Advocate
Dated : 16 Mar 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – १६/०३/२०२०

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)

________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.     तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारदार क्र.१ व २ हे अशिक्षीत असून शेती व्‍यवसाय करतात व दैनंदिन उपजिविकेच्‍या कामातील व्‍यवस्‍थेमुळे ते मे. कोर्टात समक्ष हजर राहू शकत नाहीत. म्‍हणून तक्रारदार क्र.३ यांच्‍या वतीने सदर तक्रार दाखल करण्‍यासाठी मुखत्‍यार म्‍हणुन तक्रारदार क्र.३ यांना अधिकार दिले आहेत. सामनेवाले ही पतसंस्‍था असुन सदर पतसंस्‍थेमार्फत सभासदांना उद्योगधंद्यासाठी, वाहन खरेदीसाठी, घर बांधकामासाठी तसेच घरगुती कारणासाठी कर्ज पुरवठा केला जातो तसेच ठेवी गोळा करून सर्व प्रकारच व्‍यवसाय केला जातो. तक्रारदार यांनी सामनेवाले पतसंस्‍थेच्‍या फिक्‍स डिपॉझीट योजनेत खालीलप्रमाणे डिपॉझीट रकमा जमा केलेल्‍या आहेत.

अ.क्र.

ठेवीदाराचे नाव

पावती नंबर

ठेव रक्‍कम

ठेव ठेवल्‍याची तारीख

रक्‍कम परत देण्‍याची तारीख

१.

पुंजाहरी शंकर काळे

९५१

१०,९७३/-

७/१०/११

०७/१०/१३

२.

पुंजाहरी शंकर काळे

९५६

४९,०००/-

०२/०६/१२

०२/०६/१४

३.

सौ.मिराबाई पुंजाहरी काळे

९५५

४९,०००/-

०२/०६/१२

०२/०६/१४

४.

श्री.अंकुश पुंजाहरी काळे

९५४

४९,०००/-

०२/०६/१२

०२/०६/१४

     तक्रारदाराने पतसंस्‍थेकडे सदर मुदत ठेव पावतींमधील रक्‍कम परत देण्‍याबाबत वारंवार विनंती केली. परंतु सामनेवाले यांनी सध्‍या आमच्‍याकडे पैसे नसल्‍याने व वेगवेगळी कारणे सांगुन रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करत आहे. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करून तक्रारदाराचे मागणीबाबत जाणुनबूजुन निष्‍काळजीपणा केला व योग्‍य सेवा पुरवीला नाही. म्‍हणुन तक्रारदाराने सदर तक्रार मंचात दाखल केली आहे.

     तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदार यांना सामनेवाले यांचेकडुन एकुण रक्‍कम रूपये १,५७,९७३/- ही मुदत ठेवीची पावतीत नमुद केलेल्‍या या रकमेवरील व्‍याजासह तसेच मुदत ठेवीची तारीख संपल्‍यापासून रक्‍कम अदा होईपावेतो त्‍यावर व्‍यापारी चालिरीप्रमाणे १५% व्‍याजासह तक्रारदार यांना सामनेवाले यांनी अदा करण्‍याचा हुकूम व्‍हावा. तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रूपये १०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रूपये ५,०००/- सामनेवालेकडून मिळावा.  

३.   तक्रारदार यांनी तक्रारीचे पुष्‍ट्यर्थ नि.२ वर शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी ५ वर दस्‍तऐवज यादीसोबत एकुण ६ कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये ठेव पावतींचे प्रती, सहाय्यक निबंधक राहता यांना दिलेल्‍या पत्राची प्रत, सहाय्यक निबंधक सहकारी संस्‍था, राहाता यांनी सामनेवाले पतसंस्‍थेला दिलेली पत्राची प्रत दाखल आहे.

४.    त‍क्रारदारांची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली. सदर नोटीस प्राप्‍त होऊन सामनेवाले यांनी नि.१२ वर खुलासा दाखल केला आहे. यामध्‍ये त्‍यांनी असे नमुद केले आहे की, तक्रारदाराचे तक्रारीतील मजकुर खोटा व लबाडीचा असुन सामनेवाले यांना मान्‍य व कबुल नाही. पुढे वास्‍तविक खरी परिस्थितीमध्‍ये असे नमुद केले आहे की, सदर संस्‍थेवर सहकारी कायद्याप्रमाणे जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था अहमदनगर यांचे नियंत्रण आहे. अनेक ठेवीदारांनी एकदमच ठेवीची रक्‍कम मागितली म्‍हणुन सर्वांना एकाच वेळेस रक्‍कम देणे शक्‍य नाही याची माहिती ठेवीदारांना दिेलेली आहे. तक्रारदार हे सदर संस्‍थेचे सभासद असुन तक्रारदाराचा व सामनेवाला यांचा तथाकथित असलेला वाद हा सहकार कायद्यान्‍वये सहकार न्‍यायालयात उपस्थित करणे न्‍यायोचित होते. तसेच तक्रारदार हा सदर संस्‍थेचा त्‍याचे भाग भांडवलाइतका मालक असुन संस्‍थेशी कोणत्‍याही ग्राहक-मालक असा संबंध नाही. त्‍यामुळे तक्रारदाराने दाखल केलेला सदरचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायद्यानुसार चालु शकत नाही. सबब अधिकारक्षेत्राबाबतचा मुद्दा प्राथमिक स्‍वरूपात विचारात घेण्‍यात येऊन त्‍याची चौकशी होणे गरजेचे आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्‍यात यावा, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.

५.   तक्रारदाराची दाखल तक्रार, शपथपत्र, दस्‍तऐवज सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा यांचे अवलोकन केले असता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील कारणमिमंसेप्रमाणे देत आहोत.

अ.नं.

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती सेवेत त्रुटी केली आहे काय ?

होय

(३)

तक्रारदार हे सामनेवालेंकडुन नुकसान भरपाईची रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय ?

होय

(४)

आदेश काय ?

अंतिम आदेशा प्रमाणे

६.  मुद्दा क्र. (१) तक्रारदार यांनी सामनेवाले पतसंस्‍थेमध्‍ये मुदतठेव पावती क्रमांक ९५१, ९५६, ९५५ व ९५४ मध्‍ये रकमा गुंतविल्‍या होत्‍या. याबाबत ठेव पावतींच्‍या छायांकीत प्रती तक्रारदाराने निशाणी ५ सोबत दाखल केलेल्‍या आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत, हे स्‍पष्‍ट होते. म्‍हणुन मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी नोंदवण्‍यात येत आहे.

७. मुद्दा क्र. () तक्रारदार यांनी सामनेवाले पतसंस्‍थेमध्‍ये मुदतठेव पावतींमध्‍ये रक्‍कम गुंतविलेली होती. याबाबत तक्रारदाराने निशाणी ५ सोबत दाखल केलेल्‍या मुदतठेव पावतींची पडताळणी केली असता त्‍याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

ठेवीदाराचे नाव

पावती नंबर

ठेव रक्‍कम

ठेव ठेवल्‍याची तारीख

रक्‍कम परत देण्‍याची तारीख

१.

पुंजाहरी शंकर काळे

९५१

१०,९७३/-

७/१०/११

०७/१०/१३

२.

पुंजाहरी शंकर काळे

९५६

४९,०००/-

०२/०६/१२

०२/०६/१४

३.

सौ.मिराबाई पुंजाहरी काळे

९५५

४९,०००/-

०२/०६/१२

०२/०६/१४

४.

श्री.अंकुश पुंजाहरी काळे

९५४

४९,०००/-

०२/०६/१२

०२/०६/१४

    वरील मुदत ठेव पावतींमधील रकमेची मागणी तक्रारदाराने सामनेवालेकडे केली असता सामनेवाले यांनी रकमा दिल्‍या नाहीत. सामनेवाले यांनी असा बचाव घेतला की सदर संस्‍थेवर सहकारी कायद्याप्रमाणे जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था अहमदनगर यांचे नियंत्रण आहे. अनेक ठेवीदारांनी एकदमच ठेवीची रक्‍कम मागितली म्‍हणुन सर्वांना एकाच वेळेस रक्‍कम देणे शक्‍य नाही याची माहिती ठेवीदारांना दिेलेली आहे. तक्रारदार हे सदर संस्‍थेचे सभासद असुन तक्रारदाराचा व सामनेवाला यांचा तथाकथित असलेला वाद हा सहकार कायद्यान्‍वये सहकार न्‍यायालयात उपस्थित करणे न्‍यायोचित होते. तसेच तक्रारदार हा सदर संस्‍थेचा त्‍याचे भाग भांडवलाइतका मालक असुन संस्‍थेशी कोणत्‍याही ग्राहक-मालक असा संबंध नाही. तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहे हे वरील मुद्दा क्रमांक १ मध्‍ये स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यामुळे सदर बचाव ग्राह्य धरता येणार नाही. सामनेवालेने तक्रारदार यांना मुदतठेव पावतीमध्‍ये असलेली रक्‍कम तक्रारदाराला दिली नाही, म्‍हणुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्‍याप्रती न्‍युनतम सेवा दर्शविली आहे, असे सिध्‍द होते. सबब मु्द्दा क्र.२ चे उत्‍तर होकारार्थी म्‍हणून नोंदविण्‍यात येत आहे.   

८.  मुद्दा क्र. (३) तक्रारदार यांचे मुदत ठेव पावतींमधील रक्‍कम सामनेवाले यांनी दिली नाही, ही बाब वरील मुद्यात स्‍पष्‍ट झाली आहे. सदर मुदत ठेव पावतींवर देय रक्‍कम नमुद नाही. त्‍यामुळे तक्रारदार हे मुदत ठेव पावती क्रमांक ९५१, ९५६, ९५५ व ९५४ मधील ठेव रकमेवर ठेव दिनांकापासून दोन वर्षापर्यंत ९.५% व्‍याज मिळण्‍यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. तसेच सदर मुदत ठेव पावतींमधील देय रकमा सामनेवाले यांनी दिलेल्‍या नसल्‍यामुळे तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला व तक्रार अर्जाचा खर्चही करावा लागला म्‍हणून तक्रारदार हे सामनेवालेकडून वैयक्तिकरीत्‍या व संयुक्तिकरीत्‍या  शारीरिक, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रूपये ५,०००/- व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रूपये ३,०००/- मिळण्‍यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्द क्र.३ चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

९. मुद्दा क्र. (४) मुद्दा क्र.१,२ व ३ यांच्‍या विवेचनावरून आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.   

अंतीम आदेश

१.   तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

२.   सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मुदत ठेव पावती क्र.९५१ मधील ठेव रक्‍कम रूपये १०,९७३/- व त्‍यावर दिनांक ०७-१०-२०११ पासुन ९.५ % द.सा.द.शे. व्‍याज तक्रारदार यांना द्यावे.

३.   सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मुदत ठेव पावती क्र.९५६ मधील ठेव रक्‍कम रूपये ४९,०००/- व त्‍यावर दिनांक ०२-०६-२०१२ पासुन ९.५ % द.सा.द.शे. व्‍याज तक्रारदार यांना द्यावे.

४.   सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मुदत ठेव पावती क्र.९५५ मधील ठेव रक्‍कम रूपये ४९,०००/- व त्‍यावर दिनांक ०२-०६-२०१२ पासुन ९.५ % द.सा.द.शे. व्‍याज तक्रारदार यांना द्यावे.

५.  सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मुदत ठेव पावती क्र.९५४ मधील ठेव रक्‍कम रूपये ४९,०००/- व त्‍यावर दिनांक ०२-०६-२०१२ पासुन ९.५ % द.सा.द.शे. व्‍याज तक्रारदार यांना द्यावे.

६.   सामनेवाले क्र.१ ते १८ यांनी वैक्तिगत किंवा संयुक्तिकरीत्‍या तक्रारदार यांना शारीरीक मानसिक त्रासापोटी प्रत्‍येकी रूपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च  रूपये ३,०००/- द्यावे.   

७.  आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्‍य देण्‍यात यावी.

८.  सदर प्रकरणाची ‘क’ व ‘ब’ फाईल तक्रारदार यांना परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.