अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर ************************************** ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक:एपिडिएफ/130/2008 तक्रार अर्ज दाखल दिनांक: 24/06/2005 तक्रार निकाल दिनांक : 21/09/2011 श्रीयुत. कमलाकर गंगाधर दिवाकर, ..) राहणार :- 72/9 एरंडवणे, सुरुचि को.ऑप्. ..) हौसिंग सोसायटी, गुलमोहर पथ, ..) एस्.एन्.डी.टी. कॉलेजमागे, ..) पुणे – 411 004. ..). तक्रारदार विरुध्द अ) चेअरमन, मेडिनोव्हा डायगनोस्टिक ..) सर्व्हिसेस लिमिटेड, 6-3-652, कौटिल्य ..) तिसरा मजला, सोमाजीगुडा, ..) हैद्राबाद – 500 082. ..) ..) ब) ब्रँच मॅनेजर, ..) मेडिनोव्हा डायग्नोस्टिक सर्व्हिसेस ..) लिमिटेड, शिवाजीनगर, ..) जंगली महाराज रस्ता, पुणे – 411 005 ..)... जाबदार ******************************************************************* // निशाणी 1 वरील आदेश // प्रस्तूतचे प्रकरण सन 2005 मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक मंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/180/2005 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा मंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/130/2008 असा नोंदविण्यात आला आहे. प्रस्तूतच्या प्रकरणातील जाबदारांबरोबर आपली तडजोड झालेली असल्यामुळे आपण सदरहू तक्रार अर्ज मागे घेत आहोत असा अर्ज तक्रारदारांनी निशाणी 17 अन्वये मंचापुढे दाखल केला आहे. या तडजोडीच्या रकमेपोटी जाबदारांनी तक्रारदारांना पुढील तारखेचे धनादेश दिलेले आहेत याचा विचार करता धनादेशाची रक्कम न वठल्यास जाबदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतूदींअंतर्गत प्रकरण दाखल करण्याची तक्रारदारांना मुभा ठेवून सदरहू तक्रार अर्ज निकाली करण्यात येत आहे. (श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत) सदस्या अध्यक्षा अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे पुणे. दिनांक – 21/09/2011
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |