नि.27 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर वसुली अर्ज क्रमांक : 30/2010 वसूली अर्ज दाखल झाल्याचा दि.08/06/2010 वसूली अर्ज निकाली झाल्याचा दि.03/11/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या संजय विष्णू पाटील मु.पो.वनगुळे, ता.लांजा, सध्या रा.वाटूळ, ता.राजापूर, ता.लांजा, जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द साई नागरी ग्रामीण बिगरशेत सहकारी पतसंस्था मर्या. लांजा (आगरगाव) ता.लांजा, जि.रत्नागिरी करिता 1. चेअरमन, हरी शंकर सप्रे मु.पो.ता.लांजा, जि.रत्नागिरी. 2. सचिव, नुरुद्दीन अहमद सयद मु.पो.ता.लांजा, जि.रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.शिंदे सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.देसाई -: नि का ल प त्र :- तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ पुकारले असता गैरहजर. तक्रारदार यांना देय असलेली रक्कम सामनेवाला यांनी नि.14 व नि.20 अन्वये एकूण 72,076/- रुपये मंचामध्ये जमा केले आहेत व सदरची रक्कम तक्रारदार यांनी नि.16 व 23 अन्वये स्वीकारली आहे. तक्रारदार आज रोजी गैरहजर असलेने प्रस्तुत वसूली अर्ज यापूढे चालविणेत तक्रारदार यांना स्वारस्य दिसून येत नाही. सबब प्रस्तुत वसूली अर्ज निकाली करणेत येत आहे. रत्नागिरी दिनांक : 03/11/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |