जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १५/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०१/०२/२०११
तक्रार निकाली दिनांक – ३०/११/२०१२
१. सौ. मंगला महेंद्र अहिरराव
उ.व. ४५ धंदा-व्यवसाय
रा. शिवप्रसाद कॉलनी, प्लॉट नं.४०,
गोंदुर रोड, बोरसेनगर, बोर्ड समोर,
देवपुर, धुळे. ............ तक्रारदार
विरुध्द
१. श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था, धुळे.
चेअरमन,
बिपीन भैययालाल खिंवसरा
उ.वः- सज्ञान धंदाः- चेअरमन
रा. आग्रारोड, ग.नं. ४ ची बोळ,
कादरी शॉप समोर, धुळे.
२. श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था धुळे.
सचिव,
देवेंद्र गोपालकृष्ण खंडेलवाल,
उ.व. सज्ञान, धंदा-सचिव,
रा. राघव एजन्सी प्रभाकर टॉकीज, धुळे.
३. श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था धुळे.
मॅनेजर,
सुनिल श्रीकृष्ण तांदळे,
उ.व. सज्ञान, धंदा-मॅनेजर,
रा. राघव एजन्सी प्रभाकर टॉकीज, धुळे. ...........विरुध्द पक्ष
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.एस.बी. पाटील)
(विरुध्दपक्ष – गैरहजर)
निकालपत्र
मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडकेः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत बचत योजने अंतर्गत गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था, धुळे (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत बचत योजने अंतर्गत रक्कम गुंतविली होती त्याचा तपशील खालील प्रमाणे.
अ) महाविर लक्षाधिश ठेव योजना अंतर्गत दररोज ३६ महिने साठी रक्कम रूपये २००/- प्रमाणे दिनांक ०४/११/२००६ पासुन ते ११/११/२००९ पर्यंत रूपये २६,७७५/- व त्यावरील नियमाप्रमाणे ठरलेले व्याज.
ब) महाविर लक्षाधिश ठेव योजना अंतर्गत दरमहिना ३६ महिने साठी रक्कम रूपये ३००/- प्रमाणे दिनांक ३०/०३/२००७ पासुन ते १४/०९/२००९ पर्यंतचे भरलेले पसै रक्कम रूपये ७८००/- व त्यावरील नियमाप्रमाणे ठरलेले व्याज.
क) अल्पबचत योजनेअंतर्गत दिनांक ०१/०५/२००९ पासून ६ महिन्यांपर्यत दररोज
रक्कम रूपये ५०/- प्रमाणे एकुण रक्कम रूपये ४७००/- व त्यावरील नियमाप्रमाणे ठरलेले व्याज.
वरील प्रमाणे तक्रारदार यांच्या सर्व खात्यावरील रक्कम रूपये ३९,२७५/- व त्यावरील व्याज.
३. तक्रारदार यांनी गुंतवलेल्या रकमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता पतसंस्थेने रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडून सर्व खातेवरील जमा एकुण रक्कम रूपये ३९,२७५/- व त्यावरील द.सा.द.शे. १८ टक्के प्रमाणे व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रूपये १०,०००/-व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रूपये ५०००/- मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
सदर कामी तक्रारदारांनी शपथपत्र दाखल केले असून, पुराव्यासाठी ठेव पासबुकच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
४. विरुध्द पक्ष क्र.२ यांना या न्यायमंचाची नोटिस मिळाली असून त्यांच्या पोहच पावत्या प्रकरणात दाखल आहेत. तसेच विरूध्द पक्ष क्र.१ यांना पाठविलेल्या नोटीसच्या पाकीटवर ‘GONE AWAY’ व विरूध्द पक्ष क्र.३ यांना पाठविलेल्या नोटीसच्या पाकीटवर ‘सदर नावाचे इसम दिेलेल्या पत्यावर राहत नाही, सबब परत’ अशा पोस्टाच्या शे-यासह परत आले आहे. त्यामुळे ‘गांवकरी’ या वृत्तपत्रात दि.०२/०७/२०११ रोजी जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती. या जाहीर नोटीस द्वारे विरूध्द पक्ष यांना या न्यायमंचाच्या नोटिसीचे ज्ञान झाले आहे असे समजण्यात येत आहे. परंतु नोटिसीचे ज्ञान होऊनही सदर विरूध्द पक्ष हे प्रकरणात स्वतः अथवा अधिकृत प्रतिनिधी द्वारे हजर झाले नाहीत. तसेच त्यांनी स्वतःचे बचावपत्रही प्रकरणात दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांचे विरूध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश करण्यात आला आहे.
५. तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रे पाहता तसेच त्यांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकले नंतर न्यायमंचासमोर तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार हे विरूध्द पक्ष पतसंस्थेचे ग्राहक आहेत काय? होय.
२. विरुध्द पक्ष पतसंस्थेने तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
४. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
६. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी बचत योजने अंतर्गत गुंतवलेल्या रक्कमेच्या ठेव पासबुकच्या छायांकीत प्रती सादर केल्या आहेत. त्यावरुन तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत बचत योजने अंतर्गत रक्कम गुंतवली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे बचत योजने अंतर्गत गुंतवलेल्या रक्कमा परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही विरुध्द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी, बचत योजने अंतर्गत त्यांच्या सर्व खात्यावरील व्याजासह होणारी रक्कम विरूध्द पक्ष क्र.१ चेअरमन, श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था, धुळे. व विरूध्द पक्ष क्र.२ व ३ यांच्याकडून मिळावी अशी विनंती केली आहे. परंतु तक्रारदारांची बचत योजने अंतर्गत त्यांच्या सर्व खात्यावरील संपुर्ण रक्कम व्याजासह देण्यास विरूध्द पक्ष ‘श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था, धुळे’ जबाबदार आहे. असे या न्यायालयाचे मत आहे. या संदर्भात मा. मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceededagainst and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain ableagainst the society, the Directors of members of the managing committee cannot be heldresponsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To holdthe Directors of the banks/members of the managing committee of the societiesresponsible, without observing the procedure prescribed under the Act, would also beagainst the principles of co-operation, which is the very foundation of establishment ofthe co-operative societies.
वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे तक्रारदार हे श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था, धुळे यांच्याकडुन रक्कम मिळण्यास पात्र आहे. तसेच रक्कम परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था, धुळे यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था, धुळे यांच्या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते.
९. मुद्दा क्र.४ - सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था, धुळे यांनी तक्रारदार यांना खालील प्रमाणे नमुद करण्यात आलेल्या बचत योजने अंतर्गत त्यांच्या सर्व खात्यावरील व्याजासह होणारी रक्कम ठरलेल्या व्याजदरानुसार व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याज या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत. बचत योजने अंतर्गत गुंतविलेल्या रक्कमेचा तपशील खालील प्रमाणे.
अ) महाविर लक्षाधिश ठेव योजना अंतर्गत दररोज ३६ महिने साठी रक्कम रूपये २००/- प्रमाणे दिनांक ०४/११/२००६ पासुन ते ११/११/२००९ पर्यंत रूपये २६,७७५/- व त्यावरील नियमाप्रमाणे ठरलेले व्याज.
ब) महाविर लक्षाधिश ठेव योजना अंतर्गत दरमहिना ३६ महिने साठी रक्कम रूपये ३००/- प्रमाणे दिनांक ३०/०३/२००७ पासुन ते १४/०९/२००९ पर्यंतचे भरलेले पसै रक्कम रूपये ७८००/- व त्यावरील नियमाप्रमाणे ठरलेले व्याज.
क) अल्पबचत योजनेअंतर्गत दिनांक ०१/०५/२००९ पासून ६ महिन्यांपर्यत दररोज
रक्कम रूपये ५०/- प्रमाणे एकुण रक्कम रूपये ४७००/- व त्यावरील नियमाप्रमाणे ठरलेले व्याज.
वरील प्रमाणे तक्रारदार यांच्या सर्व खात्यावरील रक्कम रूपये ३९,२७५/- व त्यावरील व्याज.
३. श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था, धुळे यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.१०००/- तसेच अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.
४. वर नमुद आदेश क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस. जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.