ग्राहक तक्रार क्र. 322/2014
अर्ज दाखल तारीख : 18/12/2014
अर्ज निकाल तारीख: 17/06/2015
कालावधी: 0 वर्षे 06 महिने 0 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. जतिन पि. मनोज पाटील,
वय - 31 वर्षे, धंदा – नौकरी,
रा.घर क्र. 2/53, मारवाडी गल्ली,
हेड पोस्ट ऑफीसजवळ, उस्मानाबाद,
ता. जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेस्ट को.
ऑप. क्रेडीट सोसायटी लि. जळगांव,
व्दारा - चेअरमन / अध्यक्ष,
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेस्ट को.
ऑप. क्रेडीट सोसायटी लि.जळगांव
रा. रेयमंड चौफुली, एम.आय.डी.सी.,
अंजिठा रोड, जळगाव 425003
2. कार्यकारी व्यवस्थापक,
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेस्ट को. ऑप.
क्रेडीट सोसायटी लि. जळगांव रा. रेयमंड चौफुली, एम.आय.डी.सी.,
अंजिठा रोड, जळगांव 425003.
2. शाखा व्यवस्थापक,
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेस्ट को.
ऑप. क्रेडीट सोसायटी लि. जळगांव,
रा. मारवाडी गल्ली, महाराष्ट्र बँकेशेजारी,
उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एन.एम.तोडकरी.
विरुध्द पक्षकार क्र.1 ते 3 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा.अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दाराः
अ) 1. तक्रारकर्ता (तक) यांने विरुध्द पक्षकार (विप) क्रेडीट को ऑप.सोसायटी यांचेकडे मुदत ठेव ठेवली असताना मुदत संपल्यानंतरही रक्कम परत न देऊन सेवेत त्रूटी केली म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक ने ही तक्रार केली आहे.
2. तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पूढीलप्रमाणे आहे. तक हा उस्मानाबाद येथील रहिवाशी असून नौकरी करतो. दरमहाच्या बचती मधून रक्कम रु.1,50,000/- त्याने दि.23.08.2013 रोजी रु.50,000/- व दि.04.12.2013 रोजी रु.1,00,000/- असे विप कडे मुदत ठेव म्हणून ठेवले. पहिल्या ठेवीची मूदत दि.23.08.2014 रोजी संपली व देय रक्कम रु.56,500/-, आणि दूस-या ठेवीची रक्कम दि.04.10.2014 रोजी संपली व देय रक्कम रु.1,13,000/- झाली. अशाप्रकारे संजीवनी ठेव या योजने अंतर्गत 13 टक्के व्याज दराने ठेवलेल्या रकमेची मुदत अखेर रु.1,69,500/- एवढी रक्कम झाली. मुदत संपल्यानंतर तक ने विप कडे वारंवार रकमेची मागणी केली. तथापि, विप यांनी रक्कम दिली नाही. ऑक्टोबर-नोंव्हेंबर 2014 मध्ये व्याजासह रक्कम देण्याचे कबूल केले. शेवटी दि.01.12.2014 रोजी तक ने रकमेची मागणी केली परंतु विप ने रक्कम देण्यास असमर्थता दाखवली. तक यांचे शिक्षण इलेक्ट्रीकल व टेक्नीशियन झाले असून त्यांस पी.एच.डी. करायची आहे त्यासाठी त्यांला रकमेची गरज आहे. मात्र विप यांनी मुदत संपल्यानंतरसूध्दा रक्कम परत न देऊन सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक ने ही तक्रार दि.18.12.2014 रोजी दाखल केली.
3. तक्रारी सोबत तक ने दि.23.08.2013 रोजीची रु.50,000/- ची ठेव पावती जिची मूदत दि.23.08.2014 रोजी संपली ती हजर केली आहे. तसेच दि.04.10.2013 रोजीची ठेव पावती रु.1,00,000/- तिची मुदत दि.04.10.2014 रोजी संपली आहे ती हजर केली आहे.
ब) विप क्र.1 ते 3 यांना नोटीस बजावूनही ते हजर झाले नाही. त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश झालेला आहे.
क) तक ची तक्रार, त्यांनी दिलेली कागदपत्रे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहीली आहेत
मुद्दे उत्तर
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
ड) कारणमीमांसा
मुद्दा क्र.1 व 2 -
1. ठेव पावतीचे अवलोकन केले असता हे स्पष्ट होते की, पहिली ठेव रक्कम रु.50,000/- तक ने विप कडे दि.23.08.2013 रोजी ठेवली, तीची मुदत 365 दिवस होती व व्याज 13 टक्के दराने मिळणार होते. मुदती अंती रु.56,500/- एवढी रक्कम तक ला मिळणार होती. दूसरी ठेव पावती तक ने दि.04.06.2013 रोजी रु.1,00,000/- मुदत ठेव ठेवली तिची मुदत 365 दिवस होती. व्याज दर 13 टक्के होता. दि.04.10.2014 अखेर रु.1,13,000/- एवढी रक्कम देय होता.
2. विप यांनी या कामी कोणताही बचाव मांडलेला नाही. तक ने आपले म्हणण्याचे पूष्टयार्थ शपथपत्र दिलेले आहे. तक चा पुरावा लक्षात घेतला विप यांनी मुदत ठेवीची मुदत संपून सुध्दा तक ची रक्कम दिली नाही हे उघड होत आहे. मुदत ठेव संपल्यानंतर ठेवीदाराला रक्कम परत देणे ही विप ची जबाबदारी होती ती विप ने पार पाडली नाही म्हणजेच सेवेत त्रूटी केली आहे त्यामुळे तक अनुतोषास पात्र आहे व म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येत आहे.
1) विप क्र.1 ते 3 यांनी तक यांस मुदत ठेवीची रक्कम रु.1,59,500/- (एक लक्ष एकोणसाठ हजार पाचशे फक्त) परत द्यावेत.
2) विप ने तक यांस वरील रकमेवर व्याज तक्रार दाखल दिनांकापासून 13 टक्के दराने
रक्कम फिटेपर्यत द्यावे.
3) विप क्र.1 ते 3 यांनी तक ला तकारीचा खर्च म्हणून रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावा.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
5) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद