Maharashtra

Chandrapur

CC/21/222

Prakash Bapurao Nikhate - Complainant(s)

Versus

Chairman and Managing Director I.D.B.I. - Opp.Party(s)

S.J.Munghate

03 May 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/21/222
( Date of Filing : 06 Dec 2021 )
 
1. Prakash Bapurao Nikhate
Gurukul society,Plot no.62,Gopal nagar,Mount conment High school road,Tukum,Chandrapur,Tah.Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Chairman and Managing Director I.D.B.I.
I.D.B.I.Tower,kaf pared,Mumbai 400005
Mumbai
MAHARASHTRA
2. Registrar Industrial Development Bank of India
I.D.B.I.tower,kaf pared,Mumbai
Mumbai
MAHARASHTRA
3. K.F.I.N. Technology pvt ltd Unit IDBI bonds department
seleniam tower-b,Pplot no 31-32,financial district,Nankramguda,Gachibov,Hydrabad
Hydrabad
Telangana
4. Assistant Manager, Co-stammer care center IDBI Bank Ltd
IDBI tower,w.TC. complex,kaf paned,Mumbai
Mumbai
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 03 May 2023
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

         (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)

                  (पारित दिनांक ०३/०५/२०२३ )

 

                       

                       

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५(१) अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता हा तुकूम चंद्रपूर येथील रहिवासी असून दिनांक २८/०२/२०१७ रोजी महाराष्‍ट्र विद्युत परिषण कंपनी मर्यादित येथून सेवानिवृत्‍त झाले. तक्रारकर्त्‍याने आय.डी.बी.आय. बॅकेचा आय.डी.बी.आय. रिटायरमेंट बॉन्‍ड- १९९६ विकत घेतला होता ज्‍याचा सर्टीफीकेट क्रमांक ००४७८४८ हा असून फोलिओ क्रमांक एफ.आर.एम.बी. ०७४६१०३ हा आहे. सदर बॉन्डची इश्‍यु प्राईस रुपये ५३००/- होती व फेस व्‍हॅल्‍यु रुपये २,००,०००/- एवढी आहे तसेच सहरहू बॉन्‍डचा वेंटीग पिरेड हा २५ वर्षाचा होता अर्थात सदर बॉन्‍डचा फेस व्‍हॅल्‍यु प्रमाणे २५ वर्षानंतर म्‍हणजेच दिनांक २७/४/२०२१ च्‍या नंतर तक्रारकर्त्‍याला सदर बॉन्‍डची म्‍यॅचुरिटी रक्‍कम फेस व्‍हॅल्‍यु प्रमाणे रुपये २,००,०००/- मिळणार होती. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ४ बॉन्‍डशी संबंधीत आय.डी.बी.आय. बॅंकेचे जबाबदार व्‍यक्‍ती  आहेत. बॉन्‍डचा म्‍यॅचुरिटी पिरेड झाल्‍यानंतर म्‍हणजेच २५ वर्षांनतर तक्रारकर्त्‍याने सदरहू बॉन्‍डच्‍या नियमाप्रमाणे दिनांक २७/४/२०२१ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ ला पाठविलेल्‍या पञाप्रमाणे सदर बॉन्‍डचया फेस व्‍हॅल्‍युप्रमाणे रुपये २,००,०००/- त्‍याला देण्‍याबाबत पञ लिहले होते व सोबतच नियमाप्रमाणे त्‍याचे मुळ आय.डी.बी.आय. बॉन्‍ड सुध्‍दा इतर कागदपञासहीत विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडे पाठविला होता. सदर पञाला काहीही उत्‍तर न मिळाल्‍याने दिनांक १२/५/२०२१ रोजी वरील आशयाचे पञ विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ ला पाठविले. दिनांक ३०/०६/२०२१ रोजी सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ ला स्‍मरणपञ दिले होते व त्‍याच्‍या बॅंकेच्‍या खात्‍यात बॉन्‍डची मॅच्‍युरिटी फेस व्‍हॅल्‍यु रुपये २,००,०००/- जमा करण्‍याची विनंती केली. सदर पञाचे उत्‍तर विरुध्‍द पक्षाने दिले नाही परंतु दिनांक १२/०७/२०२१ रोजी सदरहू बॉन्‍डचे रुपये १९,७१५/- बॅंक ऑफ बडोदा, चंद्रपूर शाखा या बॅंकेत जमा केले, हे पाहून तक्रारकर्त्‍याला धक्‍का बसला कारण सदर बॉन्‍डचा मॅच्‍युरिटी पिरेड झाला असल्‍याने त्‍याचा फेस व्‍हॅल्‍यु प्रमाणे रुपये २,००,०००/- विरुध्‍द पक्षाने देणे आवश्‍यक होते. सबब तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना दिनांक २१/०८/२०२१ च्‍या पञाव्‍दारे याबाबत विचारणा केली व फेस व्‍हॅल्‍युप्रमाणे रक्‍कम द्यावी अशी विनंती केली. तक्रारकर्त्‍याच्‍या या सदर पञाला विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ ने त्‍याच्‍या दिनांक ९/९/२०२१ च्‍या पञाव्‍दारे कळविले की सदर बॉन्‍डच्‍या ‘कॉल ऑप्‍शन’ प्रमाणे मुदतीचा आधी दिलेल्‍या तारखेला सदरहू बॉन्‍डचे सर्टीफीकेट रजिस्‍ट्रार कडे सरेंडर करायचे होते. सदर पञात त्‍यांनी पुढे म्‍हटले की, कॉल ऑप्‍शनच्‍या बाबतीत तशी सूचना आघाडीच्‍या वर्तमानपञात प्रकाशित सुध्‍दा करण्‍यात आली होती. सदर कॉल ऑप्‍शनच्‍या संदर्भात        (रिडम्‍शन पेमेंट) विरुध्‍द पक्षाकडून तक्रारकर्त्‍याला पोस्‍टाव्‍दारे कधीही कळविण्‍यात आले नव्‍हते. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्ता राहत असलेल्‍या भागात वितरीत होणा-या वर्तमानपञात सुध्‍दा अशी बाब तक्रारकर्त्‍याच्‍या वाचण्‍यात आली नाही. विरुध्‍द पक्षाने ज्‍या वृत्‍तपञाचे काञण सदर पञासोबत तक्रारकर्त्‍याला पाठविले त्‍या काञणावरुन असे दिसते की, मुंबई, नाशिक तथा पूणे या विभागात वितरीत होणा-या महाराष्‍ट्र टाईम्‍स वृत्‍तपञाचे काञण आहे ज्‍यामध्‍ये बॉन्‍ड संदर्भात सूचना सन २०११ मध्‍ये देण्‍यात आली होती परंतु असे वर्तमानपञ तक्रारकर्त्‍याच्‍या नजरेखालून जाईलच याची शाश्‍वती नसते तसेच हे वृत्‍तपञ तक्रारकर्त्‍याच्‍या घरी यायला पाहिजे. तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात विरुध्‍द  पक्ष यांनी रुपये १९,७१५/- जमा केली यावरुन असे दिसते की, बॉन्‍ड  रिडीमच्‍या पहिल्‍या फेस व्‍हॅल्‍युप्रमाणे दिनांक १/८/२००० ला रुपये १०,०००/-मिळणार होते व या स्‍टेजच्‍या अनुषंगाने ही रक्‍कम जमा केलेली दिसते व प्रत्‍यक्षात माञ वृत्‍तपञ काञण २०११ चे जोडले आहे. त्‍यात रिडक्‍शन ची रक्‍कम ही बॉन्‍डप्रमाणे रुपये ५०,०००/- दाखविली आहे, यावरुन विरुध्‍द पक्ष स्‍वतः गोंधळात दिसून येत आहे. तक्रारकर्त्‍याला वरील दोन्‍ही स्‍टेजेस चे विरुध्‍द पक्षाचे तथाकथीत ऑप्‍शन मान्‍य नाही व त्‍याला कोणत्‍याही ऑप्‍शन बाबत कळविण्‍यात न आल्‍याने विरुध्‍द पक्षाने मॅच्‍युरिटी नंतरची फेस व्‍हॅल्‍यु रक्‍कम रुपये २,००,०००/- तक्रारकर्त्‍याला देणे गरजेचे आहे. तक्रारकर्त्‍याने बॉन्‍डचा मॅच्‍युरिटी पिरेड होईपर्यंत म्‍हणजेच दिनांक १/४/२०२१ पर्यंत कधीही विरुध्‍द  पक्षांना कॉल ऑप्‍शन प्रमाणे बॉन्‍डच्‍या तथाकथीत मूदतपूर्व रिडीम्‍शन बाबत पोस्‍टाव्‍दारे कळविले नव्‍हते किंवा तक्रारकर्ता राहत असलेल्‍या भागातील वितरीत होणा-या वर्तमानपञात सदर बॉन्‍ड संदर्भात पूर्व रिडीम्‍शनच्‍या बाबतीत तथाकथीत सूचना तक्रारकर्त्‍याने वाचली नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या  पाठपुराव्‍यानंतरही विरुध्‍द पक्ष यांनी बॉन्‍ड संदर्भातील क्‍लेम सेटल केला नाही. पर्यायाने विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला न्‍युनतापूर्ण सेवा दिली आहे. सबब तक्रारकर्त्‍याने आयोगासमोर सदर तक्रार दाखल केली आहे.
  3. तक्रारकर्त्‍याची मागणी अशी आहे की, विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला सदर बॉन्‍डच्‍या मॅच्‍युरिटी नंतरची फेस व्‍हॅल्‍यु रक्‍कम रुपये २,००,०००/- द्यायला पाहिजे होती परंतु त्‍यांनी केवळ रुपये १९,७१५/- एवढीच रक्‍कम बॅंकेमध्‍ये जमा केली तर उर्वरित रक्‍कम रुपये १,८०,२८५/- विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला द्यावी तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २५,०००/- देण्‍याचा आदेश व्‍हावा.
  4. तक्रारकर्त्‍याची तक्रार स्‍वीकृत करुन आयोगातर्फे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना नोटीस काढण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ते ४ हे तक्रारीत आवश्‍यक पक्ष नसल्‍याचे आयोगाचे मत असल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ते ४ यांना नोटीस काढण्‍यात आली नाही.
  5. विरुध्‍द पक्ष यांनी प्रस्‍तुत तक्रारीत उपस्थित राहून त्‍याचे लेखी उत्‍तर दाखल करुन तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील म्‍हणणे खोडून काढीत पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार बॉन्‍डची रक्‍कम मिळण्‍याबाबत केलेली असून विरुध्‍द पक्ष यांनी अटी व शर्ती नुसार सदर रक्‍कम तक्रारकर्त्‍याला दिलेली आहे. विरुध्‍द पक्ष यांनी १९९६ मध्‍ये त्‍याचा बॉन्‍ड बाजारात आणलेला होता. सदर बॉन्‍ड हा अटी व शर्तीनुसार तक्रारीत दाखल केलेला आहे. बॉन्‍ड मधील पान क्रमांक ९ मध्‍ये बॉन्‍डचे मुल्‍य अटी व शर्तीचा समावेश आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ही आय.डी.बी.आय. बॅंक लिमीटेड कंपनी १९५६ अन्‍वये नोंदणीकृत कंपनी आहे व बॅंक नियमन कायदा १९४९ च्‍या कलम (c) च्‍या अर्थाने एक बॅंकींग कंपनी आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे नोंदणीकृत कार्यालय WTC कॉम्‍प्‍लेक्‍स, कुलाबा, मुंबई व चंद्रपूर येथे लोकमान्‍य विद्यालयाजवळ इतर शाखेपैकी एक शाखा आहे. तक्रारकर्त्‍याने या प्रकरणात केलेले सर्व आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत म्‍हणून ते नाकारण्‍यात येतात. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी उत्‍तरात पुढे नमूद केले की, ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ मधील लक्षात घेऊन या आयोगालाही तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही. त्‍यामुळे ही सदर तक्रार विरुध्‍द पक्षांविरुध्‍द  खारीज करण्‍यात यावी. तक्रारकर्त्‍याला सदर तक्रार अधिकार क्षेञाच्‍या  अभावामुळे ही नाकारण्‍यात यावी असे कथन विरुध्‍द पक्ष यांनी केलेले आहे तसेच दिनांक १/८/२०२० रोजी आय.डी.बी.आय. ने कॉल ऑप्‍शनचा वापर केला त्‍या तारखेपासून तक्रारीला कारण घडले. त्‍यामुळे सदर तक्रार ही विलंबाच्‍या  कारणास्‍तवही खारीज करण्‍यात यावी. तक्रारकर्त्‍याने सदर प्रकरणात विलंब माफीचा अर्ज सुध्‍दा दाखल केलेला नाही. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याची रुपये २,००,०००/- ची मागणी नाकारलेली आहे. ऑफर दस्‍तऐवजाच्‍या बाबतीत बॉन्‍डधारकांना पैसे काढण्‍याचा पर्याय होता व आय.डी.बी.आय. कडे Redemption ऑप्‍शन होता. रिटायरमेंट  स्‍कीम सीरीज मध्‍ये प्रत्‍येक बॉन्‍डचे मुल्‍य ५३०० चे FMB0746103 होते. ऑफर दस्‍तऐवजावर नमूद केलेल्‍या तारखेवर बॉन्‍डधारकाला लवकर विमोचन पर्याय होता आणि विमोचनाच्‍या निश्‍चीत तारखेसमोर दर्शनी मुल्‍य देय होते. प्रत्‍येक ५ वर्षाच्‍या  कालावधीच्‍या शेवटी बॉन्‍डचे रिडम्‍शनची फेस व्‍हॅल्‍यु खालीलप्रमाणे होती.

Date of early redemption

Redemption Amount

01/08/2000

Rs. 10,000/-

01/12/2006

Rs. 25,000/-

01/09/2011

Rs. 50,000/-

01/06/2016

Rs. 1,00,000/-

 

            विरुध्‍द पक्षाने ५ वर्षाच्‍या कोणत्‍याही कालावधीच्‍या शेवटी बॉन्‍डची पूर्तता करण्‍याचा निर्णय घेतल्‍यास तसे एका इंग्रजी किंवा हिंदी वृत्‍तपञात बॉन्‍डची पूर्तता करण्‍याबद्दल जाहिरात दिली जाते व त्‍याबद्दलची माहिती सर्व रजिस्‍टर बॉन्‍ड धारकांना दिली जाते. वर दिल्‍याप्रमाणे ५ वर्षाच्‍या कोणत्‍याही कालावधीत बॉन्‍डधारकांना पर्याय वापरुन मुळ बॉन्‍ड प्रमाणपञासह लिखीत स्‍वरुपात सहा किंवा तीन महिण्‍यांत विरुध्‍द पक्षाला सूचित करणे आवश्‍यक असते. बॉन्‍डधारकाला सदर रक्‍कम तेव्‍हाच दिली जाते जेव्‍हा बॉन्‍डधारक वर दिलेली सूचनाप्रमाणे दिलेल्‍या कालावधीच्‍या आत विरुध्‍द पक्षाकडे द्यायला पाहिजे. विरुध्‍द पक्ष यांनी पुढे नमूद केले की, त्‍यांनी कॉल ऑप्‍शन नोटीस जारी केली होती आणि ती सर्व मुख्‍य वृत्‍तपञामध्‍ये प्रकाशित केली गेली होती त्‍या  वर्तमानपञाच्‍या प्रति दस्‍तऐवजासह प्रकरणात दाखल आहे. तसेच विरुध्‍द पक्ष स्‍टॉक एक्‍सचेंजला दिलेली नोटीस देखील सर्व नोंदणीकृत बॉन्‍डधारकांना नोटीस सारखीच आहे. विरुध्‍द पक्ष यांनी २५ वर्षाच्‍या कालावधीनंतर रुपये २,००,०००/- ची रक्‍कम भरण्‍याचे आश्‍वासन तक्रारकर्त्‍याला दिले नव्‍हते तसेच तक्रारकर्त्‍याला दिल्‍या गेलेल्‍या  बॉन्‍डवरच आय.डी.बी.आय. कडे बॉन्‍डची पुर्तता करण्‍याचे पर्याय दिले गेलेले असून त्‍यावर नमूद केलेल्‍या तारखा दिल्‍या गेल्‍या असून बॅंकेने कॉल पर्याय वापरला होता आणि तक्रारकर्त्‍याच्‍या नोंदणीकृत पत्‍त्‍यावर तसा नोटीस पाठविण्‍यात आला. त्‍याबद्दल तक्रारीत प्रत दाखल आहे. सदर कॉल ऑप्‍शन वापरल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला देय रक्‍कम अदा करावयाची होती जी विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक २२/०७/२०२१ रोजी जमा केली. दिनांक १/८/२००० रोजी रुपये १०,०००/- नुसार कॉल पर्याय वापरला गेल्‍यामुळे रुपये १०,०००/- व त्‍यावर व्‍याजाचे दायित्‍व नसतांनाही त्‍यावर व्‍याज असे एकूण रुपये १९,७१५/- तक्रारकर्त्‍याच्‍या बॅंक खात्‍यात जमा करण्‍यात आली. सबब विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याप्रति कोणतीही न्‍यनतापूर्ण सेवा दिलेली नसल्‍यामुळे तक्रार खारीज करण्‍यात यावी.

कारणमीमांसा

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार तसेच दस्‍तावेज तसेच विरुध्‍द पक्ष यांचे उत्‍तर व दस्‍तावेजचे अवलोकन केले असता उपस्थित मुद्दे व त्‍यावरील निष्‍कर्ष आणि कारणमीमांसा पुढीलप्रमाणे आहेत की तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचेकडून आय.डी.बी.आय. रिटायरमेंट बॉन्‍ड १९९६ विकत घेतला ज्‍याचा सर्टीफीकेट क्रमांक ००४७८४७ हा असून फोलीओ क्रमांक एफ.आर.एम.बी. ०७४६१०३ असा होता. सदर बॉन्‍डची इश्‍यु प्राईस रुपये ५,३००/- होती व फेस व्‍हॅल्‍यु रुपये २,००,०००/- एवढी होती. बॉन्‍डचा वेटींग पिरेड हा २५ वर्षाचा होता. तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीत म्‍हणण्‍याप्रमाणे बॉन्‍डच्‍या फेस व्‍हॅल्‍यु प्रमाणे २५ वर्षानंतर म्‍हणजेच २७/४/२०२१ च्‍या नंतर तक्रारकर्त्‍याला मॅच्‍युरिटी फेस व्‍हॅल्‍युप्रमाणे रुपये २,००,०००/- मिळणार होते ज्‍या एवजी विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक १२/०७/२०२१ रोजी रुपये १९,७१५/- तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात जमा केले. याप्रमाणे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला सेवेत न्‍युनता दिली म्‍हणून विरुध्‍द पक्षाविरुध्‍द आयोगात तक्रारकर्त्‍याने तक्रार दाखल केली. याउलट विरुध्‍द पक्ष यांनी त्‍याचे उत्‍तर व त्‍यासोबत दस्‍तावेज दाखल करुन सदर आयोगाला ही तक्रार चालविण्‍याचे अधिकार क्षेञ नसल्‍याचे नमूद करीत तक्रारकर्त्‍याची तक्रार मुदतबाह्य आहे. तक्रारीचा कारण विरुध्‍द पक्ष यांनी कॉल ऑप्‍शन दिनांक १/८/२००० रोजी केले त्‍यामुळे सदर तक्रार मुदतबाह्य असून विलंब माफीचा कोणताही अर्ज तक्रारकर्त्‍याने केलेला नाही. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक १/८/२०२० रोजी बॉन्‍डच्‍या अटी व शर्ती प्रमाणे कॉल ऑप्‍शन करुन रुपये १९,७१५/- रुपये व्‍याजासह तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात जमा केले असल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला कोणतीही सेवेत ञुटी दिली नसल्‍याचे नमूद केलेले आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचेकडून वरील नमूद बॉन्‍डची खरेदी केली व त्‍याप्रमाणे सदर बॉन्‍डची प्रत तक्रारीत दाखल आहे. सदर बॉन्‍डची इश्‍यु प्राईस रुपये ५,३००/- होती. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या बॉन्‍डचे अवलोकन केले असता डीप डिस्‍काऊंट बॉन्‍ड १९९६ च्‍या रिटायरमेंट स्‍कीम सीरीज प्रमाणे दर पाच वर्षाच्‍या शेवटी त्‍यामध्‍ये नमूद केलेल्‍या डीम्‍ड फेस व्‍हॅल्‍युनूसार बॉन्‍ड एनकॅश/रिडिम करण्‍याचा पर्याय होता जसे...

Date of early redemption

Redemption Amount

01/08/2000

Rs. 10,000/-

01/12/2006

Rs. 25,000/-

01/09/2011

Rs. 50,000/-

01/06/2016

Rs. 1,00,000/-

     त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष कंपनीच्‍या अटी व शर्तीनुसार वरील नमूद त्‍या-त्‍या तारखेला कॉल ऑप्‍शन नोटीस सर्व नोंदणीकृत बॉन्‍ड धारकाला जारी करण्‍यात आली ज्‍यात त्‍यांना विमोचन रक्‍कम सोडण्‍यासाठी बॉन्‍ड प्रमाणपञ विरुध्‍द पक्ष यांना द्यावे लागतात. त्‍याप्रमाणे त्‍याची सूचना विरुध्‍द पक्ष यांनी विरुध्‍द पक्ष कंपनीच्‍या नियमानुसार हिंदी व इंग्‍लीश वृत्‍तपञामध्‍ये प्रसारीत केली होती. सदर वृत्‍तपञ विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारीत दाखल केलेली आहेत. तसेच दिनांक २९/०४/२००९ रोजी तसे स्‍मरणपञ ही विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला पाठविल्‍याचे दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होत आहे. सबब तक्रारकर्त्‍याचे हे म्‍हणणे योग्‍य नाही की ते राहतात त्‍या विभागात तो नमूद पेपर येत नाही ही बाब ग्राह्य धरण्‍यासारखी नाही. याशिवाय विरुध्‍द पक्ष यांनी त्‍याच्‍या वेबसाईटवर सुध्‍दा सदर नोटीस प्रदर्शित करण्‍यात येऊनही तक्रारकर्ता यांनी त्‍या-त्‍या तारखेला विरुध्‍द पक्ष यांच्‍याशी संपर्क साधून कॉल ऑप्‍शन प्रमाणे रकमेचा दावा केलेला दिसून येत नाही. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी त्‍याच्‍याउत्‍तरासोबत दाखल केलेल्‍या बॉन्‍डच्‍या अटी व शर्तीनुसार जर ग्राहकाने कोणतेही कॉल ऑप्‍शन पञाव्‍दारे उत्‍तर न दिल्‍यास बॉन्‍ड संपूर्णपणे डिस्‍चार्ज होईल. त्‍यामुळे भारतीय रिझर्व्‍ह बॅंकेने जारी केलेल्‍या मार्गदर्शक तत्‍वानुसार गुंतवणूकदारांना दावा न केलेल्‍या ठेवींवर बचत बॅंक दराने व्‍याज दिले जाते. त्‍याप्रमाणे सदर प्रकरणातही तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून बॉन्‍डची खरेदी केल्‍यापासून विरुध्‍द पक्ष कंपनीच्‍या अटी व शर्ती नुसार कोणत्‍याही कॉल ऑप्‍शनला रकमेचा दावा न करता एकदम दिनांक २७/०४/२०२१ रोजी सदर बॉन्‍डच्‍या फेस व्‍हॅल्‍युप्रमाणे रुपये २,००,०००/- ची मागणी विरुध्‍द पक्ष यांना केली असता विरुध्‍द पक्ष यांनी बॉन्‍डच्‍या पहिल्‍या कॉल ऑप्‍शन ची तारीख १/८/२००० नुसार रुपये १०,०००/- आणि त्‍यावरील व्‍याजप्रमाणे रुपये १९,७१५/- रक्‍कम तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात जमा केलेले असल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याप्रती सेवेत कोणतीही न्‍युनता केलेली नाही असे आयोगाचे मत असल्‍यामुळे खालील आदेश पारित करण्‍यात येतो.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्रमांक CC/२२२/२०२१ खारीज करण्‍यात येते.
  2. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.
  3. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.