Maharashtra

Ahmednagar

CC/15/506

Rajanikant Ramesh Shevale - Complainant(s)

Versus

CEO,Flipkart Internet Pvt.Ltd. - Opp.Party(s)

Tanpure

19 Dec 2018

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/15/506
( Date of Filing : 07 Nov 2015 )
 
1. Rajanikant Ramesh Shevale
Rahuri BK.,Tal Rahuri,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. CEO,Flipkart Internet Pvt.Ltd.
447/B,First A Cross,12th Main,4th Block,Opp.B.S.N.L.Telephone exchange,Koromangala,Bengaluru 560 034
Karnatak
2. IC Executive Officer,Distributor of Flipkart Internet Pvt.Ltd.
Adarsh Chamber,1st Floor,Back Side of Nandkumar Agency,Sub-Jail Chowk,Ahmednagar-414 001
Ahmednagar
Maharashtra
3. Executive Officer & Director of Sale,Flipkart Internet Pvt.Ltd.
Ojon Manay Tech Park,56/18 & 55/09,7th Floor,Garvebhavipalya,Hosur Road,Bengaluru-560 068
Karnatak
4. Executive Officer & Director of Sale,Flipkart Internet Pvt.Ltd.
Vaishnavi Summit,Ground Floor,7th Main,Fit Road,3rd Block,Koromangala Industrial Layout,Bengaluru-560 068
Karnatak
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Tanpure, Advocate
For the Opp. Party: A.S.Gaikwad, Advocate
Dated : 19 Dec 2018
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्‍यक्ष)

1.   तक्रारकर्ता यांनी सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्ताने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ता हे सामनेवाला कंपनीचे नियमीत ग्राहक असून तक्रारकर्ता यांनी सामनेवाला यांचेकडून ब-याच वस्‍तु खरेदी केलेल्‍या असून सामनेवाला यांनी दिलेल्‍या वेळेत वस्‍‍तू तक्रारकर्तास पोहोच केलेल्‍या आहेत. तक्रारकर्ता यांनी सामनेवालाकडून दिनांक 12 डिसेंबर 2015 रोजी वस्‍तु क्र.1 “डीजी फि्लप डी सी 001 पिन टु युएसबी डाटा केबल फॉर आय फोन / आय पॅड/ आय पॉड ” व वस्‍तु क्र.2     “ कार्बन स्‍मार्ट ऐ 12 स्‍टार ” अशी खरेदी  करण्‍याची इच्‍छा दर्शविली. दोन्‍ही वस्‍तु एकत्रित खरेदी केल्‍यावर 920/- रुपयाची सुट जाहिर करण्‍यात आली होती. त्‍याप्रमाणे तक्रारकर्ताने सामनेवालाचे दोन्‍हीही वस्‍तु सामनेवालाचे संकेत स्‍थळावर जाऊन खरेदी केले व तक्रारकर्ता यांचे मित्र अश्रय पाडेकर यांचे स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्‍या खात्‍यातून इंटरनेट बँकींगव्‍दारे सामनेवालाकडे रक्‍कम अदा केली. तक्रारकर्ताला दिनांक 2 जानेवारी 2015 ला वस्‍तु क्र.2 प्राप्‍त झाली. परंतू वस्‍तू क्र.1 प्राप्‍त झाली नाही. तक्रारकर्ताने सामनेवालाकडे त्‍यांचे ग्राहक सेवा केंद्रात दुरध्‍वनीव्‍दारे तक्रार केली. सामनेवालाने सदर वस्‍तु दिनांक 3 जानेवारी 2015 पर्यंत मिळून जाईल असे आश्‍वासन दिले. त्‍यानंतर तक्रारकर्ताने वारंवार सामनेवालास दिनांक 4 जानेवारी 2015 आणि 08 जानेवारी 2015 ला वस्‍तु क्र.1 न मिळाल्‍याचे ई-मेल व्दारे कळविले. व त्‍यावर सामनेवालाने दुर्लक्ष केले. दिनांक 16 जानेवारी 2015 सामनेवालाने तक्रारकर्तास ई-मेलव्‍दारे कळविले की, वस्‍तु क्र.1 देऊ शकत नाही. सामनेवालाने तक्रारकर्ता वस्‍तूची रक्‍कम स्विकृत करुन त्‍या वस्‍तूचा उपभोग घेऊन वस्‍तु दिली नाही ही बाब अनुचित व्‍यवहार प्रथेचा अवलंब करणारी आहे. तक्रारकर्ताने सामनेवालास दिनांक 06 एप्रिल 2015 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. सामनेवालाने सदर नोटीसला उत्‍तर असे पाठविले की, सामनेवालाचे सदर वस्‍तु निर्मिती कंपनीचा सामनेवालाचा काहीही संबध नसल्‍याने नोटीसवर कोणतीही दखल घेतली नाही. सामनेवालाने तक्रारकर्ताची वस्‍तु क्र.1 ची रक्‍कम जमा करुन घेतली व वस्‍तु क्र.1 पोहचवली नाही. म्‍हणून सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्‍यात आली आहे.

3.   तक्रारकर्ताने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारकर्तास झालेल्‍या नुकसान भरपाईपोटी व मानसिक त्रासापोटी व तक्रारीचे खर्च मिळण्‍याचा आदेश सामनेवालास व्‍हावा अशी विनंती करण्‍यात आली आहे.

4.   तक्रारकर्ताची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्‍यात आली. सदरहू नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर सामनेवाला प्रकरणात हजर झाले. व निशाणी क्र.16 वर लेखी उत्‍तर दाखल केले. सामनेवाला यांनी लेखी उत्‍तरात असे कथन केलेले आहे की, सामनेवाला ही कंपनी फक्‍त लोकांना व्‍यापार करण्‍याकरीता इंटरनेटव्‍दारे फ्लॅट फॉर्म दिलेला असून त्‍यांनी ग्राहक व विक्रेता यांनी ई-कॉमर्सव्‍दारे खरेदी विक्री करण्‍याची सुविधा दिलेल्‍या असून सामनेवालांनी कलम 79 इन्‍फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी अॅक्‍ट 2002 मध्‍ये दिलेल्‍या तरतुदीनुसार संरक्षण प्राप्‍त होते. सामनेवाला कंपनी कोणत्‍याही मालाची वॉरंटी किंवा संरक्षण देत नसल्‍याने तक्रारकर्ता हे सामनेवालाचा ग्राहक नाही. तक्रारकर्ताला कुरीयर मध्‍ये असलेल्‍या वादानुसार त्‍याला माल किंवा वस्‍तू देण्‍यात आली नसून व सामनेवालाने परत त्‍याची ही वस्‍तु पाठवू शकत नसल्‍याने तक्रारकर्ताची खरेदीची ऑर्डर रद्द करण्‍यात आली व त्‍याची रक्‍कम परत करण्‍याकरीता कारवाई करण्‍यात आली व त्‍या संदर्भात तक्रारकर्ताला काहीही दिले नाही. सामनेवालाने तक्रारकर्ता यांना कोणतीही सेवेत त्रुटी दिलेली नसल्‍याने सदरची तक्रार खोटया तथ्‍यावर दाखल केलेली असून त्‍याची सदरील रक्‍कम तक्रारकर्ताचे खात्‍यात दिनांक 19 डिसेंबर 2015 ला जमा करण्‍यात आली आहे. सामनेवालाने तक्रारकर्ताला 100/- रुपयाची सुट देण्‍याबाबतही आमंत्रण केले असून तक्रारकर्ताने ही सुट घेण्‍यास नकार दिला. सदर तक्रार खोटया तथ्‍यावर दाखल केलेली असून सदर तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती करण्‍यात आली आहे.

5.   तक्रारकर्ताने दाखल तक्रार, दस्‍तावेज, उभय पक्षकाराचे दाखल शपथपत्र, सामनेवालानी दाखल केलेली कैफियत /जबाब, उभय पक्षांचे तोंडी युक्‍तीवादावरुन  मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ येतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारकर्ता हे सामनेवाला क्र.1 ते 4 चे “ग्राहक” आहेत काय.?                    

 

... होय.

2.

सामनेवाला क्र.1 ते 4 यांनी तक्रारकर्ताला न्‍युनत्‍तम सेवा दर्शविलेली आहे काय.?

 

... होय.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

 

का र ण मि मां सा

6.   मुद्दा क्र.1  – तक्रारकर्ताने सामनेवालाकडून दिनांक 12 डिसेंबर 2015 ला वस्‍तु खरेदी करण्‍याकरीता सामनेवालाचे संकेत स्‍थळावर जाऊन ऑर्डरी दिल्‍या होत्‍या. त्‍या संदर्भात तक्रारकर्ताने सामनेवालाचे खात्‍यात इंटरनेट बँकींगव्‍दारे रक्‍कम अदा केलेली आहे. तक्रारकर्ताचे वस्‍तु खरेदीचा व्‍यवहार सामनेवालास मान्‍य झाला असल्‍याने व सामनेवालाने त्‍या वस्‍तू करीता रक्‍कम स्विकारली असल्‍याने तसेच सदर वस्‍तू पोहचवण्‍यात सामनेवालाने तक्रारकर्ताला आश्वासन दिले असून यावरुन असे निष्‍पन्‍न होते की, तक्रारकर्ता हे सामनेवाला क्र.1 ते 4 यांचे कलम 2 (1) (डी) ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील दिलेल्‍या संज्ञेनुसार “ग्राहक” आहे असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

7.   मुद्दा क्र.2 – सामनेवालाने त्‍यांचे कैफियतीमध्‍ये ही बाब स्विकारलेली आहे की, कुरीयर कंपनीच्‍या अडचणीमुळे तक्रारकर्ताला वस्‍तु क्र.1 योग्‍य वेळी पोहचवण्‍यात आलेली नाही. तक्रारकर्ता याची तक्रार व शपथपत्रावरुन असे सिध्‍द होते की, सदर कुरीयरची सुविधा सामनेवालाने दिलेली असून त्‍याकरता झालेल्‍या त्रुटी योग्‍य सुविधा दिले नसल्‍याने तसेच तक्रारकर्ताचे वस्‍तु खरेदी करण्‍याची ऑर्डर रद्द करणेचे अधिकार सामनेवालास नसून तरीसुध्‍दा त्‍यांनी खरेदी करण्‍याची ऑर्डर रद्द करुन तक्रारकर्ताने सामनेवालाकडे वस्‍तू खरेदी करता रक्‍कम भरलेली आहे. ती वस्‍तू तक्रारकर्ताला पुरविलेली नाही. सबब सामनेवालाने तक्रारकर्ताप्रति न्‍युनत्‍तम सेवा दिली आहे असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

8.   मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवाला नं.1 ते 4 यांनी एकत्रितरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारकर्ता यांना झालेल्या नुकसान भरपाई व शारीरीक मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- (रक्‍कम रु.पाच हजार फक्‍त) व या तक्रारीचा खर्च रक्‍कम रुपये रु.2,500/- (रक्‍कम रुपये दोन हजार पाचशे फक्‍त) तक्रारकर्ताला द्यावे.

3.   वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला नं.1 ते 4 यांनी एकत्रितरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या या आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

4. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

5. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.