निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 11/12/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 02/04/2013
तक्रार निकाल दिनांकः- 10/12/2013
कालावधी 08 महिने. 08 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
मे.अलोक होजीयरी. अर्जदार
तर्फे प्रो.प्रा.श्रीराम परसरामजी कालाणी. अॅड.बी.आर.पेकम.
वय 60 वर्षे. धंदा.व्यापार.
शिवाजी रोड, परभणी.
विरुध्द
1 सेंट्रल पार्सल सर्व्हीस. गैरअर्जदार.
फ्लिीट ओनर्स अँड ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर,
एफ.ओ.शॉप नं. 15-1-667, गोशमहल रोड,
राव पेट्रोलपंपच्या समोर, हैद्राबाद ( आ.प्र.)
2 सेंट्रल पार्सल सर्व्हीस.
गणेश नगर, मराठवाडा प्लॉट, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा परभणी येथील रहिवाशी असून अलोक होजीयरी या दुकानाचे मालक व प्रो.प्रा. आहेत.
अर्जदाराचे म्हणणे आहे की, गैरअर्जदार ट्रान्सपोर्टची सेवा देणारी व्यवसाय करते त्याचे मुख्य कार्यालय हैद्राबाद येथे आहे व त्याची एक शाखा परभणी येथे आहे.
अर्जदाराचे म्हणणे आहे की, त्याने दिनांक 12/05/2012 रोजी लक्ष गारमेंटस् कुशल मार्केट, कोठी हैद्राबाद यांच्याकडे 20,145/- अर्जदाराच्या दुकानी लागणा-या मालाची बिल क्रमांक 199 अन्वये खरेदी केली, त्यानंतर लगेचच अर्जदार क्रमांक 1 यांचेकडे सदरचा माल परभणी येथे पाठविण्यासाठी बुक केले त्याचा LR No. 1696 आहे. त्याकरीता अर्जदाराने त्याचे भाडे 60/- रु. व हमाली रु. 2/- अशी एकूण रु. 62/- देण्यात आले. सदर LR कॉपीवर सदर माल 15 दिवसाच्या आत मिळेण असे लिहिले आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास सदरचा माल गुडस् वर टाकते वेळी अर्जदारास चार ते पाच दिवसात परभणी येथे मिळेल असे तोंडी सांगीतले. अर्जदाराने परभणी येथे येवुन सदर माल मिळण्याची 07/06/2012 पर्यंत वाट पाहिली, परंतु त्यास त्याचा गुड्सवर टाकलेला माल मिळाला नाही, म्हणून दिनांक 07/06/2012 रोजी त्याने परभणी येथे व हैद्राबाद येथे फोन करुन चौकशी केली, परंतु उडवाउडवीची उत्तरे दिली, म्हणून अर्जदाराने वकीला मार्फत गैरअर्जदारांना नोटीसा पाठविली, परंतु त्यांना नोटीसा मिळूनही त्याने उत्तर दिले नाही.
अर्जदाराचे म्हणणे आहे की,गैरअर्जदाराने आजतागायत पर्यंत अर्जदारास त्याच्या झालेल्या नुकसान मुद्दल व पार्सल बद्दल कसल्याही प्रकारची माहिती दिली नाही. व त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदाराना आदेश करावा की, गैरअर्जदाराने अर्जदारास अर्जदाराने त्यांच्याकडे टाकलेली गुड्सवर माल न मिळाले बद्दल 20,145/- रु. 12 टक्के व्याजासह परत देण्याचा आदेश करावा व तसेच अर्जदाराचे सदरचा माल न मिळालेमुळे झालेली नुकसान भरपाई म्हणून 10,000/- रु. व तक्रार अर्ज खर्चापोटी रु.5000/- देण्याचा आदेश करावा.
तक्रार अर्जापोटी नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्यासाठी नि.क्रमांक 4 वर कागदपत्रांच्या यादीसह कागदपत्रे दाखल केले आहेत. ज्यामध्ये अर्जदाराने हैद्राबाद येथे खरेदी केलेल्या मालाची नं. 1 व 2 , अर्जदाराने गैरअर्जदारास पाठविलेली नोटीस, पोस्टाची पावती, इ कागदपत्रे दाखल केले आहे.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, सदरच्या नोटीसा गैरअर्जदारास प्राप्त होवुनही ( नि.क्रमांक 7 व 8 ) मंचासमोर हजर नाहीत, त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदाराने दाखल केलेले अर्जावरुन व दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने क्रमांक 1 व 2 ने अर्जदारास सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने दिनांक 12/05/2012 रोजी लक्ष गारमेंटस् कुशल मार्केट कोठी हैद्राबाद येथून 19185/- रुपयांचा माल खरेदी केला होता, ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि. क्रमांक 11 /1 वरील पावती वरुन दिसून येते व त्याच दिवशी अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 पार्सल पाठविण्यासाठी बुक केले ज्याचा पावती नं. 1696 असा आहे. सदरचे पार्सल अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे परभणी येथे पाठवण्यासाठी केले व त्याकामी गैरअर्जदार क्रमांक 1 ने 60/- रु. व हमाली 2/- रु. असे एकूण 62/- रु. गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराकडून घेतले होते ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 11/1 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते अर्जदारास सदरचा माल गैरअर्जदाराकडू प्राप्त झाला नाही. म्हणून त्याने वकीला मार्फत दिनांक 07/06/2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना नोटीस पाठविली होती ही बाब न. क्रमांक 4/3 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते व सदरची नोटीस प्राप्त होवुन ही गैरअर्जदाराने अर्जदारास उत्तर दिले नाही, यावरुन असे दिसते की, गैरअर्जदाराचे वर्तण बेशिस्त व निष्काळजीपणाचे आहे.असे मंचास वाटते.
अर्जदाराने दाखल केलेल्या 11/2 वरील गैरअर्जदार क्रमांक 1 ने दिलेल्या पार्सल पावती वरुन हे निष्पन्न होत नाही की, अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पार्सल कशाचे होते ? परंतु याबाबत अर्जदार स्वतः मंचासमोर येवुन पुन्हा नि.क्रमांक 9 वर शपथेवर सांगतो की, अर्जदाराने हैद्राबाद त्याने दिनांक 12/05/2012 रोजी खरेदी केलेलाच माल त्याने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे त्याच दिवशी परभणी येथे पाठविण्यासाठी पार्सल दिले होते, अर्जदाराचे म्हणणे मंचास योग्य वाटते. कारण गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना मंचाची नोटीस तामील होवुनही मंचासमोर हजर नाहीत, वा गैरअर्जदाराने अर्जदारास सदर पार्सल प्रमाणे त्याने माल अदा केला, याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही, म्हणजे याचाच अर्थ असा निघतो की, अर्जदाराने दिनांक 12/05/2012 रोजी खरेदी केलेलाच माल पार्सलव्दारे परभणी येथे माल पाठवण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दिनांक 12/05/2012 रोजी दिले.व गैरअर्जदाराने आजतागायत पर्यंत अर्जदारास पार्सल दिलेले नाही.
गैरअर्जदारास मंचाची नोटीस तामील होवुनही मंचासमोर हजर नाहीत. यावरुन असा अर्थ निघतो की, अर्जदाराची तक्रार गैरअर्जदाराना अप्रत्यक्षपणे मान्य आहे.
गैरअर्जदाराने अर्जदारास अर्जदाराची दिनांक 12/05/2012 रोजी पाठवलेली पार्सल अदा न करुन अर्जदारास निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे, असे मंचास वाटते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अर्जदाराचे
पार्सल अदा न केल्यामुळे रु. 19,185/- फक्त ( अक्षरी रु. एकोणिसहजार
एकशे पंच्याएैंशी फक्त ) आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत द्यावेत.
3 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने तक्रार अर्ज खर्चापोटी 2,500/- फक्त (अक्षरी रु.
दोनहजार पाचशे फक्त ) अर्जदारास आदेश मुदतीत द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.