तक्रारदारांतर्फे अॅड काळे
जाबदेणार 1 तर्फै अॅड सुजाता तांबे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 8 नोव्हेंबर 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दिनांक 16/8/2007 रोजी मंचात पूर्वी दाखल केली होती. दोन्ही पक्षकार हजर झाले होते. मंचानी दिनांक 30/4/2009 रोजी प्रस्तूतची तक्रार नामंजुर केली. त्यानंतर तक्रारदारांनी मा. राज्य ग्राहक वाद निवारण आयोग येथे अपील दाखल केले. अपीला मध्ये मा. राज्य ग्राहक वाद निवारण आयोग यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 13[4] नुसार प्रस्तूतच्या तक्रारीमध्ये दोन्ही पक्षकारांनी अधिकचा पुरावा देऊन तक्रार मंचाने चालवावी म्हणून पाठविली होती. तक्रारदारांनी मा. राज्य ग्राहक वाद निवारण आयोगासमोर अपील प्रकरण चालू असतांना न्यू इंडिया अॅश्युरन्स कं. लि. – जाबदेणार क्र.2 यांना पक्षकार म्हणून वगळले.
2. मा. राज्य ग्राहक वाद निवारण आयोगातून पुर्नसुनावणीसाठी तक्रार आल्यानंतर दोन्ही पक्षकारांनी कागदपत्रे दाखल केली.
3. तक्रारदारांची तक्रार व जाबदेणार यांचे थोडक्यात म्हणणे खालीलप्रमाणे-
तक्रारदारांनी जाबदेणार सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून त्यांच्या दुकानासाठी रुपये 5,00,000/- ची ओव्हरड्राफट सुविधा घेतली होती. त्यावेळी तक्रारदारांनी दुकान तारण म्हणून ठेवले होते. दिनांक 28/4/2006 रोजी दुकानास आग लागून रुपये 18,00,000/- चे नुकसान झाले. पोलिस पंचनामा झाला. तक्रारदारांनी न्यू इंडिया अॅश्युरन्स कं. लि. – जाबदेणार क्र.2 यांच्याकडे क्लेम दाखल केला. जाबदेणार क्र.2 यांनी सर्व्हेअर – एम. बी. नगरकर यांची नियुक्ती केली. सर्व्हेअरचा दिनांक 21/8/2006 रोजीचा अहवाल दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार यांनी फक्त दुकानाचीच पॉलिसी घेतली होती, स्टॉकची घेतली नाही, ही त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे. जाबदेणार क्र.1 यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी immovable property म्हणजेच दुकानच तारण म्हणून विमाकृत करुन घेतले होते, त्यामुळे स्टॉकची जबाबदारी त्यांच्यावर येत नाही. दुकानाच्या नुकसानीच्या क्लेमची रक्कम तक्रारदारास देण्यात आलेली आहे म्हणून सदरील तक्रार नामंजूर करावी.
4. मंचानी सर्व कागदपत्रांची विशेषत: विमा पॉलिसी, सर्व्हेअरचा अहवाल पाहणी केली. पॉलिसीची पाहणी केली असता त्यामध्ये, Description of Risk – Bldg., Stock, Shop, Dwellings असे नमूद करण्यात आलेले आहे. तसेच
Description of Risk Building, Stock, Shop, Dwellings | Description of Property 1. Building(s) Only- Building | Sum Insured Rs.10,14,000/- [+] | |
| 2. Category 1 stocks - 1 Stock in Trade like cloths, Readymade Garments | Rs.6,25,000/- ----------------- Rs.16,39,000/- | Net Premium ServiceTax 10.2% Total-Rs.4120/- |
असे नमूद करण्यात आलेले आहे. यावरुन जाबदेणार बँकेनी तक्रारदारांच्या दुकान/ बिल्डींग सोबत आतील रेडिमेड गार्मेंट्स, स्टॉक ची देखील विमा पॉलिसी घेतली होती ही बाब स्पष्ट होते. सर्व्हेअरच्या अहवालाची पाहणी केली असता त्यामध्ये प्रिमिअम रुपये 3739/- अधिक सर्व्हिस टॅक्स 431/-, सम इन्श्युअर्ड – बिल्डींग रुपये 10,14,000/- व स्टॉक इन ट्रेड रुपये 6,25,000/- नमूद केल्याचे दिसून येते. तसेच क्लेम अमाऊंट – एस्टिमेटेड लॉस रुपये 10,00,000/-, अॅसेस लॉस रुपये 5,00,024/-, अॅडजेस्टेड लॉस/नेट लॉस रुपये 3,39,484/- नमूद केल्याचे दिसून येते. नुकसानीचे मुल्यांकन करतांना सर्व्हेअरनी तक्रारदारांची विमा पॉलिसी, दरमहा स्टॉक स्टेटमेंट, परचेस बिल व इतर कागदपत्रांची पहाणी केल्याचे नमूद करतात. सर्व कागदपत्रांची पहाणी केल्यानंतर सर्व्हेअरनी खालील प्रमाणे नुकसानीचे मूल्यांकन केल्याचे स्पष्ट होते-
Sr.No. | Description | Amount | Annexure No. |
1 | Shirtings & Suitings | 42378.74 | I |
2 | Hosiery Items | 180043.43 | II |
3 | Readymade | 55885.27 | III |
4 | Popline | 20982.15 | IV |
5 | Sarees | 79606.2 | V |
6 | Blouse pieces | 10952.62 | VI |
7 | Handloom | 23354.85 | VII |
8 | Dress materials | Nil | VIII |
9 | Shawls & Blankets | 4221.06 | IX |
10 | Sweaters & Topi | Nil | X |
| Total of stock in trade | 417424.32 | |
11 | Electric wiring | 25000.00 | XI |
12 | Repairs to rolling shutter | 23000.00 | |
13 | Painting and plastering work | 35000.00 | |
| Total Assessed Loss | 500424.32 | |
(Say Rs.5,00,424/-)
म्हणजेच नुकसानीचे मुल्यांकन करतांना सर्व्हेअरनी बिल्डींग व स्टॉक च्या नुकसानीचे मुल्यांकन केलेले आहे. तसेच नुकसानीच्या दिनांका दिवशी विमा धारकांकडे स्टॉक रुपये 9,79,119/- होता, परंतू सम इन्श्युअर्ड रुपये 6,25,000/- असल्यामुळे Condition of average – 36.16 टक्के प्रस्तूत प्रकरणी लागू करण्यात आली. आगीमुळे व पाण्यामुळे स्टॉकचे पूर्णपणे नुकसान झाले होते, त्यातून साल्व्हेज व्हॅल्यू दाखविता येत नाही. बिल्डींगचा / दुकानाचा रुपये 10,14,000/- चा विमा होता. नुकसानीच्या दिनांकादिवशी दुकानाच्या सुपर स्ट्रक्चरची कन्स्ट्रक्शन कॉस्ट रुपये 1,00,000/- पेक्षा जास्त नसल्यामुळे कंडिशन ऑफ अॅव्हरेजचा विचार करण्यात आला नव्हता. अॅडजेस्टेड लॉस / नेट लॉस सर्व्हेअरनी खालील प्रमाणे काढलेला आहे-
Sr.No. | Particulars | Amount |
1 | Assessed loss of stock in trade Rs.4,17,424/- | |
| Less : Under insurance @ 36.16% Rs.1,50,940/- | Rs.2,66,484/- |
2 | Building : Electric work, Rolling shutter, painting & plastering | Rs.83,000/- |
| Sub total | Rs.3,49,484/- |
| Less : Excess | Rs. 10,000/- |
| Adjusted Loss / Net loss | Rs.3,39,484/- |
सर्व्हेअरनी वर नमूद केल्याप्रमाणे काढलेली नेट लॉसची रक्कम रुपये 3,39,484/- विमा कंपनीने बँकेला पर्यायाने तक्रारदारांना अदा केलेली आहे. यावरुन बँकेचे म्हणणे की स्टॉकची पॉलिसी घेतलेली नव्हती, केवळ immovable property म्हणजेच दुकानचीच होती, हे चुकीचे आहे. तक्रारदार प्रत्येक महिन्यात बँकेला स्टॉक स्टेटमेंट पाठवित होते. स्टेटमेंट प्राप्त न झाल्यास बँक तक्रारदारांना तसे कळवित असत. प्रस्तूत तक्रारीमध्ये तक्रारदारांजवळ विमा पॉलिसी कागदपत्रे नसल्यामुळे त्यांनी स्टॉक विमाकृत होता किंवा नाही याची माहिती नाही. परंतू जाबदेणार बँकेजवळ कागदपत्रे, विमा पॉलिसीची प्रत असतांना त्यांनी स्टॉकची पॉलिसी काढलेली असतांनाही मा. राज्य ग्राहक वाद निवारण आयोगात व मंचामध्ये दोन वेळेस फक्त बिल्डींग/दुकानाचीच विमा पॉलिसी घेतली असल्याचे सांगितले, हीच जाबदेणार बँकेच्या सेवेतील त्रुटी ठरते. ज्यावेळी सर्व्हेअरनी नुकसानीचे मुल्यांकन केले त्यावेळी जर जाबदेणार यांनी रुपये 3,39,484/- या रकमेमध्ये स्टॉक व बिल्डींग/दुकान यांची एकत्रित रक्कम आहे असे सांगितले असते तर तक्रारदारास मंचात सन 2007 साली तक्रार दाखल करण्याची गरजच भासली नसती. तक्रारदारांना सन 2007 ते 2012 या कालावधीत दोन वेळा प्रस्तूतच्या मंचामध्ये व एका वेळी मा. राज्य ग्राहक वाद निवारण आयोग येथे जावे लागले यास सर्वस्वी जाबदेणार बँकच जबाबदार ठरते. केवळ यासाठी म्हणून जाबदेणार बँकेनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रित रक्कम रुपये 5000/- दयावी असा आदेश देत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार बँकेनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी
एकत्रित रक्कम रुपये 5000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.