Maharashtra

Mumbai(Suburban)

2006/357

SHRI MAHENDRA M.PANDORIA AND ORS - Complainant(s)

Versus

CENTRAL BANK OF INDIA - Opp.Party(s)

10 Aug 2011

ORDER


CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, MUMBAI SUBURBAN DISTRICT.Admn. Bldg., 3rd Floor, Near Chetana College, Govt. Colony, Bandra(East), Mumbai-400 051.
Complaint Case No. 2006/357
1. SHRI MAHENDRA M.PANDORIA AND ORSTIWARI CHAWL,KHOTWADI,OPP.DR.JIKADRA,ANNIE BESANT ST.SANTACRUZ (W)MUMBAI 54 ...........Appellant(s)

Versus.
1. CENTRAL BANK OF INDIA31,SAHIL BLDG,S.V.ROAD,SANTACRUZ (W)BRANCH MUMBAI 54 ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr. J. L. Deshpande ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR ,Member
PRESENT :

Dated : 10 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

         तक्रारदार                     :   मुखत्‍यार अजितकुमार पंडोरीया

                              वकीलासोबत हजर.
                सामनेवाले             :   प्रतिनिधी श्री.जयेश जैन यांच्‍या
                              मार्फत हजर.
 -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्‍यक्ष   ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
 
 
न्‍यायनिर्णय
 
 
1.    सा.वाले क्र.1 हे सेंन्‍ट्रल बँक ऑफ इंडीयाचे सांताक्रृझ शाखेचे शाखाधिकारी आहेत. तर सा.वाले क्र.2 हे त्‍याच बँकेचे प्रमुख व्‍यवस्‍थापक आहेत. यापुढे सा.वाले यांना केवळ सा.वाले बँक असे संबोधिण्‍यात येईल.  तक्रारदार हे पती पत्‍नी असून तक्रारदारांनी आपली तक्रार त्‍यांचे मुखत्‍यारामार्फत दाखल केलेली आहे. तक्रारदार हे अनिवासी भारतीय असून त्‍यांचे सा.वाले बँकेकडे अनिवासी खाते क्र. 715181 असे होते. तक्रारदारांनी त्‍यांचे बंधु व सद्याचे मुखत्‍यार श्री.अजित कुमार पंडोरीया यांचेकडे नविन चेक मिळणेबद्दल एक मागणी पत्र सही करुन साध्‍या पोस्‍टाने पाठविले. तथापी टपाल बटवडयामध्‍ये ते मागणी पत्र गहाळ झाले व कुणी अन्‍य इसमाचे हाती पडले. त्‍या अन्‍य व्‍यक्‍तीने त्‍या मागणी पत्राचे आधारे सा.वाले बँकेकडून चेक बूक प्राप्‍त केले. त्‍यानंतर त्‍या अन्‍य व्‍यक्‍तीने त्‍या चेक बुकामधील धनादेश वापरुन रु.24,000/- व दुसरा धनादेश वापरुन रु.30,000/- असे एकूण रु.54,000/- तक्रारदारांचे एनआरए खात्‍यामधून उचलले.
2.    तक्रारदारांचे पुढे असे कथन की, सा.वाले यांच्‍या अधिका-यांनी तक्रारदारांची नमुना स्‍वाक्षरी व धनादेशावरील नमुना स्‍वाक्षरी यातील फरक तपासून पाहीला नाही व दोन्‍ही धनादेश पारीत करण्‍यात आले. त्‍यामुळे तक्रारदारांचे रु.54,000/- अन्‍य व्‍यक्‍तीस प्राप्‍त करता आले.  या प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना खात्‍याचे व्‍यवहाराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर केली असा अरोप करुन तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून मुळ रक्‍कम रु.54,000/- व नुकसान भरपाई रु.3 लाख असे एकंदर रु.3,54,000/- ची मागणी केली.
3.    सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्‍यामध्‍ये असे कथन केले की, सा.वाले यांचे कडे रु.24,000/- व रु.30,000/- असे दोन्‍ही धनादेश बेअरर होते. म्‍हणजे धनादेश सादर करणारे व्‍यक्‍तीस रक्‍कम प्राप्‍त करण्‍याचा अधिकार होता. व त्‍या दोन्‍ही धनादेशावरील स्‍वाक्षरी सा.वाले यांचे अधिका-यांनी पडताळून पाहिल्‍या. त्‍या तक्रारदारांच्‍या स्‍वाक्षरीशी मिळत्‍या जुळत्‍या होत्‍या. व त्‍यावरुन दोन्‍ही धनादेशामधील रक्‍कम धनादेश घेऊन येणा-या व्‍यक्‍तीस अदा करण्‍यात आली. या प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांच्‍या खात्‍याचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर केली या आरोपास नकार दिला.
4.    तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले. तसेच पत्र व्‍यवहाराच्‍या प्रती हजर केल्‍या. सा.वाले यांनी आपली कैफीयतीचे शपथपत्रासोबत चेक मागणी पत्राची प्रत, तक्रारदारांची नमुना स्‍वाक्षरी, दोन्‍ही वादग्रस्‍त धनादेशाच्‍या छायांकित प्रती व इतर पत्र व्‍यवहाराचे प्रती हजर केल्‍या. तक्रारदारांनी सा.वाले यांच्‍या कैफीयतीला प्रति उत्‍तराचे शपथपत्र दाखल केले. व त्‍यामध्‍ये सा.वाले यांचे कैफीयतीमधील कथने खोडून काढली.
5.    सा.वाले यांनी आपला लेखी युक्‍तीवाद  दाखल केला.
6.    प्रस्‍तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्र, कागदपत्रं, व लेखी युक्‍तीवाद यांचे वाचन केले. त्‍यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्‍यात येतात.

क्र.
मुद्दे
उत्‍तर
1
सा.वाले यांनी तक्रारदारांना एन.आर.ई.खात्‍या
मध्‍ये जारी केलेले दोन धनादेश निष्‍काळजीपणाने पारीत करुन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्‍द करतात काय ?
नाही.
 
 2
तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत काय ?
नाही.
 3.
अंतीम आदेश
तक्रार रद्द करण्‍यात येते.

 
कारण मिमांसा
7.    तक्रारदारांची तक्रार व शपथपत्र यांचेवरुन असे दिसते की, तक्रारदारांनी परदेशातून पाठविलेले धनादेशाचे मागणीपत्र पोस्‍टाने पाठविले ते गहाळ झाले. त्‍या आधारे अन्‍य व्‍यक्‍तींनी धनादेश पुस्‍तक सा.वाले बँकेकडून हस्‍तगत केले व त्‍यातील दोन धनादेशाचा वापर करुन रु.54,000/- तकारदारांचे खात्‍यातुन उचलले. 
8.    सा.वाले यांनी आपल्‍या कैफीयतीमध्‍ये एनआरई खाते क्र.715181 तक्रारदारांनी दिनांक 28.12.1996 मध्‍ये उघडले होते हे मान्‍य केले. त्‍यानंतर दिनांक 12.8.2004 रोजी त्‍या खात्‍यामध्‍ये परदेशातून रु.2,93,135/- तक्रारदारांनी जमा केले. सा.वाले यांनी आपल्‍या कैफीयतीमध्‍ये असे कथन केले की, सुनील नावाचे व्‍यक्‍तीने दिनांक 12.8.2004 रोजी धनादेशाचे मागणीपत्र हजर केले व त्‍या मागणी पत्रावर तक्रारदार यांनी सुनीलची सही प्रमाणीत केली होती. तक्रारदारांची ती सही सा.वाले यांच्‍या अभिलेखात असलेल्‍या नमुना स्‍वाक्षरीशी मिळती जुळती होती.  सा.वाले यांनी आपल्‍या कैफीयतीसोबत निशाणी W-1 वर तक्रारदार श्री.महेंद्रकुमार पंडोरीया यांची नमुना स्‍वाक्षरी हजर केली आहे. तिचे निरीक्षण प्रस्‍तुत मंचाने केले आहे. त्‍या सोबत‍ तक्रारदारांचे एनआरई खाते उघडण्‍याचे अर्जाची प्रत हजर केलेली आहे. त्‍यावर देखील दोन्‍ही तक्रारदारांच्‍या स्‍वाक्ष-या उपलब्‍ध आहेत.  सा.वाले यांनी, सुनील यांनी दिनांक 12.8.2004 रोजी धनादेश मागणीपत्रक हजर केले. त्‍याची प्रत सा.वाले यांनी हजर केलेली आहे.  त्‍यावर सुनील या इसमाची स्‍वाक्षरी असून त्‍या स्‍वाक्षरीखाली खातेदार म्‍हणून तक्रारदार यांची स्‍वाक्षरी आहे. ती स्‍वाक्ष्‍ारी सा.वाले यांनी हजर केलेली आहे.  तक्रारदारांची नमुना स्‍वाक्षरी ही खाते उघडण्‍याचे अर्जासी मिळती जुळती आहे. किंबहुना या स्‍वाक्षरीबद्दल म्‍हणजे धनादेश पुस्‍तीका मागणी बद्दलची तक्रारदारांची स्‍वाक्षरी बद्दल वाद असण्‍याचे कारण नाही. कारण तक्रारदारांनीच आपल्‍या तक्रारीमध्‍ये ही बाब मान्‍य केलेली आहे की, परदेशातून धनादेशाचे मागणी पत्र पोस्‍टाने पाठविले होते परंतु ते गहाळ झाले होते. या मागणी पत्रावरील तक्रारदारांची स्‍वाक्षरी नमुना स्‍वाक्षरीशी मिळती जुळती असल्‍याने व सुनील यांचे स्‍वाक्षरीचेखाली तक्रारदारांची स्‍वाक्षरी दिसून आल्‍याने सा.वाले यांचे अधिका-याने सुनील यांना धनादेश पुस्‍तीका दिल्‍याचे कथन सा.वाले यांचे कैफीयतीमध्‍ये आहे. प्रस्‍तुत घटणा ही 2004 साली घडली होती. त्‍यावेळेस धनादेश पुस्‍तीका खातेदाराकडे कुरीयरने पाठविण्‍याची पध्‍दत बँकेने अवलंबविलेली नव्‍हती. तर खातेदाराने त्‍यांचे मागणीनुसार प्रत्‍यक्ष धनादेश पु्स्‍तीका देण्‍यात येत होती. या संदर्भात कुठल्‍याही नियमांचा किंवा आदेशाचा भंग झाल्‍याचे कथन तक्रारदारांच्‍या प्रतिउत्‍तराचे शपथपत्रामध्‍ये नाही. फक्‍त तक्रारदारांनी असे कथन केले आहे की, धनादेश मागणी पत्रावरील स्‍वाक्षरी व तक्रारदारांची नमुना स्‍वाक्षरी ही मिळती जुळती नव्‍हती. परंतु प्रस्‍तुत मंचाने त्‍या दोन्‍ही स्‍वाक्ष-या पडताळून पाहील्‍या व त्‍या निश्‍चीत मिळत्‍या जुळत्‍या आहेत. किंबहुना तकारदारांनी म्‍हणजे तक्रारदार क्र.1 यांनी आपले शपथपत्र प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये दाखल करुन धनादेश मागणी अर्जावरील (12.8.2004) स्‍वाक्षरीस नकार दिला नाही. व ती स्‍वाक्षरी खोटी व बनावट आहे असे कथन केलेले नाही.  
9.    सा.वाले यांनी आपल्‍या कैफीयतीमध्‍ये पुढे असे कथन केले आहे की, दिनांक 12.8.2004 रोजी धनादेश पुस्‍तीका श्री.सुनील यांना तक्रारदारांच्‍या मागणी पत्रावरुन सुपुर्द केल्‍यानंतर दिनांक 14.8.2004 रोजीचा तक्रारदारांच्‍या सहीचा रु.30,000/-रक्‍कमेचा बेअरर धनादेश एका व्‍यक्‍तीने कौन्‍टरवर हजर केला. व त्‍या व्‍यक्‍तीस टोकन देण्‍यात येवून त्‍या धनादेशावरील तक्रारदारांची स्‍वाक्षरी व सा.वाले यांच्‍याकडे असलेली तक्रारदारांची नमुना स्‍वाक्षरी याची पडताळणी करण्‍यात आली व त्‍यानंतर तो धनादेश पारीत करण्‍यात आला. व धनादेश बेअरर असल्‍याने तो हजर करणारे व्‍यक्‍तीला रु.30,000/- कौन्‍टरवर अदा करण्‍यात आले. सा.वाले यांनी तो धनादेश दिनांक 14.8.2004 रु.30,000/- ची प्रत निशाणी W-3, वर हजर केलेली आहे. व त्‍या धनादेशाचे छायांकित प्रतीचे पुढील व मागील बाजुस प्रस्‍तुत मंचाने निरीक्षण केलेले आहे. सा.वाले यांचे त्‍यानंतर असे कथन आहे की, दिनांक 18.8.2004 रोजी श्री.रमेश आर.पाटील या व्‍यक्‍तीने रु.24,000/- चा धनादेश हजर केला, व तो बेअरर धनादेश होता. त्‍यावरील तक्रारदारांची स्‍वाक्षरी ही सा.वाले यांच्‍याकडे असलेल्‍या नमुना स्‍वाक्षरीशी पडताळीणी करुन व ती मिळती जुळती असल्‍याने धनादेश आणारे श्री. रमेश आर.पाटील यांना रु.24,000/- रक्‍कम अदा करण्‍यात आली. सा.वाले यांनी असेही कथन केलेले आहे की, धनादेश पारीत करीत असतांना सा.वाले यांचे कर्मचा-यांनी श्री.रमेश पाटील यांचा पत्‍ता धनादेशाचे मागे लिहून घेतला. सा.वाले यांचे या स्‍वरुपाचे कथनास धनादेशाचे छायांकित प्रतीवरील पुढील व मागील बाजूस असलेल्‍या नोंदीवरुन पुष्‍टी मिळते.  
10.   प्रस्‍तुत मंचाने वरील दोन्‍ही धनादेशावरील स्‍वाक्ष-या हया नमुना स्‍वाक्षरी व खाते उघडण्‍याचे अर्जावरील स्‍वाक्षरीशी पडताळून पाहिल्‍या व प्रस्‍तुत मंचाने असे निरीक्षण आहे की, वरील धनादेशावरील स्‍वक्ष-या हया तक्रारदारांच्‍या नमुना स्‍वाक्षरीशी व खाते उघडण्‍याचे अर्जावरील स्‍वाक्षरीशी हुबेहुब मिळते जुळते आहेत. त्‍या धनादेशावरील सहयाबाबत संशय घेण्‍यायोग्‍य काहीही नव्‍हते. धनादेशावर खाडाखोड नव्‍हती. त्‍याचप्रमाणे दोन्‍ही धनादेश बेअरर होते व कुणाचेही खात्‍यावर जमा होणारे नरव्‍हते. धनादेश बेअरर असल्‍याने धनादेश घेवून येणारे व्‍यक्‍तीला रक्‍कम अदा करणे बँकेचे कर्तव्‍य ठरते. व सबळ कारण असल्‍याशिवाय बेअरर धनादेशाची रक्‍कम तो धनादेश घेवून येणा-या व्‍यक्‍तीस नाकार देवू शकत नाही. तक्रारदार आपल्‍या प्रति उत्‍तराचे शपथपत्रामध्‍ये असे कथन करतात की, सा.वाले यांनी योग्‍य ती दक्षता घेतली नाही, व खोटी व बनावट असलेल्‍या स्‍वाक्षरीने दोन्‍ही धनादेश पारीत केले. धनादेश पारीत करीत असतांना बँकेच्‍या अधिका-यांनी हस्‍तांक्षर तज्ञाची भुमीका घेणे अपेक्षित नसते. तर धनादेशावरील स्‍वाक्षरी ही तक्रारदारांच्‍या स्‍वाक्षरीशी मिळती जुळती आहे किंवा नाही हे पडताळून पहाणे आवश्‍यक असते. त्‍याच प्रमाणे इतर काही संशय घेण्‍याजोगी बाब आहे किंवा नाही याचा विचार करणे आवश्‍यक असते. प्रस्‍तुतचे प्रकरणामध्‍ये दोन्‍ही वादग्रस्‍त धनादेशावरील तक्रारदारांची तथाकथीत स्‍वाक्षरी ही तक्रारदारांच्‍या खाते उघडण्‍याचे अर्जावरील नमुना स्‍वाक्षरीशी अगदीच मिळती जुळती होती. सर्वसाधारण परिस्थितीत धनादेश पारीत करीत असतांना सा.वाले यांचे अधिका-यास संशय घेण्‍याचे काही कारण नव्‍हते. या व्‍यतिरिक्‍त दुसरा धनादेश दिनांक 18.4.2004 रक्‍कम रुपये 24,000/- पारीत करीत असतांना सा.वाले यांचे अधिका-यांनी त्‍या धनादेशावर मागील बाजूस रक्‍कम उचलणा-या व्‍यक्‍तीचा पत्‍ता लिहून घेतला या वरुन सा.वाले यांचे अधिका-यांनी योग्‍य ती दक्षता घेतली घेतली असे दिसून येते.
11.   सा.वाले यांनी आपल्‍या कैफीयतीमध्‍ये असे कथन केले आहे की, दिनांक 23.8.2004 रोजी तक्रारदारांचे बंधु श्री.अजीत कुमार पंडोरीया यांनी तक्रारदारांच्‍या खात्‍यामध्‍ये असलेल्‍या शिल्‍लकी रक्‍कमेबद्दल चौकशी केली व त्‍यांना संशय आल्‍याने श्री. पंडोरीया यांनी धनादेशाव्‍दारे तक्रारदारांच्‍या खात्‍यातुन रक्‍कम रु.2,40,000/- श्री.अजीत कुमार पंडोरीया यांचे खात्‍याला वळते करुन घेतले. सा.वाले यांचे असेही कथन आहे की, त्‍या दिवशी सा.वाले यांनी श्री.अजीत कुमार पंडोरीया यांना असे सूचविले की, त्‍यांनी खातेदारास म्‍हणजे तक्रारदारांना संपर्क साधावा व त्‍याबद्दल तक्रार द्यावी. त्‍यानंतर तक्रारदारांचे बंधु (श्री.अजीत कुमार पंडोरीया) यांचे दिनांक 23.8.2004 रोजी प्रस्‍तुत व्‍यवहाराबद्दल तक्रार अर्ज सा.वाले यांना प्राप्‍त झाला.
12.   सा.वाले यांच्‍या कैफीयतीमध्‍ये या व्‍यतिरिक्‍त एक महत्‍वाची घटना नमुद करण्‍यात आली आहे ती म्‍हणजे दिनांक 25.8.2004 रोजी तक्रारदारांचे बंधू अजीतकुमार पंडोरीया यांचेकडून सा.वाले यांना एक तक्रार अर्ज प्राप्‍त झाला. व त्‍यामध्‍ये असे कथन केले होते की, मुळचे तक्रारदारांनी 7 धनादेश गोरेगांव येथील बिल्‍डरचे नांवाने धनादेश मागणी अर्जासोबत पाठविले होते. परंतु ते पाकीट गहाळ झाले होते. त्‍या अर्जाची प्रत सा.वाले यांनी कैफीयतीचे सोबत निशाणी W-6 येथे हजर केलेली आहे. त्‍यातील मजकूर सा.वाले यांच्‍या कैफीयतीमधील परिच्‍छेद क्र.1 ग ला विशेष पुष्‍टी देते. तक्रारदारांनी या प्रकारे कोरे धनादेश व तसेच धनोदश मागणीचा अर्ज टपालाने बिल्‍डरकडे पाठविला असेल व ते टपाल गहाळ झाले असेल तर निच्छितच बिल्‍डरचे कर्मचारी किंवा अन्‍य व्‍यक्‍ती ज्‍यांचेकडे टपाल प्राप्‍त झाले ती व्‍यक्‍ती त्‍या धनादेशाची मागणी अर्जाची किंवा को-या धनादेशाचा गैरवापर करण्‍याची शक्‍यता असते. अशा प्रकारचे धनादेश तक्रारदारांनी कुरीयरने पाठविणे आवश्‍यक होते व ते देखील तक्रारदारांचे बंधू म्‍हणजे मुखत्‍यार यांचे नांवे पाठविण्‍याची काळजी घेणे आवश्‍यक होते. त्‍या प्रकारची दक्षता तक्रारदारांनी घेतली नाही व पर्यायाने तो धनादेश मागणी अर्ज व कोरे धनादेश अन्‍य त्रयस्‍त व्‍यक्‍तीच्‍या ताब्‍यात गेले, ज्‍यावरुन त्‍याचा दुरुपयोग झाला. ही बाब तक्रारदारांचा निष्‍काळजीपणा ठरविते तर तक्रारदारांचे सा.वाले यांच्‍या विरुध्‍दचे आरोपांना छेद देते.
13.   तक्रारदारांनी त्‍यांचे बंधू अजीतकुमार पंडोरीया यांनी पोलीस स्‍टेशन, सांताक्रृझ (पश्चिम) यांचेकडे दिनांक 23.8.2004 रोजी तक्रार अर्ज दिला याची प्रत सामनेवाले यांनी आपल्‍या कैफीयतीसोबत निशाणी W-7 वर हजर केलेली आहे. त्‍यामध्‍ये अजीतकुमार असे म्‍हणतात की, तक्रारदारांनी बिल्‍डरकडे जे 7 धनादेश पाठविले होते व त्‍या सोबत मागणी पत्र पाठविले होते ते धनादेश व मागणीपत्र चोरीला गेले. व त्‍या मागणी पत्रावरुन अनोळखी व्‍यक्‍तीने पैसे काढून एक पुस्‍तीका प्राप्‍त करुन घेतली.  व त्‍यातील धनादेशाचा वापर करुन त्‍या व्‍यक्‍तीने रु.54,000/- काढून घेतले. पोलीस स्‍टेशनच्‍या तक्रारीतील कथन हे अजीतकुमार पंडोरीया यांनी सा.वाले बँकेकडे दिनांक 23.8.2004 रोजीच्‍या अर्जाशी सुसंगत आहे.
14.   तक्रारदारांनी दिनांक 11.7.2008 रोजी यादीसोबत काही कागदपत्रे हजर केली. व त्‍यामध्‍ये तक्रारदारांचे बंधू अजीतकुमार पंडोरीया यांनी दिनांक 13.8.2004 रोनी सा.वाले बँकेला दिलेल्‍या पत्राची प्रत दाखल केलेली आहे. त्‍या पत्रामध्‍ये अजीतकुमार यांनी बँकेला असे कळविले होते की, अजीत कुमार यांचे बंधू महेंद्र कुमार यांनी NRE खात्‍यामध्‍ये काही कोरे धनादेश इंग्‍लंड मधून पोस्‍टाने पाठविले आहेत व ते धनादेश प्राप्‍त होण्‍यापुर्वी NRE  खात्‍यामध्‍ये काही व्‍यवहार करु नये. तक्रारदारांचे तक्रारीमध्‍ये त्‍यांनी सा.वाले यांना या मजकूराचे पत्र दिनांक 13.8.2004 रोजी दिलेले होते असे कथन नाही. सहाजीकच त्‍याबद्दल चर्चा किंवा कथन सा.वाले यांच्‍या कैफीयतीमध्‍ये देखील नाही. महत्‍वाची बाब म्‍हणजे तक्रारदारांनी यादीसोबत जी कागदपत्रे हजर केलेली आहेत, त्‍यामध्‍ये ही दिनांक 13.8.2004 मुळ अर्ज व त्‍याची छायांकित प्रत दोन्‍ही आहेत. श्री. अजीतकुमार यांनी सा.वाले बँकेला दिनांक 13.8.2004 रोजी वरील मजकुराचा अर्ज दिला असला तरी तो मुळचा अर्ज तक्रारदारांनी प्रस्‍तुतचे तक्रारीमध्‍ये यादीसोबत दाखल करण्‍याचे कामी कारण नव्‍हते. तक्रारदारांनी श्री. अजीतकुमार यांचे शपथपत्र दाखल करुन या स्‍वरुपाचा अर्ज दिनांक 13.8.2004 रोजी दिला होता असे कथन केलेले नाही.  या प्रमाणे सा.वाले यांनी दिनांक 23.8.2004 पूर्वी म्‍हणजे श्री.अजीतकुमार यांचा अर्ज प्राप्‍त होण्‍यापूर्वी या व्‍यवहाराची काही कल्‍पना नव्‍हती. वर नमुद केल्‍याप्रमाणे वरील वादग्रस्‍त धनादेश दिनांक 14.8.2004 व दिनांक 18.8.2004 रोजी सा.वाले बँकेकडे हजर करण्‍यात आले व ते पारीत झाले व त्‍यामधील रक्‍कम धनादेश घेऊन येणा-या व्‍यक्‍तीस अदा करण्‍यात आली. या पार्श्‍वभुमीवर सा.वाले यांनी तक्रारदारांना धनादेशाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर केली असा निष्‍कर्ष काढता येत नाही.
15.   तक्रारदारांनी आपल्‍या प्रतिउत्‍तराचे शपथपत्रामध्‍ये काही न्‍यायनिर्णयाचा उल्‍लेख केला व त्‍यामध्‍ये असे कथन कले की, बँक ही खाते दाराचे खात्‍यातील रक्‍कमेच्‍या संदर्भात न्‍यासाची भुमिका बजावते व खातेदाराचे खात्‍यामध्‍ये होणा-या व्‍यवहाराबद्दल बँकेच्‍या कर्मचा-यांनी काळजीपूर्वक निर्णय घेण्‍याची आवश्‍यकता असते. या कथनाचे पृष्‍टयर्थ तक्रारदारांनी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या कॅनरा बँक विरुध्‍द कॅनरा सेल्‍स कार्पोरेशन या न्‍याय निर्णयाचा आधार घेतला. या मध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयाने असा अभिप्राय नोंदविला होता की, धनादेश खोटा असेल तर त्‍यामध्‍ये नमुद केलेली रक्‍कम अदा करण्‍याची जबाबदारी बँकेवर असत नाही.  त्‍या प्रकरणामध्‍ये कनिष्‍ठ न्‍यायालयाने असा स्‍पष्‍ट निष्‍कर्ष नोंदविला होता की, त्‍या व्‍यवहारातील सर्व 42 धनादेश व त्‍यावर असलेल्‍या सहया हया खोटया होत्‍या. कनिष्‍ठ न्‍यायालयाचा निष्‍कर्ष मा.उच्‍च न्‍यायालयाने कायम ठेवला. सर्वोच्‍च न्‍यायालयाने देखील त्‍या निर्णयाचे विरुध्‍द निष्‍कर्ष नोंदविला नाही. तथापी प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये सा.वाले यांचेकडे दिलेल्‍या दोन्‍ही धनादेशावरील स्‍वाक्ष-या खोटया होत्‍या असा निष्‍कर्ष नोंदविणे इतपत पुरावा नाही. तक्रारदारांनी जे अन्‍य न्‍यायनिर्णय दाखल केलेले आहेत त्‍यामध्‍ये देखील धनादेशावरील
स्‍वाक्षरी ही खातेदारांची नसून खोटी आहे असा निष्‍कर्ष नोंदविण्‍यात आला होता. या संदर्भात राष्‍ट्रीय आयोगाच्‍या युनायटेड कमर्शियल बँक विरुध्‍द महेंद्रा पोपटलाल व्‍होरा I (1995) CPJ 83 (NC) दिनांक 15.11.1994 हया न्‍यायनिर्णयाचा संदर्भ योग्‍य ठरतो. त्‍यामध्‍ये धनादेश पारीत करीत असताना बँक कर्मचा-यांनी हस्‍ताक्षर तज्ञाचे मत घेणे अपेक्षित नाही किंवा सखोल निरीक्षण करणे हे अपेक्षीत नाही, तर किमान दक्षता घेतली तरी पुरेसी आहे असा अभिप्राय नोंदविला आहे.
16   वरील चर्चेनुरुप व निष्‍कर्षावरुन पुढील आदेश करण्‍यात येतो.
               आदेश
1.    तक्रार क्रमांक 357/2006 रद्द करण्‍यात येते.
     
2.    खर्चाबाबत काही आदेश नाही.
3.    आदेशाच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य
      पाठविण्‍यात याव्‍यात.
 

[HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT