Maharashtra

Dhule

CC/11/197

ME SATPUDA TRYCTER DHULE - Complainant(s)

Versus

CENTRAL BANK OF INDIA - Opp.Party(s)

M B PAWAR

30 Aug 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/11/197
 
1. ME SATPUDA TRYCTER DHULE
MUMBAI AGRA ROOD DHULE
...........Complainant(s)
Versus
1. CENTRAL BANK OF INDIA
BASCO ,GOVA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 HON'ABLE MR. S.S. Joshi MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.

 

मा.अध्‍यक्षा-  सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी 

मा.सदस्‍या सौ.एस.एस.जैन

मा.सदस्‍य  -  श्री.एस.एस.जोशी

                                  ----------------------------------------                          ग्राहक तक्रार क्रमांक    - १९७/२०११

                               तक्रार दाखल दिनांक - २२-०९-२०११

                                  तक्रार निकाली दिनांक  - ३०-०८-२०१३

 

मे.सातपुडा ट्रॅक्‍टर धुळे तर्फे        ----- तक्रारदार.  

प्रोप्रा.सुरेश रघुनाथ पाटील

उ.व.५४ वर्षे,धंदा-व्‍यापार              

प्‍लॉट-एक्‍स-१,एम.आय.डी.सी.

अवधान,मुंबई-आग्रारोड,धुळे.

             विरुध्‍द

मा.शाखाधिकारी सोा.            ----- सामनेवाले.  

सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया,

शाखा-वास्‍को द गामा,

गोवा-४०३८०२

न्‍यायासन

(मा.अध्‍यक्षाः सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी)

(मा.सदस्‍याः सौ.एस.एस.जैन)

(मा.सदस्‍य: श्री.एस.एस.जोशी)

उपस्थिती

(तक्रारदारा तर्फे वकील श्री.एम.बी.पवार)

(सामनेवाले तर्फे वकील श्री.एम.बी.देशपांडे)

--------------------------------------------------------------------

निकालपत्र

(द्वाराः मा.अध्‍यक्षा सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी)

()               सामनेवाले यांनी, सदर तक्रार अर्ज या मे.मंचाच्‍या कार्यक्षेत्रात येत नसल्‍याने, प्रथमदर्शनीच निकाली काढण्‍यात यावा असा प्राथमिक मुद्दयाचा अर्ज दि.१२-१२-२०११ रोजी दिलेला आहे. 

  

()       तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार हे मे.सातपुडा ट्रॅक्‍टर्स या फर्मचे प्रोप्रायटर आहेत व त्‍यांनी महाराष्‍ट्र व गोवा या ठिकाणी त्‍यांच्‍या फर्मची स्‍थापना केली होती.  तक्रारदार यांना गोवा येथे व्‍यवसाय वाढविण्‍यासाठी वास्‍को द गामा येथे त्‍यांच्‍या फर्मची स्‍थापना करावयाची होती. त्‍यासाठी त्‍यांनी सामनेवाले यांच्‍याकडून सेल्‍सटॅक्‍स नंबर घेण्‍यासाठी दि.२८-०९-१९९५ रोजी रु.५,०००/- ची फीक्‍स डिपॉझीट काढले होते, व त्‍याची डयु डेट संपल्‍यानंतर रिन्‍यु करण्‍याची जबाबदारी सामनेवाले यांची होती.  त्‍याप्रमाणे त्‍यांनी ठरलेल्‍या वेळेत सदर एफ.डी. ही रिन्‍यु करुन दिली नाही.  तक्रारदार यांनी त्‍यांचा गोव्‍यातील व्‍यवहार बंद केल्‍यानंतर सदर एफ.डी.ची मागणी केली असता, सामनेवाले यांनी अल्‍प व्‍याज देऊन तक्रारदारांची फसवणूक केली आहे.  सामनेवाले यांनी दिलेली रक्‍कम वजा जाता उर्वरीत रक्‍कम रु.२१,२४०/- घेणे बाकी आहे.  या रकमेची मागणी केली असता सदर रक्‍कम सामनेवालेंनी दिलेली नाही.  त्‍याकामी दि.३०-०४-२०११ रोजी नोटीस पाठविली आहे.  परंतु सामनेवाले यांनी नियमाप्रमाणे एफ.डी. चे व्‍याज दिले नसून, व्‍यापारी प्रथेचा दुरुपयोग केला आहे.  त्‍यामुळे सदरचा तक्रार अर्ज या मंचात दाखल केला आहे. तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांच्‍याकडून घेणे असलेली रक्‍कम रु.२१,२४०/- व्‍याजासह मिळावी आणि मानसिक शारीरिक त्रास व अर्जाचा खर्च मिळावा.

 

()       सामनेवाले यांनी दि.१२-१२-२०११ रोजी सदर तक्रार अर्ज या मे.मंचाच्‍या कार्यक्षेत्रात येत नसल्‍याने, तक्रार निकाली काढण्‍यात यावी असा अर्ज दिला आहे.  त्‍यामध्‍ये त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदारांची शाखा गोवा पणजी येथे होती.  तक्रारदारांनी सेल्‍सटॅक्‍स नंबर काढण्‍यासाठी सामनेवालेंच्‍या गोवा येथील शाखेत त्‍यांच्‍या नावाने एफ.डी. ठेवले होते व त्‍याची मुदत तीन वर्ष दि.२८-०९-१९९८ पर्यंत होती.  तक्रारदारांनी धंदा बंद केल्‍याने सदर एफ.डी. रक्‍कम परत मागितली आहे, व ती सामनेवाले यांनी परत केली आहे.  परंतु परत केलेली रक्‍कम कमी असल्‍याने तक्रारदारांनी या मंचात तक्रार दाखल केली आहे. वास्‍तविक पाहता तक्रारदार यांचा गोव्‍यात धंदा आहे.  सामनेवालेंची शाखा गोव्‍यात वास्‍को द गामा येथे आहे व तिथे डिपॉझीट ठेवली आहे.  ज्‍या कारणासाठी डिपॉझीट होते ते ऑफीस व तक्रारीची सर्व कारणे ही गोव्‍यात घडली आहेत.  त्‍यामुळे या मे.मंचास सदर तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही. 

 

(४)       याकामी तक्रारदार यांनी तक्रार अर्ज नि.नं.२, शपथपत्र नि.नं.३, कागदप‍त्रे नि.नं.४ वर नि.नं.४/१ ते १/५, दाखल केली आहेत.  सामनेवाले यांचा अंतरिम अर्ज नि.नं. ९ व तक्रारदारांचा अर्जाचा खुलासा नि.नं.११, दाखल केला आहे.  सदर प्रकरणी दाखल कागदपत्रे पाहता तसेच उभयपक्षांचा युक्तिवाद ऐकला असता, आमच्‍यासमोर खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत. 

 

मुद्दा :

  निष्‍कर्षः

(अ)तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, ग्राहक संरक्षण  कायदा कलम ११ प्रमाणे या मंचाचे कार्यक्षेत्रात आहे काय ?

: नाही.

(ब)आदेश काय ?

: अंतिम आदेशा प्रमाणे

 

विवेचन

 

(५)     मुद्दा क्र. ‘‘’’  तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे काढलेली एफ.डी. ची छायांकीत प्रत नि.नं.५/१ वर दाखल केली आहे.  सदर प्रत पाहता ही पावती सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा वास्‍को-द-गामा गोवा यांची     दि.२८-०९-१९९५ रोजी रक्‍कम रु.५,०००/- ची असून, ती सातपुडा ट्रॅक्‍टर्स, अकाऊंट गव्‍हर्नर ऑफ गोवा थ्रु सेल्‍स टॅक्‍स ऑफीसर, वास्‍को-द-गामा, गोवा यांच्‍या नावे दिलेली आहे.  त्‍यांचा देय दिनांक २८-०९-१९९८ असा नमूद केलेला आहे.  या पावतीचा विचार करता सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर एफ.डी.ची पावती ही वास्‍को-द-गामा, गोवा शाखेतून दिलेली आहे हे स्‍पष्‍ट होत आहे. 

          तक्रारदार यांनी त्‍यांचा गोवा येथील व्‍यवसाय बंद केल्‍याने सदर एफ.डी.च्‍या रकमेची व्‍याजासह मागणी केलेली आहे.  परंतु सामनेवाले यांनी सदर रक्‍कम कमी व्‍याज देऊन दिली आहे.  या बाबतचा पत्रव्‍यवहार      दि.१२-१२-२०१० रोजी नि.नं.५/२ व नोटीस नि.नं. ५/३ वर दाखल आहे.  या दोन्‍ही कागदपत्रांवरुन असे लक्षात येते की, सामनेवालेंनी व्‍याज कमी दिले या बाबतचा वाद आहे व तो सामनेवालेंच्‍या गोवा शाखेत घडलेला असून, तक्रारदारांनी गोवा येथील शाखेशी पत्रव्‍यवहार केलेला आहे.  सदर एफ.डी. व पत्रव्‍यवहार पाहता सदरची रक्‍कम ही गोवा येथील शाखेत ठेवलेली आहे व त्‍या बाबतचे वादाचे कारण हे गोवा येथील शाखेत घडलेले आहे हे स्‍पष्‍ट होत आहे.  त्‍यामुळे सदर एफ.डी. बाबत काही वाद उत्‍पन्‍न झाला असेल तर, त्‍या बाबतची दाद हे सामनेवाले ज्‍या ठिकाणी राहतात किंवा त्‍यांची शाखा जेथे असून तेथे व्‍यवसाय करतात त्‍या ठिकाणी असलेल्‍या कार्यक्षेत्रातील मंचात दाखल होणे आवश्‍यक आहे. 

 

(६)       या बाबत तक्रारदारांनी या अंतरिम अर्जास खूलासा देऊन असे नमूद केले आहे की, कलम () सामनेवाले यांनी तक्रारदारांची तक्रार या मंचाच्‍या कार्यक्षेत्रात येत नसल्‍याबाबत मुद्दा उपस्थित केला आहे.  परंतु तक्रारदार यांचे मुख्‍यालय धुळे येथे असल्‍यामुळे मुख्‍यालयाच्‍या ठिकाणी तक्रारदार यांनी तक्रार दाखल केलेली आहे.   त्‍यामुळे या मंचास सदर तक्रार दाखल करण्‍याचा व तक्रार चालविण्‍याचा या मंचास पूर्ण अधिकारी आहे असे नमूद केले आहे.  या खुलाशा प्रमाणे सदर तक्रार या मंचाच्‍या कार्यक्षेत्रात येते असे तक्रारदारांचे म्‍हणणे आहे.  परंतु ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे, या बाबी विचारात घेता येणार नाहीत.  ज्‍या ठिकाणी सामनेवाले राहतात, अथवा त्‍यांची शाखा आहे व त्‍या ठिकाणी त्‍यांचा व्‍यवसाय केला जातो त्‍या ठिकाणच्‍या ग्राहक मंचास कार्यक्षेत्र येत आहे.  या बाबत आपण ग्राहक संरक्षण कायदा कलम ११ चा विचार करणे योग्‍य होईल.

    ग्राहक संरक्षण कायदा कलम ११   :  

(2)     A complainant shall be instituted in a District Forum within the local limits of whose jurisdiction.

(a)      the opposite party or each of the opposite parties, where there are more than one, at the time of the institution of the complaint, actually and voluntarily resides or [carries on business or has a branch office or] personally works for gain, or

(b)     any of the opposite parties, where there are more than one, at the time of the institution of the complaint, actually and voluntarily resides, or [carries on business or has a branch office],or personally works for gain, provided that in such case either the permission of the District Forum is given, or the opposite parties who do not reside, or [carry on business or have      a branch office],or personally work for gain, as the case may be, acquiesce in such institution, or 

(c)     the cause of action, wholly or in part, arises.

(७)       या कलमा प्रमाणे, कोणतेही प्रकरण त्‍याच जिल्‍हा ग्राहक मंचाच्‍या ठिकाणी चालू शकते, ज्‍या ठिकाणी सामनेवाले राहतात व व्‍यवसाय करतात.  किंवा ज्‍या ठिकाणी त्‍यांची शाखा आहे व त्‍या शाखेत कारण घडले असेल त्‍याच ठिकाणी प्रकरण दाखल करता येते.  परंतु ज्‍या ठिकाणी तक्रारदार राहतात किंवा व्‍यवसाय करतात, त्‍या ठिकाणी प्रकरण दाखल करता येत नाही.  या प्रमाणे सदर एफ.डी. ही धुळे येथील शाखेमध्‍ये ठेवलेली नाही.    सामनेवाले यांचे कार्यालय हे गोवा येथे आहे व त्‍या ठिकाणाहून एफ.डी. दिलेली आहे.  त्‍यामुळे सदर तक्रार अर्ज हा धुळे मंचाच्‍या कार्यक्षेत्रामध्‍ये दाखल करण्‍यास पात्र नाही.  याचा विचार होता वरील प्रकरण चालविण्‍याचे प्रांतीय अधिकार क्षेत्र “territorial jurisdiction” या मंचास नाही.  या कायदेशीर मुद्यावर, सदर तक्रारदाराने दिलेला अर्ज दाखल करुन घेता येत नाही असे आमचे मत आहे.  जरुर तर तक्रारदार हे योग्‍य त्‍या कार्यक्षेत्र असलेल्‍या मंचात तक्रार दाखल करु शकतात.   म्‍हणून मुद्दा क्र. चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी देत आहोत. 

 

()        या कमी मंचामार्फत खालील न्‍यायनिवाडयांचा आधार घेण्‍यात आला आहे.

·        AIR 2000 Supreme Court 579

H.V.Jayaram Vs Industrial Credit and Investment Corporation of India Ltd. & Anr.

 

·        Civil Appeal No.1560 of 2004 Order Dated Oct.20,2009 (S.C.)

                             Sonic Surgical Vs National Insurance Company Ltd.

 

·        I (2012) CPJ 81

          Saluja Ford  Vs  Hira Lal Thakur & Ors.

 

·        II (2011) CPJ 88 (NC)

                    Neha Singhal  Vs  Unitech Limited.   And

          Abhishek Singhal  Vs  Unitech Limited

 

·        II (2004) CPJ 36 (NC)

Arup Kumar Bhattacharya Vs Kundu Tirtha Special & Anr.

 

·        1997 (1) Bom. C.R. (Cons.) 1 (N.C.D.R.C. New Delhi)

          Rajaram Com Producers Punjab Ltd Vs Suryakant Nitin Kumar      

               Gupta.

 

 

या न्‍यायनिवाडयामध्‍ये खालील मार्गदर्शक तत्‍व नमूद केले आहे. 

 

     The State Commission has held that part of cause of action had arisen at Rajanand Gaon as the various complainants were entitled to receive the share certificate at that place.  Thus according to the State Commission the matter falls under Clause (c) of the above referred sub-section.  The learned counsel for the respondents has been unable to satisfy us that how receipt or non receipt of share certificate at a certain place gives cause of action to the applicant.  When a Company goes public and various applicants from different places apply for shares it does not mean that the cause of action will accrue to the applicants at the places they reside or are expected to receive the share certificates.  The applications for the shares will be deemed to have been accepted at the place where the Company has its registered office or from where the shares are to be dispatched.  Post Office will be deemed to be acting as agent for share holders for delivery of shares to them.   As noticed above, the petitioner Company has its registered office at Chandigarh while its place of work is at Mandsaur (M.P.).   It has  no branch office at Rajanand Gaon.

     The District Forum has assumed jurisdiction mainly on the ground that complainants were residing at Rajanand Gaon.  Section 11 does not lay down that the complainant can file a complaint at the place where he is residing.

 

(९)      वर उल्‍लेख केलेल्‍या न्‍यायनिर्णयात तक्रारदार हे राजनांदगावचे होते व त्‍या ठिकाणी त्‍यांना शेअर्सचे प्रमाणपत्र मिळणार होते.  कंपनीचे रजिष्‍टर्ड ऑफीस हे चंदीगड येथे होते व कामकाजाचे क्षेत्र हे मंदसौर (एम.पी.) येथे होते.  कंपनीची शाखा ही राजनांदगावला नव्‍हती.  या राष्‍ट्रीय आयोगाच्‍या निकालानुसार सदर प्रकरण चालविण्‍याचे कार्यक्षेत्र राजनांदगाव होऊ शकत नाही.  प्रस्‍तुत प्रकरणात सामनेवाले हे गोवा येथील शाखेत व्‍यवसाय करणारे आहेत, व तक्रारीस कारण गोवा शाखेत घडलेले आहे.  त्‍यामुळे धुळे मंचास हे प्रकरण चालविण्‍याचे प्रांतीय अधिकार नाही.   

 

(१०) मुद्दा क्र. ‘‘’’ वरील सर्व कारणांचा व कायदेशीर मुद्यांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

 

आदेश

 

() तक्रारदारांचा तक्रार अर्ज खारीज करण्‍यात येत आहे.

() तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.

 

धुळे.

दिनांकः ३०/०८/२०१३

 

 

 

 

          (श्री.एस.एस.जोशी)  (सौ.एस.एस.जैन)   (सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी)

              सदस्‍य         सदस्‍या           अध्‍यक्ष

           जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्‍ट्र राज्‍य)

                  

 

 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER
 
[HON'ABLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.