Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/11/338

LSP COSMETICS (INDIA) PVT. LTD., - Complainant(s)

Versus

CENTRAL BANK OF INDIA - Opp.Party(s)

PRAKASH FERNANDES

04 Aug 2011

ORDER


CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, MUMBAI SUBURBAN DISTRICT.Admn. Bldg., 3rd Floor, Near Chetana College, Govt. Colony, Bandra(East), Mumbai-400 051.
Complaint Case No. CC/11/338
1. LSP COSMETICS (INDIA) PVT. LTD.,THRU DIRECTOR MR PRADEEP SHAH, 216/217, DATTANI TRADE CENTRE, 2ND FLOOR, CHANDAVARKAR ROAD, BORIVLI-WEST, MUMBAI-92. ...........Appellant(s)

Versus.
1. CENTRAL BANK OF INDIACASH MANAGEMENT SERVICE BRANCH, 1ST FLOOR, M.G ROAD, FORT, MUMBAI-23.2. IDBI BANK, BORIVLI BRANCHKASTURBA PARK, NR. TO BHAGWATI HOSPITAL, MANDPESHWAR ROAD, BORIVLI-WEST, MUMBAI-103.3. THE ZORASTRIAN CO-OP BANK LTD,8/10, DATTANI TRADE CENTRE, CHANDAVARKAR ROAD, BORIVLI-WEST, MUMBAI-92. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr. J. L. Deshpande ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR ,Member
PRESENT :

Dated : 04 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-   
                        तक्रारदार                       :वकीलासोबत हजर.
                                सामनेवाले              :     --
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-   
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्‍यक्ष             ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-  
 
 
तक्रार दाखल करुन घेण्‍यासंबधीचा आदेश
 
 
1.    तक्रारदार ही कंपनी असून सा.वाले हया बँका आहेत. तक्रारदारांचे सा.वाले क्र.3 बँकेकडे चालू खाते होते. तक्रारदारांनी त्‍या खात्‍यामध्‍ये सा.वाले क्र.3 यांचेकडे रु.1 लाखाचा धनादेश जमा केला. तो सा.वाले क्र.1 बँकेकडे वसुलीकामी पाठविण्‍यात आला. तक्रारदारांच्‍या कथना प्रमाणे तो धनादेश सा.वाले बँकांनी गहाळ केला व बँकेकडून तक्रारदारांना पैसे मिळू शकले नाहीत.
2.    तक्रारदारांचे वकीलांचा दाखल सुनावणीकामी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.
3.    तक्रारदार हे एलएसपी कॉसमेटीक्‍स (इंडीया) प्रा.लि., अशी कंपनी आहे. व तक्रार ही कंपनीचे संचालक यांनी दाखल केलेली आहे. या प्रमाणे तक्रारदार कंपनी ही वाणीज्‍य करणारी कंपनी आहे. तक्रारदारांचे सा.वाले क्र.3 यांचेकडे चालु खाते होते, व ते वाणीज्‍य व्‍यावसायाकामी वापरले जात होते. तक्रारदारांनी सा.वाले क्र.3 यांचे कडे जमा केलेला धनादेश हा त्‍यांचे ग्राहकांनी तक्रारदारांना दिलेला होता. तो धनादेश मे.मानसी प्रॉडक्‍ट, सिहोर, गुजरात यांनी दिलेला होता. या प्रमाणे तक्रारदार ही वाणीज्‍य व्‍यवसाय करणारी कंपनी आहे. तक्रारदारांनी सा.वाले बँकेकडे चालु खाते वाणीज्‍य व्‍यवसायाकामी उघडले हेाते. तसेच तक्रारदारांना मिळालेला धनादेश हा त्‍यांच्‍या सिहोर येथील ग्राहकाकडून प्राप्‍त झाला होता. तो तक्रारदारांच्‍या खात्‍यामध्‍ये जमा होणेकामी सा.वाले क्र.3 यांचेकडे जमा केला. याप्रमाणे तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून स्विकारलेली सेवा सुविधा ही त्‍यांच्‍या वाणीज्‍य व्‍यवसायाकामी स्विकारलेली सेवा सुविधा होती.
4.    ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2 (1) (डी) प्रमाणे वाणीज्‍य व्‍यवसायाकामी एखादी सेवा सुविधा स्विकारली असेल तर ती सेवा स्विकारणारी व्‍यक्‍ती ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे ग्राहक होत नाही. हयास अपवाद फक्‍त स्‍वतःचे उपजिवीकेसाठी ती सेवा स्विकारली असेल तर होतो. प्रस्‍तुत तक्रारीतील तक्रारदार ही कंपनी असल्‍याने तो प्रश्‍न निर्माण होत होत नाही. तसेच तक्रारदार कंपनीचे त्‍या प्रकारचे कथनही नाही. वरील परिस्थितीमध्‍ये तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2(1) (डी) प्रमाणे ग्राहक होत नसल्‍याने तक्रार सुनावणीकामी दाखल करुन घेणे शक्‍य नाही.
5.    वरील परिस्थितीत पुढील आदेश करण्‍यात येतो.
       
 
 
 
                            आदेश          
1.                  तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2(1)(डी) प्रमाणे ग्राहक या संस्‍थेत बसत नाही. सबब तक्रारदार हे ग्राहक नसल्‍याने प्रस्‍तुत मंचापुढे तक्रार चालु शकत नाही.
3.    आदेशाच्‍या प्रमाणित प्रती तक्रारदारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात
     याव्‍यात.

[HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT