Maharashtra

Dhule

CC/10/309

Bhika Bhoju ChaudhariMukati Dhule - Complainant(s)

Versus

Central Bank Of india Branch Manajar Brach Mukti Dhule - Opp.Party(s)

K R Lohar

29 Jan 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/10/309
 
1. Bhika Bhoju ChaudhariMukati Dhule
...........Complainant(s)
Versus
1. Central Bank Of india Branch Manajar Brach Mukti Dhule
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S. S. Jain PRESIDING MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,धुळे.


 

 


 

मा.अध्‍यक्ष - श्री.डी.डी.मडके.


 

     मा.सदस्‍या श्रीमती.एस.एस.जैन.


 

                                  ----------------------------------------                                   ग्राहक तक्रार क्रमांक  309/2010


 

                                  तक्रार दाखल दिनांक –    01/11/2010


 

                                  तक्रार निकाली दिनांक 29/01/2013


 

 


 

श्री.भिका भोजू चौधरी.                     ----- तक्रारदार


 

उ.वय.-58 वर्षे, धंदा-शेती.


 

रा.मुकटी,‍ता.जि.धुळे.


 

              विरुध्‍द


 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया.                    ----- विरुध्‍दपक्ष


 

नोटीसीची बजावणी-शाखाधिकारी,


 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा-मुकटी.


 

ता.जि.धुळे यांचेवर बजवावी.


 

न्‍यायासन


 

(मा.अध्‍यक्षः श्री.डी.डी.मडके.)


 

(मा.सदस्‍याः श्रीमती.एस.एस.जैन.)


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे वकील श्री.डी.डी.जोशी.)


 

(विरुध्‍दपक्षा तर्फे वकील श्री.एस.आर.वाणी.)


 

--------------------------------------------------------------------


 

निकालपत्र


 


(द्वाराः मा.अध्‍यक्ष- श्री.डी.डी.मडके.)


 

(1)      तक्रारदार यांनी मुदत ठेवीमध्‍ये ठेवलेली रक्‍कम बँकेने न देऊन सेवेत त्रृटी केली म्‍हणून तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार या न्‍यायमंचात दाखल केली आहे. 


 

 


 

(2)      तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, त्‍यांनी विरुध्‍दपक्ष सेंट्रल बँक ऑफ इंडिया (यापुढे संक्षिप्‍ततेसाठी बँक असे संबोधण्‍यात येईल) मध्‍ये खालील प्रमाणे रक्‍कम गुंतविली आहे. 


 



































अ.क्र

ठेव खाते

तारीख

रक्‍कम

व्‍याजदर

देय तारीख

देय रक्‍कम

(1)

(2)

(3)

(4)

(5)

(6)

(7)

1

18/48

3/7/97

2,000

11 %

3/10/99

2553

2

18/62

28/7/97

2,000

11 %

28/10/00

2846


 

 


 

(3)       तक्रारदार यांनी सदर मुदत ठेवीमधील रकमेची वेळोवेळी मागणी केली असता, विरुध्‍दपक्ष यांनी वेळोवेळी वेगवेगळी कारणे देऊन नंतर रक्‍कम देण्‍यात येईल असे सांगितले. तसेच बँकेमध्‍ये मोठयाप्रमाणात कागदपत्रे गहाळ झालेली आहेत व कर्मचा-यांनी अपहार केल्‍याचे समजते. तक्रारदार यांनी दि.20-08-2010 रोजी बँकेत रकमेची मागणी केली असता बँकेचे व्‍यवस्‍थापकांनी त्‍यांना रक्‍कम देण्‍यास नकार दिला. त्‍यामुळे त्‍यांनी अर्ज देऊन रक्‍कम देण्‍याची विनंती केली.  तरीही विरुध्‍दपक्ष यांनी रक्‍कम दिली नाही व सेवेत त्रृटी केली आहे. 


 

 


 

(4)       तक्रारदार यांनी शेवटी बँकेस मुदत ठेवीतील सर्व रक्‍कम व त्‍यावर 11 टक्‍के दराने व्‍याज, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च द्यावा अशी विनंती केली आहे. 


 

(5)       तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍टयार्थ निशाणी नं.3 वर शपथपत्र तसेच निशाणी नं.5/1 वर ठेव पावत्‍यांची छायांकीत प्रत आणि      निशाणी नं.5/2 वर अर्जाची प्रत दाखल केली आहे.


 

 


 

(6)       विरुध्‍दपक्ष बँक प्रकरणात हजर होऊन, बँकेने निशाणी नं.8 वर खुलासा दाखल करणेसाठी मुदतीची मागणी केली. परंतु त्‍यांनी अद्याप खुलासा दाखल केलेला नाही. त्‍यामुळे प्रकरण‍ विना खुलासा चालविण्‍यात आले.


 

 


 

(7)       तक्रारदारांची कैफीयत तसेच पुराव्‍यासाठी दाखल केलेली कागदपत्रे व त्‍यांच्‍या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्‍यानंतर, आमच्‍यासमोर विष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत. 


 















मुद्देः

 निष्‍कर्षः

(अ)तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष बँकेचे ग्राहक आहेत

  काय ?

ः होय.

(ब)विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत

   त्रृटी केली आहे काय ?

ः होय.

(क)आदेश काय ?

अंतिम आदेशा प्रमाणे

 


 

विवेचन


 

 


 

(8)     मुद्दा क्र. ‘‘’’तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष बँकेत मुदत ठेव स्‍वरुपात काही रक्‍कम गुंतविली असल्‍याचे शपथेवर कथन केले आहे. तसेच आपल्‍या म्‍हणण्‍याचे पृष्‍टयार्थ त्‍यांनी निशाणी नं.5/1 वर ठेव पावत्‍यांच्‍या छायांकीत प्रती दाखल केल्‍या आहेत. त्‍यावरुन तक्रारदार हे विरुध्‍दपक्षाचे ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. म्‍हणून मुद्दा क्र. ‘‘’’ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

(9)      मुद्दा क्र. ‘‘’’तक्रारदार यांनी मुदत ठेवीमध्‍ये गुंतविलेली रक्‍कम मिळणेकरिता विरुध्‍दपक्ष बँकेस वारंवार विनंती केली असता, बँकेने रक्‍कम देण्‍यास प्रथम टाळाटाळ केली व दि.20-08-2010 रोजी रक्‍कम देण्‍यास नकार दिला असे तक्रारदारांनी म्‍हटले आहे. त्‍यासंदर्भात त्‍यांनी दि.10-08-2010 रोजी बँकेस दिलेला अर्ज निशाणी नं.5/2 वर आहे. सदर अर्ज देऊनही बँकेने रक्‍कम दिलेली नाही.  वास्‍तविक मुदत ठेवीची मुदत संपल्‍यानंतर किंवा मागणी केल्‍यानंतर सदर रक्‍कम परत करणे ही बँकेची जबाबदारी आहे. परंतु बँकेने रक्‍कम न देऊन सेवेत त्रृटी केली आहे असे स्‍पष्‍ट दिसून येते. म्‍हणून मुद्दा क्र. ‘‘’’ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

(10)     मुद्दा क्र. ‘‘’’ - उपरोक्‍त सर्व विवेचनावरुन हे न्‍यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.


 

आदेश


 

 


 

(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.


 

(ब) विरुध्‍दपक्ष शाखाधिकारी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा-मुकटी, यांनी  आदेशाच्‍या प्राप्‍ती पासून पुढील 30 दिवसांचे आत.


 

 


 

(1) तक्रारदार यांना खाता क्र.18/48 मध्‍ये ठेवलेली एकूण रक्‍कम  2,000/- (अक्षरी रु.दोन हजार मात्र) दि.03-11-1999 पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.11 टक्‍के व्‍याजासह द्यावी.


 

 


 

(2) तक्रारदार यांना खाता क्र.18/62 मध्‍ये ठेवलेली एकूण रक्‍कम  2,000/- (अक्षरी रु.दोन हजार मात्र) दि.28-10-2000 पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.11 टक्‍के व्‍याजासह द्यावी.


 

 


 

(3) तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम  1,000/- (अक्षरी रु.एक हजार मात्र) व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी एकूण रक्‍कम  1,000/- (अक्षरी रु.एक हजार मात्र) द्यावेत.


 

 


 

(क) उपरोक्‍त आदेश कलम (ब)(1) व (2) मध्‍ये उल्‍लेखीलेल्‍या  रकमेमधून, विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदारांना काही रक्‍कम किंवा व्‍याज रक्‍कम दिली असल्‍यास, काही कर्ज दिले असल्‍यास, तक्रारदारांकडून काही रक्‍कम येणे असल्‍यास, अशी रक्‍कम नियमानुसार वजावट करुन उर्वरीत रक्‍कम व्‍याजासह तक्रारदारांना अदा करावी.


 

 


 

धुळे.


 

दिनांकः 29/01/2013


 

 


 

 


 

 


 

 


 

              (श्रीमती.एस.एस.जैन.)       (डी.डी.मडके)


 

                    सदस्‍या              अध्‍यक्ष


 

                 जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,धुळे.
 
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
PRESIDING MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.