तक्रार क्रमांक – 213/2007 तक्रार दाखल दिनांक – 05/06/2007 निकालपञ दिनांक – 20/09/ 2008 कालावधी - 1 वर्ष 3 महिने 15 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर राहुल शशिकांत वाघमारे 4,ऋतुराज सोसायटी, देवी चौक, डोंबिवली(प) .. तक्रारदार
विरूध्द
1.कॅरियर एअरकॉन लि., मुबई ब्रंच, विनय भावे कॉम्प्लेक्स, 159, सी.एस.टी रोड कालिना, सांताक्रुझ, मुबई 400 098. 2. समर्थ इलेक्ट्रॉनिक्स रामनगरण् डोंबिवली. .. सामनेवाला
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल श्री. गरवाडकर वि.प तर्फो वकिल श्रीमती सुषमा ठाकर आदेश (पारित दिः 20/09/2008 ) मा. अध्यक्षा सौ. शशिकला पाटील, यांचे आदेशानुसार 1. तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार यांचे कडुन करिअर एअरकंडीशनर मॉडेल 'सिलियन्सीया' सिरि. नं. 14502644 हा एअरकंडीशनर रु. 21,500/- ला दि. 12/07/2002 रोजी खरेदी केला. त्यावर 6 वर्षकरिता वॉरंटी देण्यात आली होती. खरेदी केल्यापासुन अनेक वेळा एअरकंडीशनर बंद राहत होता म्हणुन तक्रार केली आहे. सर्व्हीस रिर्पोट नं. 54411 .. 2 .. नोंदविला. दि. 24/04/2004 रोजी मेकॅनिक येऊनही दुरुस्ती केली नाही. दि. 14/10/2005 रोजी पुर्णतः एअरकंडीशनर बंद पडला. कंपनीच्या तांत्रिक कर्मचा-यांनी येऊन तपासणी केली. कॉम्प्रेसर बिघडला आहे हि गोष्ट रिर्पोट मध्ये लपवुन ठेवली, वॉरंटी कालावधी मध्ये एअरकंडीशनर असल्याने विरुध्दपक्षकार यांनी पुर्णपणे दुरुस्त केले नाही. तक्रारीकडे दुर्लक्ष केले म्हणुन बदलुन किंवा मुळ किंमत रु. 21,500/- व 12/07/2008 पासुन त्यावर 18% व्याज दराने व्याज तसेच रु. 10,000/- मानसीक त्रासाकरिता रु. 25,000/- खर्च व रु. 5,000/- अर्जाचा खर्च अशी रक्कम परत मिळावी.
2. विरुध्दपक्षकार यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्यात आली विरुध्दपक्षकार नं. 1 मंचात हजर होऊन दि. 17/12/2007 रोजी लेखी जबाब निशाणी 9 चे अर्जासह निशाणी 11 वर दाखल केला आहे त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः- करिअर एअरकॉन प्रा. लि. हि कंपनी माननिय हायकोर्ट पंजाब व हरियाना दि. 31/08/2006 चे नुसार करिअर रेफ्रीजरेशन प्रा. लि., या योजने खाली परवानगी नुसार तयार व विक्री केली आहे त्याचे तदनंतर करिअर एअरकंडीशनीग व रेफ्रीजरेशन लिमिटेड असे नांव बदलण्यात आले तसे प्रमाणपत्रही रजिस्ट्रार एन.सी.टी दिल्ली व हरियाना यांनी दि. 30/10/2006 रोजी दिले असल्याने विरुध्दपक्षकार नं. 1 करिता लेखी जबाब दाखल केली आहे. तक्रारदार यांची तक्रार खोटी, चुकीची असल्याने नाकबुल असल्याने
.. 3 .. प्राथमिक मुद्दयावर नामंजुर करण्यात यावी. मा. राष्ट्रीय आयोगाने अनेक आदेशामध्ये अश्या प्रकारच्या तक्रारी मध्ये तक्रारदार हा 'ग्राहक' ठरत नसल्याने अनुतोष देता येत नाहीत. न्यायपृष्टार्थ पंजाब ट्रॅक्टर विरुध्द विरप्रताप (1997) II सी.पी.जे 81(एन.सी) यांचा उल्लेख केला आहे. तक्रारदार यांना वॉरंटीचे नियम व अटी प्रमाणे एकदा एअरकंडीशनर मध्ये दुरुस्ती व बदलुन देण्यात आलेला आहे त्यामुळे त्याच कामाकरीता अनुतोष देता येणार नाही वॉरंटी एक वर्षाचा कालावधी विरुध्दपक्षकार यांनीच वाढवुन दिला होता त्या वेळीही कॉम्प्रेसर मध्ये दोष आढळुन आले होते. एअरकंडीशनर अतीभार, ऑईल, व अन्य बाबीनकडे ग्राहकाने लक्ष न दिल्यास अनेक तक्रारी उपलब्द होऊ शकतात त्याबाबतचे सर्व नियम वॉरंटी कार्ड मध्ये म्यॅनुअल मध्ये नमुद केलेल्या आहेत त्याप्रमाणे सर्व सेवा दिलेल्या आहेत तक्रारदार यांनी स्वतः तक्रारीमध्ये नमुद केलेले आहे कि दि. 26/04/2004 रोजी सेवा दिल्यानंतर पुन्हा 14/10/2005 रोजी सेवा दिली आहे म्हणजे दिड वर्ष सेवा दिलेली आहे. त्यावेळी विरुध्दपक्षकार नं 1 यांनी कॉम्प्रेसर मधील दोष काढुन देण्यास तयार होते परंतु रिफिल करण्याकरिता जो खर्च येतो तो तक्रारदार यांनी दयावा याची मागणी केली असता तशी रक्कम देण्याचे नाकारले नियमाप्रमाणे विरुध्दपक्षकार सेवा देण्यास तयार होते पण तक्रारदार यांनी नाकारल्याने तक्रारीस विरुध्दपक्षकार जबाबदार नाहीत. सदर तक्रार 2005 नंतर 2 वर्षा नंतर (दि. 05/06/2007 रोजी) दाख्ाल केली असल्याने तक्रार मुदत बाहय आहे खरेदी .. 4 .. 12/07/2002 ची असुन दि. 11/07/2007 ला वॉरंटी कालावधी संपुष्टात आलेला आहे म्हणुन विरुध्दपक्षकार हे कोणत्याही दोषास जबाबदार नाही. अशी मागणी केली आहे. विरुध्दपक्षकार नं. 2 यांना मंचामार्फत नोटिस पाठविण्यात आली होती नोटिस पोहोच झाल्यावरहि मंचात उपस्थीत न राहिल्याने व लेखी जबाब दाखल न केल्याने दि. 28/01/2008 रोजी 'नो डब्लु एस' आदेश पारित करून प्रकरण एकतर्फी चौकशी करिता नेमणे त आले परंतु तदनंतर हि दि. 01/09/2008 पर्यंत दखल न घेतल्याने सदर तक्रार अर्ज एकतर्फी सुनावणी ने पुर्ण करुन एकतर्फी आदेश करणेत आले. तक्रारदार यांनी दाखल केलेला अर्ज विरुध्दपक्ष नं. 1 यांचा लेखी जबाब, दाखल कागदपत्र, प्रतिज्ञालेख याची सुक्ष्मरित्या अवलोकन व पडताळणी केले असता पुढील मुद्दे उपस्थीत झाले व कारण मिमांसा देवुन आदेश पारि त करण्यात आले आहेत. कारण मिमांसा सदर तक्रारीमध्ये खरेदी विक्री व वॉरंटी कालावधी बाबत उभयतांनमध्ये कोणतेही वाद नाहीत तक्रारदार यांनी अर्जात नमुद केलेला एअरकंडीशनर दि. 12/07/2007 रोजी खरेदी केला असुन त्यावर 11/07/2007 रोजी पर्यंत वॉरंटी कालावधी देण्यात आली होती व आहे, व याच कालावधी मध्ये विरुध्दपक्षकार यांनी लेखी युक्तीवाद मध्ये नमुद व मान्य केल्याने तक्रारदार यांनी प्रथम कॉम्प्रेसर दुरुस्त करुन व नंतर बदलून दिलेला आहे .. 5 .. व त्यावर पुन्हा एक वर्षाची ज्यादा वॉरंटी कालावधी विरुध्दपक्षकार नं. 1 यांनी स्वतः दिलेला आहे व याच कालावधी मध्ये बदलून दिलेल्या कॉम्प्रेसर मध्ये दोष उत्पन्न झाल्याने त्या ज्यादा कालावधी मध्येहि विरुध्दपक्षकार हे कॉम्प्रेसर दोषमुक्त करुन देण्यास अथवा अवश्यक्ता असल्यास पुन्हा कॉम्प्रेसर बदलून देण्यास कायदयानेही पात्र जबाबदार व बंधनकारक आहेत. कारण या ठिकाणी कंपनीने स्वतः वस्तु वर हमी पुन्हा दिलेली असल्याने आवश्यकते नुसार बिना खर्च दोष काढुन देणे अथवा वस्तु बदलून देणे न्यायोचित, विधियुक्त व संयुक्तित आहे. तक्रारदार यांचा कॉम्प्रेसर पुन्हा पुन्हा बंद पडलेला आहे या बाबतचे सर्व्हि स रिर्पोट दाखल आहे. व विरुध्दपक्षकार यांनी लेखी जबाबात मान्य केल्याने कॉम्प्रेसर बंद आहे हे मान्य व कबुल केले आहे परंतु उभयतांतील अहंकार (ego) मुळे वाद वाढुन वादित दोष तसेच राहिले आहेत व उभयतांनी आपला मार्ग स्वीकारला आहे म्हणुन अखेर तक्रारदार यांनी सदरची तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले आहे हे हि मान्य करणे न्यायोचित, विधियुक्त व संयुक्तित आहे त्यामुळे तक्रारदार यांनी सहाजिकच रु. 21,500/- रक्कम एअरकंडीशनर करिता मोजुन हि समाधानकारकरित्या वस्तु वापरण्यास न मिळाल्याने आर्थिक, शारिरीक व मानसीक त्रास झालेला आहे हे गृहीत घरणे आवश्यक आहे. विरुध्दपक्ष हे संयुक्तीकरित्या नुकसान भरपाई देण्यास पात्र व जबाबदार आहेत.
.. 6 .. विरुध्दपक्षकार नं. 2 हे जरी विक्रते असले तरी सुध्दा विक्री करण्याबाबत परवाना विरुध्दपक्षकार नं. 2 यांना दिलेला आहे त्यामुळे विरुध्दपक्षकार नं. 2 मार्फत तक्रारदार यांनी वस्तु खरेदी केलेली आहे व वेळोवेळी तक्रार विरुध्दपक्षकार नं. 2 यांचे कडे दाखल केली आहे व त्याची नोंद न घेतल्याने आदेशाप्रमाणे पुर्तता करणे करिता सहकार्य करण्याची जबाबदारी तितकीच आहे म्हणुन आदेशः- अंतीम आदेश 1. तक्रारदार यांचा अर्ज अंशतः मंजुर करणेत येत आहे. 2. विरुध्दपक्षकार क्र. 1 यांनी तक्रारदार यांना जे कॉंम्प्रेसर वॉरंटी कालावधी मध्ये पुन्हा बदलुन दिले आहे व एक वर्षाच्या जादा कालावधी मध्ये पुन्हा बंद पडल्याने त्यातिल दोष सर्व खर्च स्वतः काढुन देण्याची जबाबदारी आहे. म्हणुन असे दोष काढुन द्यावे. 3. विरुध्दपक्षकार यांनी वेळीच ज्यादा वॉरंटीच्या कालावधीत कॉम्प्रेसर स्वर्खचाने दुरुस्त करुन दिले असते तर तक्रारदानी मंचात तक्रार दाखल करणे भाग पडले नसते परंतु सेवेत त्रृटी, निष्काळजिपणा व हलगर्जीपणा केल्याने तक्रार दाखल करणे भाग पडले असल्याने विरुध्दपक्षकार नं. 1 यांनी सदर अर्जाचा खर्च रु. 2,000/- (रु. दोन हजार फक्त) व मानसिक शारिरीक त्रासावर रु. 1,000/- (रक्कम एक हजार फक्त) अशी रक्कम द्यावी.
.. 7 .. 4. अशा आदेशाचे पालन विरुध्दपक्षकार यांनी आदेशाची सही शिक्याची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत (परस्पर) पुर्तता न केल्यास वरील सर्व रक्कमेवर वसुल होईपर्यंत तक्रारदार याना द.सा.द.शे 10% व्याज दराने रक्कम व्याजासह देण्यास जबाबदार आहेत. 5. विरुध्दपक्षकार क्र. 2 यांचे विरुध्द कोणतेही आदेश नाहीत. 6. उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी. 7. तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही. दिनांक – 20/09/2008 ठिकान - ठाणे (श्री. पी. एन. शिरसाट) (सौ. शशिकला श. पाटील) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|