Maharashtra

DCF, South Mumbai

CC/257/2013

NAMDEV PRATAPSING GIRASE - Complainant(s)

Versus

CARBON MOBILES LTD., CUSTOMER CARE SERVICE, - Opp.Party(s)

SANTOSH PATIL

16 Dec 2014

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Complaint Case No. CC/257/2013
 
1. NAMDEV PRATAPSING GIRASE
48, NILKUNJ, SHIVAJI NAGAR, NAGAO BARI, DEOPUR, DHULE 424 005
...........Complainant(s)
Versus
1. CARBON MOBILES LTD., CUSTOMER CARE SERVICE,
C/O JAINA L-4, D-170, PHASE-1, OKHALA INDUSTRIAL AREA, NEW DELHI 110020
2. MANAGER/PROPRIETOR, KAIZER ELECTRONICS/ TELECOM
SITARAM BUILDING, A-BLOCK, 1ST FLOOR, 10/B, ABOVE PK WINES, NEAR JAFRAN, CRAWFORD MARKET, MUMBAI 400 001.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Satyashil M. Ratnakar PRESIDENT
 HON'BLE MR. S.G. CHABUKSWAR MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

ए क त र्फा  आ दे श

 

द्वारा - श्री.शा.गं.चाबुकस्‍वार : मा.सदस्‍य  

 1)    प्रस्‍तुतची तक्रार ही सामनेवाला यांच्‍याकडून भ्रमणध्‍वनीची किंमत रु.8,950/- व सदर रकमेवर द.सा.द.शे.18 टक्‍के दराने व्‍याजासह व रु.70,000/- मानसिक त्रासापोटी भरपाई आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावेत या मागण्‍यासाठी दाखल केली आहे.

2)    तक्रारदाराची थोडक्‍यात हकीकत अशी की,तक्रारदार हा धूळे येथील राहणारा असून सामनेवाला 1 ही भ्रमणध्‍वनी उत्‍पादन करणारी कंपनी आहे. सामनेवाला 2 हे सामनेवाला 1 चे भ्रमणध्‍वनी दुरुस्‍तीचे केंद्र आहे. सामनेवाला 3 हे सामनेवाला 1 चे अधिकृत विक्रेते आहेत. दि.01/02/2013 रोजी तक्रारदाराने स्‍वतःच्‍या वापराकरीता सामनेवाला 3 यांच्‍याकडून कार्बन कंपनीचा नमूना नं.ए21 हा भ्रमणध्‍वनी किंमत रु.8,950/- मध्‍ये खरेदी केला होता. त्‍याच दिवशी सामनेवाला 3 यांनी सदर भ्रमणध्‍वनी खरेदी केल्‍याबद्दल तक्रारदारास पावती क्र.5825 दिलेली आहे. सदर भ्रमणध्‍वनी आयएमईआय नं.911240901235572 आणि 911240901235580 असे आहेत.

 3)    या पुढे तक्रारदाराचे असे कथन आहे की, त्‍यानी भ्रमणध्‍वनी खरेदी केल्‍यानंतर तो साधारणपणे एक आठवडाभर व्‍यवस्थितरित्‍या चालला. परंतु त्‍यानंतर लगेच दि.11/02/2013 रोजी तो भ्रमणध्‍वनी हाताळत असताना अडकत असे व त्‍यानंतर तो बदं पडू लागला. तक्रारदार यांनी सामनेवाला 3 याच्‍याकडे दोन ते तिन वेळा जावून तक्रार केली. त्‍यावेळी सामनेवाला 3 यांनी सामनेवाला 2 यांच्‍याशी संपर्क साधणेसाठी सांगितले. दि.02/05/2013 रोजी तक्रारदार सामनेवाला 2 यांच्‍याकडे गेला असता त्‍यांनी भ्रमणध्‍वनी दुरुस्‍तीसाठी जमा करण्‍यास सांगितले. सामनेवाला 2 च्‍या सांगण्‍यानुसार तक्रारदाराने सदरचा भ्रमणध्‍वनी सामनेवाला 2 कडे जमा केला. दि.03/05/2013 रोजी सामनेवाला 2 यांनी सदरचा भ्रमणध्‍वनी दुरुस्‍त करुन तक्रादारास दिला. त्‍यानंतर दुस-याच दिवशी भ्रमणध्‍वनीमध्‍ये पूर्वीसारखाच बिघाड झाला. दि.06/05/2013 रोजी तक्रारदार व त्‍यांचा मुलगा पुन्‍हा सामनेवाला 2 यांच्‍याकडे गेले. त्‍यावेळी सामनेवाला 2 यांनी सांगितले की सदरचा भ्रमणध्‍वनी हा दुरुस्‍तीसाठी सामनेवाला 1 कंपनीकडे पाठवावा लागेल व त्‍यासाठी साधारणपणे एक महिन्‍याचा कालावधी लागेल. त्‍यावेळी तक्रारदार यांनी सामनेवाला 2 यांच्‍या सांगण्‍याप्रमाणे भ्रमणध्‍वनी सामनेवाला 1 यांच्‍याकडे दुरुस्‍त करण्‍यास पाठविण्‍यासाठी जमा केला. दि.25/05/2013 रोजी सामनेवाला 2 यांनी तक्रारदारास दुरध्‍वनीवरुन संपर्क साधून कळविले की भ्रमणध्‍वनी दुरुस्‍त झालेला आहे व तो घेवून जाण्‍यास कळविले. दि.27/05/2013 रोजी तक्रारदार भ्रमणध्‍वनी आणण्‍यास गेला परंतु त्‍यावेळी भ्रमणध्‍वनी पूर्णपणे दुरुस्‍त झालेला नव्‍हता. तक्रारदाराने सदरची बाब सामनेवाला 2 च्‍या निदर्शनास आणून दिली परंतु सामनेवाला 2 यांनी तक्रारदार यास भ्रमणध्‍वनीमध्‍ये स्‍मरणशक्‍ती कार्ड न टाकता चालविल्‍यास तो भ्रमणध्‍वनी दोन ते तिन दिवसात सुरळीत चालेल असे सांगितले.

4)    या पुढे तक्रारदाराचे असे कथन आहे की, दि.27/05/2013 नंतर एका आठवडयाच्‍या कालावधीत सदर भ्रमणध्‍वनीत पुन्‍हा बिघाड सुरु झाला म्‍हणून दि.04/07/2013 रोजी तक्रारदाराच्‍या मुलाने भ्रमणध्‍वनी सामनेवाला 2 यांच्‍याकडे पुन्‍हा दुरुस्‍तीसाठी दिला. दि.05/07/2013 रोजी सामनेवाला 2 यांनी भ्रमणध्‍वनी दुरुस्‍त न करता तक्रारदारास देण्‍यात आला. त्‍यानंतर दि.12/07/2013 रोजी तक्रारदाराचा मुलगा सामनेवाला 2 यांचेकडे भ्रमणध्‍वनी दुरुस्‍तीसाठी गेला परंतु त्‍यांनी भ्रमणध्‍वनी जमा करुन घेतला नाही. दिनांक 17/07/2013 व 19/08/2013 रोजी सदर भ्रमणध्‍वनी सामनेवाला 2 यांच्‍याकडे दुरुस्‍तीसाठी दिला परंतु तो त्‍यांनी दुरुस्‍त केला नाही. तक्रारदार व त्‍याच्‍या मुलाने सामनेवाला 1 ते 3 यांच्‍याशी वेळोवेळी संपर्क साधला परंतु त्‍यांनी त्‍यास प्रतिसाद दिला नाही. म्‍हणून शेवटी दि.06/08/2013 रोजी तक्रादार यांनी सामनेवाला 1 ते 3 यांना नोटीसा पाठवून भ्रमणध्‍वनीची किंमत रु.8,950/- ची मागणी केली. सदरची नोटीस सामनेवाला 1 ते 3 यांना मिळूनही त्‍यांनी नोटीसला उत्‍तर दिले नाही अथवा भ्रमणध्‍वनीची किंमत अदा केली नाही. सामनेवाला 1 ते 3 यांनी अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करुन परिपूर्ण सेवा दिली नाही. करीता हि तक्रार परि‍च्‍छेद 1 मध्‍ये नमूद केलेल्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी.

 5)    सामनेवाला 1 ते 3 यांना तक्रारअर्जाची नोटीस मिळूनही गैरहजर राहिलेले आहेत म्‍हणून सदरची तक्रार त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा चालविण्‍यात आली.

6)    तक्रारदाराने स्‍वतःचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद व दस्‍त दाखल केलेले आहेत. तक्रारदाराचे कुलमुख्‍त्‍यार निलेश गिरासे यांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

7)    तक्रारदाराने पुराव्‍याच्‍या शपथपत्रामध्‍ये तक्रारीत नमूद केलेली सर्व हकीकत जस्‍याच तसी सांगितलेली आहे. तक्रारदाराने सामनेवाला 3 कडून भ्रमणध्‍वनी खरेदी केल्‍याची पावती तक्रारअर्जासोबत पान नं.15 वर दाखल केली आहे. सदर पावतीवरुन असे दिसून येते की, दि.01/02/2013 रोजी तक्रारदाराने सामनेवाला 2 यांच्‍याकडून एक भ्रमणध्‍वनी नमूना ए 21 हा रु.8,950/- मध्‍ये खरेदी केलेला आहे. तक्रारदाराची तक्रार व शपथपत्र असे दर्शविते की, सदर भ्रमणध्‍वनी खरेदी केल्‍यानंतर आठ दिवसात तो बंद पडला. दि.06/05/2013, 04/07/2013, 17/07/2013 व 19/08/2013 रोजी तक्रारदाराने सामनेवाला यांच्‍याकडे तो भ्रमणध्‍वनी दुरुस्‍तीसाठी जमा केला परंतु तो दुरुस्‍त झालेला नाही. तक्रारदार हा नमूद तारखांव्‍यतिरिक्‍त सुध्‍दा ब-याच वेळा भ्रमणध्‍वनी दुरुस्‍तीसाठी सामनेवालाकडे गेला परंतु सामनेवाला यांनी योग्‍य असा प्रतिसाद दिलेला नाही. सामनेवाले 1 ते 3 यांनी तक्रारदारास पूर्ण सेवा दिलेली नाही त्‍यामुळे त्‍यास ही तक्रार दाखल करावी लागली आहे. तक्रारदाराच्‍या वरील पुराव्‍यास व तक्रारीतील कथनास सामनेवाले 1 ते 3 तर्फे आव्‍हान देण्‍यात आलेले नाही त्‍यामुळे सदरचा पुरावा कोठेही दुभंगलेला नाही. म्‍हणून मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार भ्रमणध्‍वनीची किंमत रु.8,950/- व त्‍यास मानसिक त्रास झाल्‍याबाबतची नुकसानभरपाई रु.4,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- सामनेवाला 1 ते 3 यांच्‍याकडून मिळण्‍याचा हक्‍कदार आहे. वरील कारणामुळे तक्रार खर्चासह अंशतः मंजूर होण्‍यास पात्र आहे. करीता खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्‍यात येत आहे -

                              अं ति म  आ दे श

1.            तक्रार क्रमांक 257/2013 खर्चासह अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे. 

 2.            सामनेवाला 1 ते 3 यांनी तक्रारदार यास भ्रमणध्‍वनीची किंमत रु.8,950/- (रु.आठ हजार नऊशे पंन्‍नास मात्र) द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजदराने तक्रार

         दाखल तारखेपासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत दयावी.

 3.            सामनेवाला 1 ते 3 यांनी तक्रारदारास रु.4,000/- (रु.चार हजार मात्र) त्‍याच्‍या मानसिक त्रासाबद्दलची नुकसानभरपाई दयावी.

 4.            सामनेवाला 1 ते 3 यांनी तक्रारदारास तक्रारीचा खर्च रु.2,000/- (रु.दोन हजार मात्र) दयावेत.

 5.            सामनेवाला 1 ते 3 यांनी वरील परिच्‍छेद क्र.2, 3 व 4 मध्‍ये नमूद केलेल्‍या रकमा तक्रारदारास या आदेशापासून 1 महिन्‍याच्‍या आत दयाव्‍यात.

 6.            सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.

 
 
[HON'BLE MR. Satyashil M. Ratnakar]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.G. CHABUKSWAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.