तक्रारदार : प्रतिनीधी श्री.एस.के.भोला हजर
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. सा.वाले हे वाहन विक्रेते आहेत.
2. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून हुंडाई i10 -कार मोबदला देऊन खरेदी केला. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार सा.वाले यांनी तक्रारदारांना योग्य ती सेवासुविधा पुरविणे आवश्यक होते परंतू सा.वाले यांनी योग्य ती सेवा पुरविली नाही.
3. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की,-
I वाहन ताब्यात देण्याचे दिनांक 31.03.2011 रोजी होते परंतू
सा.वाले यांनी वाहन दिनांक 16.04.2011 रोजी दिले.
II वाहन ताब्यात देतेवेळी वाहनाचे आधीच 370 कि.मी.एवढी धाव
झालेली होती
III सा.वाले यांनी तक्रारदारांकडनू विम्याची रक्कम रू.15,803/-,
घेतले परंतू प्रत्यक्षात मात्र रू.12,675/-,रक्कमेची पावती दिली
IV सा.वाले यांनी तक्रारदारांकडून आर.टी.ओ चार्जेस रू.42,921/-,
घेतले परंतू रू.34,742/-,रक्कमेची पावती दिली.
4. याबाबत तक्रारदारांनी सा.वाले यांना दिनांक 18.04.2011 रोजी पत्र पाठवून कळविले. परंतू सा.वाले यांनी त्यास कोणताच प्रतिसाद दिला नाही.
5. सबब तक्रारदारांनी सदर तक्रार अर्ज ग्राहक मंचापूढे दाखल करून सा.वाले यांनी वरील सेवेतील त्रुटी काढाव्यात व तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल 2 लाख व तक्रार अर्ज खर्च रू.10,000/-,तक्रारदारांना द्यावे अशी मागणी केली.
6. तक्रार अर्ज, अनुषंगीक कागदपत्र व शपथपत्र यांच्यासह दाखल केली आहेत.
7. सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर द्यावे अशी नोटीस मंचाकडुन पाठविण्यात आली. सा.वाले यांना नोटीस मिळाल्याची पोचपावती अभिलेखात दाखल आहे. तसेच सा.वाले यांना नोटीस पाठविल्याचे शपथपत्र तक्रारदारांनी दाखल केले. सा.वाले यांना नोटीस मिळूनही सा.वाले गैरहजर राहीले तक्रार अर्जास उत्तर दाखल केले नाही म्हणून तक्रार अर्ज सा.वाले यांचेविरूध्द एकतर्फा निकाली काढण्यात यावा असा आदेश पारीत करण्यात आला.
8. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र, याची पडताळणी करून पाहिली असता निकालासाठी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली हे तक्रारदार सिध्द करतात काय? | होय. |
2 | तक्रार अर्जात केलेल्या मागणीस तक्रारदार पात्र आहेत काय? | होय अंशतः |
3. | अंतीम आदेश | तक्रार अर्ज अंशतः मान्य करण्यात येते. |
कारण मिमांसा
9. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून हुंडाई i10 हे वाहन मोबदला देऊन खरेदी केले. त्याबाबतची पोचपावती अभिलेखात दाखल आहे.
10. तक्रारदारांची सा.वाले यांचेविरूध्द अशी तक्रार आहे की, सा.वाले यांनी वाहनाचा ताबा पंधरा दिवस उशीराने दिला. तसेच ताबा देतेवेळी वाहनाचे आधीच 370 कि.मी. एवढी धाव झालेली होती. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी वाहनाचा पूर्ण मोबदला 22.03.2011 रोजी दिले. करारानूसार पूर्ण मोबदला दिल्यानंतर सात दिवसाच्या आत वाहनाचा ताबा द्यावयाचे होते. परंतू सा.वाले यांनी दिनांक 15.04.2011 रोजी वाहनाचा ताबा दिला. याबाबत तक्रारदारांनी निशाणी क्र. ए-2 व ए-3 वर कागदपत्र दाखल केलेले आहेत. या कागदपत्रांची पाहणी करता असे दिसून येते की, ‘धूप मोटर्स’ औरंगाबाद लि. यांनी वाहनाची डिलीव्हरी दिनांक 31.03.2011 रोजी दिलेले आहेत व दिनांक 15.04.2011 रोजी वाहनाचे रजिस्ट्रेशन झालेले आहे.म्हणजेच वाहनाचा कायदेशीर ताबा दिनांक 15.04.2011 रोजीच दिला. यावरून सा.वाले यांनी गाडीचा ताबा 15 दिवसांनी उशीरा दिले हे स्पष्ट होते.
11. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार सा.वाले यांनी तक्रारदारांकडून विमा रक्कम रू.15,803/-,इतके घेतले परंतू पावती मात्र रू.12,675/-,रक्कमेची दिली. असे एकुण विम्यापोटी रू.3,128/-,जास्त घेतले. याबाबत तक्रारदारांनी निशाणी क्र. बी-1 व बी-2 वर कागदपत्र दाखल केलेली आहेत. तसेच तक्रारदारांचे असेही म्हणणे आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांकडून आर.टी.ओ चार्जेस रू.42,921/-,घेतले व पावती मात्र रू.34,742/-,रक्कमेचे दिले. असे सा.वाले यांनी तक्रारदारांकडून रू.8,179/-एवढी रक्कम तक्रारदारांकडून अधिकची घेतली याबाबत तक्रारदारांनी अभिलेखात निशाणी क्र. सी-1, सी-2 व सी-3 वर कागदपत्रे दाखल केलेले आहेत. बी-1 व सी-2 वरील तळनोटचे वाचन केले असता क्र. 1 वर – Car Prices, insurance, Taxes & Bank % rates prevailing at the time of delivery shall applicable, inspective of the date when booking is done असे नमूद केले आहे परंतू सा.वाले यांनी हजर राहून वाहन डिलीव्हरीच्या वेळी इंन्शरंन्स टॅक्सेस, आणि बँक रेट्स काय होते याबद्दल खुलासा केलेला नाही. तक्रारदारांच्या कथनास दाखल केलेल्या कागदपत्रांवरून पुष्टी मिळते. सा.वाले यांनी तक्रारदारांचे तक्रार अर्जातील शपथेवर केलेले कथनाचे खंडन केले नाही त्यामूळे तक्रारदारांचे म्हणणे हे ग्राहय धरण्यात येते.
12. सा.वाले यांनी विमा रक्कम व आर.टी.ओ.चार्ज जास्त स्विकारून कमी रक्कमेची पावती दिली. तसेच ठरलेल्या वेळेपेक्षा 15 दिवसानी वाहन उशीरा ताब्यात दिले. यावरून सा.वाले यांनी सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली हे स्पष्ट होते. म्हणून सा.वाले हे तक्रारदारांकडून स्विकारलेली अधिकची विमा रक्कम रू.3,128/-,व अधिकचे आर.टी.ओ. चार्जेस रू.8,179/-,असे एकुण रू.11,307/-9% व्याजदराने व्याजासह पैसे दिलेल्या दिनांकापासून ते पैसे परत देईपर्यत व्याजासह परत देण्यास जबाबदार राहतील. तसेच गाडी उशीरा ताब्यात दिल्याने झालेंल्या मानसिक त्रासाबद्दल रू.1000/-,नुकसान भरपाई देण्यास जबाबदार राहतील. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी रू 2 लाख नुकसान भरपाईची मागणी केली आहे. ही तक्रारदारांची मागणी मंचास अवास्तव वाटते.
13. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून तक्रार अर्ज खर्च रू.10,000/-,मागणी केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्ज प्रतिनीधीमार्फत दाखल केलेला आहे. तक्रार अर्ज चालविण्यासाठी वकीलाची नेमणूक केलेली नाही. त्यामूळे तक्रारदारांची तक्रार अर्ज खर्चासाठी रू.10,000/-,ची मागणी जास्त वाटते. सा.वाले हे तक्रारदारांना तक्रार अर्ज खर्च रू.5,000/-,देण्यास जबाबदार राहतील.
14. वरील विवेचनावरून खालील आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 332/2011 अंशतः मान्य करण्यातयेते.
2. सा.वाले हे तक्रारदारांना रू.11,307/-,पैसे भरल्या दिनांकापासून ते पैसे
देईपर्यंत 9%व्याजदराने व्याजासह परत देण्यास जबाबदार राहतील.
तसेच गाडी उशीरा ताब्यात दिल्याबद्दल रू.1,000/-,नुकसान भरपाई
द्यावी.
3. सा.वाले हे तक्रारदारांना तक्रार अर्ज खर्च रू.5,000/-,देण्यास जबाबदार
राहतील.
4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात