Maharashtra

Kolhapur

CC/18/269

Yasha Ravikumar Adukiya - Complainant(s)

Versus

Canon India Pvt. Limited Tarfe Pradhikrut Isam - Opp.Party(s)

S.V.Jadhav

12 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/18/269
( Date of Filing : 16 Aug 2018 )
 
1. Yasha Ravikumar Adukiya
44,Mahaveer Housing Society Kolhapur Naka Ichalkaranji
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Canon India Pvt. Limited Tarfe Pradhikrut Isam
4th & 5th Floar Natraj Bay Rustumaji 194 Junction Of Westren Express Highway Aandheri Kurla Road Aandheri (East) Mumbai 400069
2. Canon India Pvt. Limited
7th Floar Tower B Bldg.No.5,D L F Apitom D L F Fez No.3,Gurgaon 122002
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 12 Jan 2023
Final Order / Judgement

 

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      वि.प. ही इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रातील विविध वस्‍तूंचे उत्‍पादन करणारी कंपनी असून वि.प. क्र.1 हे कंपनीचे अधिकृत सर्व्‍हिस स्‍टेशन आहे तसेच वि.प. क्र.2 ही वि.प. कंपनीची उत्‍पादक कंपनी आहे.  तक्रारदार यांना फोटोग्राफीचा छंद असलेने त्‍यांचे नातेवाईक श्री अंजनलाल शहा यांनी मित्रत्‍वाच्‍या नात्‍याने तक्रारदार यांना कॅनॉन कंपनीचा EOS-1DX Mark II कॅमेरा बक्षिस देण्‍याचे ठरवून वि.प. यांनी उत्‍पादित केलेला हा कॅमेरा ता.1/6/2016 रोजी रक्‍कम रु.3,94,990/- या रकमेस खरेदी करुन ता.10/6/2016 रोजी तक्रारदार यांना दिला.  सदरच्‍या वादातील कॅमे-याचा वापर तक्रारदार हे फोटोग्राफी छंदाकरिता करु लागले.  सदर वादातील कॅमेराची स्‍टँडींग वॉरंटी एक वर्षे व अॅडीशनल वॉरंटी एक वर्ष अशी दोन वर्षाची म्‍हणजे ता.1/6/16 ते 1/6/2018 अखेर वॉरंटी वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेली होती.  सदरचा कॅमेरा वापरत असताना डिसेंबर 2017 रोजी कॅमे-यातील स्‍क्रीन मध्‍ये दोष निर्माण होवून तो पूर्ण बंद पडला. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे कॅमेरा दुरुस्‍तीकरिता दिला असता वि.प. क्र 1 यांनी प्रस्‍तुतचा कॅमेरा दुरुस्‍त करुन दिला होता तथापि पुन्‍हा सदर कॅमेरातील लेन्‍स, फोकस व बॅटरीची अकार्यक्षमता इ.तक्रारी वारंवार उद्भभवत होत्‍या.  त्‍याकारणाने तक्रारदार यांनी दि.18/5/2018 रोजी वि.प. क्र.1 यांना कॅमे-यामध्‍ये वारंवार दोषामुळे उत्‍पादित दोष निर्माण झाला असल्‍यामुळे दुरुस्‍तीस दिला.  ता. 9/6/2018 रोजी वि.प. क्र.2 यांनी तक्रारदार यांना सदर कॅमेरा दुरुस्‍त झालेला आहे व तो वि.प. क्र.1 यांचे ताब्‍यात आहे असा मॅसेज पाठविला.  सदरच्‍या कॅमे-याचे पी.सी.बी. मध्‍ये दोष होता, त्‍यामुळे पी.सी.बी. बदलला असे कळविले.  सबब, सदरचा कॅमेरा खरेदी केल्‍यापासून वॉरंटी कालावधीमध्‍ये त्‍याच्‍यामध्‍ये निर्माण झालेल्‍या दोषांचे तांत्रिक दृष्‍टया पूर्णतः निवारण झाले नसल्‍याने व कॅमे-याच्‍या गुणवत्‍तेत कमालीची घट झाली असल्‍याने तक्रारदार यांनी सदरचा कॅमेरा वि.प. यांनी परत घेवून त्‍याऐवजी नवीन कॅमेरा द्यावा अशी मागणी वि.प. यांना केली असता वि.प. यांनी वादातील कॅमेरा 30 दिवसांत घेवून जाणेचा अथवा कॅमेरा लिलाव करुन अशी धमकी तक्रारदार यांना दिली.  सबब, वि.प. हे सदर कॅमे-याची अल्‍प किंमतीत विल्‍हेवाट लावणार या भितीने तक्रारदार यांनी न्‍यायीक दाद मागणेचा हक्‍क अबाधीत ठेवून सदरचा कॅमेरा वि.प. यांचेकडून स्‍वीकारला.  अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदार यांना सदर कॅमे-यामधील निर्माण झालेल्‍या दोषांचे तांत्रिकदृष्‍टया पूर्णतः निवारण न करुन सदोष कॅमेरा देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे.  सबब, सदर कॅमे-याची किंमत रु. 3,94,99/- परत मिळावी, सदर रकमेवर होणारे व्‍याज रु. 1,02,697/-, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,00,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.30,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत कॅमेरा खरेदीची पावती, वि.प. यांचे स्‍मरणपत्र, वॉरंटी अटी व शर्ती, वि.प. यांनी तक्रारदारांना पाठविलेले मेल, ट्वीटरवरील ट्रवीट, तक्रारदार यांचे आधारकार्ड इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

3.    वि.प.क्र.1 यांना प्रस्‍तुत तक्रारीची नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झालेले नाहीत.  सबब, त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश नि.1 वर दि. 3/11/2018 रोजी पारीत करण्‍यात आला.

 

4.    वि.प.क्र.2 यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्‍हणणे दाखल केले आहे.  वि.प. यांचे कथनानुसार, वादातील कॅमेरा हा भेटवस्‍तूच्‍या स्‍वरुपात तक्रारदार यांचे मित्र श्री अंजनलाल शहा यांनी मैत्रीखातर दिलेला होता. त्‍याकारणाने तक्रारदार यांनी सदरचा कॅमेरा विकत घेतलेला नव्‍हता व त्‍याचा मोबदला दिलेला नव्‍हता या कारणाने तक्रारदार हे ग्राहक नाहीत तसेच सदरकामी श्री अंजनलाल शहा यांना पार्टी केलेले नसलेमुळे सदरच्‍या तक्रारीस नॉन-जॉंईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्‍वाची बाधा येत असलेने तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्‍यात यावी.  तक्रारदार यांनी पाच महिन्‍यानंतर ता. 26/12/2017 व 18/5/18 या दोन्‍ही तारखांना दोनवेळा कॅमेरा दुरुस्‍त करुन दिलेला होता. दोन्‍ही वेळा वि.प. यांनी तक्रारदार यांचा कॅमेरा विनामोबदला दुरुस्‍त करुन दिलेला आहे.  तक्रारदार यांच्‍या कॅमे-यामध्‍ये काहीही उत्‍पादित दोष नव्‍हता व नाही.  तसा तथाकथित उत्‍पदित दोष जर कॅमे-यामध्‍ये असेल तर तसा दोष कोणत्‍याही सबळ पुराव्‍याशिवाय व तज्ञांचा अहवालामार्फत सिध्‍द केलेला नाही.  वि.प. यांनी तक्रारदार यांना नेमकी कोणती सेवा देणेस कसूर केली हे तक्रारीत नमूद नाही.  तक्रारदार यांनी त्‍यांचा कॅमेरा हा दुरुस्‍तीकरिता दि.26/12/2017 रोजी म्‍हणजेच जवळजवळ खरेदी तारखेच्‍या 18 महिन्‍यानंतर दिलेला होता.  सदरचा कॅमेरा तक्रारदार यांनी त्‍या कालावधीमध्‍ये ब-याच वेळा कोणत्‍याही तक्रारीविना वापरला होता.  कॅमेरा रिपेअरीस देतेळी तक्रारदार यांनी कॅमे-यात हिरव्‍या रंगाच्‍या रेषा येतात असे सांगितले.  तो तपासला असता तो मुदतीत दुरुस्‍ती करुन दिला.  कॅमेरा दुरुस्‍त केल्‍यानंतर पाच महिन्‍यानंतर कॅमे-याच्‍या लेन्‍स, फोकस व बॅटरीबाबत तक्रार उपस्थित केली असे म्‍हणणे वि.प. यांनी दाखल केलेले आहे.  सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी मागणी वि.प.क्र.2 यांनी केली आहे.

 

5.    वि.प.क्र.2 यांनी याकामी कागदयादीसोबत पॉवर ऑफ अॅटोर्नी, कस्‍टमर सर्व्हिस रिपोर्ट तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

6.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्‍हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे कॅमे-याची खरेदी रक्‍कम परत मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

4

तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

5

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर.

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

7.    वि.प. ही इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रातील विविध वस्‍तूंचे उत्‍पादन करणारी कंपनी असून वि.प. क्र.1 हे कंपनीचे अधिकृत सर्व्‍हिस स्‍टेशन आहे तसेच वि.प. क्र.2 ही वि.प. कंपनीची उत्‍पादक कंपनी आहे.  तक्रारदार यांना फोटोग्राफीचा छंद असलेने त्‍यांचे नातेवाईक श्री अंजनलाल शहा यांनी मित्रत्‍वाच्‍या नात्‍याने तक्रारदार यांना कॅनॉन कंपनीचा EOS-1DX Mark II कॅमेरा बक्षिस देण्‍याचे ठरवून वि.प. यांनी उत्‍पादित केलेला हा कॅमेरा ता.1/6/2016 रोजी रक्‍कम रु.3,94,990/- या रकमेस खरेदी करुन ता.10/6/2016 रोजी तक्रारदार यांना दिला.  सदरच्‍या वादातील कॅमे-याचा वापर तक्रारदार हे फोटोग्राफी छंदाकरिता करु लागले.  सबब, सदरचा कॅमेरा हा केवळ स्‍वतःच्‍या फोटोग्राफीच्‍या छंदाकरिता तक्रारदार यांना वापरला होता असे तक्रारदार यांनी तक्रारीत क‍थन केले आहे.  वि.प. यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये वादातील कॅमेरा हा भेटवस्‍तूच्‍या स्‍वरुपात तक्रारदार यांचे मित्र श्री अंजनलाल शहा यांनी मैत्रीखातर दिलेला होता. त्‍याकारणाने तक्रारदार यांनी सदरचा कॅमेरा विकत घेतलेला नव्‍हता व त्‍याचा मोबदला दिलेला नव्‍हता या कारणाने तक्रारदार हे ग्राहक नाहीत तसेच सदरकामी श्री अंजनलाल शहा यांना पार्टी केलेले नसलेमुळे सदरच्‍या तक्रारीस नॉन-जॉंईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्‍वाची बाधा येत असलेने तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्‍यात यावी असे म्‍हणणे दाखल केले आहे.  सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होता.  सदर मुद्याच्‍या अनुषंगाने तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी अ.क्र.1 ला वादातील कॅमेरा ता.23/12/2016 रोजी अंजनलाल शहा यांनी वि.प. यांचेकडून रक्‍कम रु.3,94,990/- इतक्‍या रकमेस खरेदी केल्‍याची पावती दाखल केलेली आहे.  तसेच अ.क्र.5 व 6 ला वि.प. कंपनीने तक्रारदार यांना पाठविलेल्‍या मेलची प्रत दाखल केलेली आहे.  तक्रारदार यांच्‍या पुरावा शपथपत्राचे अवलोकन करता तक्रारदार हे सदरचा कॅमेरा स्‍वतःच्‍या फोटोग्राफीच्‍या छंदाकरता वापरत होते व त्‍यामध्‍ये त्‍यांचा कोणताही व्‍यापारी उद्देश नव्‍हता असे कथन केले आहे.  सबब, सदरचा कॅमेरा तक्रारदार यांना श्री अंजनलाल शहा यांनी त्‍यांच्‍या फोटोग्राफीचे छंदाकरिता दिलेला होता ही बाब कागदपत्रांवरुन दिसून येते.  त्‍याकारणाने तक्रारदार हे वादातील कॅमे-याचे लाभार्थी ग्राहक ( Beneficiary consumer) होते ही बाब  नाकारता येत नाही.  त्‍याअनुषंगाने हे आयोग पुढील न्‍यायनिवाडयाचा आधार घेत आहे. 

 

            2020 CJ 334 NC

            BMW India Pvt.Ltd. Vs. Mukul Agarwao and Others

            Decided on 10/12/2019 National Consumer Disputes Redressal Commission,

            New Delhi

 

Definition of consumer itself includes user of goods and beneficiary of services – car purchased for complainant No.1 – for that purpose, loan was also sanctioned to him by complainant No.2, and that complainant No.1 is regularly paying EMIs – car was also being used by complainant No.1 – He is user and beneficiary of services under the insurance policy –

 

      1.2-2c – Beneficiary of services is also consumer

 

When a person hires services, he may hire it for himself or for any other person.  In such a cases, the beneficiary (or user) of the services is also a consumer

 

सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे लाभार्थी ग्राहक ( Beneficiary consumer) असलेने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत तसेच प्रस्‍तुतकामी वादातील कॅमेरा हा तक्रारदार हेच फोटोग्राफी छंदाकरिता वापरत असलेमुळे सदरच्‍या तक्रारीस श्री अंजनलाल शहा यांना सदरकामी आवश्‍यक पार्टी न केलेस सदरच्‍या तक्रारीस कोणतीही बाधा येत नाही या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.   सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2

 

8.    उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मध्‍ये नमूद केलेल्‍या वादातील कॅमेराची स्‍टँडींग वॉरंटी एक वर्षे व अॅडीशनल वॉरंटी एक वर्ष अशी दोन वर्षाची म्‍हणजे ता.1/6/16 ते 1/6/2018 अखेर वॉरंटी वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेली होती याबाबत वाद नाही.  सदरचा कॅमेरा वापरत असताना डिसेंबर 2017 रोजी कॅमे-यातील स्‍क्रीन मध्‍ये दोष निर्माण होवून तो पूर्ण बंद पडला. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे कॅमेरा दुरुस्‍तीकरिता दिला असता वि.प. क्र 1 यांनी प्रस्‍तुतचा कॅमेरा दुरुस्‍त करुन दिला होता तथापि पुन्‍हा सदर कॅमेरातील लेन्‍स, फोकस व बॅटरीची अकार्यक्षमता इ.तक्रारी वारंवार उद्भभवत होत्‍या.  त्‍याकारणाने तक्रारदार यांनी दि.18/5/2018 रोजी वि.प. क्र.1 यांना कॅमे-यामध्‍ये वारंवार दोषामुळे उत्‍पादित दोष निर्माण झाला असल्‍यामुळे दुरुस्‍तीस दिला.  ता. 9/6/2018 रोजी वि.प. क्र.2 यांनी तक्रारदार यांना सदर कॅमेरा दुरुस्‍त झालेला आहे व तो वि.प. क्र.1 यांचे ताब्‍यात आहे असा मॅसेज पाठविला.  सदरच्‍या कॅमे-याचे पी.सी.बी. मध्‍ये दोष होता, त्‍यामुळे पी.सी.बी. बदलला असे कळविले.  सबब, सदरचा कॅमेरा खरेदी केल्‍यापासून वॉरंटी कालावधीमध्‍ये त्‍याच्‍यामध्‍ये निर्माण झालेल्‍या दोषांचे तांत्रिक दृष्‍टया पूर्णतः निवारण झाले नसल्‍याने व कॅमे-याच्‍या गुणवत्‍तेत कमालीची घट झाली असल्‍याने तक्रारदार यांनी सदरचा कॅमेरा वि.प. यांनी परत घेवून त्‍याऐवजी नवीन कॅमेरा द्यावा अशी मागणी वि.प. यांना केली असता वि.प. यांनी वादातील कॅमेरा 30 दिवसांत घेवून जाणेचा अथवा कॅमेरा लिलाव करुन अशी धमकी तक्रारदार यांना दिली.  सबब, वि.प. हे सदर कॅमे-याची अल्‍प किंमतीत विल्‍हेवाट लावणार या भितीने तक्रारदार यांनी न्‍यायीक दाद मागणेचा हक्‍क अबाधीत ठेवून सदरचा कॅमेरा वि.प. यांचेकडून स्‍वीकारला.  सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना सदर कॅमे-यामधील निर्माण झालेल्‍या दोषांचे तांत्रिकदृष्‍टया पूर्णतः निवारण न करुन सदोष कॅमेरा देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ?  हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. 

 

9.    सदर मुद्याचे अनुषंगाने वि.प. यांनी दाखल केलेल्‍या म्‍हणण्याचे अवलोकन करता वि.प. यांनी तक्रारदार तक्रार नाकारली आहे.  तक्रारदार यांनी पाच महिन्‍यानंतर ता. 26/12/2017 व 18/5/18 या दोन्‍ही तारखांना दोनवेळा कॅमेरा दुरुस्‍त करुन दिलेला होता. दोन्‍ही वेळा वि.प. यांनी तक्रारदार यांचा कॅमेरा विनामोबदला दुरुस्‍त करुन दिलेला आहे.  तक्रारदार यांच्‍या कॅमे-यामध्‍ये काहीही उत्‍पादित दोष नव्‍हता व नाही.  तसा तथाकथित उत्‍पदित दोष जर कॅमे-यामध्‍ये असेल तर तसा दोष कोणत्‍याही सबळ पुराव्‍याशिवाय व तज्ञांचा अहवालामार्फत सिध्‍द केलेला नाही.  वि.प. यांनी तक्रारदार यांना नेमकी कोणती सेवा देणेस कसूर केली हे तक्रारीत नमूद नाही.  तक्रारदार यांनी त्‍यांचा कॅमेरा हा दुरुस्‍तीकरिता दि.26/12/2017 रोजी म्‍हणजेच जवळजवळ खरेदी तारखेच्‍या 18 महिन्‍यानंतर दिलेला होता.  सदरचा कॅमेरा तक्रारदार यांनी त्‍या कालावधीमध्‍ये ब-याच वेळा कोणत्‍याही तक्रारीविना वापरला होता.  कॅमेरा रिपेअरीस देतेळी तक्रारदार यांनी कॅमे-यात हिरव्‍या रंगाच्‍या रेषा येतात असे सांगितले.  तो तपासला असता तो मुदतीत दुरुस्‍ती करुन दिला.  कॅमेरा दुरुस्‍त केल्‍यानंतर पाच महिन्‍यानंतर कॅमे-याच्‍या लेन्‍स, फोकस व बॅटरीबाबत तक्रार उपस्थित केली असे म्‍हणणे वि.प. यांनी दाखल केलेले आहे.  प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. कंपनीने तक्रारदार यांना ता. 6/7/2018 रोजी फस्‍ट रिमायंडर नोटीस दाखल केली आहे. तसेच अ.क्र.3 ला Standard Warranty Terms and conditions for Digital Camera and Camcorder Products ची प्रत दाखल केलेली आहे.  सदरच्‍या कागदपत्रांवरुन तक्रारदार यांच्‍या वादातील Standard Warranty एक वर्ष व Additional Warranty 1 वर्षे अशी दोन वर्षाची वॉरंटी होती ही बाब दिसून येते.  अ.क्र.5 व 6 ला वि.प. कंपनीने अनुक्रमे  दि.14/6/18 व 19/6/18 रोजी पाठविलेल्‍या मेलची प्रत दाखल केलेली आहे. अ.क्र.7 ला तक्रारदार यांनी वि.प. यांच्‍या प्रॉडक्‍टसंदर्भात ट्वीटरवर केलेले ट्वीट दाखल केलेले आहे.  त्‍याचे अवलोकन करता,

 

Shockingly pathetic response from a big company @ CanonUSA@Canon@Canon_India@CanonUKandIE with global presence. Regret my decision for buying a faulty Canon 1Dx-M2 DSLR where, even during the warranty period find lack of response.

 

असे नमूद आहे.  अ.क्र.8 ला वि.प. कंपनीने तक्रारदार यांना दि.25/7/2018 रोजी पाठविलेल्‍या मेलची प्रत दाखल केलेली आहे.  सदर दाखल मेलच्‍या प्रतीवरुन तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे वादातील कॅमे-यात दोष उत्‍पन्‍न झाल्यामुळे दुरुस्‍तीसाठी दिलेला असून सदरचा कॅमेरा वि.प. यांनी दुरुस्‍ती केलेला आहे ही बाब दिसून येते.  तथापि तक्रारदार यांचे पुराव्‍याचे शपथपत्राचे अवलोकन करता,

 

वि.प. यांनी सदरचा कॅमेरा दुरुस्‍त केलेनंतर त्‍याचे पी.सी.बी.मध्‍ये दोष होता म्‍हणून सदरचा पीसीबी बदलला असे कळविण्‍यात आले होते. वास्‍तविक वॉरंटी कालावधीत सदर कॅम-यामध्‍ये निर्माण झालेल्‍या दोषांचे पूर्ण निवारण झालेले नव्‍हते.  त्‍यामुळे सदर कॅमे-याच्‍या गुणवत्‍तेवर कमालीची घट झालेली आहे.  असे तक्रारदार यांनी सदर पुरावा शपथपत्रामध्‍ये कथन केलेले आहे.   

 

10.   सदरकामी वि.प. यांच्‍या म्‍हणण्‍याचे अवलोकन करता तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे दोन वेळा म्‍हणजेच दि.26/12/2017 व दि.18/5/2018 रोजी सदरचा कॅमेरा दुरुस्तीस दिलेला होता ही बाब मान्‍य केलेली आहे.  तसेच वि.प. यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यासोबत दाखल केलेल्‍या ता.18/5/2018 रोजीच्‍या कस्‍टमर सर्व्हिस रिपोर्टचे अवलोकन करता,

 

      Accessories submitted 1) body cap 2) Battery

      Problem reported by customer – Error 40

      Engineer remarks – Max cleaning done, parts replaced camera is ok. Submitted

                       battery  found defective

      Observation by engineer –     Symptoms - Operation failure

                                                    Cause - disconnection

                                                     Remedy – Replace parts, electrical adjustment                       

तसेच वि.प. यांनी त्‍यांच्‍या लेखी युक्तिवादामध्‍ये तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे जेव्‍हा कॅमेरा दुरुस्‍तीसाठी दिलेला होता, तो कॅमेरा वि.प. च्‍या तज्ञांनी तपासला व त्‍यांना सकृतदर्शनी असे आढळून आले की, तक्रारदार यांनी सदर कॅमे-याला Error येतो या कारणास्‍तव तक्रार वि.प. यांचेकडे दिलेली होती.  सबब, सदर तज्ञांनी सकृतदर्शनी  कॅमेरा तपासल्‍यावर त्‍यांना आढळून आले की, कॅमे-यावर धूळ माती जमा झाली होती व त्‍याचे बॉडी पार्ट डॅमेज झाले होते असा शेरा वि.प. यांच्‍या कस्‍टमर सर्व्हिस रिपोर्टवर मारलेला आहे असे लेखी युक्तिवादात कथन केले असले तरी सदरच्‍या कस्‍टमर सर्व्हिस रिपोर्टवरुन सदर कॅमे-याची Battery found defective असा रिमार्क इंजिनिअर यांनी दिलेचा दिसून येतो.  तसेच सदर इंजिनिअरच्‍या निरिक्षणामध्‍ये Symptoms – OPERATION FAILURE असे दिसून येते.  सदरची कागदपत्रे वि.प. यांनी मंचात दाखल केलेली असलेमुळे सदरचे कागद वि.प. यांना मान्‍य आहेत.   वि.प. यांनी त्‍यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदार यांनी सदरच्‍या कॅमे-याचा दोन वर्षामध्‍ये अतिवापर केल्‍यामुळे सदरचा दोष कॅमे-यात उत्‍पन्‍न झालेला आहे असे कथन केले आहे.  तथापि तक्रारदार यांच्‍या अतिवापरामुळे सदरच्‍या कॅमे-यामध्‍ये दोष निर्माण झाला होता असे सदर कस्‍टमर सर्व्हिस रिपोर्टमध्‍ये नमूद नाही अथवा त्‍याअनुषंगाने वि.प. यांनी कोणताही सबळ कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही.  त्‍या कारणाने केवळ तक्रारदार यांच्‍या अतिवापरामुळे सदर कॅमे-यामध्‍ये दोष उत्‍पन्‍न झाले ही वि.प. यांची कथने हे आयोग विचारात घेत नाहीत.  प्रस्‍तुतकामी सदरचा कॅमेरा हा वॉरंटी काळात नादुरुस्‍त झालेला असून तक्रारदार यांनी सदर दोषाच्‍या निवारणासाठी वि.प. यांचेकडे वेळोवेळी सदरचा कॅमेरा दुरुस्‍तीसाठी ईमलद्वारे तकार केलेची बाब कागदपत्रांवरुन सिध्‍द होते.  सबब, सदरकामी कस्‍टमर सर्व्हिस रिपोर्टवरुन वादातील कॅमे-यामध्‍ये बॅटरी दोष व ऑपरेशन फेल्‍युअर ही बाब स्‍पष्‍टपणे नमूद असलेमुळे सदर कॅमे-यामध्‍ये उत्‍पादित दोष असलेची बाब नाकारता येत नाही.   सबब वि.प. यांनी तक्रारदार यांना सदोष कॅमेरा देवून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला असून तक्रारदार यांना  तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.  प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांचे पुरावा शपथपत्र दाखल कागदपत्रांवरुन वि.प. यांनी वादातील कॅमेरा तक्रारदार यांना 30 दिवसांत घेवून जाणेचे पत्र तक्रारदार यांना पाठविलेले आहे. त्‍या कारणाने तक्रारदार यांनी वि.प. हे सदर कॅमे-याची विल्‍हेवाट लावणार याची भिती असलेने न्‍यायीक दाद मागणेचा हक्‍क अबाधीत ठेवून सदरचा सदोष कॅमेरा दि.8/8/18 रोजी स्‍वीकारलेला आहे असे कथन केलेले आहे. सबब, हे वि.प.क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना वादातील दोषयुक्‍त कॅमेरा परत घेवून तक्रारदार यांना नवीन त्‍याच प्रकारचा व गुणवत्‍तेचा कॅमेरा अदा करावा अथवा वि.प. 1 व 2 यांनी संयुक्तिकरित्‍या वादातील नमूद कॅमे-याची रक्‍कम रु.3,94,990/- तक्रारदार यांना अदा करावी तसेच तक्रार दाखल तारीख 27/08/2018 पासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.4

 

11.   वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.5  -  सबब आदेश.

 

 

 

 

- आ दे श -

 

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

 

  1. वि.प.क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना वादातील दोषयुक्‍त कॅनॉन कंपनीचा EOS-1DX Mark II हा कॅमेरा परत घेवून नवीन त्‍याच प्रकारचा व गुणवत्‍तेचा कॅमेरा अदा करावा.

                   अथवा 

   वि.प. क्र. 1 व 2 यांनी  संयुक्तिकरित्‍या  तक्रारदार  यांना  रक्‍कम  रु. 

   3,94,990/-  अदा  करावी  व  सदर  रकमेवर  तक्रार  दाखल  तारीख

   27/08/2018 पासून  सदरची संपूर्ण  रक्‍कम  तक्रारदार यास मिळेपावेतो  

   द.सा.द.शे.6 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.

 

  1. वि.प. यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- अदा करावी. 

 

  1. वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

  1. विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्‍वये वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

  1. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 

 

 

 
 

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.