जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 84/2014.
तक्रार दाखल दिनांक : 26/03/2014.
तक्रार आदेश दिनांक : 04/07/2014. निकाल कालावधी: 00 वर्षे 03 महिने 08 दिवस
श्री. गोविंद हरिपंत कुलकर्णी, वय 57 वर्षे,
व्यवसाय : वकिली, रा. रती अपार्टमेंटस्, 235,
दक्षीण कसबा, शनी मंदिराजवळ, सोलापूर – 413 007. तक्रारदार
विरुध्द
(1) कॅनरा बँक, रा. 112, जे.सी. रोड, बेंगलोर – 560 002.
(नोटीस चेअरमन यांचेवर बजावण्यात यावी.)
(2) कॅनरा बँक, सरस्वती चौक, सोलापूर.
(नोटीस मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.)
(3) कॅनरा बँक, रा. विठ्ठल मंदिराजवळ, पंढरपूर, जि. सोलापूर.
(नोटीस मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
श्री. ओंकारसिंह जी. पाटील, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : पी.पी. कुलकर्णी
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : आर.एम. करकाळे
आदेश
श्री. ओंकारसिंह जी. पाटील, सदस्य यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत प्रकरण आजरोजी सुनावणीसाठी मंचासमोर आले असता तक्रारदार व विधिज्ञांनी पुरसीस दाखल केली आहे आणि विरुध्द पक्ष यांनी दि.16/6/2014 रोजीचे माफीपत्र दिल्याचे नमूद करुन त्याची प्रत सोबत सादर केली आहे. त्यांनी पुरसीसद्वारे तक्रार निकाली काढण्याची विनंती केली आहे. सबब, विरुध्द पक्ष यांच्या पुरसीसप्रमाणे तक्रार निकाली काढण्यात येते.
(श्री. ओंकारसिंह जी. पाटील) (सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी÷)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
-00-
(संविक/स्व/4714)