सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 27/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि.12/05/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि.16/06/2015
श्री जॉन किस्तु फर्नांडीस
वय 46 वर्षे, धंदा- नोकरी,
रा.तळखांबा, चराठा ता.सावंतवाडी,
जि. सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) शाखाधिकारी,
कॅनरा बॅंक, गोरेगांव पश्चिम शाखा,
मुंबई.
2) कॅनरा बॅंक,सावंतवाडी शाखा,
वसंत प्लाझा,पहिला मजला,
गांधी चौक, मेन रोड सावंतवाडी,
ता.सांवतवाडी, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदार- वकील श्री.आर.डी.आंबिये आणि वकील श्री.एस.ए.धुरी
विरुद्ध पक्ष – कोणी नाही.
आदेश नि.1 वर
(दि.16/06/2015)
द्वारा : मा.प्रभारी अध्यक्ष, श्री. कमलाकांत ध. कुबल.
- सदरचे तक्रार प्रकरण विरुध्द पक्ष बॅंकेने ठेव पावतीची रक्कम व्याजासहित परत केली नसल्याने सेवा त्रृटी संबंधाने दाखल केले आहे.
- सदर तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे नॉमिनी म्हणून नांव असलेली ठेव पावती रक्कम रु.25,00,000/-(रु.पंचवीस लाख मात्र) व त्यावरील व्याज मागणी करुनही विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी दिले नाही. तसेच नॉमिनी म्हणून नाव असतांनाही वारस दाखला मागणी केला म्हणून विरुध्द पक्ष यांचेविरुध्द सेवात्रृटी संबधाने तक्रार दाखल करणेत आलेली आहे.
- सदर तक्रार अर्जाचे विनंती कलम 12 मध्ये तक्रारदार यांनी मुदतबंद ठेवपावंतीची मुददल रक्कम आणि व्याजाच्या रक्कमेची मागणी केली आहे. तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारीरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.1,00,000/- आणि तक्रारीचा खर्च अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जामध्ये नमुद ठेवपावतीची रक्कम ही रु.25,00,000/- ची आहे. या मंचाचे वित्तीय अधिकारक्षेत्र (Pecuniary Jurisdiction) हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 11(1) प्रमाणे रक्कम रु.20,00,000/-(रु.वीस लाख मात्र) पर्यंत मर्यादीत आहे .
- तक्रार प्रकरणाचे अॅडमीशन हिअरींगचे वेळी तक्रारदारचे वकीलांसमोर ही बाब स्पष्ट करणेत आली परंतु तक्रारदारतर्फे वकील श्री.आंबिये यांनी असा युक्तीवाद केला की तक्रारदार यांना पावतीची रक्कम देणेसाठी आज्ञापीत आदेश विरुध्द पक्षकार यांना होणेसाठी आकार रु.1,00,000/- केलेला आहे. त्यामुळे मंचाचे वित्तीय अधिकारक्षेत्रात कोणतीही बाधा येणारी नाही.
- सदरची तक्रार जरी विरुध्द पक्ष बॅंकेच्या सेवेतील त्रुटीसंबंधाने असली तरी तक्रारदार यांची मागणी ही ठेवपावतीची रक्कम रु. 25,00,000/-(रु.पंचवीस लाख मात्र) आणि त्यावरील व्याजासंबंधाने आहे. जिल्हा ग्राहक मंचाचे वित्तीय अधिकारक्षेत्र (Pecuniary Jurisdiction) हे फक्त रु.वीस लाख पर्यंत मर्यादीत आहे आणि तक्रारदार यांची मागणी रु.वीस लाख पेक्षा जास्त रक्कमेची आहे. त्यामुळे सदरची तक्रार जिल्हा ग्राहक मंचाचे आर्थिक अधिकारक्षेत्रात बसत नाही. सबब तक्रारदार याने योग्य त्या आर्थिक अधिकारक्षेत्र(Pecuniary Jurisdiction)असलेल्या मा.राज्य आयोग,मुंबई यांचे खंडपीठ कोल्हापूर यांचेकडे दाखल करण्यासाठी तक्रार परत करणेचे आदेश पारीत करीत आहेात.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंचाचे आर्थिक अधिकारक्षेत्राचे (Pecuniary Jurisdiction) बाहेरील असल्याने ती तक्रार तक्रारदारास परत करणेचे आदेश पारीत करणेत येतात.
- तक्रारदार यांनी मा.राज्य आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे खंडपीठ कोल्हापूर यांचेकडे तक्रार दाखल करणेचे सुचीत करणेत येते.
- तक्रारदारास आदेशाची प्रत पाठविणेत यावी.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 16/06/2015
Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्य, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.