Maharashtra

Nagpur

CC/10/550

Sau. Sunita Ashokrao Hadole - Complainant(s)

Versus

Cahitnyawadi Urban Credit Co-op. Society, Nagpur - Opp.Party(s)

Adv. Sanjay M. Kasture

23 Aug 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/550
1. Sau. Sunita Ashokrao HadolePlot No. 557, Chitanis Nagar, NagpurNagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Cahitnyawadi Urban Credit Co-op. Society, Nagpur7-A, Indraprastha, Ramna Marotinagar, Nagpur, Through Shri Chandrabhan Raghunath ApturkarNagpurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :Adv. Sanjay M. Kasture, Advocate for Complainant

Dated : 23 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

श्री.विजयसिंह राणे, मा. अध्‍यक्ष यांचे कथनांन्‍वये. 
 
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 23/08/2011)
 
1.                 तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून त्‍यांच्‍या तक्रारीचा आशय असा आहे की, त्‍यांनी रु.50,000/- मुदत ठेवी अंतर्गत गैरअर्जदार संस्‍थेकडे दि.03.03.2006 ला गुंतविले होते व सदर मुदत ठेव ही 03.09.2011 ला परीपक्‍व होणार होती. गैरअर्जदार संस्‍था यावर 13 टक्‍के व्‍याज देणार होती. तसेच तक्रारकर्त्‍यांचे गैरअर्जदार संस्‍थेकडे एक बचत खाते होते व त्‍यात रु.45,959/- ही रक्‍कम शिल्‍लक होती. तक्रारकर्त्‍यांना रकमेची गरज भासल्‍याने त्‍यांनी गैरअर्जदारांना मुदत ठेवीतील रक्‍कम ही मुदतपूर्व मागणी केली व बचत खात्‍यातील रकमेचीही मागणी केली. परंतू गैरअर्जदार संस्‍थेने ती फेटाळली. गैरअर्जदारांनी मुदत ठेवीची रक्‍कम रु.56,500/- ही बचत खात्‍यात दि.05.02.2010 रोजी स्‍थानांतरीत करण्‍यात आली. तक्रारकर्त्‍यांच्‍या बचत खात्‍यात रु.1,02,459/- जमा आहेत. तक्रारकर्त्‍यांनी रकमेची मागणी केली असता त्‍यांनीही रक्‍कम परत केली नाही. तक्रारकर्त्‍यांच्‍या मते ही सेवेतील त्रुटी आहे. म्‍हणून त्‍यांनी मंचासमोर तक्रार दाखल करुन, रु.1,02,459/- बचत खात्‍यातील रक्‍कम 18 टक्‍के व्‍याजासह मिळावी, शारिरीक व मानसिक त्रासाची भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत. तक्रारीसोबत बचत खात्‍याची व मुदत ठेवीची प्रत व गैरअर्जदारांना दिलेल्‍या पत्राची प्रत दाखल केलेली आहे. 
 
 
2.                सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना पाठविण्‍यात आली असता त्‍यांनी तक्रारीस संयुक्‍तपणे लेखी उत्‍तर दाखल केले व नमूद केले आहे की, मंचास अधिकार नाही, सर्वच ठेवीदारांनी एकाच कालावधीत गुंतविलेल्‍या रकमांची मागणी केल्‍यामुळे संस्‍था आर्थिक अडचणीत आलेली आहे आणि कर्ज रकमेची वसुली करुन गुंतवणुकदारांना/ठेवीदारांना ते रकमा भविष्‍यकाळात परत करतील. याबाबत तक्रारकर्त्‍यांना सांगण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे गैरअर्जदारांनी अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला नाही व सेवेत त्रुटी दिलेली नाही असे गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे म्‍हणणे आहे.
 
 
3.                सदर प्रकरण युक्‍तीवादाकरीता आल्‍यावर मंचाने तक्रारकर्त्‍यांचा युक्‍तीवाद त्‍यांच्‍या वकिलांमार्फत ऐकला. गैरअर्जदारांचे वकिलांनी त्‍यांचा लेखी जवाब हाच लेखी युक्‍तीवाद म्‍हणून ग्राह्य धरण्‍यात यावा अशा आशयाचे पुरसिस दाखल केले. मंचाने सदर प्रकरणी दाखल शपथपत्रे व दस्‍तऐवज यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
4.                गैरअर्जदारांनी मंचाचे अधिकार क्षेत्राबाबत घेतलेला मुद्दा, वरिष्‍ठ न्‍यायालयांचे अनेक निकालांद्वारे यापूर्वीच निकाली काढलेला आहे. तक्रारकर्त्‍यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज, यांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ते हे गैरअर्जदारांचे ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तऐवज क्र. 1 व 2 वरील बचत खाते पुस्तिकेच्‍या प्रतीवरुन व मुदत ठेवीच्‍या प्रमाणपत्रावरुन, तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदार संस्‍थेकडे असलेली मुदत ठेवीची रक्‍कम रु.56,500/- ही त्‍यांच्‍या बचत खात्‍यामध्‍ये स्‍थानांतरीत करण्‍यात आल्‍याचे जे तक्रारीत नमूद केले आहे ती बाब सत्‍य असल्‍याचे निदर्शनास येते. तसेच बचत खात्‍यात अगोदर रु.45,959/- जमा असल्‍याची नोंदही बचत खाते पुस्तिकेवर आहे. गैरअर्जदारांनीही सदर बाब नाकारलेली नाही. तसेच तक्रारकर्त्‍यांना रकमेची आवश्‍यकता असल्‍याने, त्‍यांनी गैरअर्जदार संस्‍थेला रक्‍कम परत मागितली, परंतू गैरअर्जदार संस्‍थेने त्‍यावर कोणतीही पावले उचलली नाही, असा उल्‍लेख तक्रारकर्त्‍यांनी प्रशासकीय अधिकारी यांना लिहिलेल्‍या पत्रात नमूद केले आहे.
 
5.                तक्रारकर्त्‍यांनी मुदत ठेवीची मागणी ही परीपक्‍वतेपूर्व केलेली आहे. गैरअर्जदारांनी त्‍याबाबत रु.56,500/- त्‍यांच्‍या बचत खात्‍यात स्‍थानांतरीत केलेले आहे. तक्रारकर्तीला याबाबत वाद नाही. फक्‍त बचत खात्‍यात एकूण जमा रक्‍कम मागणी करुनही परत केली नाही याबाबत त्‍यांचा वाद आहे. मंचाचे मते ठेवीदारांनी/तक्रारकर्त्‍यांनी त्‍यांची जमा रक्‍कम परत मागितल्‍यानंतरही ती परत न करणे ही गैरअर्जदार यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे, म्‍हणून तक्रारकर्ते सदर प्रकरणी त्‍यांच्‍या बचत खात्‍यात स्‍थानांतरीत केलेली रक्‍कम रु.1,02,459/- व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहेत.
 
6.                गैरअर्जदारांनी रक्‍कम फक्‍त बचत खात्‍यात स्‍थानांतरीत केलेली आहे, मात्र परत करण्‍याबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत. तक्रारकर्त्‍यांनी रकमेची मागणी ही अपंग मुलाच्‍या उपचाराकरीता केलेली आहे आणि रक्‍कम न मिळाल्‍याने निश्चितच मानसिक त्रास सहन करावा लागला असावा व पर्यायाने मंचासमोर येऊन दाद मागावी लागली, म्‍हणून मंचाचे मते तक्रारकर्ते मानसिक त्रासाची भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्‍यास पात्र आहेत. उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍यांना, रु.1,02,459/- ही रक्‍कम    दि.05.02.2010 पासून रकमेच्‍या संपूर्ण अदाएगीपावेतो द.सा.द.शे. 9 टक्‍के  व्‍याजासह द्यावी.
3)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍यांना, रु.10,000/- मानसिक त्रासाच्‍या    भरपाईपोटी व रु.2,000/- तक्रारीच्‍या खर्चापोटी द्यावे.
4)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्‍तपणे किंवा वैयक्‍तीकपणे      आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावे.
 
 

[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT