जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 140/2011 तक्रार दाखल तारीख –12/09/2011
श्रीमती गंगुबाई भ्र.मोहन लोखंडे
वय 55 वर्षे धंदा शेती व घरकाम .तक्रारदार
रा.साठेवाडी ता.गेवराई जि.बीड
विरुध्द
1. विभाग प्रमुख,
कबाल इन्शुरन्स कंपनी लि.
भास्करायण प्लॉट नं.7 ई सेक्टर-1,
टाऊन सेंटर, सिडको,औरंगाबाद. सामनेवाला
2. .शाखा व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
मंडल कार्यालय क्र.2 अंबिका हाऊस
शंकर नगर चौक,नागपूर -440 010
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.अशोक पावसे
सामनेवाला क्र.1 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.2 तर्फे ः- अँड.व्ही.एस.जाधव
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे पती नामे मोहन सुभा लोखंडे हे शेतकरी होते. त्यांचा दि.17.07.2010 रोजी रोड अपघाताने मृत्यु झालेला आहे. घटनेची माहीती गेवराई पोलिस स्टेशनला देण्यात आलेली आहे. त्यांनी तपास करुन मृत्यूची नोंद केलेली आहे. मयताचा पंचनामा करुन त्यांचे शवविच्छेदन करण्यात आलेले आहे.
तक्रारदारांनी मयताच्या विम्याची रक्कम मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी गेवराई यांचेमार्फत सामनेवाला क्र.1 व 2 कडे सर्व कागदपत्र सांक्षाकीत करुन प्रस्ताव दाखल केला. परंतु सामनेवाला क्र.1 व 2 यांनी आजपर्यत दावा मंजूर केलेला नाही. ही सामनेवाला यांचे सेवेतील त्रुटी आहे. म्हणून मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व खर्चाची रक्कम रु.5,000/- ची मागणी तक्रारदार करीत आहे.
विनंती की, विमा रक्कम रु.1,00,000/- 18 टक्के व्याजासहीत सामनेवाला यांनी देण्या बाबत आदेश व्हावेत. सामनेवाला क्र.2 यांनी विमा दावा सामनेवाला क्र.1 कडे पाठवून त्वरीत निर्णय घ्यावा असे आदेश व्हावेत. मानसिक शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व खर्चापोटी रु.5,000/- देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा दि.02.11.2011 रोजी पोस्टाने दाखल केला. श्री. मोहन लोखंडे रा. साठेवाडी ता.गेवराई यांचा अपघात दि.17.07.2010 रोजी झाला. त्यांचा दावा दि.04.1.1.2010 रोजी अपूर्ण कागदपत्र उदा. बँक पासबूक प्रत, 6-क मूळ, शवविच्छेदन अहवाल, 8-अ, पोलिस अधिका-याने सांक्षाकीत केलेला इत्यादी अपुर्ण कागदपत्रासह मिळाला. त्या बाबतचे पत्र दि.07.12.2010 रोजी दिलेले आहे. परतु तक्रारदारांनी आवश्यक ती कागदपत्र दाखल न केल्याने सदरचा दावा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी नागपूर कडे दि.21.12.2010 रोजी अपूर्ण कागदपत्राचे शे-याने पाठविला. अंतिमतः युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने सदरचा दावा दि.31.12.2010 रोजीच्या पत्राने बंद केला.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा दि.15.12.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. विमा कालावधी हा दि.14..11.2010 पर्यतच होती. दावा दाखल करताना तक्रारदारांनी अपूरे कागदपत्र दाखल केले होते ते मूदतीत नव्हते. प्रस्ताव हा अपघात झाल्यानंतर 90 दिवसांचे आंत पूर्ण कागदपत्रासह विमा कंपनीकडे सूपूर्द करायला पाहिजे अशी तक्रारीत आहे.
जेव्हा महाराष्ट्र शासन,कृषी अधिकारी यांचेशी या सामनेवाला यांचा करार झालेला असल्याने व संबंधीत शेतक-याने या सामनेवालाकडे कूठलाही विमा रक्कमेचा हप्ता भरलेला नाही. त्यामुळे सामनेवाल्यामध्ये किंवा तक्रारदारामध्ये कोणताही करार नाही तो सामनेवाला यांचा ग्राहक नाही. त्यामुळे शेतकरी या जिल्हा मंचात या सामनेवाला विरुध्द दाद मागण्यास पात्र नाही.
कागदपत्र अपुर्ण असल्याने व तो मूदतीत दाखल केलेले नव्हते म्हणून दावा नामंजूर करण्यात आलेला आहे.
कृषी खात्याचे आयुक्त यांचे बरोबर करार झालेला असल्याने तक्रारीत त्यांना सामनेवाला म्हणून समाविष्ट करणे आवश्यक होते. तसे न केल्याने तक्रार टेनेबल नाही, खारीज करण्या योग्य आहे.
विनंती की, तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 व 2 यांचा खुलासा, सामनेवाला क्र. 1 चे शपथपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.पावसे व सामनेवाले क्र.2 यांचे विद्वान वकील श्री.जाधव यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी सदरचा दावा सांक्षाकीत कागदपत्रासह तालुका कृषी अधिकारी गेवराई यांचे मार्फत सामनेवाला क्र.1 व 2 कडे दाखल केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. सदर सामनेवाला क्र.1 चा खुलासा पाहता तक्रारदाराचा प्रस्ताव त्यांना अपूर्ण कागदपत्रासह मिळाला. त्यात अपूर्ण कागदपत्र बँक पासबूक, 6-क, इन्क्वेस्ट पंचनामा पोलिस अधिका-यांने सांक्षाकीत केलेले इत्यादी कागदपत्र अपूर्ण होते. त्या संदर्भात सामनेवाला क्र.1 यांनी संबंधीत अधिकारी यांनी पत्राने कळविले आहे परंतु त्या बाबतची पूर्तता झालेली नाही. तसेच तशाच अपूर्ण अवस्थेत दावा सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 कडे पाठविला आहे व सामनेवाला क्र.2 यांनी अपूर्ण कागदपत्राच्या कारणास्तव दावा नाकारला आहे. या अपूर्ण कागदपत्रामध्ये बँक पासबूक प्रत, 6-क हे आवश्यक कागदपत्र आहे. ही कागदपत्र तक्रारदारांनी तक्रारीतही दाखल केलेली नाही. सदरचे कागदपत्र तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत सामनेवालाकडे पाठविल्याचे तक्रारदाराचे विधान आहे परंतु त्या बाबत कोणताही कागदोपत्री पुरावा नाही. त्यामुळे महत्वाची कागदपत्र नसल्या कारणाने सामनेवाला यांनी सदरचा दावा योग्य रितीने नाकारल्याची बाब स्पष्ट होते यात सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब कूठेही स्पष्ट होत नाही. त्यामुळे तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे तक्रारदाराची तक्रार मंजूर करणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड