जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 138/2011 तक्रार दाखल तारीख – 12/09/2011
तक्रार निकाल तारीख– 30/04/2013
श्रीमती आशाबाई भगवान निलंगे,
रा.वरवटी ता.अंबाजोगाई जि.बीड. ... अर्जदार
विरुध्द
1) विभाग प्रमुख,
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्विस प्रा.लि.,
शॉप नं. राज अपार्टमेंट, सिडको
औरंगाबाद.
2) शाखा व्यवस्थापक,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
19, रिलायन्स सेंटर, वालचंद हिराचंद
मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई. ... गैरअर्जदार
समक्ष - श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
अर्जदारातर्फे अड.ए.एस.पावसे,
गैरअर्जदार क्र.1 तर्फे कोणीही हजर नाही,
गैरअर्जदार क्र.2 तर्फे अड.ए.पी कुलकर्णी.
---------------------------------------------------------------------------------------
निकाल
दिनांक- 30.04.2013
(द्वारा- श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य)
तक्रारदारांचे पती श्री.भगवान निलंगे हे वयवसायाने शेतकरी असून दि.20.03.08 रोजी विहीरीत पडल्यामुळे पाण्यात बूडून मृत्यू पावले. सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन यांना मिळाल्यानंतर पोलीसांनी तपास काम करुन मृत्यूची नोंद केली. घटनास्थळ पंचनामा, मयत व्यक्तींचा पंचनामा करुन प्रेत पोस्टमार्टमसाठी पाठवले.
(2) त.क्र.138/11
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्ताव कृषी अधिकारी अंबाजोगाई यांचे मार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे दाखल केला. अद्याप पर्यंत नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव दि.09.06.08 रोजी प्राप्त झालेला असून प्रस्तावामध्ये काही कागदपत्रांची म्हणजेच मुळ तहसिलदार प्रमाणपत्र, मुळ मृत्यू प्रमाणपत्र, मुळ 7/12, 8अ चा उतारा, वयाचे प्रमाणपत्र साक्षांकित केलेले वगैरेची मागणी तक्रारदारांना करुनही सदर कागदपत्रांची पुर्तता झाली नाही. त्यामुळे “अपूर्ण कागदपत्रांच्या” शे-यासह विमा प्रस्ताव दि.23.06.10 रोजी गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. तक्रारदारांनी कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळे दि.24.11.10 रोजी विमा प्रस्तावाची फाईल गैरअर्जदार क्र.2 यांनी बंद केली.
गैरअर्जदार क्र.2 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव मुदतबाहय असून पॉलीसीतील अटी व शर्तीनुसार नियमाप्रमाणे कागदपत्रांसहीत गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे दाखल केला नाही. तक्रारदारांना सदर तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नाही.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, गैरअर्जदार क्र.1, 2 यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. तसेच तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.पावसे आणि गैरअर्जदार क्र.2 यांचे विद्वान वकील श्री.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांचा प्रस्तावामध्ये गैरअर्जदार क्र.1 यांच्या लेखी म्हणण्यानुसार काही कागदपत्रांच्या म्हणजेच मुळ प्रत तहसिल प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, 7/12 व 8अ चा उतारा, वयाचे प्रमाणपत्र वगैरे पूर्तता न झाल्यामुळे तक्रारदारांचा अपरिपूर्ण प्रस्ताव गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. तक्रारदारांनी कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळे दि.24.11.10 रोजी प्रस्तावाची फाईल बंद केली.
गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीने कागदपत्राच्या पुर्ततेच्या तांत्रिक कारणास्तव तक्रारदारांचा प्रस्ताव फेटाळणे उचित नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
(3) त.क्र.138/11
तक्रारदारांनी शकुंतला मूंढे विरुध्द स्टेट ऑफ महाराष्ट्र 2010 (2) Mh.L.J हा न्यायनिवाडा त्यांचे समर्थनार्थ दाखल कला आहे. सदरील न्यायनिवाडयानुसार सदर योजना ही शेतक-यांकरीता कल्याणकारी योजना राबवलेली असल्यामुळे कागदपत्रांच्या पुर्ततेच्या कारणास्तव फेटाळणे योग्य नाही असे नमुद केले आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीने तक्रारदारांचा प्रस्ताव गुणवत्तेवर निकाली करणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांचा
शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्ताव आदेश
मिळाल्यापासून 60 दिवसात गुणवत्तेवर निकाली करावा.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड