मंचाचे निर्णयान्वये - श्री. रामलाल सोमाणी, अध्यक्ष //- आदेश -// (पारित दिनांक – 09/09/2010) 1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय असा आहे की, तक्रारकर्तीचे पती श्री. गजानन जंगलू बनकर होते, रस्ता अपघातात दि.10.08.2006 मरण पावले. गैरअर्जदार क्र. 1 विमा एजंट आहे आणि गैरअर्जदार क्र. 2 या भागातील शेतक-यांचे विमाकृत करणारी संस्था आहे. तक्रारकर्तीने गैरअर्जदाराकडे मृतक पतीचा नि धनाबद्दल नुकसान भरपाई म्हणून दाव्याची मागणी केली असता 26.05.2008 रोजी चुकीचे कारण देऊन गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला आहे. गैरअर्जदाराने नमूद केले आहे की, “ गजाननचा मृत्यु झाल्यानंतर जमीन हस्तांतरीत केली.” या शे-यासह दावा मंजूर केला आहे. गजाननचे वडील यांचा मृत्यू 01.10.1970 रोजी झाला तेव्हापासून वारस म्हणून मृतक गजाननचे नाव भुमी स्वामी म्हणून सर्व्हे नं. 5, आराजी 0.75 हे.आर.चे शेतकरी होते. एक वर्ष उशिरा तक्रारकर्त्याचा दावा नामंजूर केलेला आहे. भरपूर पत्रव्यवहार केल्यानंतर सुध्दा नुकसान भरपाई मिळाली नाही, म्हणून तक्रारकर्ती 23.03.2008 पासून 15 टक्के व्याज गैरअर्जदाराकडून मिळण्यास पात्र आहे. तक्रारकर्तीने प्रार्थना केली आहे की, विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- व रु.50,000/- 15 टक्के व्याज, रु.25,000/- मानसिक त्रासापोटी, रु.20,000/- खर्चापोटी व रु.1,000/- नोटीस खर्चापोटी असे एकूण रु.1,97,000/- नुकसान भरपाई गैरअर्जदाराकडून मिळावी आणि गैरअर्जदाराने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे असे ग्राह्य धरण्यात यावे. तक्रारकर्तीने एकूण 27 दस्तऐवज दाखल केलेले आहेत. 2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठविण्यात आला होता. उभय गैरअर्जदारांना नोटीस भेटूनही ते गैरहजर राहिले. त्यांच्याविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश 03.08.2010 रोजी पारित करण्यात आले. तक्रारकर्तीच्या वतीने दि.08.09.2010 रोजी शासनाच्या दिशा-निर्देशाची प्रत दाखल करण्यात आली. उभय गैरअर्जदार गैरहजर असल्याकारणाने तसेच तक्रार शपथपत्रासह असल्याने मंचाने प्रकरण सुक्ष्मपणे वाचन व तपासणी केली. तसेच दस्तऐवजाचे अवलोकन करुन मंच खालील निष्कर्षाप्रत आले. 2. -निष्कर्ष- 3. दाखल दस्तऐवजाप्रमाणे ही बाब स्पष्ट होते की, मृतकाच्या वडिलांच्या नावाने शेती व त्यानंतर मृतकाच्या नावाने ती आलेली आहे. तसेच तहसिलदाराने प्रमाणपत्र दिले आहे की, तक्रारकर्ती ही दावा मिळण्यास पात्र आहे व आवश्यक दस्तऐवज गैरअर्जदाराकडे पाठविण्यात आलेले आहे. तक्रारकर्तीच्या कथनाला कोणताही विरोध नाही. दस्तऐवज पृष्ठ क्र.48, व 49 वरुन स्पष्ट होते की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी 27.05.2008 ला तक्रारकर्तीचा दावा नामंजूर केलेला आहे. तसेच गैरअर्जदाराला नोटीस मिळाल्या नंतरही उत्तर दिलेले नाही. तहसिलदार, सावनेर यांच्याकडे मृतकाच्या नावाने त्याच्या मृत्यू आधी जमिन होती असे मान्य केलेले आहे. वरील कागदपत्रावरुन मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, गैरअर्जदाराने कपोलकल्पीत कारण देऊन तक्रारकर्तीचा दावा नामंजूर केलेला आहे आणि रास्त दावा नामंजूर करुन तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 4. तक्रारकर्त्याने 15 टक्के व्याजाची मागणी केलेली आहे आणि त्याअनुषंगाने त्यांनी दिशा निर्देशाची प्रत दाखल केलेली आहे. गैरअर्जदार प्रकरणात हजर नाही आणि कायदेशीर व न्यायोचित आदेश होण्याकरीता रास्त व्याज तक्रारकर्तीला मंजूर करणे न्यायोचित राहील असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारकर्तीला या संपूर्ण प्रकरणात भरपूर मानसिक त्रास सहन करावा लागला आहे आणि त्याकरीता नुकसान भरपाई दाखल रक्कम मंजूर करणे न्यायोचित राहील. तसेच गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला प्रकरण दाखल करण्यास भाग पाडले, म्हणून तक्रारीचा खर्च देण्यास गैरअर्जदाराला आदेश देण्यात येतात. 5. तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवज पृष्ठ क्र. 12 मृतकानंतर वारसांची संख्या दिलेली आहे. मंचासमोर तक्रारकर्तीच्या मुलाचे लग्न झालेले आहे किंवा नाही याबद्दल कोणतीही स्थिती स्पष्ट झालेली नाही. तक्रारकर्तीचे वय 45 वर्ष दाखविण्यात आलेले आहे. तक्रारकर्ती सुशिक्षीत दिसून येत नाही. म्हणून तिला देणे असलेली रक्कम दिला व मृतकाच्या मुलाला प्रदीप यांच्या नावाने देणे व त्यातून काही रक्कम मुदत ठेवीमध्ये ठेवण्याचे आदेशीत करणे शेतकरी/तक्रारकर्ती लाभार्थी राहील. म्हणून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला रास्त दावा नाकारुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 3) गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला मृतक गजानन मृत्यू दाव्यासंबंधी रु.1,00,000/- 28.03.2007 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याज दराप्रमाणे देय करावे. 4) गैरअर्जदाराने नुकसान भरपाईदाखल तक्रारकर्तीला रु.5,000/- देय करावे. तक्रारीचा खर्च रु.1,000/- देय करावा. 5) उपरोक्त आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे अन्यथा आदेशीत रकमेवरील देय व्याज देय तारखेपासून 9 टक्केऐवजी 12 टक्के राहील याची गैरअर्जदाराने नोंद घ्यावी. 6) गैरअर्जदाराने उपरोक्त आदेशानुसार मंचात रक्कम जमा झाल्यानंतर प्रबंधकांनी तक्रारकर्ती व तिचा मुलगा प्रदीप यांच्या नावाने प्रत्येकी रु.25,000/- तक्रारकर्तीच्या पसंतीच्या राष्ट्रीकृत बँकेत 5 वर्षाकरीता मुदतठेवीमध्ये ठेवण्याकरीता द्यावी. तक्रारकर्ती सदर रकमेवरील व्याज घेण्याच्या मोकळीक राहील. उर्वरित संपूर्ण रक्कम तक्रारकर्तीच्या नावाने अकाऊंट पेयी चेकद्वारे देण्यात यावे. ठेव ठेवण्यात आलेल्या बँकेने सदर रक्कम अपरीपक्व देऊ नये. कारण मंचाचे आदेशाशिवाय किंवा कोणत्याही कर्ज बोजा गहाण निर्माण करु नये. 7) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे. 8) तक्रारकर्त्याने दाखल ‘ब’ व ‘क’ फाईल्स (सदस्यांकरीता फाईल्स) घेऊन जावे.
| [HONABLE MR. Mr. Milind R. Kedar] Member[HONABLE MR. Ramlal Somani] PRESIDENT | |