निकाल (घोषित दिनांक 20/01/2011 द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष)
विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तिचे पती छोटूसिंग काकरवाळ हे शेतकरी होते. त्यांचे दिनांक 22/7/2008 रोजी अपघाती निधन झाले. महाराष्ट्र शासनाने शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला असून सदर विमा योजनेच्या कालावधीमध्येच तिचे पती छोटूसिंग यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे तिने दिनांक 18/10/2008 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 तहसिलदार कन्नड यांच्याकडे शेतकरी अपघात विमा योजनेनुसार पतीच्या अपघाती मृत्यूबद्दल नुकसान भरपाई मिळणेसाठी आवश्यक कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला. विमा दावा प्राप्त झाल्यानंतर तहसिलदार कन्नड यांनी तो विमा दावा गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. यांच्याकडे पाठविला व त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तो विमा दावा गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठविला. परंतु वारंवार विचारणा करुनही गैरअर्जदार विमा कंपनीने तिच्या विमा दाव्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही व तिला विम्याचा लाभ दिला नाही. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की तिला गैरअर्जदारांकडून विमा रक्कम रु 1,00,000/- व्याजासह देण्यात यावेत व ईतर नुकसान भरपाई देण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांनी लेखी म्हणणे दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की मयत छोटूसिंग काकरवाळ यांचा दिनांक 22/7/2008 रोजी अपघात झला व तक्रारदाराचा विमा दावा त्यांच्याकडे दिनांक 13/12/2008 रोजी प्राप्त झाला. पॉलिसीचा कालावधी दिनांक 15/8/2007 ते 14/8/2008 असा असल्यामुळे पॉलिसीतील अटीनुसार विमा दावा पॉलिसी कालावधी संपल्यापासुन 90 दिवसांच्या आंत म्हणजे दिनांक 14/11/2008 रोजी किंवा त्यापुर्वी दाखल होणे आवश्यक होते. परंतु विमा दावा विलंबाने म्हणजे दिनांक 13/12/2008 रोजी प्राप्त झाला व तो विमा दावा दिनांक 31/1/2009 रोजी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठविण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांनी लेखी निवेदन दाखल केले. विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, पॉलिसी सुरु झाली त्यावेळी मयत व्यक्ती शेतकरी होता याबाबतचा पुरावा तक्रारदाराने दाखल केला नाही. तक्रारदार त्यांची ग्राहक नाही. कारण विम्याबाबत तक्रारदारासोबत कोणताही करार झालेला नसुन शासनासोबत विम्याबाबत करार झालेला आहे. तक्रारदाराने विमा दावा दाखल केल्याबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. तक्रारदाराचा विमा दावा त्यांना मिळालेला नाही. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेसच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराचा विमा दावा निर्धारीत तारखेनंतर दाखल झाला होता. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार चालण्यास योग्य नाही म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 तहसिलदार यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर आहेत म्हणून त्यांच्या विरुध्द ही तक्रार एकतर्फा चालविण्यात आली.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स होय
कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय
2. आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 :- तक्रारदाराचे पती मयत छोटूसिंग काकरवाळ हे शेतकरी होते ही बाब तक्रारदाराने दाखल केलेल्या गाव नमुना 7/12 चा उतारा नि.क्र.5/10 वरुन स्पष्ट दिसून येते. तसेच मयत छोटूसिंग याचे दिनांक 22/7/2008 रोजी अपघातामध्ये डोक्याला मार लागल्याने निधन झाले होते हे देखील शवविच्छेदन अहवाल निशानी क्रमांक 5/7 वरुन स्पष्ट दिसून येते.
महाराष्ट्र शासनाने गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी कडे औरंगाबाद विभागातील शेतक-यांचा दिनांक 15/8/2007 ते 14/8/2008 या कालावधीसाठी शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता ही बाब कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांनी लेखी निवेदनाद्वारे स्पष्ट केलेली आहे.
तक्रारदाराचे पती छोटूसिंग यांचे दिनांक 22/7/2008 रोजी म्हणजे गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे कडील शेतकरी अपघात विमा पॉलिसीच्या कालावधीमध्येच अपघाती निधन झालेले असून तक्ररदाराने सदर योजनेतील तरतुदीनुसार दिनांक 18/10/2008 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 तहसिलदार कन्नड यांच्याकडे पतीच्या अपघाती