निकाल
दिनांक- 20.06.2013
(द्वारा- श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदारांचे पती देविदास नारायण मुंडे शेतकरी असून मौजे वानटाकळी ता.परळी जि.बीड येथे त्यांचे मालकीची शेतजमीन आहे. दुर्दैवाने दि.22.04.09 रोजीच्या
(2) त.क्र.141/11
अपघातामध्ये मृत्यू पावले. तक्रारदारांनी सदर अपघाताची माहिती परळी पोलीस स्टेशन यांना दिली. पोलीसांनी मयत व्यक्तीचा पंचनामा करुन प्रेत पोस्टमार्टमसाठी पाठवले. तक्रारदारांनी सदर प्रकरणात एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट वगैरे दाखल केले आहे.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी परळी यांचे मार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे दाखल केला. परंतू अद्याप पर्यंत प्रस्तावाबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांचे लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या प्रस्तावामध्ये काही कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी मागणी केली. शेवटी दि.21.06.10 रोजी अपूर्ण प्रस्ताव गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीकडे पाठवला. गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीने तक्रारदारांना सदर कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी कळवले परंतू कागदपत्रांची पुर्तता न झाल्यामुळे दि.24.11.10 रोजी प्रस्तावाची फाईल बंद करण्यात आली.
गैरअर्जदार क्र.2 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांचा विमा कालावधी दि.15.08.08 ते 14.08.09 असून सदर कालावधीनंतर 90 दिवसाच्या आत योग्य मार्गाने व आवश्यक कागदपत्रांसह दाखल करणे आवश्यक आहे. परंतू तक्रारदारांनी वरील नियमानुसार प्रस्ताव दाखल केला नाही. तक्रारदारांचा प्रस्ताव नामंजूर अथवा मंजूर केलेला नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नाही.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे वकील युक्तीवादासाठी सतत गैरहजर असल्यामुळे सदर प्रकरण गुणवत्तेवर निकाली करण्याचा निर्णय न्यायमंचाने घेतला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांचे पती श्री.देविदास नारायण मुंडे हे शेतकरी असून त्यांचा अपघाती मृत्यू दि.22.04.09 रोजी झाल्याचे दिसून येते. गैरअर्जदार क्र.1 कबाल इन्शुरन्स यांचे लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांची प्रस्तावाची फाईल
(3) त.क्र.141/11
गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीने दि.24.11.10 रोजी बंद केली आहे. परंतू दि.24.11.10 रोजीचे पत्र सदर प्रकरणात दाखल नाही. त्याचप्रमाणे या संदर्भातील पत्र तक्रारदारांना दिल्याबाबतचा कोणताही पुरावा न्यायमंचासमोर नाही. वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदारांची तक्रार विहीत मुदतीत दाखल आहे असे न्यायमंचाचे मत आहे.
गैरअर्जदार क्र.1 कबाल इन्शुरन्स यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांचा प्रस्तावामध्ये शपथपत्र 20/-रु.चे बॉण्ड पेपरवरचे, वयाचा दाखला, 6क चा उतारा, एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट वगैरे कागदपत्रांची पुर्तता न झाल्यामुळे प्रस्तावाची फाईल बंद केली आहे. म्हणजेच तक्रारदारांचा प्रस्ताव गुणवत्तेवर निकाली झालेला नाही. तांत्रिक कारणास्तव सदर प्रस्तावाची फाईल बंद केली आहे. शासनाने सदरची योजना शेतक-यांकरीता कल्याणकारी योजना राबवलेली असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव फेटाळणे उचित नाही.
तक्रारदारांनी गैरअर्जदार क्र.1 यांचे लेखी म्हणण्यामध्ये नमुद केलेली सर्व कागदपत्रे गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीकडे दाखल करावी. तसेच गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीने सदर कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर विलंबाचा मुददा वगळून तक्रारदारांचा प्रस्ताव गुणवत्तेवर निकाली करणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदारांना आदेश देण्यात येतो की, गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीकडे शपथपत्र 20/-रु.चे बॉण्ड पेपरवरचे, वयाचा दाखला, 6क चा उतारा,
एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम
रिपोर्ट वगैरे कागदपत्रे आदेश मिळाल्यापासून 30 दिवसात दाखल करावी.
2) गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की,
तक्रारदारांकडून आदेश क्र.1 मध्ये नमुद केलेली कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर 60 दिवसात तक्रारदारांचा प्रस्ताव विलंबाचा मुददा वगळून गुणवत्तेवर निकाली करावा.
(4) त.क्र.141/11
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड