(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्यक्ष(प्रभारी))
(पारीत दिनांक : 31 मार्च 2012)
1. अर्जदार हीने सदर तक्रार, शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याकरीता दाखल केली असून, जुना मुळ तक्रार क्र.9/2008 मध्ये आदेश दि.25.8.2008 अन्यये पारीत झाला. मा.राज्य आयोग, महाराष्ट्र राज्य मुंबई, सर्कीट बेंच, नागपूर यांचे कडील अपील क्र.A/08/880 आदेश दि.4.5.11 चे आदेशान्वये सदर तक्रारीत गै.अ.क्र.3 ला जोडण्याची परवानगीसह केस पुन्हा चालविण्याकरीता मंचाकडे पाठविण्यात आले. मा.राज्य आयोग, महाराष्ट्र राज्य मुंबई, सर्कीट बेंच, नागपूर यांचे कडील अपील क्र.A/08/880 आदेश दि.4.5.11 चे आदेशान्वये मुळ तक्रारीत दुरुस्ती करण्यात आली व नवीन तक्रार क्रमांक देण्यात आला. तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
2. अर्जदार हीने मृतक इंशुअर्ड विस्तारी श्रीराम मखरे यांची पत्नी असून विस्तारी श्रीराम मखरे यांचा अपघात दि.5.4.2007 ला मोटार सायकल स्लीप होवून आरमोरी ब्रम्हपूरी रोड, उदापूर गावाच्या शिवारात प्रभुकृपा राईस मिलजवळ झाला. अर्जदार विधवेच्या पतीचे नांवे शेतजमीन होती व तो व्यवसायाने शेतकरी होता व सदर शेतजमीनीतून उत्पन्न घेत होते.
3. महाराष्ट्र सरकाने महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी शेतकरी अपघात विमा काढला असल्यामुळे व त्याची विदर्भातील जबाबदारी नॅशनल इन्शुरन्स कं.लि.कडे व कबाल इन्श्युरंस सर्व्हीस प्रा.लि. या विमा कंपनीकडे आहे. अर्जदार विधवेचे पती विस्तारी श्रीराम मखरे हे मोटार सायकल अपघाताने मृत्यु पावल्यामुळे, अर्जदार हीने शेतकरी अपघात विमा रुपये 1 लाखाचा धनादेश मिळावा म्हणून अपघाता संबंधीत सर्व कागदपञासहीत व शेतीच्या सातबारा, गांव नमुना-8, हल्ली मुक्काम असलेल्या ठिकाणासह तहसिलदार देसाईगंज (वडसा) मार्फत दोन प्रतीत अर्ज सादर केला. एक प्रत कबाल इन्श्युरन्स कंपनी व दूसरी प्रत तहसिलदार देसाईगंज यांना दिली. दिनांक 1.9.2007 ला तहसिलदार देसाईगंज यांच्या कार्यालयातून एक ञुटीचे पञ आले. अर्जदार हिने लगेच नमुना-6 क ची प्रत तहसिलदार देसाईगंज यांना देवून ञुटीची पुर्तता केली. अर्जदार हीने सर्व कागदपञाची पुर्तता करुन सुध्दा अर्जदाराला त्याच्या मृतक इन्शुअर्ड पतीचा विमा मिळावा म्हणून तहसिलदार, देसाईगंज यांचेकडे वारंवार चौकशी करुन सुध्दा
... 3 ... (ग्रा.त.क्र.26/2011)
विम्याची रक्कम न मिळाल्यामुळे नाईलाजास्तव ग्राहक न्यायमंचाकडे सादर केली. अर्जदाराने शेतकरी अपघात विमा अंतर्गत न मिळालेली रक्कम रुपये 1,00,000/-, नुकसान भरपाई खर्च रुपये 25,000/- असे एकूण रक्कम रुपये 1,25,000/- मिळावी व विम्याची रक्कम न मिळाल्यामुळे अर्जाच्या तारखेपासून 18 टक्के व्याज गै.अ.क्र.1, 2 व 3 कडून देण्याची प्रार्थना केली आहे.
4. अर्जदार हीने नि.क्र.3 नुसार 15 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार आर.बी.सी. म्हणून नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गै.अ.क्र.1 ने नि.क्र.16 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गै.अ.क्र.2 ने मंचात दि.16.6.08 ला लेखी उत्तर दाखल केला. गै.अ.क्र.3 ने हजर होऊन नि.क्र. 18 नुसार लेखी बयान दाखल केले.
5. गै.अ.क्र.1 ने लेखी उत्तरात नमूद केले की, सदर तक्रारीतून कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. ला निर्दोष मुक्त करावे अशी विनंती केली आहे. तक्रारदार हे आमचे ग्राहक होऊ शकत नाहीत, परंतु, ज्या विमा कंपनीने राज्य शासनाकडून विमा प्रिमीयम स्विकारुन ही जोखीम स्विकारलेली आहे, त्याचेच ग्राहक होऊ शकतात. आम्ही केवळ सल्लागार आहोत व शासनास विना मोबदला सहाय्य करतो. यामध्ये, मुख्यत्वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषि अधिकारी/तहसिलदार यामार्फत आमच्याकडे आल्यावर विमा दावा अर्ज योग्यपणे भरला आहे कां ? सोबत जोडलेली कागदपञे विमा कंपनीने मागणी केल्याप्रमाणे आहेत कां ? नसल्यास तालुका कृषि अधिकारी, तहसिलदार यांना कळवून त्यांची पुर्तता करवून घेणे व सर्व योग्य कागदपञे मिळाल्यावर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडून दावा मंजूर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे, ऐवढाच आहे. विस्तारी श्रीराम मखरे गांव – हनुमानवार्ड, तालुका – देसाईगंज, जिल्हा- गडचिरोली सदरील अपघात हा दि.5.4.2007 रोजी झाला. सदरी दावा हा आमच्या कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी नॅशनल इंन्शुरन्स कंपनी, मुंबई यांचेकडे पाठविण्यात आला. सदर दाव्या विषयी वारंवार विचारणा करुनही दावा अर्ज विमा कंपनीकडे प्रलंबित आहे. त्यामुळे, आम्हांस योग्यत्या दोषी कडून कारण नसतांनाही तक्रारीस सामोरे जाण्यास भाग पाडल्याने या अर्जाचा खर्च रक्कम रुपये 5000/- देण्याचा व तक्रारीतून निर्दोष मुक्तता करण्यात यावी, अशी विनंती केली.
6. गै.अ.क्र.2 ने मंचात दि.16.6.08 च्या लेखी बयानात नमूद केले की,
... 4 ... (ग्रा.त.क्र.26/2011)
अर्जदार विधवेने मुद्दा क्र.3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे कागदपञ सादर केली. दि.1.9.2007 ला कंपनीने काढलेल्या ञृटींची पुर्तता करुन या कार्यालयास सादर केली आहे. त्यानुसार, ञृटीचे संबंधात कागदपञ कंपनीकडे ह्या कार्यालयाने पाठविलेले आहे. अपघात विम्याची रक्कम मंजूर करण्याची जबाबदारी कंपनीकडे आहे. त्यामुळे, अर्जदाराने या कार्यालयाच्या फे-या मारुन विम्याची रक्कम या कार्यालयाकडून मिळालेली नाही, हे म्हणणे मान्य नाही.
7. गै.अ.क्र.3 ने लेखी बयानात नमूद केले की, अर्जदाराने मृतक विस्तारीच्या मृत्युबद्दल शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाईसाठी सादर केलेला दावा, विमा पॉलिसीच्या तरतूदीनुसार नियमबाह्य असल्यामुळे नामंजूर करण्यात आलेला आहे. तक्रारीतील संपूर्ण मजकूर असत्य व खोटा, तसेच बनावट स्वरुपाचा असून अमान्य आहे. मृतक विस्तारीचा अपघाती मृत्यु दि.5.4.2007 ला त्याची स्वतःची मोटार सायकल स्लीप होवून झाला आहे, ही बाब पोलीसांनी केलेल्या तपासातून स्पष्ट दिसून येते. त्याअर्थी मृतक हा भरधाव वेगाने हयगयीने व निष्काळजीपणे मोटार सायकल हाय-वे वर चालवीत होता व त्याचे हॅण्डलवरील नियंञण सुटल्यामुळे मोटार सायकल स्लीप होऊन खाली पडला व अपघाती मृत्यु झाला. मोटार वाहन नियमाप्रमाणे दुचाकी वाहन चालवितांना हेलमेट चा वापर केलेला नव्हता, त्यामुळे त्याचे डोक्याला जबरदस्त मार लागून अपघाती मृत्यु झाला व त्यासाठी मृतक सर्वस्वी जबाबदार आहे. मोटार वाहन अॅक्टचा नियम 129 प्रमाणे हेलमेटचा वापर करणे अनिवार्य आहे, त्यामुळे नियमभंग केलेला आहे. मृतकाजवळ वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता, त्यामुळे अर्जदारांनी तो सादर केलेला नाही. विमा पॉलिसीच्या तरतूदीनुसार वैध वाहन परवाना सादर करणे अनिवार्य आहे, त्यामुळे नियमाचे अधिन राहून नुकसान भरपाईचा दावा नामंजूर करण्यात आलेला आहे.
8. गै.अ.क्र.3 ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, मृतकांच्या वारसांना मोटार सायकलच्या विमा पॉलिसी अंतर्गत पर्सनल अॅक्सीडेंन्टल क्लेम मिळण्याची तरतूद आहे. अर्जदारांनी दारिद्र्य रेषे खालील वार्षीक उत्पन्नाचा रुपये 15,000/- चा दाखल सादर केलेला आहे, तो बनावट, खोटा व अमान्य आहे. मृतकाचे वारसांनी खोटा दावा सादर केलेला आहे व शेतकरी अपघात विमा पॉलिसीच्या नियमाप्रमाणे व तरतूदीनुसार नुकसान भरपाईचा दावा नामंजूर केलेला आहे. त्यामुळे, अर्जदाराचा दावा नियमबाह्य असल्यामुळे खारीज करण्यात यावा.
... 5 ... (ग्रा.त.क्र.26/2011)
9. अर्जदाराने नि.क्र.19 नुसार पुरावा शपथपञ दाखल केले. गै.अ.क्र.3 ने दाखल केलेले लेखी बयान हेच रिजॉईन्डरचा भाग समजण्यात यावा अशी पुरसीस नि.क्र.20 नुसार दाखल केली. तसेच, गै.अ.क्र.3 ने नि.क्र.21 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन व गै.अ.क्र.3 ने दाखल केलेला लेखी युक्तीवाद व अर्जदाराचे वकीलांनी केलेल्या तोंडी युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
10. अर्जदार हीने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- मिळण्याकरीता तक्रार दाखल केली आहे. अर्जदार ही विस्तारी मखरे याची विधवा असून मृतकाच्या नावाने मौजा धामनगांव, तह. ब्रम्हपूरी, जिल्हा - चंद्रपूर येथे गट क्र.76 आराजी 0.94 हे.आर. शेत जमीन होती. अर्जदाराने तक्रारीसोबत सातबाराचा उतारा व गावनमुना आठ-अ दाखल केला. सदर दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन मृतक विस्तारी श्रीराम मखरे हा शेतकरी होता, त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा कालावधीत त्याचा अपघाती मृत्यु झाल्यामुळे रुपये 1,00,000/- चा विमा दावा मिळण्यास पाञ आहे.
11. अर्जदार हीच्या पतीचा अपघाती मृत्यु दि.5.4.2007 ला रस्ता अपघातात मोटार सायकल स्लीप होवून मृत्यु झाला. त्याच्या अपघाताचे वेळी महाराष्ट्र शासनाने गै.अ.क्र.3 कडून काढलेली पॉलिसी वैध होती. त्यामुळे, विमा कालावधीत शेतक-याचा मृत्यु झाला असल्याने विमादावा रक्कम अर्जदार लाभधारक असल्याने मिळण्यास पाञ आहे.
12. गै.अ.क्र.2 ने अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर शवविच्छेदन अहवाल, प्रथम सुचना रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा इत्यादी पुराव्याचे कागदपञ गै.अ.क्र.1 यास दि.5.10.07 ला पाठविले असल्याचा आपले दि.16.6.08 ला दाखल केलेल्या लेखी उत्तरात मान्य केले आहे. तसेच, गै.अ.क्र.1 ने पोष्टामार्फत पाठविलेल्या बिनाशपथपञा वरील लेखी उत्तरात हे मान्य केले आहे की, विमा दावा मिळण्याकरीता पुढील कार्यवाहीसाठी नॅशनल इंशुरन्स कंपनी लि., मुंबई यांचेकडे दावा पाठविला. परंतु, दाव्यासंबंधी वारंवार विचारणा करुनही दावा अर्ज कंपनीकडे प्रलंबीत आहे. यावरुन, शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शासन निर्णयानुसार ब्रोकर कंपनीने विमा दाव्याचे
... 6 ... (ग्रा.त.क्र.26/2011)
दस्ताऐवज पडताळणी करुन, गै.अ.क्र.3 कडे पाठविले, तरी गै.अ.क्र.3 यांनी विमादाव्याची रक्कम दिली नाही, यावरुन गै.अ.क्र.3 ने सेवा देण्यात न्युनता केली आहे, असे दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होतो.
13. गै.अ.क्र.3 ने नि.क्र.18 नुसार दाखल केलेल्या लेखी बयानात असा मुद्दा घेतला आहे की, मृतक विस्तारी याचा अपघात त्याच्या चुकीमुळे मोटार सायकल स्लीप होवून दि.5.4.07 ला झाला. मोटार सायकल हाय-वे वर चालवीत असतांना हेलमेटचा वापर केला नव्हता, त्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागून मरण पावला. मृतकाने मोटार वाहन अॅक्टचे नियम 129 च्या नियमाचा भंग केला, त्यामुळे नुकसान भरपाईस पाञ नाही. गै.अ.क्र.3 यांनी उपस्थित केलेला वरील मुद्दा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणा-या क्लेम करीता संयुक्तीक नाही. हेलमेट घालून फक्त डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यु झाला, त्यामुळे विमा क्लेम मिळण्यास पाञ नाही, हे संयुक्तीक नाही. तर, मृतकाच्या कानातून, नाकातून व तोंडातून रक्त निघत असल्याचे इनक्केंस पंचनाम्यात नमूद आहे. तसेच, हार्ट अटॅक असल्याचे पोष्ट मॉर्टम मध्ये नमूद आहे. गै.अ. यांनी लेखी उत्तरातील विशेष कथनात असाही मुद्दा घेतला आहे की, मोटार सायकल विमा पॉलिसी अंतर्गत पर्सनल अॅक्सीडेंट क्लेम मिळण्याची तरतूद आहे. त्यामुळे, शेतकरी विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मागण्याचा हक्क व अधिकार नाही. गै.अ. यांचे हे कथन संयुक्तीक नाही. शासन निर्णयानुसार दुस-या विमा योजने अंतर्गत विमा क्लेम असला तरी शेतकरी अपघात विमा योजना ही स्वतंञ योजना आहे, यामुळे मृतक हा राजस्व विभागाच्या नोंदणीनुसार शेतकरी होता, त्यामुळे नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- मिळण्यास अर्जदार पाञ आहे.
14. गै.अ.यांनी लेखी उत्तरात असाही मुद्दा घेतला आहे की, नुकसान भरपाईकरीता सादर केलेला दावा पॉलिसीच्या तरतूदीनुसार नियमबाह्य असल्यामुळे नामंजूर करण्यात आला आहे. गै.अ.यांनी लेखी बयानासोबत पॉलिसीच्या तरतूदी व नियमाची कोणतीही प्रत दाखल केली नाही. तसेच, विमा दावा केंव्हा नाकारण्यात आला याबद्दलचाही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे, गै.अ.यांचे विमा दावा नियमबाह्य आहे हे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ नाही. एकंदरीत, गै.अ.यांनी बेकायदेशीरपणे विमा दावा निकाली काढण्यास विलंब करुन, पाडून ठेवला व विमा दाव्याच्या लाभापासून अर्जदारास वंचीत ठेवले. गै.अ.क्र.3 यांनी गै.अ.क्र.1 कडून दावा प्रस्ताव प्राप्त होऊनही निकाली काढला नाही, ही त्याचे सेवेतील न्युनता असल्याची बाब सिध्द होतो.
... 7 ... (ग्रा.त.क्र.26/2011)
15. गै.अ.क्र.3 यांनी विमा दावा नाकारल्याचा पञ रेकॉर्डवर दाखल केलेला नाही आणि मोघमपणे दस्ताऐवज पुरविले नाही म्हणून विमा दावा नामंजूर करण्यात आला, असे बचावात्मक कथन केले आहे. उपलब्ध रेकॉर्डवरुन गै.अ.क्र.1 व 2 ने आपली जबाबदारी पारपाडली आहे, त्यामुळे त्यांचे विरुध्द तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. परंतु, गै.अ.क्र.3 ने, गै.अ.क्र.1 कडून दस्ताऐवज प्राप्त करुनही विमा दावा निकाली काढण्यास विलंब करुन न्युनतापूर्ण सेवा दिलेली आहे, तसेच अर्जदारास विमा क्लेमची रक्कम न दिल्यामुळे मानसिक व शारीरीक ञास सहन करावा लागला, त्याकरीता नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आलेले आहे.
वरील कारणे व निष्कर्षावरुन तक्रार अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) गैरअर्जदार क्र.3 ने मृतक विस्तारी श्रीराम मखरे याचा अपघाती मृत्यु झाल्यामुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रुपये 1,00,000/- तक्रार दाखल केल्याचा दिनांक 15.5.2008 पासून द.सा.द.शे.6 % व्याजाने आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत मंचात जमा करावे.
(2) गैरअर्जदार क्र. 3 ने, अर्जदारास मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 2000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1000/- आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत मंचात जमा करावे.
(3) गैरअर्जदार क्र.3 यांनी आदेशीत रक्कम जमा केल्यानंतर 60 टक्के रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत 5 वर्षाचे मुदतीकरीता अर्जदाराचे नांवे मुदत ठेवीत गुंतवून ठेवण्यात यावे व उर्वरीत 40 टक्के रक्कम अर्जदारास देण्यात यावी.
(4) गैरअर्जदार क्र.1 व 2 चे विरुध्द तक्रार खारीज.
(5) गैरअर्जदार क्र.3 ने वरील आदेशाचे पालन विहीत मुदतीत न केल्यास आदेशीत रक्कम मंचात जमा करे पर्यंत द.सा.द.शे.12 % व्याज देय राहील.
... 8 ... (ग्रा.त.क्र.26/2011)
(6) गैरअर्जदारांनी आप आपला खर्च सहन करावा.
(7) अर्जदार व गैरअर्जदारांना आदेशाची प्रत देण्यात यावी.