निकाल
दिनांक- 30.09.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील मजकुर वाचला. तक्रारदार यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदार यांनी सदरील तक्रार सामनेवाला यांचेकडून घरभाडे वसूल करुन मिळावे म्हणून दाखल केली आहे.
तक्रारदार यांच्या तक्रारीतील बाबींचा विचार केला असता सामनेवाला हे तक्रारदार यांचे भाडेकरी होते. तक्रारदार यांनी त्यांचे घर सामनेवाला यांना भाडेकरी करारावर दिलेले होते व दरमहा भाडे रु.8,183/- असे ठरलेले होते. तक्रारदार व सामनेवाला यांचे घरमालक व भाडेकरी असे संबंध आहे. तक्रारदार यांना महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्याअंतर्गत दाद मागण्याचा अधिकार आहे. तक्रारदार यांनी प्रथमदर्शनी ते सामनेवाला यांचे ग्राहक आहे ही बाब सिध्द केलेली नाही. तक्रारदार हे घरमालक असल्यामुळे व सामनेवाला हे भाडेकरी असल्यामुळे घरमालक व भाडेकरी ही संज्ञा ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत तक्रारदार ग्राहक आहे ही बाब मान्य करत नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार दाखल करुन घेता येत नाही. या मंचास तक्रारीत नमुद केलेल्या बाबींची तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. सबब तक्रार यांची तक्रार प्राथमिक मुद्यावर रदद करण्यात येत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार प्राथमिक मुद्यावर रदद करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड