अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक:एपिडिएफ/292/08
तक्रार अर्ज दाखल दिनांक: 12/07/2006
तक्रार निकाल दिनांक : 22/11/2011
कुमारी श्वेता सुमन, ..)
जी-203, गर्ल्स हॉस्टेल, एस्.आय्.एम्.एस्. ..)
रेंजहिल्स, किरकी, ..)
पुणे – 20. ..).. तक्रारदार
विरुध्द
बिजनेस अॅल्गोरिटीज प्रायव्हेट लिमीटेड, ..)
39, शंकरनगर, नागपूर – 10. ..)
डिजीकॉम कन्सलटंट (एच्.पी. इन रेंट) ..)
36, भाग्यनगरी, 11/57, सदाशिव पेठ, ..)
महाराष्ट्र मंडळ, टिळक रोड, ..)
पुणे - 411 030. ..)... जाबदार
// निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूतचे प्रकरण सन 2006 मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/177/06 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/292/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
सदरहू प्रकरण मंचाकडे सन 2008 पासून प्रलंबित असल्यामुळे प्रकरण चालविण्याचे आहे अथवा नाही याबाबत तक्रारदारांचे निवेदन येणेसाठी तक्रारदारांना नोटीस काढली असता तक्रारदारांची नोटीस “Left 21/7/11” या शे-यासह परत आली आहे. अर्थात अशा परिस्थितीत सदरहू प्रकरण योग्य तजवीजीअभावी काढून टाकण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक –22/11/2011