ग्राहक तक्रार क्र. 253/2014
दाखल तारीख : 21/11/2014
निकाल तारीख : 04/09/2015
कालावधी: 0 वर्षे 09 महिने 12 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. अरुण जगन्नाथ माळवदकर,
वय – 62 वर्षे, धंदा – सेवानिवृत्त,
रा.श्री.संत गोरोबा काका नगर, जि.प. शाळेजवळ,
सांजा रोड, उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखाधिकारी,
श्री. कोळेकर,
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप,
क्रेडिट सोसायटी लि.,
शाखा- मारवाड गल्ली उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद, ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.पी.व्ही.वडगणे.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधिज्ञ : श्री.आर.एस.कोचेटा.
न्यायनिर्णय
मा. सदस्य, सौ. विद्युलता जे. दलभंजन यांचे व्दारा:
अ) अर्जदार हे उस्मानाबाद येथील रहिवाशी आहे. विरुध्द पक्षकार (विप) बँकेकडे खाली दिलेल्या तक्याप्रमाणे मुदत ठेवली आहे. सदर मुदत ठेव रक्कम गरज पडल्यामुळे मुदतीनंतर मिळणेची विनंती केली असता विप ने देण्यास टाळाटाळ केल्याने विप ने ती रक्कम परत न देऊन सेवेत त्रूटी केली म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक ने ही तक्रार दिलेली आहे.
तक यांच्या म्हणण्याप्रमाणे विप यांच्याकडे खालीलप्रमाणे मुदत ठेवी ठेवलेल्या आहेत.
अ.क्र. | पावती क्र. | रक्कम | ठेव ठेवल्याची दिनांक | ठेवीची मुदत संपणारी दिनांक |
01 | 0948286 | रु.21,000/- | 03/08/2013 | 16/04/2015 |
02 | 0948722 | रु.22,000/- | 27/09/2013 | 21/04/2015 |
03 | 0684265 | रु.46,000/- | 24/06/2014 | 24/06/2015 |
तक यांचे आवर्त ठेव रु.20,400/- जमा असून तक यांना आपआपल्या वेगवेगळया वैयक्तिक कारणा करीता पैशाची गरज असल्याने विप कडे मुदतपुर्व व मुदतीनंतर सदर रक्कम विप पतसंस्थेस परत मिळण्याबाबत तसेच आवर्त ठेव रक्कम मिळणेबाबत अनेकदा विनंती केली तसेच दि.16/10/2014 रोजी अर्ज दिला असता सदर रक्कम परत देण्यास सदर पतसंस्था विप ने टाळाटाळ केली व म्हणून तक ने दि.17/10/2014 रोजी विधीज्ञामार्फत नोटीस देऊन सदर रकमेची मागणी केली मात्र विप ने सदर नोटीस स्विकारुनही उत्तर दिले नाही तसेच रक्कमही परत दिली नाही. म्हणून तक स झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- असे एकूण रक्कम रु.95,184/- देय व्याजासह मिळावी तसेच वरील सर्व रक्कम 18 टक्के व्याजासह मिळावी अशी तक ने विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत मुदत ठेवीची मुळ पावती क्र.0948286, 0948722, 0684265 बचत खाते पास बूक, व आवर्ती खाता पास बुक, मत्यु प्रमाणपत्र, नोटीस, पोष्टाची पोहोच पावती, ई. कागदपत्रांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
सदर तक्रारीबाबत विप यांना नोटीस पाठविली असता त्यांनी आपले म्हणणे दाखल न केल्याने दि.22/04/2015 रोजी त्यांच्या विरुध्द नो से आदेश पारीत करण्यात आला.
4) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांची उत्तरे त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2) विरुध्द पक्षकाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
4) काय आदेश? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्या क्र.1 ते 3
तक्रारदाराची तक्रार ही त्यांनी विप यांच्या पतसंस्थेत ठेवलेली ठेव व त्यावरील व्याज ठेव गरज असल्याने मागणी करुनही मुदत संपुनही मिळालेली नाही म्हणून दाखल केली आहे. सदर तक्रारीबाबत तक्रारदार यांनी दाखल कागदपत्रांच्या आधारे पडताळणी केली असता त्यांचे नावे असलेले विप यांच्या पतसंस्थेचे नाव असलेले खालील पावत्यांच्या सत्यप्रती दाखल केलेल्या असून त्यातील तपशील पुढीलप्रमाणे आढळून येतो.
अ.क्र. | पावती क्र. | ठेव रक्कम | मुदती नंतरची देय रक्कम | ठेव ठेवल्याची दिनांक | ठेवीची मुदत संपणारी दिनांक |
01 | 0948286 | रु.21,000/- | रु.23,730/- | 03/08/2013 | 16/04/2014 |
02 | 0948722 | रु.22,000/- | रु.2,48,60/- | 27/09/2013 | 21/04/2014 |
03 | 0684265 | रु.46,000/- | रु.52,440/- | 24/06/2014 | 24/06/2015 |
| एकुण | रु.89,000/- | रु.1,01,030/- | | |
सदर ठेवींना व्याजदर 13 टक्के दर्शविलेला आहे. तक यांनी गुंतवलेली एकूण रक्कम रु.89,000/- असून देय रक्कम रु.1,01,030/- आहे. सदर पावत्यांवर विप पतसंस्थेचे नाव व क्लार्क, कॅशियर व मॅनेजर यांच्या सहया आहेत. तसेच तक यांनी दाखल केलेल्या पासबुकावर व आवर्ती पासबुकावर तक यांचा फोटो असून विप बँकेचा शिक्का आहे. यावरुन सदर व्यवहार झाला आहे असे दिसते. सदरबाबत पडताळणी करीता विप यांना अनेकदा संधी देऊन त्यांनी आपले म्हणणे / हरकत दाखल केलेली नाही म्हणून दि.22/04/2015 रोजी विप विरुध्द नो से आदेश पारीत करण्यात आला. म्हणून तक्रारदार यांनी दिलेली तक्रार ही प्रथम दर्शनी योग्य आहे असे दिसते म्हणून आम्ही या मतापर्यंत आलो आहोत की जर तक्रारदाराची तक्रार व दाखल केलेली कागदपत्रे त्रुटीपुर्ण वा असत्य असले असते तर विप यांनी नोटीस मिळूनही मंचात उपस्थित न राहण्याचे व आपले म्हणणे दाखल न करण्याचे काय कारण असू शकते. म्हणजेच विप कडे तक्रारदाराची तक्रार खोडण्या इतपत किंवा हरकत नोंदविण्या इतपत पुरावे नसल्याने त्यांनी मंचात उपस्थित राहून हरकत नोंदविली नाही व आपले म्हणणे दिले नाही. म्हणजेच त्यांना तक्रारदाराची तक्रार मान्य आहे आणि तक्रारदार त्यांच्या ठेवींची रक्कम मिळविण्यास पात्र आहेत म्हणुन आम्ही मुद्या क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत व खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदाराची एकूण मुदत ठेव पावती नुसार 13 टक्के व्याजासह
मुदतपुर्ती नंतर होणारी तक क्र.1 यांची रु.1,01,030/- (रुपये एक लक्ष एक हजार तीस
फक्त) देय दिनांका पासून 9 टक्के व्याज दराने आदेश दिल्या तारखेपासून 30 दिवसात
द्यावेत.
3) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व कागदपत्राच्या
(तक्रारीच्या) खर्चापोटी रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी सदरबाबत मंचात अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.