निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* तक्रार दाखल करुन घेण्यासंबधीचा आदेश 1. वरील दोन्ही तक्रारीतील तक्रारदार व सा.वाले हे एकच आहेत. त्याचप्रमाणे तक्रारीतील किरकोळ तपशिल वगळता मुख्य वादाचा मुद्दा तोच आहे. सा.वाले हे विमानसेवा देत असून त्यांची ब्रिटीश ऐअरवेज् नावाची कंपनी आहे. 2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे तक्रारदार ही कंपनी असून त्यांचा विदेशात वस्तु व माल पाठविण्याचा व्यवसाय आहे. तक्रारदारांना त्यांच्या विदेशातील ग्राहकाकडून माल पुरविण्याचा आदेश मिळाला व त्याप्रमाणे तक्रारदारांनी सा.वाले विमान सेवेचे विमानातून फळे,भाजीपाला व इतर नाशवंत वस्तु विमानाने पाठविल्या. तक्रारदाराने सा.वाला यांना त्याबद्दल विमान भाडे अदा केले. तक्रारदाराच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे सा.वाले यांनी त्यांचे ग्राहकांस पाठविलेला माल पोहचविला गेला नाही व त्यात सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी मागीतलेली नुकसान भरपाई दिली नाही. सबब तक्रारदाराने सा.वाले यांना सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली या कथनावर आधारीत नुकसान भरपाईचेकामी प्रस्तुत तक्रार दाखल केली. 3. तक्रारदारांचे वकीलांचा तक्रार दाखल सुनावणीचेकामी युक्तीवाद ऐकण्यात आला. 4. प्रस्तुत मंचाने दाखल सुनावणीचे दरम्यान तक्रारदारांचे वकीलांनी प्रस्तुतची तक्रार ही व्यापारी व्यवहाराबद्दलची व संबंधित सेवा सुविधा पुरविण्या संदर्भात असल्याने ग्राहक मंचाचे कार्यक्षेत्रात येऊ शकते काय याबद्दल शंका विचारली होती व शंकेवर आधारीत प्रस्तुत आदेश आहे. 5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2 (1)(d) (ii) या प्रमाणे जी व्यक्ती व्यापारी व्यवहारा संदर्भात वस्तु विकत घेते किंवा सेवा स्विकारते अशा व्यवहारासंबंधात तक्रार करणारी व्यक्ती ही ग्राहक या संज्ञेत बसत नाही. सबब ग्राहक मंचाच्या कार्यक्षेत्रात या स्वरुपाचे तक्रारीबाबत दाद मागणे संदर्भातील तक्रार येऊ शकत नाही. 6. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीमध्ये असे मान्य केले आहे की, तक्रार ही परदेशामध्ये वस्तु व माल पाठविणारी कंपनी असून सा.वाले यांचेकडून तक्रारदाराने त्यांचा माल, वस्तु विदेशातील ग्राहकास पुरविणेकामी सेवा स्विकारल्या होत्या. विदेशातील ग्राहकाचे नांव देखील दिलेले आहे. जी नाशवंत फळे,भाजीपाला, वस्तु पाठविल्या त्याचे वर्णन देखील दिलेले होते. तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये असे कोठेही कथन नाही की, तक्रारदार हे एकाच व्यक्तीची स्वयंमरोजगार निर्माण करणारी कंपनी आहे. तर व्यापारी तत्वावर मोठया प्रमाणावर व्यापार करणारी कंपनी दिसते. विदेशातील ग्राहकांना त्यांचे मागणी प्रमाणे तक्रारदार माल निर्यात करत होते यावरुन देखील तक्रारदारांच्या व्यवसायाची व्यप्ती मोठी आहे हे स्पष्ट होते. प्रस्तुतच्या प्रकरणात सा.वाले हे तक्रारदारांनी पाठविलेल्या वस्तुचे किंवा मालाचे खरेदीदार नव्हते, तर खरेदीदार हे विदेशातील मालाचे ग्राहक होते हे स्पष्ट असले तरीही सा.वाले हे तकारदारांचा माल विदेशात वाहुन नेणारी विमान सेवा कंपनी आहे ही बाब तक्रारदारांना मान्य आहे. तक्रारदारांचा हा व्यवहार पूर्ण करण्याकामी सा.वाले सेवा विमान भाडे घेऊन स्विकारली होती यावरुन व्यापारी व्यवहार पूर्ण करण्याचे काम सा.वाले यांचेकडून तक्रारदाराने सेवा सुविधा स्विकारली ही बाब स्पष्ट होते. सबब सा.वाले हे तक्रारदाराचे व्यापारी व्यवहाराकरीता ( Commercial purpose ) सेवा सुविधा पुरविणारे असल्याने कलम 2 (1)(d) (ii) चे परंतुकाप्रमाणे प्रस्तुत व्यवहार हा ग्राहक मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही. सबब तक्रारदार ग्राहक या व्याख्येमध्ये बसत नाही. 7. वरील निर्णयाचे पृष्ठयर्थ आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या बिर्ला टेक्नोलॉजी लिमिटेड विरुध्द नॅचरल ग्लास अन्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड 2011 सीटीजे 121 (सर्वोच्च न्यायालय) (सीपी) या न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचा आधार घेतला आहे. अपीलकार मुळचे सा.वाले यांनी तक्रारदाराच्या व्यावसायीक उपभोगाकरीता काही संगणक प्रणाली विकसीत केली होती. परंतु त्यामध्ये दोष आढळल्याने तक्रारदार कंपनीने सा.वाले संकणक प्रणाली निर्माते याचे विरुध्द नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेला होता. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वस्तुंचा व्यवहार हा व्यापारी तत्वाकरीता असला तरी त्या संबंधात इतर दुय्यम सेवा सुविधासुध्दा व्यापारी तत्वामध्ये मोडतात व ग्राहक मंचास दि.15.3.2003 चे नंतर या प्रकारची तक्रार दाखल करुन घेण्यास अधिकार नाही असा निर्णय दिला. येथे एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की, ग्राहक कायदा 1986 दि.15.3.2003 रोजी कलम 2 (1)(d) (ii) यामध्ये बदल करण्यात येऊन परंतुक घालण्यात आला आहे ज्यामुळे व्यापारी तत्वाकरीता सेवा सुविधा स्विकारलेल्या असतील तर ती व्यक्ती ग्राहक या सज्ञेमध्ये मोडत नाही. 8. वरील परिस्थितीत दोन्ही तक्रारी दाखल करुन चालविण्यास ग्राहक मंचास अधिकार नाही असे आमचे मत आहे. उक्त परिस्थितीत मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश <!--[if !supportLists]-->1. <!--[endif]-->तक्रार क्रमांक 9/2011 व 10/2011 रद्द करण्यात येतात. <!--[if !supportLists]-->2. <!--[endif]-->आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |