Maharashtra

Akola

CC/15/239

Vinay Ganeshprasad Pande - Complainant(s)

Versus

BranchOfficer,Oriental Bank of Commerce - Opp.Party(s)

P M Rathi

11 May 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/15/239
 
1. Vinay Ganeshprasad Pande
R/o.Patrakar Colony,Behind Busstand,Akola
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. BranchOfficer,Oriental Bank of Commerce
Office,Mahanagrpalika Office,Akola
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'BLE MR. Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: आ दे श :::

( पारीत दिनांक : 11/05/2016 )

आदरणीय, सदस्‍या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार

1.        ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …

          तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्षाकडे बचत खाते क्र. 786 आहे.  तक्रारकर्त्याने दि. 02/08/2012 रोजी दि अग्रसेन नागरी सहकारी बँक लि., अकोला या बँकेचा व किरण कॉपोरेशन यांनी दिलेला धनादेश रक्कम रु. 10,000/- ज्याचा क्र. 3019274, हा समाशोधन करण्याकरिता त्याच्या वर नमुद खात्यात लावला होता.  सदर चेक खात्यात लावल्यानंतर तक्रारकर्त्यास असे वाटले की, सदरची रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली असेल, कारण विरुध्दपक्ष बँकेने सदरचा धनादेश अनादरित झाल्याबद्दल तक्रारकर्त्याला कोणतीही सुचना दि. 26/03/2015 पर्यंत म्हणजे तब्बल चार वर्षापर्यंत दिली नाही.  तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष बँकेकडून दि. 26/3/2015 रोजी एक पाकीट मिळाले, त्यामध्ये वर नमुद धनादेश रिटर्न मेमो दि. 4/08/2012 रोजीचा मिळाला.  त्यामुळे तक्रारकर्त्याने ताबडतोब दि. 30/3/2015 रोजी पत्र देवून त्याला झालेल्या रु. 10,000/- च्या नुकसानीची मागणी केली.  सदर धनादेश अनादरीत झालेल्याबद्दल विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास तब्बल चार वर्ष माहीती दिली नाही. त्यामुळे चेक अनादरित झाल्यामुळे तक्रारकर्त्यास चेक देणाऱ्या विरुध्द  फौजदारी तक्रार दाखल करता आली नाही.  तक्रारकर्त्यास रु. 10,000/- व त्यावरील व्याजाचे सुध्दा नुकसान झालेले आहे.  अशा प्रकारे  विरुध्दपक्षाने सेवा देण्यास न्युनता दर्शविली, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व  तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष बँकेकडून त्याला झालेल्या नुकसान भरपाई म्हणून रु. 10,000/- तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- तक्रार खर्च रु. 10,000/- व या सर्व रकमेवर दि 2/8/2012 पासून व्याज देण्यात यावे.

      सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 04  दस्‍तऐवज पुरावे म्हणून  जोडण्‍यात आले आहेत.

 

विरुध्‍दपक्ष  यांचा लेखीजवाब :-

2.            विरुध्दपक्ष यांनी  लेखी जबाब दाखल करुन  असे नमुद केले की, सदरचा चेक अनादरित झाल्याची बाब विरुध्दपक्षाकडून तक्रारकर्त्यास ताबडतोब तोंडी दुरध्वनीवरुन व ते स्वत: बँकेत आले असतांना त्यांना सांगण्यात  आलेली होती व त्यांना तोंडी सदरचा अनादरीत चेक व रिर्टन मेमो परत घेवून जाण्यास सुध्दा सांगीतले होते.  परंतु त्यांनी तो अनादरीत झालेला चेक व रिर्टन मेमो घेवून गेले नाही.  त्यामुळे विरुध्दपक्षाकडील साफसफाईच्या वेळेस जेंव्हा तो चेक सापडला त्यावेळेस त्याला नोंदणीकृत डाके मार्फत पाठविण्यात आला.  किरण कार्पोरेशन म्हणजे ज्यांनी चेक दिलेला होता त्यांना जो पर्यंत या केस मध्ये पक्ष म्हणुन जोडले जात नाही व जो पर्यंत सदरचा चेक त्यांनी तक्रारकर्त्याला त्याची देयताची पुर्तता करण्यासाठी दिला होता किंवा नाही, ही बाब जो पर्यंत सिध्द होत नाही, तो पर्यंत तक्रारकर्त्याला अनादरीत झालेल्या चेक विषयी एन.आय.ॲक्ट अंतर्गत अधिकार प्राप्त होतो किंवा काय, ही बाब सुध्दा प्रमाणित होत नाही.  तक्रारकर्ता अनादरीत चेक शिवाय सुध्दा सदर किरण कॉर्पोरेशनच्या विरुध्द वसुलीचा दावा करु शकले असते व त्या दाव्यामध्ये त्यांना चेक अनादरीत झाल्याची बाब विटनेस समन्सद्वारा सिध्द करता आली असती,  वरील सर्व कारणामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.

3.        त्यानंतर तक्रारकर्त्यातर्फे प्रतिउत्तर दाखल करण्यात आले, तसेच  उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

4.       सदर प्रकरणात उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तांचे अवलोकन करुन व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकुन काढलेल्या निष्कर्षाचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला.

  1. तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरुन व दाखल दस्तांवरुन तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक असल्याचे दिसून येते.  सदर बाब विरुध्दपक्षानेही नाकारलेली नसल्याने, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक असल्याचे ग्राह्य धरण्यात येते.
  2. तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याने दि. 2/8/2012 रोजी दि अग्रसेन नागरी सहकारी बँक लि., अकोला या बँकेचा व किरण कॉर्पोरेशन यांनी दिलेला रु. 10,000/- चा धनादेश ज्याचा क्र. 3019274हा त्याच्या विरुध्दपक्ष बँकेतील खात्यात क्लिअरिंगसाठी लावला होता. परंतु सदरचा धनादेश अनादरीत झाल्याची कोणतीच सुचना विरुध्दपक्षाने दि. 26/3/2015 पर्यंत तक्रारकर्त्याला दिली नाही व दि. 26/3/2015 रोजी तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष बँकेकडून नोंदणीकृत डाकेमार्फत पाकीटातून दि. 2/8/2012 रोजीचा वर नमुद केलेला धनादेश व चेक रिटर्न मेमो दि. 4/2/2012 रोजीचा मिळाला.  सदर धनादेश अनादरीत झाल्याची माहीती विरुध्दपक्ष बँकेने मुदतीत तक्रारकर्त्याला न दिल्याने तक्रारकर्त्याला किरण कॉर्पोरेशन यांचे विरुध्द, धनादेश अनादरीत झाल्याबाबत फौजदारी स्वरुपाची तक्रार दाखल करणे अशक्य झाले आहे.  त्यामुळे तक्रारकर्त्याचे धनादेशाची रक्कम रु. 10,000/- व त्यावरील व्याजाचे नुकसान झालेले आहे.  सदर आर्थिक नुकसानीची, तसेच शारीरिक व मानसिक नुकसानीची भरपाई व प्रकरणाचा खर्च मिळावा अशी विनंती तक्रारकर्त्याने केलेली आहे.
  3. यावर, विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने जमा केलेला चेक अनादरीत झाल्याची बाब विरुध्दपक्षाने ताबडतोब तक्रारकर्त्याला कळविली होती व तक्रारकरर्ता जेंव्हा बँकेत स्वत: आले होते त्यावेळी त्यांना सदरचा अनादरीत चेक व मेमो परत घेऊन जाण्याचे तोंडी सांगण्यात आले होते.  विरुध्दपक्षाकडील साफसफाईच्या वेळेस जेंव्हा तो चेक व मेमो सापडला त्यावेळेस तक्रारकर्त्याला तो नोंदणीकृत डाकेमार्फत पाठविण्यात आला.  त्यामुळे विरुध्दपक्षाने सेवा देण्यात कुठलीही त्रुटी केलेली नाही.  तक्रारकर्त्याने किरण कॉर्पोरेशनला सदर तक्रारीत पक्ष केलेले नाही.  तसेच  तक्रारकर्ता अनादरीत चेक शिवाय सुध्दा सदर किरण कार्पोरेशन विरुध्द वसुलीचा दावा करु शकले असते.
  4. उभय पक्षांचे म्हणणे ऐकल्यावर मंचाने दाखल दस्तांचे काळजीपुर्वक अवलोकन केले. विरुध्दपक्षातर्फे जबाबाशिवाय कुठलेच दस्त दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाने त्यांच्या जबाबात तक्रारकर्त्याला धनादेश अनादरीत झाल्याचे तोंडी कळविले होते, असे जे विधान  केले आहे,  ते सिध्द करणारा कुठलाही पुरावा विरुध्दपक्षाने मंचासमोर दाखल केलेला नाही. याउलट विरुध्दपक्षाने ही बाब मान्य केली आहे व तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तांवरुनही हे सिध्द होते की, ऑगस्ट 2012 मध्ये अनादरीत झालेला धनादेश विरुध्दपक्षाने मार्च 2015 मध्ये तक्रारकर्त्याला रजिस्टर्ड पोष्टाने पाठविला.  तसेच सदर धनादेश अनादरीत झाल्याची माहीती तक्रारकर्त्याला नसल्यानेच ते किरण कॉर्पोरेशनच्या विरुध्द वसुलीसाठी कोणतीही फौजदारी अथवा दिवाणी कारवाई करु शकले नाही.  त्यामुळे “अनादरीत चेक शिवाय सुध्दा तक्रारकर्ता किरण कॉर्पोरेशनच्या विरुध्द वसुलीचा दावा करु शकले असते”, हे विरुध्दपक्षाचे विधान मंचाला ग्राह्य धरता येणार नाही.

    त्यामुळे तक्रारकर्त्याचे धनादेशाची रक्कम रु. 10,000/- व त्यावरील व्याजाचे नुकसान विरुध्दपक्षातर्फे देण्यात येणाऱ्या सेवेतील त्रुटीमुळे झाल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आल्याने तक्रारकर्ता धनादेशाची रक्कम सव्याज व शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईसह प्रकरणाचा खर्च विरुध्दपक्षाकडून मिळण्यास पात्र आहे.

    सबब, अंतीम आदेश येणे प्रमाणे

  •                       अं ति   दे :::
  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
  2. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला धनादेशाची रक्कम रु. 10,000/-   ( रुपये दहा हजार फक्त ) दि. 4/8/2012 ( चेक रिटर्न मेमो तारीख ) पासून देय तारखेपर्यंत द.सा.द.शे. 8 टक्के दराने, व्याजासह द्यावी.
  3. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 3000/- ( रुपये तिन हजार फक्त ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 2000/- ( रुपये दोन हजार फक्त ) द्यावे.
  4. सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे.

सदर आदेशाच्‍या प्रती संबंधीतांना निशुल्‍क देण्‍यात याव्‍या.

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'BLE MR. Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.