जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/237. प्रकरण दाखल तारीख - 15/10/2009 प्रकरण निकाल तारीख – 22/01/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य मा.श्रीमती एस.आर.देशमुख - सदस्या प्रकाश पि. सक्रू राठोड वय, 45 वर्षे, धंदा शेती, रा.निमगांव ता.हदगांव जि. नांदेड अर्जदार विरुध्द. शाखा प्रबंधक, युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. गैरअर्जदार गुरु कॉम्पलेक्स,जी.जी.रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.जी.जाधव गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.श्रीनिवास मददे. निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, अध्यक्ष ) गैरअर्जदार विम्याची रक्कम न देऊन सेवेत ञूटी केली म्हणून अर्जदार यांनी आपली तक्रार नोंदविली आहे. याप्रमाणे अर्जदाराचे वडील मयत सक्रू धेना राठोड यांची जनात वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी ज्यांचा नंबर 230600/47/00/001089 असून त्यांचा कालावधी दि.30.08.2000 ते 29.08.2005 असा आहे. ही पॉलिसी सेवा सहकारी सोसायटी चाभरा ता. हदगांव जि. नांदेड यांनी काढली होती. दि.9.5.2004 रोजी सांयकाळी शेतावरुन घरी परत असताना कॅनालमध्ये अचानक तोल जाऊन पडल्यामूळे गंभीररित्या जखमी झाले. म्हणून त्यांना श्री गूरुगोविंदसिंघ हॉस्पीटल नांदेड येथे इलाजासाठी दि.10.05.2004 रोजी दाखल केले. तेथे दि.09.06.2004 पर्यत इलाज केला. अर्जदाराचे वडील मयत सक्रू यांच्या डाव्या पायास फ्रॅक्चर झाल्यामूळ अपंगत्व आले. पायामध्ये रॉड टाकण्यात आला. यानंतर काही महिन्यानंतर परत दि.7.1.2005 रोजी राञी पडल्यामूळे पायातील रॉड बाहेर पडला. त्यामूळे त्यांना त्यांच दिवशी राञी दि.7.1.2005 रोजी श्री गूरुगोविंदसिंघजी हॉस्पीटल नांदेड येथे इलाजासाठी दाखल केले तेथे त्यांचा दि.5.3.2005 पर्यत इलाज चालू होता. तेव्हापासून ते अंथरुणावरच पडून होते त्यांतच त्यांचा दि.18.11.2007 रोजी मृत्यू झाला. गैरअर्जदार यांना नूकसान भरपाईसाठी विम्याची रक्कम मागितली असता ती त्यांनी दिली नाही म्हणून त्यांनी दि.21.07.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस दिली व त्यांनी दि.3.8.2009 रोजी उत्तर दिले व विम्याची रक्कम देण्यास नकार दिला. अर्जदाराची मागणी आहे की, विम्याची रक्कम रु.1,00,000/- त्यावर व्याज व तक्रारीचा खर्च रु.5,000/- त्यांना मिळावेत. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. सेवा सहकारी सोसायटी चाभरा ता. हदगांव यांनी सक्रू धेना राठोड यांचा ग्रूप विमा उतरविला होता व त्या यादीमध्ये त्यांचे नांवही होते परंतु ते गैरअर्जदारांचे कधीही विमाधारक नव्हते. म्हणून अर्जदाराची तक्रार फेटाळण्यास योग्य आहे. दि.9.5.2004 रोजी सायंकाळी 7.30 वाजता कॅनालमध्ये सक्रू राठोड पडला होता व जखमी झाला हे ते अमान्य करतात. शिवाय दि.10.05.2004 ते 9.5.2004 पर्यत श्री गूरुगोविंदसिंघजी हॉस्पीटल मध्ये उपचार घेतले नव्हते. यांचे कारण डिसचार्ज कार्डमध्ये डॉक्टराची सही, मजकूरामध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नाही. सक्रू राठोड यांना अंपगत्व आले नव्हते. सदर विमा पॉलिसीच्या अटी व नियमानुसार शरीरातील हात, पाय, कान डोळा हे भाग पूर्णतः व कायम स्वरुपी 100 टक्के निकामी होणे किंवा सदर भाग शरीरापासून वेगळे होणे असा आहे. परंतु या प्रकरणात तसे काही नाही. फ्रॅक्चर झाले म्हणजे अपंगत्व आले असा होत नाही. पोलिस स्टेशन मनाठा येथे दि.23.12.2004 रोजी घटनास्थळ पंचनामा केला गेला तो घटनेनंतर सात ते आठ महिन्यानंतर तयार केलेला आहे. सदर अपघातामूळे सक्रू राठोड मरण पावले नाहीत यांचा कोणताही पूरावा कागदपञ, किंवा पी.एम. रिपोर्ट अर्जदाराने तसे सिध्द केलेले नाही. मयत सक्रू राठोड यांचे वय 70 वर्षापेक्षा जास्त असल्यामूळे व वृध्दापकाळामूळे त्यांचा मृत्यू दि.18.11.2007 रोजी झाला. विमा पॉलिसीच्या अटी व नियमाप्रमाणे एखादया व्यक्तीचा अपघात व जखम झाली असली तरी सदर जखमेमूळे कायम स्वरुपाचे अपंगत्व येऊन सदर दूखापतीमूळे तो व्यक्ती घटनेच्या दिवसापासून सहा महिन्याचे आंत मरण पावली पाहिजे. प्रस्तूत प्रकरणामध्ये मयत सक्रू हा तथाकथीत पहिला घटना दि.9.5.2004 रोजी पासून 3 वर्ष 6 महिने आणि 9 दिवसांनी म्हणजे दि.18.11.2007 रोजी मरण पावले. त्याचप्रमाणे तथाकथित दूसरी घटना दि.7.1.2005 रोजी पासून 2 वर्ष 10 महिने 11 दिवसानंतर म्हणजे दि.18.11.2007 रोजी मरण पावले. अपघात हा मरणास जिम्मेदार नाही. गैरअर्जदाराने क्लेम संबंधी चौकशी अधिकारी नियूक्त करुन त्यांचे मार्फत चौकशी केली. त्यांचे रिपोर्टमध्ये दि.24.3.2005 रोजी क्लेम नामंजूर केलो आहे. म्हणून अर्जदारास विम्याची रक्कम नूकसान भरपाई व खर्च मागण्याचा अधिकार नाही. शिवाय तक्रार ही मूदतीत दाखल केलेली नाही. म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- गैरअर्जदाराने जनता वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी दिलेली आहे. मयत सक्रू यांचा विमा हा सेवा सहकारी सोसायटीच्या मार्फत घेण्यात आलेला आहे म्हणून ते लाभार्थी आहेत. दि.9.5.2004 रोजी सायंकाळी शेतावरुन घरी येत असताना कॅनालमध्ये पडून जखमी झाल्या कारणाने त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. या संबंधी पोलिसाकडे एफ.आय.आर. दि.23.12.2004 रोजी नोंदविला आहे. यांचा अर्थ गैरअर्जदार यांनी आपले म्हणण्यात आक्षेप घेतल्याप्रमाणे सात महिन्यानंतर पंचनामा करण्यात आलेला आहे. पंचनाम्यात पाय घसरुन कॅनालमध्ये पडल्याने डाव्या पायाचे मांडीचे हाड मोडले असे म्हटले आहे. अर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे त्यांना श्री गूरुगोविंदसिंघजी हॉस्पीटल नांदेड येथे दाखल करण्यात आले होते त्याबददलचे उपचाराबददलचे हॉस्पीटलचे मेडीकल कागदपञ दाखल केलेले आहेत. यात दि.10.05.2004 रोजी शरीक करण्यात आलेले आहे. दि.29.5.2004 रोजी त्यांचे पायाचे ऑपरेशन केलेले आहे व दोन्ही पाय प्लॉस्टरला बांधून दोन महिन्यापर्यत विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे. अर्जदाराने मेडीकल बोर्डाचे प्रमाणपञ दाखल केलेले आहे ते दि.24.4.2005 रोजीचे असून यावर 42 टक्के अपंगत्व असे म्हटले आहे. म्हणजे पॉलिसीच्या नियमाप्रमाणे पायाचे 100 टक्के अपंगत्व किंवा पाय निकामी झाला असे म्हणता येणार नाही. प्रमाणपञावरचा मयत सक्रू यांचा फोटो पाहिला त्यांचे दोन्ही पाय जमिनीवर थोडे का होईना टेकून काठीचे सहायाने चालू शकतात असे दिसते म्हणजे अर्जदार हे अंथरुणाला खिळून होते असे म्हणता येणार नाही. यानंतर दि.7.1.2005 रोजी म्हणजे या प्रमाणपञाच्या आधी पडल्यामूळे परत शरीक केले असे म्हटले आहे. हे उपचाराचे कागदपञ पाहिले असता याचेवर परत उपचार करुन दि.5.3.2005 रोजीला डिसचार्ज दिलेला आहे. दि.17.2.2005 रोजीचे वैद्यकीय महाविद्यालयाचे जे प्रमाणपञ दिलेले आहे त्यामूळे मयत सक्रू राठोड यांचेबददल Patient is old असे म्हटले आहे. अर्जदाराचे वडील हे सक्रू राठोड यांचा दि.18.11.2007 रोजी मृत्यू झाला असे म्हणतात व अपघात हा दि.9.5.2004 रोजी झाला याचेंशी संबंधी जोडतात, पण जवळपास 3 वर्ष सहा महिन्यानंतर हा अपघात मृत्यूस कारणीभूत झाला असे म्हणता येणार नाही व मृत्यूचे नंतर मयत सक्रू यांनी 1 ते 2 दिवस आधी हॉस्पीटलमध्ये अडमिट केले किंवा मृत्यूचे वेळेस त्यांना एखादया डॉक्टरने तपासले किंवा मृत्यू कशामूळे झाला त्यांचे पोस्ट मार्टेम रिपोर्ट असा कोणताही पूरावा अर्जदार समोर आणत नाहीत. म्हणजे जखम झाली असेल तर गॅगरिन सारखा प्रकार होण्याची शक्यता असती असा कोणताही पूरावा समोर येत नाही. त्यामूळे साडेतिन वर्षा पूर्वीचा अपघात हा त्यांचे मृत्यूस कारणीभूत होऊ शकत नाही. पॉलिसीतील नियम व अटी प्रमाणे अपघाताचा मृत्यूशी संबंध हा सहा महिन्यापर्यत मृत्यू झाला तरच येऊ शकतो असा ही नियम आहे. याशिवाय गैरअर्जदाराने असा आक्षेप घेतला आहे की, सदर तक्रार ही मूदतीत नाही. या बददलही अर्जदाराने या पूर्वी गैरअर्जदार यांचेकडे क्लेम मागितला होता. गैरअर्जदार यांनी दि.29.7.2005 रोजी दावा नाकारला आहे. यानंतर परत यावीषयावर त्यांना विम्याची रक्कम मागता येणार नाही. सदरील दावा मूदतीत नाही. प्रकरणात अर्जदाराने पाठविलेली कायदेशीर नोटीस, यांला गैरअर्जदार यांनी दिलेले उत्तर, तपासणीक अधिकारी श्री. खोमणे यांनी घेतलेला जवाब, त्यांचा अहवाल, शपथपञ इत्यादी कागदपञ पूराव्या कामी दाखल केलेले आहेत. अर्जदाराने शेवटी दि.21.02.2008 रोजीचे प्रमाणपञ दाखल केलेले आहे. यात पाय मोडल्यामूळे व आजारी असल्याकारणाने मयत सक्रू यांचा मृत्यू झाला असे प्रमाणपञ दाखल केलेले आहे. मृत्यू कशामूळे झाला हे वैद्यकीय अधिकारीच प्रमाणीत करु शकतात, ग्रामपंचायत यांना असे प्रमाणपञ देण्याचा अधिकार नाही. सदरील सर्व बाबीचा विचार केला असता असे दिसून येते की, गैरअर्जदार यांचे सेवेत ञूटी झाली असे अर्जदार सिध्द करु शकलेले नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती एस.आर.देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जयंत पारवेकर, लघूलेखक. |