जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/148 प्रकरण दाखल तारीख - 02/07/2009 प्रकरण निकाल तारीख – 19/03/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते. - सदस्य बालाजी पि.गणपत ताटेपामुलवार, वय 52 वर्षे, व्यवसाय नौकरी, अर्जदार. रा.यांत्रिकी मडळ उ.स., यांत्रिकीभवन, वर्कशॉप रोड, नांदेड. विरुध्द. 1. शाखाधिकारी, गैरअर्जदार. लाईफ लाईन लाईफ केअर लि, शाखा कार्यालय श्रीनगर, यादव कॉप्लेक्स, नांदेड. 2. शाखाधिकारी, लाईफ लाईन लाईफ केअर लि, मुख्य शाखा कार्यालय, रेनबो हाऊस,दुसरा मजला, सावेडी रोड, अहमदनगर. 3. शाखा व्यवस्थापक, दि. ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनी, संतकृपा मार्केट, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी. गैरअर्जदार तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड निकालपत्र (द्वारा- मा.बि.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) गैरअर्जदार यांनी वैद्यकिय उपचाराची रक्कम पॉलिसीच्या नियमाप्रमाणे न देऊन सेवेत त्रुटी केली म्हणुन अर्जदार यांनी वैद्यकिय उपचारासाठी रु.50,000/-, 18 टक्के व्याजासह मिळावेत तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणुन रु.5,000/- गैरअर्जदारांना देण्याचे आदेश व्हावेत म्हणुन ही तक्रार नोंदविली आहे. अर्जदार यांनी गैअर्जदार क्र.2 यांच्या मार्फत रु.1,00,000/- साठी नागरी सुरक्षण गैरअर्जदार यांचेकडे दि.02/12/2007 ते 02/12/2008 या कालावधीसाठी काढली होती. त्यामुळे पालिसी अंतर्गत त्यांचा व त्यांच्या पत्नीसह सुरक्षा लाभ व्यक्तिगत अपघात झाल्यास नुकसान भरपाई मिळण्याची सुविधा होती. अर्जदार हे दि.19/07/2008 रोजी परभणीहुन नांदेडकडे रात्री 2 ते 2.30 दरम्यान घाई गडबडीत रेल्वेकडे जात असतांना प्लॅटफॉर्मवर ओलावा असल्यामुळे त्यांच्या पत्नीचा पाय घसरला व त्या त्यांच्या मागच्या बाजुस डोक्यावर आदळल्या त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबदरदस्त मार लागला त्यामुळे त्यांना ताबडतोब वैद्यकिय उपचारासाठी यशोदा हॉस्पीटल नांदेड येथे मेंदुला मार लागल्या कारणाने भरती केले. गंभीर दुखापत असल्या कारणाने त्यांना दि.19/07/2008 पासुन 30/02/2008 पर्यंत उपचार घ्यावे लागले यासाठी अर्जदार यांना बराच वैद्यकिय खर्च झाला ज्याची बिले अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे दि.07/08/2008 रोजी क्लेम फॉर्मसह व आवश्यक ते कागदपत्रांची पुर्तता करुन दिले व अपघाती वैद्यकिय खर्च मिळावा यासाठी मागणी केली यासाठी हॉस्पीटलचे बिल, सिटी स्कॅन रिपोर्ट, एक्स-रे रिपोर्ट, ब्लड रिपोर्ट या सर्व कागदपत्रांची पुर्तता करावी असे सांगितले त्यानुसार अर्जदाराने सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात बरेच पत्र व्यवहार झाले. गैरअर्जदार यांनी पोलिस पंचनामा, बिल तसेच सर्व बिले डुप्लीकेट असल्याबद्यल व डिस्चार्ज कार्ड पाठवण्यासंबधी मागणी केली. यात अर्जदार यांनी दि.27/05/2009 रोजी उत्तर दिले यात सर्व बिले योग्य आहे, डुप्लीकेट बिले नाहीत. त्यामुळे अर्जदाराची तक्रार योग्य असुन वरील मागणी पुर्ण करावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. लाईफ लाईन केअर प्रा.लि ही इन्शुरन्स सेवा देणारी कंपनी आहे. सदरील सेवा देण्यासाठी ओरिएंटल इंशुरन्स कंपनीने निरनिराळया किंमतीची व कालावधीची लाईफ केअर फॅसिलिटी कार्ड बाजारात विक्रीसाठी आणली आहेत. लाईफ लाईन केअर लिमिटेडने लाईफ केअर कार्ड धारकास इन्शुरन्स कव्हर देण्यासाठी दि.ओरिएन्टल इशुरन्स कंपनी लि अहमदनगर यांचे बरोबर बिझनेस टाय अप केलेला आहे. म्हणजे लाईफ लाईन लाईफ केअर लि प्रत्यक्षात लाईफ केअर फॅसलिटी कार्ड विकते व सवलत म्हणुन त्या बदल्यात त्याय विमाधारकास त्या कार्डाच्या किंमतीनुसार त्यांची त्या रक्कमेची व मुदतीची पॉलिसी देते. रिस्क ही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी ची आहे कारण इंन्शुरन्स पॉलिसी ही त्यांनी दिलेली आहे. अर्जदाराची पत्नी जमुनाबाई यांनी लाईफ केअर कार्ड टेबल नं. 32 घेतले होते त्यांची नागरी सुरक्षा पॉलिसी नं.34287/1 रु.1,00,000/- मुदत दि.12/12/2007 ते 11/12/2008 यात दि.19/07/2008 रोजी अपघात झाला त्याची लेखी सुचना दि.07/08/2008 रोजी मिळाली व त्याच दिवशी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि अहमदनगर यांना क्लेम फॉर्म पाठविलेले आहे, त्यांना गैरअर्जदारांनी त्रुटीची सेवा दिलेली नाही. अर्जदारांनी पाठविलेल्या कागदपत्रामध्ये अपघाताचे ठोस पुरावे पोलिस पंचनामा,त्यांनी दिलेले बिल डुप्लीकेट आहेत, ओरीजनल बिले व डिसचार्ज कार्ड पाहीजे आहे हे सर्व कागदपत्र मिळाल्यानंतर अपघात विमा पॉलिसी ही दि.ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि यांची आहे तेंव्हा संबंधीत अपघाती विमा क्लेम सेटल करणे हे त्यांची जबाबदारी आहे. यात त्यांनी कुठलीच सेवेतील त्रुटी केलेली नाही. अर्जदारांनी पत्र लिहुन ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांनी म्हटल्याप्रमाणे कागदपत्रांची पुर्तता करावी असे म्हटले आहे. आमचा दोष नसल्या कारणाने आम्हास दोषमुक्त करावे असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांनी आपला लेखी जबाब वकीला मार्फत सादर केले आहे. गैरअर्जदार यांच्याकडुन कोणत्याही प्रकारची सेवेत कमतरता झाली नाही. विमा पॉलिसी त्यांना मान्य आहे त्याप्रमाणे विमाधारकास त्यांच्या पत्नीसाठी दवाखान्यात शेरीक करावे लागले तर अशा परिस्थितीत हॉस्पीटलायझेशनचा खर्च किंवा जास्तीत जास्त विमाराशीची 20 टक्के म्हणजे रु.20,000/- विमाधारकास देण्याची तरतुद आहे. अशा परिस्थितीत विमाधारकाने गैरअर्जदारास ताबडतोब लिखीत सुचना करणे आवश्यक आहे व त्यामध्ये विमाधारकाचे नांव, पॉलिसी क्रमांक,विमा रक्कम कालावधी, अपघाताची तारीख, दवाखान्यात ईलाज घेत असल्याबद्यलची सुचना ताबडतोब दिलेली नाही. सदरील पॉलिसी प्रमाणे अपघात म्हणजे रस्ता,वाहन,रेल्वे,विमान अपघात, आगीमुळे अपघात,पाण्यामध्ये बुडुन अपघात, सर्पदंश, आकाश फाटल्याने अपघात, झाड पडुन अपघात, लाईटचा शॉक लागुन अपघात, जंगली जनावराने केलेला हल्ला इ.समावेश आहे. अर्जदाराची सरची केस वरील कशातही बसत नाही म्हणुन अर्जदारास गैरअर्जदार काहीही देणे लागत नाही. अर्जदाराचे पत्नीचे निधन कसे झाले हे दाखविण्यासाठी कोणतेही कागदपत्र नाही. अर्जदाराची पत्नी ज्या पध्दतीने पडली ते अपघातात बसत नाही व अर्जदाराने केलेले कथन हे कायम अपंगत्वामध्ये येत नाही म्हणुन अर्जदाराने केलेली रु.50,000/- ची मागणी चुकीची आहे. गैरअर्जदाराने मुळ बिलाची मागणी सतत केलेली आहे परंतु ते देत नाहीत. अर्जदाराने अंदाजे रु.7,050/- चे बिल दाखल केलेले आहे त्यात सिटी स्कॅन रु.2,000/-, पॅथॅलॉजी रु.600/-, यशोदा हॉस्पीटचे रु.13,700/- या बिलाचे झेरॉक्स दाखल केलेले आहे, हे सर्व बिलाची एकुण रक्कम रु.23,350/- होते. अर्जदारास मुळ डिसचार्ज कार्ड देण्याची विनंती केली तेंव्हा त्याची डयुप्लीकेट कॉपी दाखल केली आहे. त्यावर डॉक्टराची सही नाही त्यामुळे अर्जदारास मानसिक त्रासाबद्यल रक्कम मागण्याचा अधिकार नाही किंवा सदर तक्रारअर्ज हे खर्चासह फेटाळण्यात यावे असे म्हटले आहे. अर्जदार पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहे. तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र.1 अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 यांच्या मार्फत गैरअर्जदार क्र. 2 यांची पॉलिसी लाईफ लाईन लाईफ केअर कार्ड घेतलेले आहे, पॉलिसी मान्य आहे त्यात गैरअर्जदाराचे एवढेच म्हणणे आहे की, अर्जदाराच्या पत्नीचा अपघात हा पॉलिसी नियमाप्रमाणे अपघातात बसत नाही. अर्जदाराची पत्नी ही रात्री दोन वाजता दि.19/07/2008 रोजी परभणी येथे रेल्वे प्लॅटफॉर्मवर ओलावा असल्यामुळे पाय घसरुन त्यांचा हा अपघात झाला ही बाब अपघातात मोडत नाही. अपघात म्हणजे पॉलिसी प्रमाणे रस्ता,वाहन,रेल्वे,विमान अपघात, आगीमुळे अपघात,पाण्यामध्ये बुडुन अपघात, सर्पदंश, आकाश फाटल्याने अपघात, झाड पडुन अपघात, लाईटचा शॉक लागुन अपघात, जंगली जनावराने केलेला हल्ला, कशा प्रकारचा अपघात पाहीजे व हा अपघातात बसत नाही व यास अपघात म्हणता येणार नाही. अपघाताचा पुरावा दाखल पोलिस पंचनामा, एफ.आय.आर. पुरावा म्हणुन कुठलेच कागदपत्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा अपघातच होता का ? अर्जदाराच्या पत्नीस यशोदा हॉस्पीटल येथे दाखल करण्यत आले व तेथे त्यांचा उपचार झाला त्यांनी जे दाखल केलेले बिल आहे ही डुप्लीकेट बिले असुन गैरअर्जदार त्यांना मुळ बिल मागतात त्यांचे मुळ डिसचार्ज कार्ड देण्याची मागणी करतात डुप्लीकेट डिसचार्ज कार्डवर डॉक्टरांची सही नाही सिटी स्कॅन, पॅथॅलॉजी इ.ची जर टोटल केली तर रु.23,350/- होतात. विमा पॉलिसी प्रमाणे वैद्यकिय खर्चासाठी रु.20,000/- देय आहे व येथे अर्जदाराने पॉलिसीतील नियम डावलुन सरळसरळ वैद्यकिय उपचारासाठी रु.50,000/- ची मागणी केली आहे जे की, चुक आहे. यात मुख्य बाब म्हणजे अशी आहे की, अर्जदारांना समक्ष बोलावुन विचारल असता, बिलाची मुळ प्रत कुठे आहे या प्रश्नांस त्यांनी शासनाकडे या प्रती क्लेम मिळण्यासाठी दिल्या जातात व त्यांना सरकारकडुन वैद्यकिय खर्च यापुर्वीच मिळालेले आहे. एकदा वैद्यकिय खर्च एकाकडुन घेतल्यानंतर परत विमाकंपनीकडुन त्याच बाबीसाठी क्लेम मागणे हे चुकीचे आहे तेंव्हा त्यांना डब्बल क्लेम मिळु शकणार नाही, शिवाय अपघात हा सिध्द होत नाही. तक्रारअर्जा मध्ये अपंगत्वाबद्यल रु.50,000/- मिळु शकते तेंव्हा ते त्यावर असा युक्तीवादाचे वेळी अर्जदाराचवे वकील म्हणतात व यासंबंधीचे मेडीकल बोर्डाकडील अपंगत्वाबद्यलचे प्रमाणपत्र नाही. या शिवाय तक्रारअर्जतील प्रेयरमध्ये मागणी नाही. तेंव्हा त्यांची ही मागणी मंजुर करण्या जोगा नाही. वरील सर्व बाबी तपासले असता, गैरअर्जदारांनी केलेली कार्यवाही योग्य ठरवून सेवेत त्रुटी नाही या निष्कर्शास आम्ही आलो आहे. म्हणुन वरील बाबीवरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज खारीज करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक |