निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 18/05/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 27/05/2011 तक्रार निकाल दिनांकः- 23 /08/2011 कालावधी 02 महिने 27 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. 1 माणिकराव पिता टोपाजी कोमटवार, अर्जदार तक्रार क्रमांक 121/2011 वय 80 वर्ष.धंदा.सेवानिवृत्त.गँगमन, अड.आर.जे.साखरे. रा.पुर्णा.जि.परभणी. 2 रुख्मीनबाई पिता.माणिकराव कोमटवार, अर्जदार तक्रार क्रमांक 122/2011 वय 60 वर्षे,धंदा. घरकाम. अड.आर.जे.साखरे. रा.पुर्णा.जि.परभणी. विरुध्द शाखा अधिकारी. गैरअर्जदार. बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा पुर्णा. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्रीमती. अनिता ओस्तवाल.सदस्या.) प्रकरण 121/2011 व 122/2011 मधील तक्रार अर्जातील मजकुर सारखाच आहे विरुध्द पक्षकार एकसमान असल्यामुळे दोन्ही प्रकरणांचा निकाल संयुक्तीकपणे या निकालपत्राव्दारे देण्यात येत आहे. गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदारांनी हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदारांची थोडक्यात तक्रार अशी की, प्रकरण क्रमांक 121/2011 व प्रकरण क्रमांक 122/2011 मधील अर्जदारांनी गैरअर्जदार बँकेत मुदत ठेव पावती अनुक्रमे पावती क्रमांक 696197 व पावती क्रमांक 696196 व्दारे रक्कम रु.50,000/- व 5000/- 39 महिन्या करीता ठेवी ठेवल्या होत्या.त्या रक्कमा दिनांक 17/11/2005 रोजी परिपक्व झाल्या त्यानुसार मुदत ठेव पावती क्रमांक 696197 चे रक्कम रु.64,680/- व मुदत ठेव पावती क्रमांक 696196 चे रक्कम रु.6468/- होते. उपरोक्त रक्कमा मिळण्यासाठी अर्जदारांनी गैरअर्जदार बँकेकडे अनेक वेळा संपर्क साधला असता त्याने रक्कम देण्यास टाळाटाळ केली.शेवटी दिनांक 04/05/2011 रोजी अर्जदारांनी उपरोक्त रककम देण्याची विनंती गैरअर्जदार बँके केली असता गैरअर्जदार बँकेने रक्कम देण्यास स्पष्टपणे नकार दिला म्हणून अर्जदारांनी मंचासमोर तक्रारी दाखल करुन गैरअर्जदार प्रकरण क्रमांक 121/2011 मधील अर्जदारास रक्कम रु. 64,680/- दिनांक 17/11/2005 पासून 18 टक्के व्याजदराने द्यावे.व प्रकरण क्रमांक 122/2011 मधील अर्जदारास रक्कम रु. 6468/- दिनांक 17/11/2005 पासून 18 टक्के व्याजदराने द्यावे तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी प्रत्येकी रक्कम रु.5000/- द्यावे अशा मागण्या अर्जदारांनी मंचासमोर केल्या आहेत. प्रकरण क्रमांक 121/2011 मधील अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.5/1 ते नि.5/3 व प्रकरण क्रमांक 122/2011 मधील अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.5/1 ते नि.5/2 मंचासमोर दाखल केली आहेत. गैरअर्जदार बँकेस संधी देवुन ही त्याने नेमल्या तारखेस मंचासमोर लेखी निवेदन दाखन न केल्यामुळे त्यांच्या विरोधात NO Say आदेश पारीत करण्यात आला. अर्जदाराच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारांचा तक्रार अर्ज कायदेशिर मुदतीत आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 – अर्जदारांनी गैरअर्जदार बँकेत 39 महिन्यासाठी मुदतठेवी मध्ये काही रक्कम गुंतवली होती. त्या रक्कमा परिपक्व दिनांक 17/11/2005 रोजी झाल्या पंरतु गैरअर्जदार बँकेने अद्याप ही अर्जदारांना सदरील रक्कम दिलेल्या नाहीत अशी अर्जदारांची तक्रार आहे.निर्णयासाठी महत्वाचा मुद्दा असा की,अर्जदारांचा तक्रार अर्ज कायदेशिर मुदतीत आहे काय ? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल.कारण ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 24 (अ) नुसार वादास कारण घडल्यापासून 2 वर्षाच्या आत अर्जदारांनी तक्रार अर्ज मंचासमोर दाखल करणे गरजेचे आहे.या प्रकरणा मध्ये अर्जदारांनी दिनांक 17/08/2002 रोजी 39 महिन्यासाठी मुदत ठेवी मध्ये काही रक्कमा गुंतविल्या होत्या त्या रक्कमा दिनांक 17/11/2005 परिपक्व झाल्यासह तदनंतर अर्जदारांनी दिनांक 18/05/2011 रोजी म्हणजे जवळपास 5 ½ वर्षांनी मंचासमोर तकार दाखल केल्या आहेत. वास्तविक पाहता अर्जदारांनी दिनांक 17/11/2007 च्या अगोदर तक्रार दाखल करणे गरजेचे होते एवढया उशिरा तक्रार दाखल करण्याचे नेमके कारण काय होते ? याचे स्पष्टीकरण मंचासमोर देण्यात आलेले नाही.तसेच गैरअर्जदार बँकेने सदरील रक्कम अर्जदारास कशासाठी देण्याचे टाळले किंवा रक्कमा न देण्याचे बॅंकेस कारण काय ? याचा ही समाधान कारक खुलासा अर्जदाराने मंचासमोर केलेला नाही शिवाय गैरअर्जदार बँक ही काही सहकारी बँक नाही त्यामुळे बँक अवसायनात गेली म्हणून अर्जदारास रक्कम देण्यात आलेली नाही असा ही प्रकार घडलेला नाही.शिवाय गैरअर्जदार बॅकेने लेखी निवेदन दाखल न केल्यामुळे त्यांची भुमिका स्पष्ट होत नाही,परंतु अर्जदारांनी ठेव पावतीत गुंतवलेली रक्कम पक्व ( Matured) झाली असेल तर गैरअर्जदार बँकेस रक्कम द्यावीच लागेल हे ही या प्रसंगी लक्षात घ्यावे लागेल. म्हणून सर्व बाबींचा सारासार विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आ दे श 1 अर्जदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने प्रकरण क्रमांक 121/2011 व प्रकरण क्रमांक 122/2011 मधील मुदतठेव पावती मध्ये गुंतवलेली रक्कम नियमा प्रमाणे अर्जदारास द्यावी. 3 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |