Maharashtra

Gadchiroli

CC/08/18

Rajesh Haribhau Bonkinpelliwar, Aheri, Distt. Gadchiroli, Age 42 years - Complainant(s)

Versus

Branch Officer, The Gadchiroli Jillha Madhyvarti Sahakari Bank Ltd., Branch- Aheri, Distt.Gadchiroli - Opp.Party(s)

12 Feb 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/08/18
 
1. Rajesh Haribhau Bonkinpelliwar, Aheri, Distt. Gadchiroli, Age 42 years
R/s. Aheri, Distt. Gadchiroli, Age 42 years
Gadchiroli
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Officer, The Gadchiroli Jillha Madhyvarti Sahakari Bank Ltd., Branch- Aheri, Distt.Gadchiroli
Branch Officer, The Gadchiroli Jillha Madhyvarti Sahakari Bank Ltd., Branch- Aheri, Distt.Gadchiroli
Gadchiroli
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 
PRESENT:
 
ORDER

(मंचाचे निनर्णयान्‍वये, अनिल एन. कांबळे, अध्‍यक्ष,प्रभारी)

                 (पारीत दिनांक : 12 फेब्रूवारी 2009)

 

1.        अर्जदाराने, सदरची तक्रार, ग्राहक संरक्षण तरतुदी अंतर्गत गैरअर्जदाराचे विरुध्‍द दाखल केलेली आहे.  अर्जदाराने, गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दिनांक 4/6/2003 रोजी आपले करंट खाते क्र. 5561 मध्‍ये धनादेश

                                           ... 2 ...

                        .... 2 ...

 

655263 दिनांक 31/3/2003 रुपये 6,390/- चा चेक जमा केला.  तसेच, दिनांक 4/5/2007 ला गैरअर्जदार क्र. 1 कडे धनादेश क्र. 816309 दिनांक 14/2/2007 रुपये 4,790/- चा चेक वटविण्‍याकरीता जमा केला.  परंतु, सदर जमा केलेले चेक आजपावेतो रक्‍कम बँकेने त्‍याचे खात्‍यात जमा केलेली नाही.  त्‍याकरीता अर्जदारास बराच मानसिक ञास झाला व आर्थिक नुकसान झाले आहे.  त्‍यापोटी धनादेशाची एकुण रक्‍कम 11,180/-  रुपये आणि 6 % टक्‍के व्‍याजासह देण्‍यात यावे, तसेच नुकसानभरपाई रुपये 15,000/- असे अंदाजे एकंदरीत रुपये 30,000/- गैरअर्जदारांकडून वसुल करुन देण्‍यात यावे.  अर्जदाराने, आपले तक्रारी सोबत निशाणी 3 वरील यादीनुसार एकुण 6 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले आहेत.  ज्‍यामध्‍ये खात्‍यात जमा केलेल्‍या चेकची काऊंटर स्‍लीप, गैरअर्जदार क्र. 1 ला दिलेल्‍या पञाची प्रत, गैरअर्जदार क्र. 1 ने दिलेल्‍या पञाची प्रत दाखल केलेले आहे.  अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदारास नोटीस काढण्‍यात आला.  गैरअर्जदार क्र. 1 हजर होऊन निशाणी 7 नुसार आपले लेखी बयाण दस्‍ताऐवजासह दाखल केले आहे.  गैरअर्जदार क्र. 1 ने आपले लेखी बयाणात घेतलेल्‍या आक्षेपानुसार अर्जदाराने, गैरअर्जदार क्र. 2 म्‍हणून ‘चंद्रपूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक मर्यादीत, चंद्रपूर’ ला तक्रारीत दुरुस्‍ती करुन गैरअर्जदार म्‍हणून जोडण्‍यात आले.  त्‍यानुसार गैरअर्जदार क्र. 2 ला नोटीस काढण्‍यात आला.  गैरअर्जदार क्र. 2 हजर होऊन निशाणी 16 नुसार लेखी बयाण व निशाणी 17 नुसार आपले दस्‍ताऐवज दाखल केलेले आहेत.

 

2.        गैरअर्जदार क्र. 1 ने आपले लेखी बयाणात, अर्जदाराने केलेले सर्व आक्षेप अमान्‍य करुन तक्रार खारीज करण्‍यात यावी, अशी मागणी केली आहे.  गैरअर्जदार क्र. 1 ने विशेष कथनात असे नमुद केले आहे की, अर्जदार राजेश अहेरी शाखेचा ग्राहक असून, त्‍याने दिनांक 4/6/2003 रोजी चेक क्र. 655263 रुपये 6,390/- आयकर रिटर्न संदर्भातील स्‍टेट बँक ऑफ इंडिया, शाखा चंद्रपूरचा चेक जमा केला.  गैरअर्जदार क्र. 1 ने, प्रचलित कार्यपध्‍दती नुसार तो चेक दिनांक 4/6/2003 रोजी, चंद्रपूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक मर्या., मुख्‍य कार्यालय चंद्रपूर येथे वटविण्‍याकरीता पाठविला.  तो चेक चंद्रपूर बँकेने, स्‍टेट बँक ऑफ चंद्रपूर

                                           ... 3 ...

                        ... 3 ....

 

 

कडे पाठविण्‍यात आला होता.  अर्जदाराने चौकशी केल्‍यानंतर दिनांक 6/2/2004 रोजी चंद्रपूर मध्‍यवर्ती सहकारी बँकेला स्‍मरणपञ दिले.  त्‍यानंतर वारंवार चंद्रपूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेस स्‍मरणपञ दिले.

 

3.        चंद्रपूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि. चे सहाय्यक व्‍यवस्‍थापक, मुख्‍यालय चंद्रपूर यांनी दिनांक 18/2/2005 रोजी उत्‍तर पाठविले.  त्‍यात उत्‍तरानुसार payees Endorsement Required  या सबबीखाली आम्‍हास परत केला असून, आम्‍ही तो चेक गडचिरोली मध्‍यवर्ती सहकारी बँक, शाखा भेंडाळा यांचेकडे पाठविल्‍याचे कळविले.  वास्‍तविक, चंद्रपूर जिल्‍हा मध्‍यवर्ती शाखेने सदर चेक अहेरी शाखेचा असल्‍याने तो या गैरअर्जदारास पाठवीणे आवश्‍यक होते.  परंतु तसे न केल्‍याने चेक वटण्‍यास उशिर झाला.  अर्जदाराने चेकची संपूर्ण पुर्तता paying Endorsement  पुर्ण केले असते तर चेक परत आला नसता, याकरीता अर्जदाराच व्‍यक्‍तीशः जबाबदार आहे.  त्‍यामुळे, या चेकची रक्‍कम गैरअर्जदार भरपाई करण्‍यास जबाबदार नाही.

 

4.        गैरअर्जदार क्र. 1 ने आपले लेखी बयाणातील विशेष कथनात पुढे असे नमुद केले आहे की, चेक क्र. 816309 दिनांक 4/5/2007 रुपये 4,790/- चा चेक दिनांक 21/5/2005 रोजी ‘चंद्रपूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक मर्यादीत यांचेकडे पाठविला आहे.  सदर चेक बद्दल जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेस विचारणा केली असता, त्‍यांनी समाधानकारक उत्‍तर दिले नाही.  सदर चेक चंद्रपूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक नंतर महाराष्‍ट्र राज्‍य सहकारी बँक, नागपूर  यांना डी.डी. व्‍दारे पाठविला किंवा नाही याबद्दल मुख्‍य लेखापाल, महाराष्‍ट्र राज्‍य सहकारी बँक, विभागीय कार्यालय, नागपूर यांना दिनांक 12/1/2008 आणि 10/7/2008 च्‍या पञाव्‍दारे विचारणा केली.  परंतु, त्‍यांचेकडून अजुनपावेतो कोणतेही उत्‍तर आले नाही.  गैरअर्जदार क्र. 1 ने, आपली जबाबदारी पूर्ण केलेली आहे, चेक वटण्‍यास लागलेल्‍या अवधीस व नुकसानभरपाईस जबाबदार नाही.  अर्जदाराचा अर्ज हा तथ्‍यहीन असून, गैरअर्जदारास खर्चात व मानसिक ञासात पाडणारा असल्‍याने, खर्चासह खारीज करण्‍यात यावा.

                                           ... 4 ...

                        ... 4 ...

 

5.        गैरअर्जदार क्र. 2 ने, आपले निशाणी 16 वरील लेखी बयाणात, अर्जदाराची तक्रार अमान्‍य केले आहे.  अर्जदाराने केलेली मागणी व प्रार्थना गैरअर्जदार क्र. 2 चे विरुध्‍द वास्‍तवीकतेवर नसून बेकायदेशिर व खोटी असल्‍यामुळे, नाकबूल केली आहे.  गैरअर्जदार क्र. 2 ने आपले विशेष कथनात असे म्‍हटले आहे की, अर्जदाराच्‍या तक्रारीमध्‍ये गैरअर्जदार क्र. 2 यांनी सेवेत न्‍युनता केली असे दिसून येत नाही.  अर्जदाराचे तक्रारीत गैरअर्जदार क्र. 2 विरुध्‍द तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण नसल्‍यामुळे रद्द होण्‍यास पाञ आहे. 

 

6.        गैरअर्जदार क्र. 2 ने आपले विशेष कथनात पुढे असे म्‍हटले आहे की,  गैरअर्जदार क्र. 1 ने दिनांक 4/6/2003 रोजी धनादेश क्र. 655263 रुपये 6,390/- चा धनादेश ओ.बी.सी. क्र. 113 व्‍दारे कलेक्‍शन करीता दिनांक 31/3/2003 रोजी पाठविला.  गैरअर्जदार क्र. 2 ने  सदर धनादेश दिनांक 19/6/2003 ला स्‍टेट बँक चंद्रपूर, जटपूरा गेट रामनगर यांचेकडे पाठविला.  सदर चेक भारतीय स्‍टेट बँक, चंद्रपूर यांनी पैसे घेणा-याचे पुष्‍ठांकन हवे या सबबीखाली गैरअर्जदार क्र. 2 ला दिनांक 19/6/2003 रोजी परत केला.  गैरअर्जदार क्र. 2 नी दिनांक 3/7/2003 रोजी जावक क्र. 2247, व्‍ही.पी.एल. 241 व्‍दारे यु.पी.सी. ने 5/7/03 रोजी गैरअर्जदार क्र. 1 ला परत केला.  परंतु, गैरअर्जदार क्र. 2 ने सदर परत करावयाचा धनादेश अहेरी शाखेत पाठविण्‍याऐवजी जावक क्र. 2247, यु.पी.सी. 242 व्‍दारे दिनांक 3/7/03 ला शाखा भेंडाळा येथे पाठविले.  भेंडाळा शाखेने दिनांक 9/7/03 ला सदर चेक गडचिरोली जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक प्र.का. गडचिरोली येथे पाठविला.

 

7.        गैरअर्जदार क्र. 2 ने, आपले लेखी बयाण पुढे असेही म्‍हटले आहे की, गैरअर्जदार क्र. 1 ने दिनांक 4/5/2007 रोजी धनादेश क्र. 816309 रुपये 4,790/-  कलेक्‍शन क्ररीता दिनांक 21/5/2007 ओ.बी.सी. क्रमांक 189 नुसार पाठविला.  गैरअर्जदार क्र. 2 ने लेजर बुकमध्‍ये अ.क्र. 977 वर नोंद केली आणि सदर चेक कलेक्‍शन करीता दिनांक 28/5/07 ला भारतीय स्‍टेट बँक, जटपूरा गेट, चंद्रपूर यांचेकडे पाठविला.  सदर चेक दिनांक 28/5/2007 ला चेकची मुदत संपली, या सबबीखाली गैरअर्जदार

                                            ... 5 ...

                        ... 5 ...

 

क्र. 2 ला परत केला.  तेंव्‍हा गैरअर्जदार क्र. 2 ने, दिनांक 29/5/2007 ला गैरअर्जदार क्र. 1 ला चेक परत केला.  गैरअर्जदार क्र. 1 नी धनादेश क्र. 816109 हा 14/2/2007 ला रुपये 4,790/- ओ.बी.सी. कलेक्‍शन करीता दिनांक 19/5/2005 ला महाराष्‍ट्र राज्‍य सहकारी बँक, विभागीय कार्यालय, नागपूर यांचेकडे दिनांक 20/5/07 ला जावक क्र. 489 रजिस्‍ट्री पावती क्र. 2361 नुसार पाठविण्‍यात आले.  परंतु, महाराष्‍ट्र राज्‍य सहकारी बँक, विभागीय कार्यालय, नागपूर यांनी सदर चेक बद्दलची माहिती गैरअर्जदार क्र. 1 ला दिलेली नाही.  अर्जदाराने दोन्‍ही चेकची पुर्णपणे पुर्तता न केल्‍यानेच गैरअर्जदार क्र. 2 ने सदर चेक गैरअर्जदार क्र. 1 ला परत केला आहे.  अर्जदार हे व्‍यक्‍तीशः स्‍वतः जबाबदार आहे.  चेकची नुकसानभरपाईस गैरअर्जदार क्र. 2 जबाबदार नाही.  अर्जदाराने, चेकच्‍या बाबत कोणतीही लेखी तक्रार गैरअर्जदार क्र. 2 कडे दाखल केलेली नाही.  गैरअर्जदार क्र. 1 ने चेकच्‍या बाबत कळविल्‍या नंतर गैरअर्जदार क्र. 2 ने चेक बाबत माहिती दिलेली नाही.

 

8.        गैरअर्जदार क्र. 2 ने आपले  लेखी बयाणात पुढे असेही म्‍हटले आहे की, अर्जदार व गैरअर्जदार क्र. 2 हे उपभोगता व ग्राहक या संज्ञेत मोडत नाही.  अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 यांच्‍यातील वाद हा तक्रारीतील विषय आहे.  गैरअर्जदार क्र. 2 ला अनावश्‍यक पार्टी बनविले आहे, त्‍यामुळे खर्चासह खारीज होण्‍यास पाञ आहे.

9.        गैरअर्जदार क्र. 2 ने आपले विशेष कथनात असेही म्‍हटले आहे की, भारतीय स्‍टेट बँक, चंद्रपूर, जटपूरा गेट रामनगर, ही आवश्‍यक पार्टी असल्‍याने, त्‍यांना जोडण्‍यात यावे.  अर्जदाराची तक्रार ही मुदतबाह्य असल्‍याने, खर्चासह खारीज होण्‍यास पाञ आहे.  अर्जदाराचा अर्ज तथ्‍यहिन, गैरअर्जदार क्र. 2 ला खर्चात व मानसिक ञासात पाडणारा असल्‍याने, खर्चासह खारीज करण्‍यात यावी.

10.       अर्जदाराने, आपले तक्रारीतील कथना पृष्‍ठयर्थ निशाणी 10 नुसार प्रतीउत्‍तर दाखल केली आहे.  अर्जदाराने दाखल केलेले दस्‍ताऐवज

                                           ... 6 ...

 

 

                        ... 6 ...

 

आणि गैरअर्जदार क्र. 1 व 2 नी दाखल केलेले दस्‍ताऐवज, तसेच उभय पक्षाच्‍या वकीलांनी केलेल्‍या तोंडी युक्‍तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

              मुद्दे                      उत्‍तर

 

(1)  अर्जदाराची तक्रार मुदतबाह्य आहे काय ?      :        नाही.

(2)  अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 2 चा ग्राहक आहे :    होकारार्थी.

     काय ?

(3)  अर्जदार चेकची रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यास :    होकारार्थी.

     पाञ आहे काय ?

(4)  गैरअर्जदाराने, अर्जदारास सेवा देण्‍यात ञृटी  :    होकारार्थी.

     केली आहे काय ?

(5)  तक्रारीचा अंतिम निकाल काय ?            : अंतिम आदेशाप्रमाणे.

 

              //  कारण मिमांसा  //

मुद्दा क्रमांक 1 :

 

11.        गैरअर्जदार क्र. 2 ने लेखी बयानात तक्रार ही मुदतबाह्य असल्‍याचा मुद्दा उपस्थित केला.  गैरअर्जदार क्र. 2 ने कशा पध्‍दतीने मुदतबाह्य आहे, याबद्दलचा कुठलाही उल्‍लेख आपले लेखी बयानात आणि तोंडी युक्‍तीवादात केला नाही किंवा त्‍याचा खुलासाही केला नाही, फक्‍त नाकारण्‍यावरुन नाकारले आहे.  अर्जदार, गैरअर्जदार क्र. 1 चा खातेदार असून करंट खाते क्र. 5561 असून, अर्जदार नियमितपणे गैरअर्जदार क्र. 1 कडे, जमा केलेल्‍या दोन्‍ही चेक बाबत विचारणा करीत होता.  गैरअर्जदार क्र. 1 ने दिनांक 10 जुलै 2008 ला अॅड. निलीमा महाकाले, महाकाली मंदिर, चंद्रपूर यांना चेक बद्दल माहिती कळविले आहे.  अर्जदार आपल्‍या चेक बद्दल पाठपुरावा करीत असल्‍यामुळे, वादास कारण सतत घडत असल्‍याने, अर्जदाराची तक्रार मुदतबाह्य आहे असे म्‍हणता येत नाही.

                                                ... 7 ...

                        ... 7 ...

गैरअर्जदाराने आपले बयाणात मुदती बाबतचा मुद्दा उपस्थित केलेला नाही.  गैरअर्जदार क्र. 1 ने आपले लेखी बयाणासोबत दस्‍ताऐवज दाखल केले.  त्‍यामध्‍ये गैरअर्जदार क्र. 2 ला दिनांक 6/2/2004, 15/2/2005 ला स्‍मरणपञ पाठविले आहे.  तसेच, गैरअर्जदार क्र. 2 ने दिनांक 18/2/2005 ला गैरअर्जदार क्र. 1 ला उत्‍तर पाठविले आहे.  अर्जदार आपले चेकच्‍या बाबत नियमितपणे पाठपुरावा करीत असून, गैरअर्जदार क्र. 1 ला त्‍याबाबत विचारणा करीता होता आणि गैरअर्जदार क्र. 1 चेकच्‍या बाबत वेळोवेळी 2008 पर्यंत पञ व्‍यवहार केला असून, त्‍याबाबतचे दस्‍त रेकॉर्डवर दाखल केलेले आहेत.  त्‍यामुळे अर्जदाराची तक्रार ही मुदतबाह्य आहे असे म्‍हणता येत नाही.  गैरअर्जदार क्र. 2 ने उपस्थित केलेला मुद्दा न्‍यायोचित व संयुक्‍तीक नाही, असे या न्‍यायमंचाचे मत असल्‍यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रमांक 2 ते 4 :

 

12.       अर्जदाराचा करंट खाता गैरअर्जदार क्र.1 च्‍या बँकेत असून, त्‍यानी आपल्‍या करंट खात्‍यात आयकर विभागाकडून प्राप्‍त झालेला चेक जमा केला.  सदर चेक गैरअर्जदार क्र. 1 ने गैरअर्जदार क्र. 2 कडे ओ.बी.सी. कलेक्‍शन करीता पाठविले.  गैरअर्जदार क्र. 1 ने आपले लेखी बयाणात अर्जदार हा ग्राहक असल्‍याचे मान्‍य केले आहे.  परंतु, गैरअर्जदार क्र. 2 ने आपल्‍या लेखी बयाणात असा मुद्दा उपस्थित केला की, अर्जदार व गैरअर्जदार क्र. 2 यांच्‍यात ग्राहकीय संबंध नाहीत, तर अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 त्‍यांच्‍यातील वादाचा विषय आहे.  गैरअर्जदार क्र. 1 ही मध्‍यवर्ती बँक असून, गैरअर्जदार क्र. 2 ही त्‍या बँकेशी संबंधीत सलग्‍न बँक असल्‍यामुळे, गैरअर्जदार क्र. 1 कडून, अर्जदाराने जमा केलेला चेक गैरअर्जदार क्र. 2 कडे कलेक्‍शन करीता पाठविले.  गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्‍यात बँकीय संबंध असल्‍यामुळेच कलेक्‍शन करीता पाठविण्‍यात आले.  वास्‍तविक, सदर चेक हे भारतीय स्‍टेट बँक, जटपूरा गेट, शाखा चंद्रपूर यांचेकडील असतांना, त्‍यांचेकडे कलेक्‍शन करीता न पाठविता प्रथम आपल्‍या संबंधित बँकेकडे पाठविले व संबंधित बँक म्‍हणजेच चंद्रपूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक

                                                ... 8 ....

                        .... 8 ...

यांनी स्‍टेट बँकेकडे सदर चेक कलेक्‍शनकरीता पाठविले.  गैरअर्जदार क्र. 2 च्‍या लेखी बयानातील प्‍यारा 2 मधील मजकूरानुसार गैरअर्जदार क्र. 1 ने धनादेश 31/3/03 ला पाठविलेला चेक कलेक्‍शनकरीता भारतीय स्‍टेट बँक, चंद्रपूर कडे दिनांक 19/6/03 ला पाठविले.  यावरुन, गैरअर्जदार क्र. 2 ने सदर चेक आपलेकडे 70-80 दिवस पाडून ठेवला, हा गैरअर्जदार क्र. 2 चा गंभीर निष्‍काळजीपणा असून, सेवेतील न्‍युनता आहे.  अर्जदारास,गैरअर्जदार क्र. 1 च्‍या मार्फतीने गैरअर्जदार क्र. 2 सेवा देत असल्‍यामुळे अर्जदार व गैरअर्जदार क्र. 2 यांचेत ग्राहकीय सेवा संबंध आहे, असे या न्‍यायमंचाचे मत आहे.  गैरअर्जदार क्र. 2 ने अर्जदारास सेवा देण्‍यात ञृटी केलेली आहे.  गैरअर्जदार क्र. 1 ने आपले लेखी बयाणात सदर चेक हे गैरअर्जदार क्र. 2 कडे कलेक्‍शनकरीता पाठविला असल्‍यामुळे, तक्रारीत त्‍याला गैरअर्जदार क्र. 2 म्‍हणून जोडणे आवश्‍यक आहे असा मुद्दा उपस्थित केला, त्‍यानुसार अर्जदाराने आवश्‍यक पक्ष म्‍हणून गैरअर्जदार क्र. 2 ला जोडले आहे आणि तक्रार गुणदोषावर निकाली काढण्‍याकरीता कोणी सेवा देण्‍यात ञृटी केली आहे, हे निश्चित करण्‍याकरीता आवश्‍यक पक्ष आहे.  गैरअर्जदार क्र. 2 ने उपस्थित केलेला उपभोगता व ग्राहकाचा संबंध अर्जदाराशी आहे, तसेच आवश्‍यक पक्ष असल्‍यामुळे अर्जदार व गैरअर्जदार यांच्‍यात संबंध निर्माण झालेले आहेत.  त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 2 चे म्‍हणणे ग्राहय धरण्‍यास पाञ नाही.

 

13.       अर्जदाराने, गैरअर्जदार क्र. 1 च्‍या शाखेत दिनांक 4/6/2003 ला रुपये 6,390/- चा चेक जमा केला.  परंतु, गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्‍या निष्‍काळजीकृत्‍यामुळे व गैरअर्जदार क्र. 2 च्‍या बेजबाबदार कृत्‍यामुळे आजपर्यंत अर्जदार सदर चेकच्‍या रकमेचा लाभ घेण्‍यापासून वंचीत राहिला.   गैरअर्जदार क्र. 1 ने पाठविलेला चेक ओ.बी.सी. क्र. 113 गैरअर्जदार क्र. 2 ला प्राप्‍त झाल्‍यानंतर paying Endorsement नसल्‍यामुळे स्‍टेट बँकेने परत केल्‍यानंतर तो चेक सरळ गैरअर्जदार क्र. 1 कडे परत पाठविण्‍याची जबाबदारी असतांना, तो चेक गैरअर्जदार क्र. 1 कडे न पाठविता, भेंडाळा शाखेकडे पाठवून गैरअर्जदार क्र. 2 च्‍या बेजबाबदार कर्मचा-याने आपले कर्तव्‍य उत्‍तमप्रकारे पार पाडले असल्‍याचे दाखल दस्‍ताऐवजावरुन दिसून

                                                ... 9 ...

                        ... 9 ...

 

येते.  गैरअर्जदार क्र. 2 चा हा गंभीर निष्‍काळजीपणा असून, तो चेक अजुनपर्यंत गैरअर्जदार क्र. 1 च्‍या शाखेकडे पोहचलेला नाही.  त्‍यामुळे अर्जदाराच्‍या खात्‍यात रक्‍कम जमा करण्‍यात आली नाही.  भारतीय स्‍टेट बँक, शाखा जटपूरा चंद्रपूर ने paying Endorsement च्‍या सबबीखाली तो चेक गैरअर्जदार क्र. 2 कडे दिनांक 19/6/2003 ला परत पाठविण्‍यात आला.  त्‍यानंतर लगेच गैरअर्जदार क्र. 2 ने आपले कर्तव्‍य जबाबदारीने पार पाडून गैरअर्जदार क्र. 1 कडे पाठविले असते तर, गैरअर्जदार क्र. 1 कडून त्‍याचेवर अर्जदाराची Endorsement घेऊन, पुन्‍हा ते कलेक्‍शनकरीता पाठवून त्‍याची रक्‍कम अर्जदारास त्‍याचवेळी सन 2003 मध्‍ये प्राप्‍त झाली असती, परंतु गैरअर्जदार क्र. 2 च्‍या निष्‍काळजी कृत्‍यामुळे त्‍या रकमेच्‍या लाभापासून वंचीत झाला आहे.  त्‍यामुळे चेक क्र. 655263 रुपये 6,390/- गैरअर्जदार क्र. 2 दिनांक 19/6/2003 पासून व्‍याजासह परत करण्‍यास जबाबदार आहे, असे या न्‍यायमंचाचे ठाम मत आहे.  ग्राहकाने बँकेत चेक जमा केल्‍यानंतर तो चेक स्‍थानिक असल्‍यास दूस-या दिवशी व बाहेरील असल्‍यास 7/14 दिवस ऐवढया कालावधीत क्‍लीअर होऊन ती रक्‍कम अर्जदाराच्‍या खात्‍यात जमा व्‍हावयास पाहिजे, असे निर्देश रिजर्व बँकेने सर्व बँकांना दिले आहे.  प्रस्‍तुत प्रकरणात गैरअर्जदार क्र. 1 व 2 नी अर्जदाराचा चेक क्‍लीअर होऊन येण्‍याकरीता बराच विलंब केला असून, अजुनपर्यंत अर्जदाराचे दोन्‍ही चेक अर्जदाराच्‍या खात्‍यात जमा झालेले नाही, ही गैरअर्जदाराच्‍या सेवेतील न्‍युनता असल्‍याचे स्‍पष्‍ट होतो.  आदरणीय राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली, ‘अतुल नंदा व इतर –विरुध्‍द – रिजर्व बँक ऑफ इंडिया व इतर’, 2008-CTJ-955 (CP) (NCDRC), या प्रकरणात आपले मत दिले आहे, त्‍यात दिलेले मत या प्रकरणाला तंतोतंत लागु पडतो.  त्‍यातील महत्‍वाचा भाग खालीलप्रमाणे.

 

Banking – Collection of cheques – Consumer Protection Act, 1986 – Deficiency in Service – Section 2(1)(g)—Section 2(1)(o) – What can be the appropriate time frame for crediting the cheques sent to the banks for collection ? – Question considered on the basis of the policies framed by the various banks and the directions in this connection issued by the Reserve Bank of India to them

                                       ...10 ...

                 ... 10 ...

– So considered, directed that for the local cheques credit and debit be given on the same day or at the most next day – For collection of outstation cheques the maximum period be 7/10/14 days and for any delay beyond it, the payee of the cheques be paid interest at the fixed deposit rate or at a specified rate – Reserve Bank of India made responsible for monitoring the directions given to the banks.

 

Atul Nanda & others

-V/s.- Reserve Bank of India & others.

2008-CTJ-955 (CP) (NCDRC)

 

          ******                 ******                 ******                 ******

 

14.       गैरअर्जदार क्र. 1 ने आपले लेखी बयाणात चेक क्र. 816309 दिनांक 14/2/2007 रुपये 4,790/- ओ.बी.सी. कलेक्‍शनकरीता गैरअर्जदार क्र. 2 कडे दिनांक 21/5/2007 ला पाठविले असल्‍याचे गैरअर्जदार क्र. 2 ने आपले लेखी बयाणात मान्‍य केले, ही बाब गैरअर्जदार क्र. 1 ने सुध्‍दा दिनांक 21/5/2007 गैरअर्जदार क्र. 2 कडे पाठविले असल्‍याचे मान्‍य केले आहे.  सदर चेक हा अर्जदाराने आपले करंट खात्‍यात 4/5/2007 ला जमा केला होता व तो चेक गैरअर्जदार क्र. 1 ने 21/5/2007 ला गैरअर्जदार क्र. 2 कडे पाठविला.  यातच बराच कालावधी गैरअर्जदार क्र. 1 ने घालवीला व त्‍यानंतर गैरअर्जदार क्र. 2 ने सदर चेक 28/5/2007 ला भारतीय स्‍टेट बँक, जटपूरा गेट, चंद्रपूर कडे पाठविला.  परंतु, तो चेक मुदत संपली असल्‍याचे कारणावरुन त्‍यादिवशी गैरअर्जदार क्र. 2 कडे पाठविला.  गैरअर्जदाराचे म्‍हणण्‍यानुसार, सदर धनादेश 29/5/2007 ला गैरअर्जदार क्र. 1 कडे परत पाठविला.  हीच बाब, गैरअर्जदार क्र. 2 आपले लेखी बयाणात परिच्‍छेद 3 मध्‍ये, ‘‘गैरअर्जदार क्र. 1 नी धनादेश क्र. 816109 हा दिनांक 14/2/07 ला रुपये 4,790/- ओ.बी.सी. कलेक्‍शन करीता दिनांक 19/5/05 ला महाराष्‍ट्र राज्‍य सहकारी बँक, विभागीय कार्यालय, नागपूर यांचेकडे दिनांक 20/5/2007 जावक क्र. 489 रजि. पावती क्र.2361 नुसार पाठविण्‍यात आले.  परंतु, महाराष्‍ट्र राज्‍य सहकारी बँक, विभागीय कार्यालय, नागपूर यांनी सदर चेक बाबतची माहिती सदर गैरअर्जदार क्र. 1 ला दिली                                              ... 11 ...

                        ... 11 ....

 

नाही.’’  ही बाब, गैरअर्जदार क्र. 1 च्‍या अखत्‍यारीत असतांना गैरअर्जदार क्र. 2 ला याबद्दल कशी काय माहिती उपलब्‍ध झाली हे स्‍पष्‍ट होत नाही आणि दूसरी महत्‍वाची बाब अशी की, गैरअर्जदार क्र. 1 ने सदर चेक गैरअर्जदार क्र. 2 ला 21/5/07 ओ.बी.सी. क्र. 189 नुसार पाठविला आणि तो चेक त्‍याच काळात महाराष्‍ट्र राज्‍य सहकारी बँक, विभागीय कार्यालय, नागपूर यांचकडे पाठविला.  याबाबत, गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्‍या लेखी बयाणात विसंगती दिसून येते.  यावरुन, गैरअर्जदार क्र. 1 एकीकडे गैरअर्जदार क्र. 2 कडे पाठविल्‍याचे व दूसरीकडे नागपूरहून दिनांक 12/1/08 तसेच 10/7/08 ला पञाव्‍दारे विचारणा केले, परंतु माहिती दिली नाही. ही गैरअर्जदार क्र. 1 च्‍या सेवेतील न्‍युनता असल्‍याची बाब सिध्‍द होतो.  त्‍यामुळे, गैरअर्जदार क्र. 1 चेक क्र. 816309 दिनांक 4/5/07 पासून व्‍याजासह परत करण्‍यास जबाबदार आहे, असे या न्‍यायमंचाचे ठाम मत आहे. 

 

15.       अर्जदाराने, गैरअर्जदार क्र. 1 कडे चेक जमा केला.  त्‍यानंतर, वारंवार गैरअर्जदार क्र. 1 कडे जाऊन त्‍याबाबतची माहिती विचारत होता.  परंतु, अजुनपर्यंत चेकची रक्‍कम जमा झाली नाही, त्‍यामुळे त्‍याला मानसिक, शारीरीक व आर्थिक ञास गैरअर्जदाराच्‍या कृत्‍यामुळे झाला असल्याची बाब दाखल दस्‍ताऐवजावरुन सिध्‍द होते.  त्‍यामुळे, गैरअर्जदार मानसिक, शारीरीक ञासापोटी, आर्थिक ञासापोटी नुकसानभरपाई देण्‍यास जबाबदार आहे, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले असल्‍यामुळे, मुद्दा क्र. 2 ते 4 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रमांक 5 :

 

16.       मुद्दा क्रमांक 1 ते 4 च्‍या विवेचनावरुन अर्जदाराची तक्रार मंजुर करण्‍यास पाञ असल्‍याचे निर्णयाप्रत आले असल्‍यामुळे, अर्जदाराची तक्रार मंजुर करुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

                                                ... 12 ...

 

 

 

                      ... 12 ...

 

              //  अंतिम आदेश  //

 

(1)  अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर.

(2)  गैरअर्जदार क्र. 1 ने चेक क्र. 816309 रुपये 4,790/-, दिनांक

4/5/2007 पासून द.सा.द.शे. 12 %  टक्‍के व्‍याजाने, आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदारास द्यावे.

(3)  गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने, वैयक्‍तीकरित्‍या अथवा संयुक्‍तीकरित्‍या

चेक क्र. 655263 रुपये 6,390/-, दिनांक 19/6/2003

पासून द.सा.द.शे. 12 %  टक्‍के व्‍याजाने, आदेशाची प्रत प्राप्‍त

झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदारास द्यावे.

(4)  अर्जदारास झालेल्‍या मानसिक, शारीरीक व आर्थिक ञासापोटी

गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने प्रत्‍येकी रुपये 5,000/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

(5)  अर्जदारास, तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 1,000/- गैरअर्जदार क्र.

1 व 2 यांनी वैयक्‍तीकरित्‍या अथवा संयुक्‍तीकरित्‍या आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

(6)  उभयतांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी. 

 

गडचिरोली.

दिनांक :12/02/2009.

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.