सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 17/2014
तक्रार दाखल झाल्याचा दि. 23/04/2014
तक्रार निकाल झाल्याचा दि. 24/04/2015
श्री विलास वसंत दळवी
रा.होडावडा (कवडासवाडी)
वय – 27 वर्षे, व्यवसाय – शेती
ता.वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) शाखाधिकारी,
सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्ग
शाखा होडावडा बाजारपेठ,
ता.वेंगुर्ला, जिल्हा- सिंधुदुर्ग
2) सर व्यवस्थापक,
सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्ग
सावंतवाडी प्रधान कार्यालय, सावंतवाडी चिटणीस बिल्डिंग,
माठेवाडा, सावंतवाडी, ता.सावंतवाडी,
जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्य.
तक्रारदारतर्फे – व्यक्तीशः
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ - श्री अजित पुडलिक राणे
आदेश नि.1 वर
(दि.24/04/2015)
द्वारा : श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
1) प्रस्तुत प्रकरणात विरुध्द पक्ष पतसंस्थेतर्फे सदोष सेवा देणेत आली आणि विरुध्द पक्ष यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला म्हणून नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदारतर्फे करण्यात आली होती. विरुध्द पक्ष हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे नि.7 वर देवून तक्रारीतील कथने नाकारली होती. दरम्यानचे काळात तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचेमध्ये तडजोडीची बोलणी चालू झाल्याने प्रकरण राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दि.11/04/2015 रोजी ठेवण्यात आले. विरुध्द पक्ष यांनी दि.10/04/2015 रोजी अर्ज दाखल करुन तक्रारदार यांना विरुध्द पक्ष संस्थेने रु.22,000/- (रुपये बावीस हजार मात्र) ची वन टाईम सेटलमेंट दिली असून त्यांनी दि.19/03/2015 रोजी रक्कम भरणा करुन कर्ज खाते निरंक झालेने तक्रार अर्ज निकालात काढणेबाबत कळविले. तो अर्ज नि.34 वर आहे.
2) तक्रारदार आणि विरुध्द पक्ष दि.11/04/2015 रोजी भरविणेत आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तसेच त्यानंतर दि.20/04/2015 आणि आज रोजी देखील उपस्थित नाहीत. नि.34 मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे तक्रार प्रकरणी तडजोड झाल्याने तक्रारीस कोणतेही कारण शिल्लक राहिलेले नाही; सबब तक्रार अर्ज निकाली काढणेत येतो.
3) खर्चाबाबत आदेश नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 24/04/2015
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्य, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.