Maharashtra

Kolhapur

CC/11/362

Sou.Aanandi Viththal Yerudkar - Complainant(s)

Versus

Branch Officer Claim Department,Aviva Life Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Suchita Ghatge

29 Aug 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/362
1. Sou.Aanandi Viththal YerudkarAt Gharpan Post kale,Tal.Panhala,Kolhapur.2. Viththal Doulu YerudkarGharpan.3. Smt.Rekha Umesh YerudkarGharpan.4. Onkar Umesh YerudkarGharpan.5. Atharv Umesh YerudkarGharpan. ...........Appellant(s)

Versus.
1. Branch Officer Claim Department,Aviva Life Insurance Co.Ltd.Branch Shahupuri 3rd lane,Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Suchita Ghatge, Advocate for Complainant

Dated : 29 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

       

 
निकालपत्र :- (दि.29/08/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
(01)       प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना रजि.नोंद डाकने नोटीस पाठवली असता नोटीस लागू होऊन त्‍याची पोहोच सदर कामी दाखल आहे. परंतु सामनेवाला प्रस्‍तुत कामी हजर झाले नाहीत किंवा त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणेही सदर कामी दाखल केलेले नाही. तक्रारदाराचे वकीलांचा  युक्‍तीवाद ऐकणेत आला.
 
           सदरची तक्रार तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्‍यामुळे दाखल करणेत आला आहे. 
 
(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- यातील तक्रारदार क्र.1 व 2 यांचा मयत मुलगा व तक्रारदार क्र.3 यांचे मयत पती उमेश विठ्ठल येरुडकर यांनी सामनेवाला यांचेकडे पॉलीसी क्र.REG1720436  अन्‍वये रक्‍कम रु.60,000/- इतक्‍या रक्‍कमेची आपले कुटूंबाचे कल्‍याणाकरिता ईझी लाईफ प्‍लस युनिट लिंक्‍ड इन्‍शुरन्‍स पॉलीसी दि.17/10/2007 रोजी उतरवली होती. सदर पॉलीसीची मुदत दि.17/10/2017 पर्यंत होती. मयत उमेश विठ्ठल येरुडकर यांनी सामनेवाला शाखा कार्यालयामध्‍ये वेळोवेळी पॉलिसी घेतलेपासून विम्‍याचे तिमाही हप्‍ते पॉलीसीच्‍या अटी वशर्तीप्रमाणे वेळेवर भरलेले होते.
 
           तक्रारदार क्र. 1 व 2 यांचा मयत मुलगा व तक्रारदार क्र.3 यांचे मयत पती उमेश विठ्ठल येरुडकर हे दि.15/06/2008 रोजी मोटर अपघाताने मयत झालेले आहेत. त्‍यांचे पश्‍चात तक्रारदारांनी सामनेवाला कंपनीचे कार्यालयाचे संबंधीत शाखेकडे मयत उमेश येरुडकरचे अपघाती मृत्‍यूचा क्‍लेम दाखल केलेला होता. त्‍यानुसार सामनेवालांकडे संपूर्ण कागदपत्रे दाखल केली होती. तरीही सामनेवाला कंपनीने दि.07/12/2010 रोजीच्‍या पत्रानुसार चुकीचे कारण देऊन तक्रारदाराचा विमा क्‍लेम नामंजूर केलेचे कळवले.
 
           मयत उमेश येरुडकर हे सामनेवाला विमा कंपनीचे शाखा कार्यालयातील विमा प्रतिनिधीही होते. त्‍यांनी ब-याच लोकांची विमा पॉलीसी उतरवून सामनेवाला इन्‍शुरन्‍स कंपनीचे व्‍यवसाय वृध्‍दीस हातभारही लावलेला होता. मयत उमेश येरुडकर यांनी उत‍रविलेल्‍या इतर विमा पॉलीसीचे कमिशनही मयत उमेश येरुडकर यांचे पश्‍चात तक्रारदारांना देणे सामनेवालांवर बंधनकारक आहे. असे असताना केवळ तक्रारदारांना मृत्‍यू क्‍लेमची रक्‍कम व विमा कमिशन देणे लागू नये म्‍हणून तक्रारदारांचा विमा क्‍लेम नामंजूर केला आहे.
 
           त्‍यानंतर तक्रारदार यांनी दि.02/04/2011 रोजी आपले वकीलांमार्फत नोटीस पाठवून सदर विमा क्‍लेमची मागणी केली. सदर नोटीस दि.05/04/2011 रोजी सामनेवाला यांना लागू होऊनही त्‍यांनी सदर नोटीसला उत्‍तर दिलेले नाही अथवा तक्रारदारांना क्‍लेमची रक्‍कम दिलेली नाही. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब प्रस्‍तुतची तक्रार मंजूर करुन पॉलीसीची रक्‍कम रु.60,000/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/-, व तक्रारीचा टायपिंग, झेरॉक्‍स, कोर्ट फी स्‍टॅम्‍प, पोस्‍टेज खर्च रु.3,000/- सामनेवाला यांचेकडून व्‍याजासह वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ उमेश विठ्ठल येरुडकर यांचा मृत्‍यू दाखला, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिलेले पत्र, तक्रारदाराने सामनेवाला यांना वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस, त्‍याची पोष्‍टाची पावती व पोहोच पावती इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(4)        सामनेवाला यांना नोटीस लागू होऊनदेखील ते सदर कामी हजर झालेले नाहीत तसेच लेखी म्‍हणणेही दाखल केलेले नाही.
 
(06)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच तक्रारदाराचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?                 --- होय.
2) काय आदेश ?                                      --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 व 2 :- तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत उमेश विठ्ठल येरुडकर यांनी सामनेवाला यांचेकडे पॉलीसी क्र.REG1720436  अन्‍वये रक्‍कम रु.60,000/- इतक्‍या रक्‍कमेची ईझी लाईफ प्‍लस युनिट लिंक्‍ड इन्‍शुरन्‍स पॉलीसी दि.17/10/2007 रोजी उतरवली होती ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच मयत उमेश विठ्ठल येरुडकर यांचा दि.15/06/2008 रोजी मोटर अपघातामध्‍ये मृत्‍यू झालेनंतर तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे विमा क्‍लेमची मागणी केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.07/12/2010 रोजी विमाधारकाची सदर पॉलीसी लॅप्‍समध्‍ये गेली असलेने क्‍लेम नाकारलेचे कळवलेले आहे.
 
           सामनेवाला यांना मयत उमेश विठ्ठल येरुडकर यांचा मृत्‍यू हा अपघाती असलेचे मान्‍य आहे. तसेच मरणोत्‍तर पंचनामा व शवविच्‍छेदन अहवालावरुन विमाधारकाचा अपघाती मृत्‍यू झालेचे निर्विवाद आहे. याबाबत वाद नाही. परंतु विमाधारकाने विमा हप्‍ता वेळेत न भरलेने पॉलीसी लॅप्‍समध्‍ये गेली असलेने विमा दावा नाकारलेचे कळवलेले आहे. तसेच सदर पॉलीसीचा हप्‍ता भरणेचा कालावधी हा दि.17/04/2008 या दिवशी हप्‍ता न भरलेने पॉलीसी लॅप्‍स झाली आहे तसेच त्‍यानंतर दि.17/05/2008 अखेर संपणा-या ग्रेस कालावधीतही रक्‍कम भरलेली नाही. त्‍यामुळे पॉलीसी कराराच्‍या आर्टीकल 5.1 नुसार पॉलीसी लॅप्‍स झालेमुळे मृत्‍यू दावा देता येत नाही असे कळवलेचे दिसून येते. तक्रारदाराने दि.02/04/2011 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठवलेली आहे. सदर नोटीस सामनेवाला यांना पोहोच झालेली आहे. तशी पावती सदर कामी दाखल आहे तरीही सामनेवाला यांनी त्‍यास कोणतेही उत्‍तर दिलेले नाही.
 
           वस्‍तुत: हप्‍ता भरणेबाबत विमा कंपन्‍याकडून पत्र अथवा मोबाईलवर हप्‍ता भरणेबाबत संदेश/सुचना दिली जाते. सदर बाबीचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारास सदर विमा हप्‍ता भरणेबाबत कळवलेचे अथवा तसे पत्र दिलेचे कुठेही दिसून येत नाही किंवा क्‍लेम नाकारलेल्‍या पत्रात सामनेवाला यांनी तसा उल्‍लेख केलेला नाही. तसेच सामनेवाला हे सदर कामी नोटीस लागू होऊनही हजर झालेले नाहीत तसेच लेखी म्‍हणणेही दाखल केलेले नाही. यावरुन सामनेवाला यांना सदर तक्रार मान्‍य असलेचे दिसून येते. विमाधारकाचा मृत्‍यू झालेनंतर क्‍लेम दावा प्राप्‍त झालेनंतर पॉलीसी लॅप्‍स झालेचे सांगून क्‍लेम नाकारला आहे. तसेच मे. मंचाची नोटीस लागू होऊनही तसेच तक्रारदाराची वकील नोटीस पोहोचूनही त्‍यास कोणतेही उत्‍तर दिलेले नाही. तसेच लेखी म्‍हणणे दाखल करुन युक्‍तीवाद केलेला नाही. याचा विचार करता तक्रारदाराची तक्रार पुराव्‍यानिशी खोडून काढणेची जबाबदारी सामनेवाला यांची आहे. यासाठी हे मंच खालील पूर्वाधार विचारात घेत आहे.
 
AIR 1999 SUPREME COURT 1441 S. SAGHIR AHMAD AND D.P.WADHWA Civil Appeal No.1534 of 1999 D/- 17-3-1999 (A) Evidence Act (I of 1872) S.114- Adverse inference-Party to suit- Not entering the withness box-Give rise to inference adverse against him.
 
I(2000) CPJ 336 ANDHRA PRADESH STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, HYDERABAD – LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA & ANR. VS. KOMURAVELLI RAMA RATNAM- F.A.No. 262 of 1996 decided on 09.11.1999- Consumer Protection Act, 1986-Section 15-Appeal-Life Insurance-Premium due on 28.1.1994 received by Life Insurance Corporation on 14.2.1994 without objection-Life Insurance Corporation estopped from raising contention after death of insured that policy in lapsed condition, premium mistakenly received-Earlier two years premium if not p[aid, insured should have been informed-Policy cannot be revived after his death-Clear lapse and deficiency in service on part of LIC-Complainant entitled to insured amount along with bonus and other benefits.
 
 
           वरील विस्‍तृत विवेचन पूर्वाधाराचा विचार करता तसेच तक्रारदार हा सामनेवालांकरिता विमा प्रतिनिधी म्‍हणून काम करीत होता. तसेच त्‍यांचे व्‍यवसायाचे वृध्‍दीस त्‍याने हातभार लावलेला आहे. तसेच त्‍याचे कमिशनसुध्‍दा सामनेवाला यांनी दिलेला नाही. सदर कमिशन दयावे लागू नये म्‍हणून सद मृत्‍यू दावा नाकारुन सेवात्रुटी केलेबाबत तक्रारदाराने प्रतिपादन केले आहे. सदर बाबींचा विचार करता नमुद विमाधारकास सामनेवाला यांचे कार्यपध्‍दतीचे नियमांचे विमा प्रतिनिधी म्‍हणून काम करत असलेने ज्ञान होते. तसेच त्‍याचा मृत्‍यू हा दि.15/06/2008 रोजी झालेला आहे. सदर पॉलीसीचा कालावधी हा दि.17/10/2017 संपणार होता. तो मयत झालेवर संपूर्ण कागदपत्रे विमा कंपनीकडे दाखल केली असतानाही दि.07/12/2010 रोजी म्‍हणजे जवळजवळ तक्रारदाराचा दावा नाकारलेला आहे. सदर दावा नाकारणेमध्‍ये अडीज वर्षाचा कालावधी घेतलेला आहे. ही सामनेवालांचे सेवात्रुटी आहे. तसेच पॉलीसी लॅप्‍स झालेबाबत कोणतीही सुचना तक्रारदारास दिलेली नाही. अशाप्रकारे विमा दावा नाकारुन विमा धारकाच्‍या मृत्‍यूचा अनुचित फायदा सामनेवाला यांना घेता येणार नाही. सबब तक्रारदाराचा न्‍याय योग्‍य क्‍लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब तक्रारदार विमा पॉलीसीप्रमाणे रक्‍कम रु.60,000/- क्‍लेम नाकारलेपासून संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारुन केलेल्‍या सेवात्रुटीमुळे तक्रारदार मानसिक त्रास व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
                           आदेश
 
 
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा पॉलीसीप्रमाणे रक्‍कम रु.60,000/-(रु.साठ हजार फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.07/12/2010 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.
 
3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्‍त) अदा करावेत.
 
          
        
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT