Maharashtra

Ahmednagar

CC/17/88

Sudam Shankar Salunke - Complainant(s)

Versus

Branch Officer, Bhaichand Hirachand Raisoni Multi-State Co-op. Society Ltd. - Opp.Party(s)

Sole N. N.

10 Feb 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/17/88
( Date of Filing : 10 Mar 2017 )
 
1. Sudam Shankar Salunke
Nagar-Kalyan Road, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Kirti Sudam Salunke
Nagar-Kalyan Road, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Officer, Bhaichand Hirachand Raisoni Multi-State Co-op. Society Ltd.
Branch Aadte Bajar, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Chief Officer/Main Manager, Bhaichand Hirachand Raisoni Multi-State Co-op. Society Ltd.
Poonam Chembars, Bank street, Navi peth, MIDC, Jalgaon,
Jalgaon
Maharashtra
3. Chairman , Bhaichand Hirachand Raisoni Multi-State Co-op. Society Ltd.
E-2,3,4,5 Raymond Chufuly,MIDC, Ajintha Road,
Jalgaon
Maharashtra
4. Vice Chairman, Bhaichand Hirachand Raisoni Multi-State Co-op. Society Ltd.
E-2,3,4,5 Raymond Chufuly,MIDC, Ajintha Road,
Jalgaon
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:Sole N. N. , Advocate for the Complainant 1
 
Dated : 10 Feb 2021
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – १०/०२/२०२१

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.   तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अंतर्गत सदर  तक्रार दाखल केलेली आहे.

२.     तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, सामनेवाले क्रमांक २ या पतसंस्‍थेच्‍या आडतेबाजार, अहमदनगर या शाखेमध्‍ये ठेवी ठेवलेल्‍या होत्‍या. त्‍याचा तपशील पुढीलप्रमाणे .

अ.नं.

ठेवीदाराचे नाव

पावती नं./ खाते नं.

देय तारीखपरतीची तारीख

मुदतीनंतर (देय) मिळणारी रक्‍कम

१.

सुदाम शंकर साळुंके

८५७२१७

२८.१.१५

१,४६,९००/-

२.

  -do-

आवर्ती १०४/१५१

२५.६.१४

९०,०००/-

३.

किर्ती सुदाम साळुंके

१०४/१५९

१६.११.१४

८०,०००/-

४.

सुदाम शंकर साळुंके

एस ए व्‍ही आय/३ एस.ए.व्‍ही. आय 

२८.६.१५

३,१२३/-

     
                                                                                                      एकुण क्‍लेम रूपये ३,२०,०२३ + देय तारखेपासुन व्‍याज

३.    सामनेवाले क्र.१ यांनी २०१४ मध्‍ये पतसंस्‍थेचे व्‍यवहार बंद केलेले आहे. तसेच नोंदी घेणे व ठेवी देणे बंद केले होते. त्‍यामुळे वर नमुद परिच्‍छेदामधील ठेवी तक्रारदाराला मिळालेल्‍या नाही व सामनेवालेने तक्रारदाराचे मागणीकडे पुर्ण दुर्लक्ष केलेले आहे. त्‍यामुळे तक्रारदाराने सामनेवालेकडुन वर नमुद ठेवींमधील रक्‍कम व्‍याजासह मिळणेसाठी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अन्‍वये सदर आयोगाकडे दाखल केलेली आहे.

४.    सामनेवाले सदर तक्रारीबाबत नोटीस घेऊनही प्रकरणात हजर झाले नाही. सबब निशाणी १ वर सामनेवाले क्रमांक १ यांचेविरूध्‍द प्रकरण एकतर्फा  चालविणेचा आदेश पारीत करण्‍यात आला होता. तक्रारदाराने निशाणी २४ वर पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे. तसेच निशाणी २५ वर तक्रारदाराने लेखी युक्तिवादही दाखल केलेला आहे. तक्रारदाराने तक्रारीसोबत मुदत ठेव पावती,  आवर्ती खाते पासबुक व सामनेवाले यांना दिलेली नोटीस दाखल केलेली आहे. तक्रारदाराने दाखल केलेले वर नमुद दस्‍तऐवज, तक्रार व शपथपत्र पुराव्‍यावरून असे दिसुन येते की, सामनेवालेने तक्रारदाराकडुन मुदत ठेवी स्विकारून मुदतीनंतर परत केलेल्‍या नाहीत. सदर सामनेवालेची बाब तक्रारदाराप्रती अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब आहे, असे सिध्‍द होते. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतीम आदेश

१.  तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

२.  सामनेवालेने तक्रारदाराकडुन घेतलेल्‍या मुदत ठेवीची रक्‍कम तसेच खात्‍यात ठेवलेली एकुण रक्‍कम रूपये ३,२०,०२३/- (अक्षरी रूपये तीन लाख वीस हजार तेवीस) तक्रारदाराला सामनेवालेने दिनांक १०-०३-२०१७ दिनांक पासुन द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह रक्‍कम अदा होईपर्यंत द्यावे.

३. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना शारीरीक मानसिक त्रासापोटी प्रत्‍येकी रूपये १०,०००/- (अक्षरी रूपये दहा हजार) व तक्रारीचा खर्च  रूपये ५,०००/- (अक्षरी रूपये पाच हजार) द्यावे.   

४.  वर नमुद आदेशाची पुर्तता सामनेवालेने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांचे आत करावी.

५. आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्‍य देण्‍यात यावी.

६.  सदर प्रकरणाची ‘क’ व ‘ब’ फाईल तक्रारदार यांना परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.