Maharashtra

Akola

CC/14/175

Viththal Namdeorao Wankhade - Complainant(s)

Versus

Branch Officer, Bank of Maharashtra - Opp.Party(s)

Surujushe

15 Jan 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/14/175
 
1. Viththal Namdeorao Wankhade
R/o.Ekvira Vidyut Colony,Navsari, Amravaati
Amravati
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Officer, Bank of Maharashtra
Branch Kurum,Tq. Murtizapur
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'BLE MR. Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: आ दे श :::

( पारीत दिनांक : 15/01/2016 )

आदरणीय अध्‍यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार

 

      सदर प्रकरण तक्रारकर्ते यांनी दाखल केल्यानंतर,  मंचाने विरुध्पक्षाला नोटीस काढली होती.  विरुध्दपक्ष प्रकरणात हजर होवून त्यांनी लेखी जबाब दाखल करुन मंचाच्या असे निदर्शनास आणुन दिले की, तक्रारकर्ते यांनी या प्रकरणाच्या आधी विरुध्दपक्षाविरुध्द प्रकरण क्र. 184/2013 दाखल केले होते,  त्यातील वाद व ह्या प्रकरणाचा वाद मुद्दा सारखा आहे.  सदर प्रकरण क्र. 184/2013  मंचाने दि. 18/10/2014 रोजी खारीज केले असल्यामुळे तक्रारकर्ते पुन्हा असाच वाद घेवून मंचात येवू शकत नाही.  विरुध्दपक्षाने या प्रकणात तक्रार क्र. 184/2013 निकाल ता. 18/10/2014 चे रेकॉर्ड मागविण्याचा अर्ज दाखल केला,  मंचाने तो अर्ज मंजुर केला.  तक्रारकर्ते यांनी या प्रकरणाच्या आधी प्रकरण क्र. 184/2013 याच विरुध्दपक्षाविरुध्द मंचात दाखल करुन, मुळ ठेव पावतीची रक्कम विरुध्दपक्षाकडून सव्याज मिळावी, अशी विनंती केली होती.  मंचाने, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज व युक्तीवाद ऐकून, प्रकरण दि. 18/10/2014 रोजी खारीज केले होते.

      तक्रारकर्ते यांच्या या प्रकरणात ठेव पावती क्रमांक जरी वेगळा असला तरी ह्या ठेव पावतीचा संबंध या आधीच्या प्रकरणात निकाली काढल्या गेलेल्या मुळ ठेव पावतीशी जुळत असल्यामुळे पुन: हाच वाद मुद्दा मंचाला तपासता येणार नाही.  तक्रारकर्ते यांनी मंचाचे प्रकरण क्र. 184/2013 मधील दि. 18/10/2014 रोजीचे मंचाचे आदेशास वरीष्ठ न्यायालयात आव्हान दिले नव्हते,  त्यामुळे सदर आदेश आता अंतीम झाले आहेत.  त्यामुळे एक निकाली निघालेला वाद मुद्दा पुन: तपासणे योग्य राहणार नाही.  सबब प्रकरण खारीज करुन अंतीम आदेश पारीत केला.

:::अं ति म  आ दे श:::

  1. तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येते.
  2. न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारीत नाही.

सदर आदेशाच्‍या प्रती संबंधीतांना निशुल्‍क देण्‍यात याव्‍या. 

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'BLE MR. Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.