( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या ) आदेश ( पारित दिनांक :16 नोव्हेबर 2010 ) तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार सहारा इंडिया फायनान्सियल कार्पोरेशन लिमीटेड यांनी ग्राहकांकरिता एक योजना राबवुन ग्राहकांनी गैरअर्जदार यांचेकडे रुपये 6,000/-, 72 महिन्याचे कालावधी करिता रक्कम जमा केल्यास सदर जमा रक्कमेवर 10 टक्के दराने व्याजाची ती रक्कम होईल ती ग्राहकास प्रत्येक महिन्याला मिळेल (जसे 6000/- रुपयावर प्रतिमाह 50/- रुपये प्रमाणे) व सदर कालावधी (72 महीन्यांचा) संपल्यावर जमा रक्कम व त्यावर 12 टक्के बोनस देण्यात येईल. अशी योजना जाहीर केली होती. सदर योजनेत तक्रारदाराचे आजोबा श्री बापुराव गणपतराव गमे यांनी काही रक्कमा जमा केलेल्या होत्या. जमा रक्कम व त्यावर मिळणारे फायदे त्याचप्रमाणे ग्राहकाने काढलेली रक्क्म याचा तपशील खालीलप्रमाणे..... प्रमाणप क्रं. | जमा रक्कम | महिन्याचे व्याज 10 टक्के | बोनस | परिपक्वता रक्कम | एकुण | काढलेली रक्कम | एकुण मिळणारी रक्कम | 46200142313 | 18000/- | 150 | 2160 | 18000 | 30960 | 2800 | 28160 | 46200142314 | 18000/- | 150 | 2160 | 18000 | 30960 | 450 | 30510 | 46200142315 | 12000/- | 100 | 1440 | 12000 | 20640 | 500 | 20140 |
तक्रारदाराचे आजोबा श्री बापुराव गणपतराव गमे यांनी सदर योजनेरक्कम गुंतवितांना आपला मुलगा व तक्रारदाराचे काका नामे श्री रामदास गमे यांना आपला नामनिर्देशित व्यक्ति नेमले होते. परंतु श्री रामदास गमे मरण पावल्याने तक्रारदाराचे आजोबांनी तक्रारदारास आपला नामनिर्देशीत व्यक्ति नेमले. त्यानंतर तक्रारदाराचे दि. 23.9.2008 रोजी मृत्यु झाला. तक्रारदाराने गैरअर्जदारयांचेशी संपर्क साधुन त्यांच्या सुचनेवरुन वारसान प्रमाणपत्र प्राप्त केले व सदर योजनेची मुदत संपल्यावर गैरअर्जदार यांचेशी तक्रारदाराने संपर्क साधला असता त्यांनी नियमाप्रमाणे सदर रक्कम देण्याऐवजी दिनांक 26.6.2008 रोजी फक्त मुळ रक्कम व त्यावर मिळणारा बोनस असे एकुण 53,760/- रुपयेच अदा केले बाकी रुपये 25,250/- रु. तक्रारदारास दिले नाही ही गैरअर्जदार यांची कृती सेवेतील कमतरता आहे म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन रक्कम रुपये 25250/- परत करावे व सदर रक्कमेवर 23.3.2008 पासुन 18 टक्के दराने व्याज मिळावे तसेच तक्रारदारास झालेल्या त्रासापोटी रुपये 50,000/- मिळावे व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 20,000/- मिळावे अशी मागणी केली. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून दस्तऐवजयादी नुसार एकुण 5 कागदपत्रे दाखल केली. त्यात 3 प्रमाणपत्र व वारसान प्रमाणपत्र व पंजाब नॅशनल बॅकेंचा धनादेश इत्यादी कागदपत्रे आंहेत. सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रं. 1 यांना नोंदणीकृत डाकेने नोटीस देण्यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदार यांच्या कथनानुसार तक्रारदार ‘ ग्राहक ’नाही. सदरची तक्रार कालमर्यादेत नाही. सदरच्या तक्रारीस आरबिट्रेशन कॉल्जचीबाधा येते. सदरची तक्रार या मंचाच्या अधिकार क्षेत्रात नाही. गैरअर्जदार यांचे मते खातेदार व तसेच वारसाच्या मृत्युनंतर तक्रारदारास सदर खात्यातील रक्कम त्यांनी 6 वे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, नागपूर हयांच्याकडुन काढलेला वारस प्रमाणपत्राच्या आधारे देण्यात आली. (सक्सेशन केस नं.78/07 ) सदरची रक्कम तक्रारदारास दिनांक 11.10.2007 रोजी देण्यात आली. कुठलाही विरोध न दर्शविता तक्रारदाराने ती रक्कम स्विकारलेली आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांचेकडे काहीही देणे बाकी नाही. सदर प्रकरणात वारसदाराचा मृत्यु झाल्यावर खातेदाराचा देखील मृत्यु झाला. परंतु आपल्या हयातीत सदर खातेदाराने नामनिर्देशीतव्यक्तिबदलला नाही. खातेदाराच्या मृत्युनंतर वारसदार खाते स्वतःच्या नावावर परिवर्तीत करुन मासिक व्याज मागु शकतो. परंतु तसा अर्ज कुणी केला नाही. तसेच योजनेच्या अटी व शर्तीनुसार केवळ खातेदारच मासीक व्याज मागु शकतो. म्हणुन तक्रारदारास मासीक व्याज मागण्याचा अधिकार नाही. गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्यापोटी वरिष्ठ न्यायालयाचे काही न्याय निवाडयांवर आपली भिस्त ठेवलेली आहे व सदरची तक्रार खोटी असुन खारीज करावी अशी विनंती केली आहे. -: कारणमिमांसा :- प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करता, निर्वीवादपणे तक्रारदार हा ‘ लाभार्थी ’ या नात्याने गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. तसेच गैरअर्जदार यांनी देय रक्कमेपैकी काही रक्कम दिनांक 26.6.2008 रोजी तक्रारदारास अदा केलेली होती. त्या तारखेपासुन दोन वर्षाच्या आत तक्रारदाराने सदर तक्रार या मंचात दाखल केली ते पाहता सदरची तक्रार कालमर्यादेत आहे. तसेच या मंचाच्या अधिकारक्षेत्रात आहे. असे या मंचाचे मत आहे. निर्वीवादपणे तक्रारदाराचे आजोबा श्री बापुराव गणपतराव गमे यांनी गैरअर्जदार यांच्या योजनेमध्ये अनुक्रमे रक्कम रुपये 18,000/-, 18,000/- व 12,000/- एवढी रक्कम 10 टक्के व्याजाने गुंतविलेली होती. योजनेप्रमाणे मुळ रक्कम,व्याज व मान्य केलेला बोनस (अनुक्रमे रुपये 2160/-, 2,160, व 1440/-) विचारात घेता तक्रारदारास तिनही प्रमाणपत्रानुसार एकंदर रुपये 82,560/- एवढी रक्कम मिळावण्यास हवी होती. (त्यापैकी गैरअर्जदार यांनी रु.53,760/- एवढी रक्कम दिनांक 20.6.2008 रोजी तक्रारदारास अदा केलेले होती असे निर्देशनास येते. म्हणजेच 82560 –53760=28800/- एवढी रक्कम गैरअर्जदाराकडे देय होती.) त्यापैकी मासीक व्याजातील ग्राहकाने रुपये 6,800/- एवढी रक्कम उचलल्याचे शपथेवरील कथनात म्हटलेले आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार यांच्या जवाबाला कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांचे हे म्हणणे मंच मान्य करते. म्हणजेच 28,800- 6,800= 22,000 एवढी रक्कम गैरअर्जदार यांचकडे देय असल्याचे दिसुन येते. गैरअर्जदार यांचे मते मासीक व्याज मागण्याचा अधिकार योजनेतील अटी व शर्तीनुसार केवळ खातेदारांनाच आहे. परंतु गैरअर्जदार यांनी आपल्या या म्हणण्यापोटी कुठलाही पुरावा दस्तऐवज सादर केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांचे हे म्हणणे या मंचाला मान्य करता येणार नाही. तक्रारदाराने अनभिज्ञपणे त्यावेळेस सदरचीरक्कम गैरअर्जदाराकडुन स्विकारली तरी तक्रारदाराने सदर तक्रार दाखल केली म्हणजेच त्याला स्विकारलेल्या रक्कमेबाबत आक्षेप आहे. जरी तक्रारदाराने आक्षेप न घेता रक्कम स्विकारली तरी त्यामुळे कायदेशिररित्या व नियमाप्रमाणे तक्रारदाराला देय असलेल्या लाभापासुन तो वंचीत ठेऊ शकत नाही. वरील वस्तु आणि परिस्थीती पाहता हे मच या निष्कर्षाप्रत येते की,तक्रारदार नियमाप्रमाणे मिळणा-या व्याजाची रक्कम मिळण्यास पात्र आहे. सबब आदेश -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर 2. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास रुपये 22,000/- परत करावे. सदर रक्कमेवर दिनांक 20.6.2008 पासुन ते रक्कम मिळेपर्यत 12 टक्के द.सा.द.शे. दराने व्याज दयावे. 3. तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रुपये 3,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रुपये 2,000/- द्यावेत. सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER | |