Maharashtra

Nanded

CC/08/402

Ramkishan Ragunath Gangalal - Complainant(s)

Versus

Branch Manger,Oriental insurance company,Nanded - Opp.Party(s)

Adv.Abhijit Ashokrao Choudhari

16 May 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/402
1. Ramkishan Ragunath Gangalal Datta nagar,NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Branch Manger,Oriental insurance company,Nanded G.G.road,Nanded.NandedMaharastra2. The orinental insurance company limited,Brance Manger,Branch Merchante Chamber,2nd flower Nisike.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 16 May 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
प्रकरण क्र.402/2008
                                                     प्रकरण दाखल दिनांक  30/12/2008.
                                                     प्रकरण निकाल दिनांक 16/05/2009.
                                                   
समक्ष         -    मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील       अध्‍यक्ष.
                       मा. श्री.सतीश सामते.                सदस्‍य.
 
रामकशिन रघुनाथ गंगवाल
वय, 45 वर्षे, धंदा, व्‍यापार,                                 अर्जदार रा. दत्‍त नगर, नांदेड.
 
विरुध्‍द
 
1.   दि ओरिएंटल इन्‍शूरंन्‍स कंपनी लि.
     तर्फे शाखाधिकारी/ब्रॅच मॅनेजर,
     शाखा जी.जी.रोड, नांदेड.                             गैरअर्जदार
2.   दि ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
     तर्फे शाखाधिकारी/ब्रॅच मॅनेजर,
     शाख मर्चट चेंबर्स, दूसरा मजला,
     तिलक पथ, नाशिक-422 001.
अर्जदारा तर्फे            - अड.अभिजीत चौधरी.
गैरअर्जदारा तर्फे          - अड.एस.व्‍ही.राहेरकर
निकालपत्र
(द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
 
              गैरअर्जदार दि ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी लि. यांच्‍या सेवेच्‍या ञूटी बददल   अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे.
              अर्जदार हे टेम्‍पो नंबर एम.एच.-15-बीजे-1050 या ट्रकचे मालक असून सदरील ट्रक अर्जदाराने अरुण टी. जैन रा. पिंपळगांव जि.नाशिक यांचेकडून इन्‍शूरन्‍स पॉलिसीसह दि.4.1.2007 रोजी विकत घेतले आहे. हा टेम्‍पो चालविण्‍यासाठी  केरबा देवलाजी रानडे रा.गडगा ता. बिलोली यांना चालक म्‍हणून नौकरीस ठेवले होते. हे वाहन दि.6.3.2007 रोजी नरसीहून नांदेड कडे परत येत असताना 9.15 वाजता कापसी या गावाजवळ समोरुन येणा-या ट्रक नंबर एम.एच.34-एम-786  या चालकाने बेशिस्‍तपणे वाहन चालवून अर्जदाराच्‍या टेम्‍पोस जबरदस्‍त धडक दिली. त्‍यात अर्जदाराच्‍या टेम्‍पोचे खूप नूकसान झाले. अर्जदाराने पोलिस स्‍टेशन, उस्‍माननगर यांचेकडे तक्रार दिली आहे. अपघातग्रस्‍त वाहनाचा विमा गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडून काढलेला आहे व त्‍यांचा कालावधी दि.18.08.2006 ते 17.08.2007 असा आहे. अपघाताची सूचना प्राप्‍त झाल्‍यावर गैरअर्जदार यांनी सर्व्‍हेअर नेमून टेम्‍पोच्‍या नूकसानीचे निरीक्षण करण्‍यास सांगितले. त्‍याप्रमाणे त्‍यांनी घटनास्‍थळी भेट देऊन सर्व्‍हेअरचा अहवाल गैरअर्जदार यांना दिला. सर्व्‍हेअरच्‍या सांगण्‍यावरुन वाहन घटनास्‍थळावरुन काढून वाहनाची दूरुस्‍ती केली व तो खर्च रु.2,50,000/- इतका आला. त्‍यांच्‍या दूरुस्‍तीचे मूळ बिल अर्जदाराने गैरअर्जदार यांना दिलेले आहे. अर्जदार यांनी क्‍लेम दाखल केल्‍यापासून गैरअर्जदार यांचेकडे वारंवार चकरा मारुनही त्‍यांनी नूकसान भरपाई मंजूर केली नाही व शेवटी दि.26.09.2007 रोजी गैरअर्जदार कंपनीने वाहनाची इन्‍शूरन्‍स पॉलिसी अरुण टी.जैन यांचे नांवाने असल्‍याकारणाने क्‍लेम देण्‍यास नकार दिला. असे करुन गैरअर्जदाराने सेवेत ञूटी केल्‍यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदारास दि.6.3.2007 रोजी पासून 18 टक्‍के व्‍याजाने रु.2,50,000/- व मानसिक ञासापोटी रु.20,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.10,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळावेत अशी विनंती केली आहे.
              गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी दावा दाखल करण्‍यास लोकसस्‍टॅडी व कॉज ऑफ अक्‍शन नाही. गैरअर्जदार यांचेकडून सेवेत कोणतीही ञूटी झालेली नाही. वस्‍तूस्थितीत गैरअर्जदाराने अपघातग्रस्‍त वाहन नंबर एम.एच.-15-बीजे-1050 या वाहनाचा विमा श्री.अरुण टी. जैन या नांवाने दिलेला असून त्‍यांचा कालावधी दि.18.08.2006 ते 17.08.2007 असा होता. अपघाताची तारीख दि.06.03.2007 अशी आहे. परंतु वाहनाच्‍या नोंदणी पूस्‍तकात अर्जदार रामकीशन गंगवाल यांचे नांव मालक म्‍हणून दि.27.1.2.2006 रोजी आर.टी. ओ. ने त्‍यांचे रजिस्‍ट्ररमध्‍ये घेतलेले आहे. अपघाताच्‍या दिवशी वाहनाची पॉलिसी ही अरुण टी. जैन यांचे नांवावर होती. त्‍यामूळे सध्‍याचा अर्जदाराचा गैरअर्जदाराने दिलेल्‍या पॉलिसीमध्‍ये काहीही संबंध नाही. त्‍यामूळे गैरअर्जदार यांनी दावा नाकारलेला आहे तो योग्‍य आहे.
 
                मोटार वाहन कायदा कलम 157(2) प्रमाणे ज्‍या व्‍यक्‍तीच्‍या नांवे वाहनाची नोंद आर.टी. ओ. कार्यालयामध्‍ये झालेली असेल म्‍हणजेच नांव परिवर्तन झाले असेल तर त्‍यांनी सदरील परिवर्तनाच्‍या तारखेपासून 14 दिवसांच्‍या आंत विमा पॉलिसी मध्‍ये तशा प्रकारचा बदल म्‍हणजेच त्‍यांच्‍या नांवाने पॉलिसी करुन घेणे बंधनकारक आहे.
 
              लॉस असेंसर श्री.संपत जयंत यांची मोटर फायनला सर्व्‍हे रिपोर्ट साठी नेमणूक केली असताना त्‍यांनी सर्व्‍हे करुन व बिल चेक करुन एकूण रु.69,500/- चे नूकसान दाखवलेले आहे. पण ही देण्‍याची जबाबदारी गैरअर्जदारावर येत नाही. नियमाप्रमाणे कारवाई केल्‍यामूळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीश करावी असे म्‍हटले आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                               उत्‍तर 
1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्‍द
       करतात काय  ?                                  होय.                     
 2. काय आदेश ?                         अंतिम आदेशाप्रमाणे
                          कारणे
मूददा क्र.1 ः-
              अर्जदार यांची पॉलिसी नंबर 171700/31/2007/2673 ही पॉलिसी गैरअर्जदार यांना मान्‍य आहे. फक्‍त वाद आहे तो नवीन मालकी हक्‍क ट्रान्‍सफर झाल्‍याबददलचा. अर्जदाराने जी पॉलिसी दाखल केलेली आहे त्‍यावर अरुण टी. जैन रा. पिंपळगांव जि.नाशिक  यांचे नांव आहे. ही पॉलिसी एम.एच.-15-बीजे-1050 या ट्रक वाहनासाठी घेतलेली आहे. दि.09.03.2007 रोजी सदरील वाहनाचा अपघात झाला यात समोरुन येणा- ट्रकने नरसी या गांवाजवळ अर्जदाराच्‍या वाहनास धडक दिली व यात टेम्‍पोचे नूकसान झाले. पोलिस स्‍टेशन, उस्‍माननगर येथे एफ.आय.आर. दाखल झाला असून त्‍यांची प्रत तसेच घटनास्‍थळ पंचनामा, या प्रकरणात दाखल आहे व अपघात झाल्‍याबददल गैरअर्जदार यांना आक्षेपही नाही. आक्षेप एवढाच आहे की, अपघात झाला त्‍या दिवशी म्‍हणजे दि.09.03.2007 रोजी आर सी. बूकात अरुण टी. जैन यांचे नांवाच्‍या ऐवजी रामकीशन गंगवाल यांचे नांव होते व अर्जदार यांनी सूरुवातीस आपल्‍या तक्रार अर्जात त्‍यांनी हा ट्रक दि.04.01.2007 रोजी अरुण टी. जैन यांचेकडून विकत घेतला आहे असे म्‍हटले आहे. गैरअर्जदार यांचे मते पॉलिसीच्‍या नियमाप्रमाणे व मोटार वाहन कायदा 157 (2)  प्रमाणे ज्‍या व्‍यक्‍तीच्‍या नांवाने वाहनाची नोंद आहे म्‍हणजे आर.टी. ओ. कार्यालयामध्‍ये कोणाचे नांवे परिवर्तन झाले असेल तर अशा प्रकारचा बदल 14 दिवसांचे आंत विमा कंपनीस या बदलाची सूचना देऊन पॉलिसी नवीन मालकाचे नांवाने ट्रान्‍सफर करुन घेणे बंधनकारक आहे. अशी नवीन मालकाने कोणत्‍याही प्रकारची सूचना विमा कंपनीस दिली नाही व पॉलिसी स्‍वतःचे नांवाने ट्रान्‍सफर करुन घेतली नाही म्‍हणजे अपघाताचे दिवशी जूने मालक अरुण जैन हेच आहेत व विमा कंपनीचा नवीन मालकाशी कोणताही करार नव्‍हता म्‍हणून दावा देय नाही. असे म्‍हणून दावा नाकारला जरी असला तरी हे नियम Mandatory म्‍हणजे बंधनकारक नाही. म्‍हणजे विमा हा वाहनाचा घेतला जातो व वाहनाचा नंबर एम.एच.-15-बीजे-1050 आहे व विमा हा या वाहनावर आहे. पॉलिसी ही नवीन मालकाच्‍या नांवाने ट्रान्‍सफर जरी झाली नसली तरी ज्‍या वाहनाचा विमा काढला ते वाहन तेच आहे. म्‍हणून वाहनाच्‍या झालेल्‍या नूकसानी बददल गैरअर्जदार आपली जबाबदारी टाळू शकत नाही. कारण विमा हा वाहन मालकाचा नाही तर वाहनाचा काढला आहे. यात वाहनाच्‍या मालकाचे स्‍वतःचे नूकसान झाले तर विमा कंपनी ती कोणतीही नूकसान भरपाई देणार नाही परंतु वाहनाचे नूकसान झाले तर त्‍यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. त्‍यामूळे पॉलिसी
 “ Runs with an vehicle and not with owner ”   म्‍हणून यात वाहन विकले म्‍हणजे विमा पॉलिसी वाहनासोबत आपोआप ट्रान्‍सफर होते व वाहनाचे नूकसान देण्‍यास गैरअर्जदार यांचेवर बंधन येते.
 
              सर्व्‍हेअर यांनी आपल्‍या शपथपञात असे स्‍पष्‍ट केलेले आहे की, वाहनाचे नूकसान रु.72,681/- झालेले आहे व यातून पॉलिसी एक्‍सेस व साल्‍व्‍हेज ही रक्‍कम वजा जाता नेट रु.69,500/-  चे नूकसान त्‍यांनी असेंस केलेले आहे. मा. राष्‍ट्रीय आयोग यांनी आपल्‍या निकालात स्‍पष्‍ट केले आहे की, सर्व्‍हेअर हा प्रथमदर्शनी लॉस असेंस करणारा व्‍यक्‍ती असतो त्‍यामूळे या सर्व्‍हे रिपोर्टला महत्‍व देण्‍यात आलेले आहे. याप्रमाणे सर्व्‍हे रिपोर्टला महत्‍व देण्‍यात येऊन अर्जदार यांनी बिल जरी दाखल केले असले तरी कूठले पार्टस बदलावयाचे व कूठले बदलावयाचे नाही यांचा निर्णय सर्व्‍हेअरच घेतात.  या कारणास्‍तव सर्व्‍हे रिपोर्ट प्रमाणे रक्‍कम मिळण्‍यास अर्जदार हे पाञ आहेत व ही रक्‍कम न देऊन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली आहे.
              यात जनरल रेग्‍यूलेशनसचे GR. 17. Transfers  दाखल केलेले आहे. तसेच मा.उच्‍च न्‍यायालय अलाहाबाद   2008 ACJ 2068   New India Assurance Com. Ltd Vs. Harpal Singh and others  या प्रकरणात वाहन हे नवीन मालकाचे नांवान हस्‍तांतरी झालेले होते परंतु विमा पॉलिसी ही त्‍यांचे नियमाप्रमाणे सूचना न मिळाल्‍यामूळे हस्‍तांतरी झाली नव्‍हती अशा परिस्थितीत त्‍यांनी गैरअर्जदार यांना या जबाबदारीतून मूक्‍त केलेले नाही.
 
              तसेच 2008 ACJ 1681 The High Court of Karnataka at Banglore   यात  United India Insurance Company Ltd. Vs. M.N. Ravikumar and others. यात देखील वाहनाची पॉलिसी नवीन मालकाचे नांवाने हस्‍तांतरीत झाली नव्‍हती व अपघात घडला. गैरअर्जदार यांचेवर पूर्ण नूकसान भरपाईची जिम्‍मेदारी टाकलेली आहे.
 
              गैरअर्जदार यांनी मा. राष्‍ट्रीय आयोग यांचे रिव्‍हीजन पिटीशन 2882/2003 National Insurance Company Vs. Banowarilal Agarwalla यात ए यांचे वाहन बी ला विक्री केले परंतु पॉलिसी हस्‍तातंरीत केली नाही तर ती अर्जदाराच्‍या नांवाने आहे, अपघात झाला, व वाहन त्‍यांचे नांवावर होते, अशा परिस्थितीत मूळ मालकास क्‍लेम मागता येऊ शकतो म्‍हणजे हे स्‍पष्‍ट आहे की, वाहनाचे क्‍लेम हा गैरअर्जदार यांना दयावा लागणार आहे तो मूळ मालक असून की नवीन मालक असो. गैरअर्जदार यांची जबाबदारी टळू शकत नाही. या प्रकरणात नवीन मालकाचे नांवाने वाहन हस्‍तांतरीत झालेले आहे त्‍यामूळे त्‍यांना रक्‍कम मिळाली पाहिजे.
                   वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                             आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
 
2.                                         गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत सर्व्‍हे रिपोर्टप्रमाणे रु.69,500/- व त्‍यावर दावा नाकारल्‍याची दि.20.06.2007 पासून 9 टक्‍के व्‍याजाने पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत व्‍याजासह अर्जदार यांना दयावेत.
 
3.                                         मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- मंजूर करण्‍यात येतात.
 
4.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)                                                (श्री. सतीश सामते)    
           अध्यक्ष.                                                                    सदस्‍य
 
 
 
जे.यु, पारवेकर
लघुलेखक.