- आदेश- नि. 1 वर -
( दि. 01-08-2018)
व्दारा : मा. श्री. विजयकुमार आ. जाधव, अध्यक्ष.
1) तक्रारदार यांनी सामनेवाला 1 बजाज अलियांझ लाईफ इन्शुरन्स कॉपोरेशन कं.लि, यांचेकडून दि.25-10-2007 रोजी "बजाज अलियांझ युनीट गेन प्लस गोल्ड साईज वन " नावाच्या प्लॅनची पॉलिसी उघडली होती. सदरचा पॉलिसीचा प्लॅन हा दरवर्षी रक्कम रु. 12,000/- प्रमाणे 10 वर्षे रक्कम भरल्यावर दि. 25-10-2017 रोजी पॉलिसीचा प्लॅन मॅच्युअर झालेनंतर रक्कम रु.1,20,000/- व अधिक त्यावरील व्याज रक्कम रु. 49,000/- अशी एकूण रक्कम रु.1,69,000/- तक्रारदार यांना सामनेवाला विमा कंपनी देणे लागत होती. तक्रारदारांनी सामनेवाला कंपनीकडे प्रत्येक वर्षी सदर पॉलिसीची रक्कम रु.12,000/- सामनेवाला 1 कडे रोख स्वरुपात जमा केली आहे व त्याच्या रितसर पॉलिसी रक्कम भरलेच्या पावत्या तक्रारदारास सामनेवाला यांनी दिलेल्या आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदारास पॉलिसीचे मॅच्युरटीनंतर रक्कम देणेस टाळाटाळ केली त्यामुळे तक्रारदाराने सामनेवालांकडून पॉलिसीची एकूण रक्कम रु.1,69,000/- व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.12,000/- तसेच सामनेवाला नोटीस पाठविली त्याचा खर्च रु.3,000/- अशी एकूण रक्कम रु. 1,94,000/- मिळणेसाठी तक्रारदारांना प्रस्तुत तक्रार अर्ज न्यायमंचात दाखल केलेला आहे.
2) नि. 13 वर तक्रारदार यांनी आज दि. 01-08-2018 रोजी पुरशीस दाखल केली आहे. तक्रारदार यांनी पुरशीसमध्ये नमूद केलेप्रमाणे सामनेवाला कंपनीने दि.5-03-2018 रोजी रक्कम रु.1,79,179/- (रक्कम रुपये एक लाख एकोणऐंशी हजार एकशे एकोणऐंशी फक्त) तक्रारदाराचे खात्यात जमा केलेली आहे. सबब, तक्रारदार सदरचा तक्रार अर्ज विनातक्रार काढून घेत आहेत. तक्रारदार यांची सामनेवाला यांचेकडून अन्य कोणतीही रक्कम मागणी नाही असे पुरशीसमध्ये नमूद केले आहे.
3) तक्रारदाराचे पुरशीसवर तक्रारदार व त्यांचे वकिलांनी सही केली आहे. सदरची पुरशीस मंचाने पडताळून पाहून मान्य केलेली आहे. सदर पुरशीसनुसार तक्रारदाराचा तक्रार अर्ज क्र. 4/2018 निकाली करणेत येतो. सबब, आदेश खालीलप्रमाणे.
- आ दे श -
1) तक्रार अर्ज नं. 4/2018 निकाली करणेत येतो.
2) तक्रारदार यांची दि.01-08-2018 रोजीची नि. 13 वरील पुरशीस ही या आदेशाचा एक भाग समजणेत यावी.
3) प्रकरण दप्तरी दाखल.
4) उभय पक्षकांराना सदरच्या आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.