जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 07/2009. प्रकरण दाखल तारीख - 07/01/2009 प्रकरण निकाल तारीख – 29/01/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य चंद्रकलाबाई भ्र.किशनराव मारकवाड, वय वर्षे 42, धंदा घरकाम, रा.महात्माफुलेनगर,भोकर ता.भोकर, अर्जदार. जि.नांदेड. विरुध्द. 1. शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार. भारतीय जिवन बिमा निगम, जिवन ज्योती, पेट्रोल पंपासमोर,भोकर, ता.भोकर जि.नांदेड. 2. प्रभाग व्यवस्थापक (डिव्हीजनल मॅनेजर) भारतीय जिवन बिमा निगम, गांधीनगर,नांदेड. 3. विभागीय व्यवस्थापक (झोनल मॅनेजर) भारतीय जिवन बिमा निगम, योगक्षम, इष्ट विंग, जिवन बिमा मार्ग, मुंबई. अर्जदारा तर्फे वकील - अड.यु.एस.संगारेडडीकर. गैरअर्जदार तर्फे वकील - - विलंब माफीचा अर्ज दि.26/01/2009 वरील आदेश. (द्वारा-मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) अर्जदाराचे पती किशनराव मारकवाड हे दि.05/04/1999 रोजी हदय विकाराच्या झटक्याने भोकर येथे मृत्यु पावलेले आहेत. त्यांनी नौकरी दरम्यान दि.30/06/1998 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांच्या कार्यालयातुन पॉलिसी ज्याचा क्र.982623899 टर्म – 14/13 एजंट नामे ए.आर.राठोड यांचेकडुन काढलेली आहे. अर्जदार यांचे पतीच्या मृत्युनंतर पॉलिसीची रक्कम मिळणेसाठी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे मागणी केली असता, गैरअर्जदार यांनी दि.15/05/1999 व दि.24/06/1999 रोजी अर्जदारास कागदपत्रांची पुर्तता करण्या विषयी कळविलेले आहे. त्यानंतर गैरअर्जदार यांनी दि.27/11/1999 रोजी अर्जदारास पॉलिसीच्या अटींचा भंग झाला म्हणुन किशनराव यांच्या पॉलिसीचा लाभ अर्जदार यांना देता येत नाही, असे कळविले आहे. त्यानंतर अर्जदार यांनी दिवाणी दावा क्र. 124/2000 हा दिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर यांचेकडे दाखल केला. सदरचा दिवाणी दावा दि.23/03/2001 रोजी ऑर्डर 7 रुल 11 सी.पी.सी.प्रमाणे नाकरण्यात आलेला आहे. त्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना वकीला मार्फत दि.10/12/2007 रोजी विमा क्लेमची रक्कम मागणीसाठी लिगल नोटीस पाठविलेली आहे. सदर नोटीसीस गैरअर्जदार यांनी दि.04/06/2008 रोजी उत्तर देऊन क्लेम नाकारले बाबत कळविलेले आहे. अर्जदार यांचा क्लेम दि.27/01/1999 रोजी गैरअर्जदार यांनी नाकारलेला आहे. अर्जदार यांनी सन 1999 पासुन दोन वर्षाच्या आंत सदरचा तक्रारअर्ज या ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचामध्ये सादर करणे आवश्यक होते पंरतु अर्जदार यांनी तसे केलेले नाही. क्लेम नाकारल्याच्या तारखेनंतर म्हणजे दि.27/11/1999 नंतर ते या ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये दि.07/01/2009 रोजी त्यांची तक्रार घेऊन आलेले आहेत. सदर अर्जासोबत त्यांनी विलंब माफीचा अर्ज दिलेला आहे परंतु विलंब माफीसाठी कोणतेही योग्य व संयुक्तीक कारण अर्जदार यांनी दिलेले नाही. त्यामुळे अर्जदार यांचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 24 अंतर्गत नामंजुर होणेस पात्र आहे,असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र, त्यांनी दाखल केलेले कागदपत्र व केलेला युक्तीवाद याचा विचार होता, आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदार यांचा अर्ज नामंजुर करण्यात येतो. 2. संबंधीतांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघूलेखक. |